एक कट्टा तो बनता है!
एक कट्टा तो बनता है!
कुठल्याही वीकान्ताला, ठाण्यात, पुण्यात, मुंबईत... घरी, दारी, कुठेही.
कोणाकोणाला जमेल, आवडेल, कधी, कुठे... सांगा.
http://www.aisiakshare.com/node/2304
http://www.aisiakshare.com/node/2304
इथे एक उपचर्चा दिसेल.
"गाठभेट" किंवा "कट्टा " हा शब्द शोधून पहावा.
मुंबै-ठाण्यात सुनील व थत्ते उपलब्ध आहेत.(वेळ त्यांच्याशी बोलून पहावी)
मिहिर पुण्यात कट्टा असल्यास येतील.
मी मुंबै-पुणे-ठाणे किंवा इतर ठिकाणीही* कट्टा असेल तर यायचा प्रयत्न करीन.
.
.
*म्हण्जए नाशिक कोल्हापूर , औरंगाबाद अशी आवाक्यातली काही ठिकाणे.
सातासमुद्रापार कट्टायोजित असेल तर तिकिटाची व्यवस्था करणे.
डिसेंबरचे माझेही वीकान्त पॅक.
डिसेंबरचे माझेही वीकान्त पॅक. जानेवारीचा दुसरा किंवा तिसरा वीकान्त, तोही चालणार नसेल तर फेब्रुवारीचा दुसरा वीकान्त...
@अरुणजोशी
अहो, आपणही एकमेकांना ओळखत नाही का? प्रत्यक्ष भेटलेले नसलो म्हणून काय झाल? इथल्या मुक्तसुनीत, बिपिन कार्यकर्ते आणि ३_१४ विक्षिप्त अदिती यांच्याखेरीज कुणालाही मी प्रत्यक्ष भेटलेली नाही.
अगदी सुरुवातीला मला कट्टेबिट्टे प्रकरणं बळंच वाटायची. व्हर्चुअली चाललंय तर चालू द्या की मजेत, कशाला भेटायचे घाट आणिक... असं वाटायचं. पण आता मी थोडी माणसाळलेय. शिवाय या संस्थळावर बराच वेळ घालवते मी. सहज शक्य असेल तर जालीय ओळखी त्रिमित करून घ्यायला मजा येईल. म्हणून...
मला वाटतं - कधीही चालेल असं म्हणत राहिलं, तर काही ठरणारच नाही. ११ जानेवारी किंवा १८ जानेवारी (शनिवार) या दोन तारखा पुरेशा लांब नि पुरेशा जवळ वाटताहेत. ठाण्यात मी काही घरातला पाहुणचार ऑफर करू शकणार नाही. त्यामुळे पुणे मला धावेल. कुणाला कधी जमतंय?
पुण्यात असेल तर नक्की येईन (प्लीज पुण्यातच ठेवा ना कट्टा :P)
माझा ऐसी वरील वावर पुष्कळसा वाचनमात्रच असला आणि बरेच (किंवा सगळेच) मला ओळखत जरी नसले तरी मला ऐसी च्या कट्ट्याला येण्याची मनापासुन इच्छा आहे...म्हणुन पुण्यात कट्टा असल्यास जरुर हजेरी लावेन :)
(ज्या मराठी संस्थळाने माझं मराठी सुधरवलं (अजुन शिकतोच आहे म्हणा) त्या मराठी संस्थळाच्या सभासदांना प्रत्यक्ष भेटून 'धन्यवाद' देण्याची संधी सोडायची नाही)
व्हर्चुअली चाललंय तर चालू
व्हर्चुअली चाललंय तर चालू द्या की मजेत, कशाला भेटायचे घाट आणिक... असं वाटायचं. पण आता मी थोडी माणसाळलेय. >> :-D मलाही असंच वाटयच आतापर्यँत. पण ऐसीचे लोक हटके आहेत. त्यामुळे त्यांना भेटायला आवडेल. मला पुणे सोयिस्कर पडेल. पण बाकी ठिकाणही चालतील. इथे शेत नाही का कोणाचं? हुरडापार्टी?
"तुम मैं और एक कट्टा"
येथे कट्टा वगैरे गोष्टींचे प्लान चाललेले पाह्यले तेव्हा म्हण्टले आपण टिमकी वाजवून घ्यावी.
कट्टा :
कालावधी : पुढील संपूर्ण आठवडा
स्थळ : वॉशिंग्टन डीसीचे एक उपनगर
सदस्य : अस्मादिक + ३, नाईल, विक्षिप्त अदिती +१ , राजेश घासकडवी + ३, रुची + २, अमुक, धनंजय , रूपाली जगदाळे.
विशेष सूचना : इथे हेवा, असूया, मत्सर इत्यादि आहेरांचा स्वीकार केला जाईल. कलोअहेवि.
ताजा कलम : उपरोल्लेखित यादीपैकी केलेल्या कुठल्याही आहेराचा परतावा तुमच्या कट्ट्याच्या वेळी आवर्जून केला जाईल याची नोंद घ्यावी.
घासकडव्यांचं धाकटं
घासकडव्यांचं धाकटं लेकरू तुम्हाला अजून माहित नाही वाट्ट? ३१ डिसेंबरला वर्षाचं होईल आता.
तरुणींकडून कूल पॉॅईट्स मिळतात
हे बाकी खरे हो. पण त्यासाठी वयाचे बंधन नाही. मोठ्याच्या वाढदिवसाला आलेल्या सगळ्या मुली धाकटाभोवतीच गोळा झाल्या होत्या, शिवाय आपले मुक्तसुनितरावही त्याच्या प्रेमात आहेत.
मी नंदन (फारच पूर्वी, विसरले
मी नंदन (फारच पूर्वी, विसरले तर काय गुन्हा नाहीये), राधिका (जालाशी संबंधित काम नव्हतं, त्यामुळे या संदर्भात आठवलं नाही, माफी मागनार न्हाई), मस्त कलंदर आणि निखिल देशपांडे यांनाही भेटलेय. आणि छोटा डॉन (पण तो इथे नसतो फारसा) आणि मणिकर्णिका (तीही फारशी नसते).
तरी भावना दुखावल्याबद्दल दिलगिरी गोड मानून घ्यावी...
ऐसीवर बर्यापैकी
ऐसीवर बर्यापैकी दिसणार्यांपैकी मी नंदन, अदिती (३_१४), बिका, मनोबा, चिंज, आरा(एकदाच), मिहिर, सहज, मुसु (श्रामो, अदिती)यांना भेटलोय. मकी आणि निदे आणि बाकी मिपाच्या जुन्या जन्तेपैकी बर्यापैकी जणांना भेटलोय. यावरून आठवले 'प्रदीप' हल्ली दिसत नाहित: हुकडून बोलवायला हवे.
या व्यतिरिक्त प्रकाश घाटपांडे व संजोप राव माझ्या लग्नाला आले होते, तेव्हा स्टेजवरच भेट झाली होती तेवढीच.
हायला! नाही-नाही म्हणता बरेच भेटलेत की (तरीही मला अनेक जण म्हणतात की तु प्रतेक्ष भेटत नाहीस म्हणून! काय कळत नाय बॉ!)
मात्र १७ जानेवारीला भेटायला आतापर्यंत तयार झालेल्यांपैकी बहुदा फक्त मनोबाच भेटलेला आहे. त्यामुळे अधिकच उत्सुकता आहे!
मी टेक्सासच्या प्रचंड
मी टेक्सासच्या प्रचंड उन्हाळ्यात अदितीला भेटलेच नाहीये तर पूर्ण दिवस घालवून हादडून, रिव्हरवॉकवर बोटींग करुन, अलामो (मेक्सिकन किल्ला) ही पाहीलाय. म्हणजे ती अलामो पहात होती व मी कडेच्या पाण्यातले गोल्ड्फिश. अन एक खगोलशास्त्रज्ञ तावडीत सापडल्याने तिला काहीबाही प्रश्न विचारून पिळलेलंही मला आठवतय :)
मी पिझ्झा खाल्ला ते ठिकाण
मी पिझ्झा खाल्ला ते ठिकाण 'ग्रीन्स & ऑलिव्ह्स' पण तिथे असलेले वेटिंग बघता तिथे निवांत गप्पा टाकत बसणे कठीण जावे.
शिवाय सर्वात मोठे टेबल १० जणांचे आहे असे आठवते. इथे पुण्यातलेच ११ जण आहेत.
साऊथ इंडीज बद्दल कल्पना नाही
सिझलर्स : याना पुन्हा लहान जागा, बरेच वेटिंग
कबाब मिळतील असा ढाबा: ऐडीया आवल्डी. पुण्यात असा ढाबा है का?
बाकीच्यांनी पण ऑप्शन्स सुचवा.
बाकी मुंबईहून येणार्यांपैकी किमान काहींना तरी सकाळी येऊन रात्री जायचे असु शकते हे लक्षात घेता कट्टा दुपारी करावा लागेल हे गृहितक योग्य आहे काय?
मुंबईकर/ठाणेकर रहायच्या तयारीने येत असतील तर मस्तच - माझ्या घरी किमान चार जणांची रहायची सोय करता येईल.
डिसेंबरचे विकांत जाम
डिसेंबरचे विकांत जाम प्याक!
जानेवारीतील कोणतही विकांत सांगा.. जागा ठरत नसेल तर माझ्या घरी या.