Skip to main content

२०१४ चा आशावादी आढावा !!

येत्या वर्षात -

रस्त्यावरच्या खड्ड्यांत
भ्रष्टाचार पाय घसरून पडावा

सच्चाईच्या डांबराने
त्याला तेथेच कायमचा गाडावा

भारताचा उज्ज्वल इतिहास
पुन्हा पुन्हा घडावा

भारताचा दुश्मन
धाय मोकलून रडावा

मनाच्या अंगणात आशादायी स्वप्नांचा
सुमंगल सडा पडावा

नववर्षाच्या शुभेच्छा !!

............सा… Tue, 31/12/2013 - 18:32

सुंदर!!!
का कोण जणे पण -

>> भारताचा दुश्मन धाय मोकलून रडावा>> फार आवडले. खूप!!!

'न'वी बाजू Tue, 31/12/2013 - 22:19

रस्त्यावरच्या खड्ड्यांत
भ्रष्टाचार पाय घसरून पडावा

|
|
|

भारताचा उज्ज्वल इतिहास
पुन्हा पुन्हा घडावा

भ्रष्टाचार का होईना, पण रस्त्यावरच्या खड्ड्यात पुन्हापुन्हा पडण्याकरिता रस्त्यावरचे खड्डे कायम नकोत काय? किंवा, त्यांना डांबराने बुजवायचे म्हटले, तर नवनवीन खड्डे पुन्हापुन्हा पाडायला नकोत काय?

............सा… Wed, 01/01/2014 - 01:05

In reply to by 'न'वी बाजू

म्हणजे पुन्हा पुन्हा च्या वरच्या ओळी पूर्ण इतिहासात तुम्ही सामील केल्या आहेत तर

वोक्के.
त्या न्यायाने,
भारताचा दुश्मन
धाय मोकलून रडावा
.
.
.
.

मनाच्या अंगणात आशादायी स्वप्नांचा
सुमंगल सडा पडावा

शत्रूच्या अश्रूंचा सडा पडावा अशी इच्छा ते करताहेत असे म्हणले तर बरोबर होईल :)

कवितेतील ही नवी बाजू आपल्या लक्षात आलेली नाही हे नम्रपणे नमूद करु इच्छिते ;)