Skip to main content

गूज मनीचे १

1 minute

काल परवाची गोष्ट...९ वी तील पोर ..आईला म्हणते का जन्माला घातलस मला ? असंख्य विचारांचे तरंग उमटले..सहजिवनाची सुरुवात आठवली ,सर्व लोभस क्षण डोळ्या समोरून सरू लागले . लहानपनापासून दूर होस्टेल मध्ये शिक्षण.आई वडिलांचा माझ्या प्रगतीचा शुद्ध हेतु होता.लेकीने खूप शिकावे ,असे वाटत असताना माझ बालपण आई वडिलांच्या मायेला पारखं झालेलं.म्हणून पोटच्या लेकराला कधी दूर ठेवायच नाही अस समजायला लागल्यापासून ठरवून टाकल होत. आणि आज लेकीची मुक्ताफळ ऐकुन सुन्न झाल.का बोलली ती असं...

Node read time
1 minute

मन Mon, 25/11/2013 - 09:21

चार ओळी, सत्तर पंचाहत्तर शब्द.
शीर्षकातून हा "भाग १" असावा अशी शंका येते.
ऐसीवासीयांना ह्याबद्दल अ‍ॅडव्हान्स मध्ये शुभेच्छा.
.
.
.
तुम्हाला लिहिण्यात काही अडचण आहे का?
म्हणजे सुचतय पण टंकनश्रम फार प्डताहेत नवीन असल्यामुळं असं वाटतय का?
भानगड काय आहे?
व्यवस्थित लिहा पाहू.
तुमची सुरुवात चांगली आहे.
पण भस्सकन धागा थांबवल्यानं अगदि विरस होतोय.

मानस Tue, 26/11/2013 - 04:40

टंकन श्रम होतात त्यामुळे लिखाण वेगाने होत नाही.कशाप्रकारे लवकर लेखन करता येते काही सांगू शकल का?

तिरशिंगराव Tue, 26/11/2013 - 10:38

In reply to by मानस

'गमभन' हे सॉफ्टवेअर फ्री आहे. ते संगणकावर उतरवून घ्या. म्हणजे तुम्हाला टायपिंगला भरपूर वेळ देता येईल. तिथे लेखन पूर्ण झाल्यावर इथे फक्त कॉपी पेस्ट करा.

सविता Tue, 26/11/2013 - 11:19

मुलं किंवा फॉर दॅट मॅटर कोणीही रागाच्या भरात जे बोलतात, तेच त्यांना खरंच म्हणायचं असतं आणि ते त्यांच्या मनातले कायम्स्वरूपी भाव असतात असं नाही.

लेकीची मुक्ताफळं जेव्हा आली त्या पुर्वी काहीतरी घटना घडलीच असेल.

मनीषा Tue, 26/11/2013 - 18:01

मुलं किंवा फॉर दॅट मॅटर कोणीही रागाच्या भरात जे बोलतात, तेच त्यांना खरंच म्हणायचं असतं आणि ते त्यांच्या मनातले कायम्स्वरूपी भाव असतात असं नाही.

लेकीची मुक्ताफळं जेव्हा आली त्या पुर्वी काहीतरी घटना घडलीच असेल.

सहमत

आणि बर्‍याच वेळा मुलं मोठ्या लोकांच ऐकून बोलतात किंवा अनुकरण करतात. कदाचित त्यांना त्या बोलण्याचा अर्थ देखिल नक्की माहीती नसतो. त्या मुळे त्यांचं बोलणं प्रत्येकवेळी शब्दशः घेऊ नये.

ॲमी Tue, 26/11/2013 - 18:31

नविन धागा टाकण्याऐवजी हाच एडीट करुन अपडेट करत रहा वाटल्यास :-)
मुलगी ९वी तली आहे, टिनएजर... शारीरीक, हार्मोनल बदलांतून जात असतात. चालायचच.

पण रागात किँवा कोणत्याही इतर हायपर भावनेत मनुष्य (किँचीत एक्झेगरेटेड) पण खरंच बोलत असतो माझं मत. इतर वेळी पॉलीटीकली करेक्ट रहायचा प्रयत्न करतात सगळेजण. शांत झाल्यावर त्या वाक्यांमागच कारण जाणुन घेउन उपाय, सुधारणा कराव्या.