Skip to main content

ऑफीसातील समस्या

खरं तर ही समस्या मांडताना लाजच वाटते आहे.
ऑफीसमध्ये दर महीन्याला वाढदिवस साजरे होतात. डिसेंबर मध्ये माझा होता. जवळ जवळ अख्खा डिसेंबर मी मेलची वाट पहात होते की आज नाही उद्या साजरा होइल.
शेवटचा आठवडा (गेला) मी रजेवर गेले. अन त्या महीन्याचे वाढदिवस साजरे केले गेले.
चाइल्डीशच म्हणायला पाहीजे पण मला वाईट वाटले. मुख्य वाईट याचे वाटले की - वाढदिवसाचे जे निमंत्रण गेले त्यात माझ्या नावाचा उल्लेख नव्हता फक्त एक व्यक्ती जी त्या दिवशी ऑफीसात हजर होती त्याचा उल्लेख होता. त्याला शुभेच्छा दिलेल्या होत्या. I felt singled out. मी माझ्या ऑफीसमधील मैत्रिणीला (परीचीत खरं तर मैत्रिण नव्हे) मी ते बोलून दाखविले. माझा कयास आहे की तिने ते काही लोकांच्या कानावर घातले.
कारण आज मॅनेजर येऊन म्हणाले की - आपण या गुरुवारी तुझा वाढदिवस साजरा करु.
मी त्यांना म्हटले - हा अपवाद कशासाठी? Please don't put me in a spot by making this exception.
पण त्यांनी ऐकले नाही. बहुतेक या गुरुवारी वाढदिवस साजरा होईल.
____________________________
खूप त्रास होतो आहे.
खरं तर ऑफीसमध्ये कोणी वाढदिवस साजरे करायला जात नाही. मला त्या सहकारी स्त्रीशी बोलल्याबद्दल अतिशय टोचणी लागली आहे. It's reflecting so poorely on me. Very unprofessional!!!
_____________________________
मी काय केले पाहीजे? मुकाट्याने जाऊन साजरा करुन यावे की अन्य काही? :(
थोडा "ताईला विचारा" (Agony Aunt) प्रकारचा धागा झाला आहे.
______________________________
अन हे सर्व केव्हा तर मी "स्वतःशी प्रामाणिक रहाण्याचा" निश्चय केल्याच्या नेमक्या दुसर्‍या दिवशी घडले आहे. कालच मी ठरवले काही का होइना स्वतःशी प्रामाणिक रहायचे. पण इथे माझ्या या प्रामाणिक भावना या आहेत की मला उगाच अपवादात्मक साजरा करायचा नाही. देवही निश्चयाची परीक्षाच घेतो असे वाटते.
____________________
परत शांतपणे मॅनेजरचे मन वळवायचा प्रयत्न करणार आहे. But why the hell all this? :(
माझी चूक १००% आहेच. पण आता हे निस्तरायचं कसं? मला खरच जावसं वाटत नाहीये.
Am I ever going to stop feeling opologetic? Hell no!!!! It has become a norm!!! कंटाळा आलाय.

अतिशहाणा Mon, 30/12/2013 - 21:05

होऊ दे ऑफिसला वाढदिवसाचा खर्च! केक खा आणि बाकी काही करु नका.

............सा… Mon, 30/12/2013 - 21:08

In reply to by अतिशहाणा

इतकं गुन्हेगार वाटतय. अगोदरच मला गर्दीत फार आवडत नाही. त्यात चूक करुन गर्दी फेस करणं म्हणजे आगीतून फुफाट्यात टाइप :(
मी मॅनेजरला लिहीलय की एक तर जानेवारी वाढदिवसात तरी करा किंवा अजिबात करु नका. I think I have a say in my birthday celebration.

पण ऑफीसात कोणाशीही काही बोलणं म्हणजे घोडचूकच आहे.

............सा… Mon, 30/12/2013 - 23:30

समस्या सुटलेली आहे. मॅनेजरने आत्ताच अतिशय गोड शब्दात समजावून सांगीतले की परत कोणताही वाढदिवस साजरा होणार नाही पण तुझा साजरा होणार आहे. प्लीज लुक फॉरवर्ड अँड एन्जॉय.

आता परत का होणार नाही त्याचं कारण मला नीट कळलं नाहीये :(

असो.

सर्वांना - अजून एका सुमार धाग्याच्या तसदीबद्दल माफी.
_____________________________
शेवटचे अप्डेट - शेवटी निक्षून सांगीतले की मला या सेलिब्रेशनमध्ये ओढू नका. लीव्ह मी अलोन अँड अन्-माईंडेड तेव्हा कुठे प्लॅन रद्द झालाय.

नगरीनिरंजन Mon, 30/12/2013 - 21:32

अशा गोष्टींबाबत तक्रारी नेहमी आपल्या मॅनेजरकडेच कराव्यात आणि तेही पर्फॉर्मन्स अ‍ॅप्रेजलच्या वेळीच. ;-)
यालाच अनुभव म्हणतात. :-) असो.
आता घाटतंय तर घाटू द्या.

मन Mon, 06/01/2014 - 11:29

खरं तर ही समस्या मांडताना लाजच वाटते आहे.

वाढदिवसाच्या बाबतीत लाजू नका. आमच्या सहकारीणींप्रमाणे दरवर्षी अठरावा वाढदिवस साजरा करीत र्‍हावात.
इथे डंगर्‍या डंगर्‍या बायका पंधरा वर्सहचा वर्केक्स लिहितात रेझ्युमेवर ; अन् न शोभणारे अल्लड उपद्व्याप करतात. त्यांच्याकडून शिका.

मुकेश अ लहरे Tue, 07/01/2014 - 17:20

कंत्राटदार खूप कमी पगार देतात
अर्धा पगार तर त्यांचाच घशात जातो