Skip to main content

पंचमी

थेंब थेंब दहिवर
अंग अंग गहिवर
ओते चान्दण्याचा घडा
शुभ्र लाह्या भुईवर

लाह्या दुधाचा वाडगा
नाग चपळ बुजतो
केवड्याच्या पाना आड
हुंकार गतीचे भरतो

रत्ने थेंबांची वेचत
श्रावण उत्सवी नाग
पंचामृते ओसंडली
स्वप्नांना मन्दशी जाग

*****

राजेश घासकडवी Sat, 02/11/2013 - 01:26

शृंगारिक प्रतिमांनी भरलेली कविता आवडली.

अष्टाक्षरीची लय काही ठिकाणी ढळलेली आहे. ती सुंदरीच्या ढळलेल्या पदराप्रमाणे न वाटता नागाच्या हुंकारांच्या चुकलेल्या ठेक्याप्रमाणे वाटते :)