Skip to main content

मार खाल्ला आहे का?

आपण आयुष्यात दणकून मार खाल्ला आहे का?

आईबाबांकडून.. जास्त शक्यता..

अन्य कुठे बाहेर?

कॉलेजात. पोरीच्या लफड्यात?

दंगलीत.. उगाच बाजूला उभे असताना..

गुंडांकडून.. कोणाच्या मधे पडल्यावर.

त्यासोबतच उलटही... म्हणजे आपण कोणाला कधी मनसोक्त हग्यामार दिला आहे का?

नंतर वाईट वाटलं का?

वेळ न येवो अशी शुभेच्छा..

यापूर्वी आली असल्यास साग्रसंगीत सांगावे.. विनंती..

दिवाळीनिमित्त शुभेच्छा...!!

मचाककथेतील खाजकुमार Tue, 25/10/2011 - 11:50

ओ असले बालवाडी छाप लेख इतर लोळीपोप.कॉम वर लिहित चला इथे नको..

मोठे व्हा

घंटासूर Tue, 25/10/2011 - 12:59

In reply to by मचाककथेतील खाजकुमार

ओ असले बालवाडी छाप लेख इतर लोळीपोप.कॉम वर लिहित चला इथे नको..

मोठे व्हा

तुम्ही बाहेर या की आता मचाककथेतून. कशाला तिथंच पडत राह्यलात अजून. जरा जग बघा, मोठे व्हा.

मचाककथेतील खाजकुमार Tue, 25/10/2011 - 12:31

In reply to by सविता

आहे त्यांना उत्सुकता , तुम्हाला काय त्याचा त्रास?

आहे अम्हाल त्रास , तुम्हाला काय त्याची उत्सुकता ;)

घंटासूर Tue, 25/10/2011 - 12:58

In reply to by शिल्पा बडवे

भर दिवाळीत हे विचार कसे येतात तुमच्या मनात? अं!!
भर दिवाळीत नविन काही लिहायचे सोडून तिकडचे लेख इकडे आणि इकडचे लेख तिकडे टाकताना नाही आले तुमच्या मनात असले विचार शिल्पातै.?

limbutimbu Tue, 25/10/2011 - 14:14

ल्हानपणी आपुन लई मार खाल्लाय, पर मला मारायची शामत फकस्त मपल्या आयशीबापसापाशीच होती.
बाकी येरागबाळ्यान्चे ते काम नोहे! :D
पर राजा, अस्ले दुसर्‍याच्या जखमेवरील खपली काढणारे प्रश्न विचारायच्या आधी जरा तुपल्याबद्दलबी बोल की! तू लेका किती कुठ कसा कसा किम्निमित्ते मार खाल्लास? च्यामारी आपल ठेवाव झाकुन अन लोकाच बघाव वाकून अस झालय बग तुझ! सोताबद्दल काही सान्गत नै अन चाललाय लोकान्च्या चाम्भारचवकशा करायला.
बरं, तुलाबी दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा! :)

गवि Tue, 25/10/2011 - 14:19

In reply to by limbutimbu

माझंच आधी लिहिलं होतं पण कोणा वाचकमित्राला ते सर्व बालवाडीतलं वाटायला लागल्याने काढलं.. स्वसंपादन करुन.

शाळेत नववीत मार दिला होता एका रॅगिंग करणार्‍या पोराला.

बाकी मास्तरांकडून बरेच तारे डोळ्यासमोर चमकवले गेले आहेत.

मोठा झाल्यावर जपून राहिल्याने अद्याप तशी वेळ आली नाही. इथे धाग्यावर येईल अशी चिन्हे दिसत आहेत.. :)

limbutimbu Tue, 25/10/2011 - 14:30

In reply to by गवि

>>>>माझंच आधी लिहिलं होतं पण कोणा वाचकमित्राला ते सर्व बालवाडीतलं वाटायला लागल्याने काढलं.. स्वसंपादन करुन.
अरे राजा, तुला ती गोष्ट माहिते? बाप, मुलगा अन त्यान्च गाढव घेऊन जात अस्तात ती गोष्ट रे!
एक जण म्हणतो अरे गाढव आहे बरोबर तर कोणी त्यावर बसुन का जात नाही?... ते ऐकतात
मग पोरगा गाढवावर बसलाय, बाप चालतोय तर एक म्हणतो म्हातार्‍या बापाला चालवितो का रे... ते ऐकतात
मग बाप बसला गाढवावर, पोरगा चालत तर अजुन एक म्हणतो, येवढ्या लहानग्याला दमवितो का रे... ते ऐकतात
मग दोघेही जण गाढवावर बसतात, तर अजुन कोणी म्हणतो, काय राव गाढवाला दमवताहात.
शेवटी दोघेही मिळून गाढवाला उचलुन घेतात अन शेवटी ओढ्यात पाडतात.
तेव्हा विचार करा बोवा :)

... Tue, 25/10/2011 - 14:46

शाळेत अजिबात मार काय ओरडासुद्दा खाल्ला नाही

ही कसर लहानपणी बाबानी श्री गिरवण्याच्यावेळी पूर्ण केली होती
त्यामुळे त्यानंतर तशा वेळा येउ दिल्या नाहीत

विश्वनाथ मेहेंदळे Tue, 25/10/2011 - 16:32

काही प्रतिसाद (आणि त्यांचे लेखक ;-) ) पाहून एक डायलॉग आठवला. "गांव बसा नाही, लुटेरे आ गये"
बाकी, अगदी मुक्तापिठावर आल्यासारखे वाटले. सहज विचारतो, इथे कुणी एक्सेल घेऊन बसले नाही ना ?? ;-)

limbutimbu Tue, 25/10/2011 - 17:00

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

>>> काही प्रतिसाद (आणि त्यांचे लेखक ;-) ) पाहून एक डायलॉग आठवला. "गांव बसा नाही, लुटेरे आ गये" हाऽऽ ह्हाऽऽ ह्ह्हाऽऽऽ (इथे स्मायली कशा टाकायच्या? :( )
नेम देम. नाव घ्या भौ, नावाशिवाय गाव खरेदी करायला जाउ नका :P

बिपिन कार्यकर्ते Tue, 25/10/2011 - 16:56

इंटरेस्टिंग प्रश्न आहे हा. बहुतेक सगळ्यांकडे सांगण्यासारखे काही तरी असणार हे नक्की.

माझ्या आयुष्यात असा एक दणकून मार खायचा प्रसंग, आयुष्य सुरू झाल्यावर तसा फार लवकरच आला. जास्त वाट बघायला लागली नाही. तशीही माझी आई आम्हा सगळ्या चुलत आत्ते भावंडांमधे कडकलक्ष्मी म्हणूनच प्रसिद्ध होती. पानात टाकलं म्हणून तर चिक्कार मार खाल्लाय पण हग्या मार असा हा पहिलाच. ;)

मी साधारण सहा सात वर्षांचा असेन आणि माझी बहिण दोन वर्षांनी मोठी. ऊन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी गेलो होतो. आजोळ एका चाळीत. तिथेच आईचा एक लांबचा चुलतभाऊ आऊटहाउसमधे रहायचा. एकदा त्याच्या खोलीत मित्रामित्रांची ओली पार्टी चालली होती. कोल्ड्रिंकच्या बाटल्या पडल्या होत्या. त्यावेळी कोल्ड्रिंक म्हणजे कोका कोलाच फक्त. आणी तो सुद्धा वर्षात फारतर २ ते ३ वेळा मिळायचा. त्या व्यतिरिक्त लग्नमुंजींमधे मिळाला तरच. तर अशी ही पार्टी चालू होती. आणि मी आणि ताई खिडकीतून अधाश्यासारखे त्या बाटल्या बघत होतो. तो आमचा तथाकथित मामाही तथाकथित म्हणायच्या लायकीचाच होता. तो आणि त्याचे मित्र आम्हाला त्या कोल्ड्रिंकच्या बाटल्या दाखवून दाखवून पीत होते. काही तरी कामासाठी आई घराबाहेर आली आणि तिने ते दृश्य बघितले. तिचा संताप डोक्यात गेला. एकतर त्या भावाचा राग आणि दुसरे म्हणजे आमचे आशाळभूत वागणे. दोन्हीचा राग आम्हा दोघांवर निघाला. तब्बल अर्धा तास ती मला आणि ताईला बडवत होती. प्रत्येक फटक्याबरोबर "तुम्ही काय भिकारी आहात का? कधी मिळाले नाही का?" अशी सरबत्ती चालूच. आम्ही दोघेही अर्धमेले झालो होतो. आख्खी चाळ गोळा झाली. आई कोणालाही आवरत नव्हती. तो आमचा मामाही तिच्या हातापाया पडत होता. शेवटी आजीने आजोबांच्या कामाच्या ठिकाणी निरोप पाठवून त्यांना बोलावून घेतले. त्यांनी आल्यावर आम्हाला आईपासून दूर केले. दुसर्‍या दिवशी सकाळी बाबाही आले. त्यांनाही आईने याबद्दल काही बोलू दिले नाही.

आजही तो प्रसंग स्वच्छ आठवतो आहे. प्रत्येक डिटेलसकट. आणि त्याप्रसंगातून जे काही मिळाले ते आजही आमच्याबरोबर आहे. कोणताही प्रसंग आला तरी आम्ही कोणीच कधी लाचार नाही झालो. मदत मागितली / घेतली / केली. पण लाचारी कधीच नाही पत्करली.

***

बाकी याव्यतिरिक्त म्हणजे शाळेत असताना एका मित्राच्या लफड्यामुळे मार खायचा प्रसंग आला होता. पण माझ्यासारख्याच दिसणार्‍या एका मित्रावर ते आपोआप ढकलले गेले आणी मी वाचलो!

पण ते सगळे परत कधीतरी! ;)

limbutimbu Tue, 25/10/2011 - 17:05

In reply to by बिपिन कार्यकर्ते

>>>>आणि त्याप्रसंगातून जे काही मिळाले ते आजही आमच्याबरोबर आहे. कोणताही प्रसंग आला तरी आम्ही कोणीच कधी लाचार नाही झा>>>>
भले त्यावेळेस आईचा राग आला असेल, पण अनुभवान्ती तुम्ही हाच निष्कर्ष काढलात हे योग्य झाले. मुलान्ना टुकायची सवय अस्तेच, पण ती कठोरपणे काढून टाकण्याची पूर्वी पद्धत होती. आमची आई चारचौघात बिनदिक्कत पणे मुस्काटीत भडकावू शकायची (सिन्हेचा रवी प्रथमात). सबब लाडेलाडे बाळान्च्या सवई आम्हाला लागु शकल्या नाहीत याबद्दल आईचे धन्यवादच!

अशोक पाटील Tue, 25/10/2011 - 17:47

ज्याला 'योग्य वयात मार खाल्लेला आहेच' असे सर्वसाधारणपणे म्हटले जाते त्यावेळी मीदेखील तसा आणि तितका खाल्ला आहे, पण त्यातही सिंहाचा वाटा होता तो तिर्थरुपांचाच. तोही शाळेच्या वयात. धाकट्या बहिणीला माहीला [माही = गावजत्रा] जातेवेळी कपडे आणले आणि मला नाही त्याबद्दल मी तिलाच अद्वातद्वा बोललो होतो (असणारच, त्यात शंका नाही) आणि त्यातील एक वाक्य वडिलांना संताप देणारे झाले. खरेतर मलाही कपडे घ्यायचे त्यांच्या मनात असणार पण काहीशा आर्थिक ओढाताणीमुळे त्यानी सुधासाठी प्रथम घेतले (तिचा त्यावेळी उपलब्ध असलेला ड्रेस फारच जुना झाला होता, हे मला नंतर समजले) आणि पुढे केव्हातरी मला घेऊ असा व्यावहारिक विचार केला गेला असणार. पण त्याच्याशी मला कर्तव्य नव्हते आणि त्या येडेपणात मी घरच्या परिस्थितीला लागेल असे काहीतरी बोललो, ज्यामुळे वडिलांच्या डोक्यात संतापाची चूडच पेटली आणि दुनियेवरचा राग त्यानी माझ्यावर असा काही काढला की ज्याचे नाव ते.

आईने कधी अंगाला हात लावलेले स्मरत नाही. तिच गोष्ट मित्रांचीही. कॉलेजची वर्षेही साने गुरुजींच्या श्याम धर्तीचीच गेली असल्याने तिथे कधी 'मेरे अपने' स्टाईल धूम करण्याचे प्रसंग आले नाहीत. मात्र मोठेपणी एकदोनदा शेजार्‍यांच्या हातघाईवर आलेल्या भांडणात (ते सोडविण्यासाठी, अमुक एकाची बाजू घेऊन नव्हे) पडलो होतो. मारहाण नव्हती पण चुकून दोन घे, एक दे, असे प्रसंग घडले.

२. "त्यासोबतच उलटही... म्हणजे आपण कोणाला कधी मनसोक्त हग्यामार दिला आहे का?"
~ नाही. पण एकदा तसे जरूर करावे अशी तीव्र इच्छा झाली होती हे इथे कबूल करतो. प्रसंग ~ ८-१० वर्षापूर्वी "टायटॅनिक" चित्रपट संपल्यानंतर थिएटरबाहेर पार्किंगकडे मी आणि मित्र जात असताना मागून येणारी तीन कॉलेजची पोरे (कॉलेजची नसतीलही, पण त्या वयाची जरूर होती) चित्रपटाबद्दल कॉमेन्ट्स करीत येत होती. तशी चर्चा अपेक्षित असते आणि त्यात वावगेही काही नसते. पण त्यापैकी एका मुलाने 'केट विन्स्लेट' चे नाव घेऊन इतकी एक घाणरेडी टिप्पणी केली की त्या गटारीभाषेने अक्षरशः शहारून गेलो आणि ज्याला इंग्रजीत Impulsively म्हणतात त्या झोतात मागे वळलो आणि त्या त्रिकुटाला थांबविले. मुस्काटात भडकवावी त्या पोराच्या असे वाटले. तेही बावचाळले. "तू आत्ता जे काही शेरेबाजी केलीस ती घरच्या मंडळीसमोर करण्याचे धाडस करशील का ?" असे विचारल्यावर तो मिथुन, जॅकी आविर्भात माझ्याकडे पाहू लागला; पण त्याच्या सोबत्यांनाही ते केटबद्दलचे वाक्य खटकले असणार त्यामुळे त्यानी "सॉरी सर. सहज मजेत तसे याने म्हटले. फर्गेट." असे म्हणत त्या जॅकीला घेऊन ते एग्झिट गेटकडे गेले. मलाही कळेना की असा संतापी मी कसा काय झालो. पण जे झाले ते अगदी नॅचरली हे मात्र खरे.

बस्स मारबिर कुणाला दिलेला नाही. अगदी स्वत:च्या मुलालाही.

अशोक पाटील

यशवंत कुलकर्णी Tue, 25/10/2011 - 18:37

मी मार नाही पण झापड खाल्ली आहे एका सरदारजीकडून आणि मारली पण आहे.
त्यावेळी मी एका वकिल मित्राकडे 18-19 वर्षांचा असताना ज्युनियरशीप करीत होतो.
झालं काय की नेमकी त्या वकील मित्राची प्रेमविवाहजन्य फर्स्‍टनाइट होती... त्यांना बिअर हवी होती.
मी आणि आणखी एक मित्र ( तो ही ज्युनिअर‍च) मिळुन एका कॉम्प्लेक्स मध्‍ये असलेल्या वाइन शॉपवर गेलो. मी गाडीवरच थांबलो...त्याला बिअर घ्‍यायला उशीर लागत होता...म्हणून मी इकडून हॉर्न वाजवायला सुरुवात केली... खूप वेळ हॉर्न वाजवत राहिलो.. तेवढ्‍यात कॉम्प्लेक्समधून एक सरदारजी आला आणि मला खाडकन झापड मारली... ''कितनी बार चिल्ला रहा हुं हॉर्न मत बजा..हॉर्न मत बजा..सुनता ही नहीं..तो ओरडला..
मी ''बाप का रास्ता है क्या..'' वगैरे शक्य होती तेवढी बाचाबाची केली..
घरी गेल्यावर पण मी लालबुंद झालेला पाहुन सरांनी मारामारी झालीय हे ओळखलं..
आमची सगळी वरात पुन्हा त्या कॉम्प्लेक्समध्‍ये गेली (नुकतंच लग्न झाल्याने सरांच्या अंगावर तो लग्नात वापरतात तो सुरा होता)...
तो सरदारजी तिथेच खुर्ची टाकून बसला होता..
''क्यों भाई.. मेरे बच्चे को क्‍यूं मारा'' सरांनी त्याला बोलायला सुरुवात केली
मला सर म्हणे.. मार याच्या थोबाडीत.. मी पण जोर खाऊन त्याला एक लगावली..
तोपर्यंत गर्दी जमली.. गोंधळ वाढला..
मग सर आणखी तापले.. ते पण त्याला बदडू लागले..
तेवढ्यात तिथे पो‍लीसकट असलेला साध्‍या कपड्यातला माणूस आला.. ‍
त्यानं मध्‍यस्‍थी केली.. कारण त्यानं सरदारजीनं मला मारलेलं पाहिलं होतं.. कशामुळे मारलं हे पण त्यानं पाहिलं होतं..
तो पोलीसकटवाला शहरातीलच कुणीतरी पोलीस अधिकारी होता..
म‍ग.. जाऊ द्या..जाऊ द्या.. आता वाढवू नका.. दोघांची पण चूक आहे.. आता वाढवू नका वगैरे झालं..
सर म्हणे अजून जास्त वाढलं असतं तर सुराच खुपसला असता..
आणि किस्सा संपला.

यशवंत कुलकर्णी Tue, 25/10/2011 - 18:56

In reply to by बिपिन कार्यकर्ते

ती दुसरी मारामारी नंतर केली ना त्यांनी..
.
.
.
असल्या दिवशी मारहाणीत उतरल्याबद्दल त्यांनी नंतर त्यांच्या घरच्यांची बोलणी खाल्ली!

शहराजाद Tue, 25/10/2011 - 20:37

माझ्या आईला कधीच मार देणं जमलं नाही आणि रुचलंही नाही. क्वचित संतापून एखादा फटका दिला तरी तो 'हात्त ले' करावे तितका मऊ असे. घार उंचावरून सुसाट वेगाने खाली झेपावताना जमीनीलगत आल्यावर पंख पसरून खाडकन ब्रेक लावते, त्याप्रमाणे तिचा हात मारायला येताना अंगापासून काही मिलीमीटरवर अगदी हळू होत असे. फक्त एकदाच तिने खराखुरा मार दिल्याचं आठवतं. मी आणि माझा भाऊ कुठल्यातरी खाण्याच्या गोष्टीवरून भांडत होतो. त्यावेळी,'कधी खायला न मिळाल्यासारखे काय वागता' म्हणून तिने दोघांनाही सणसणीत फटके मारून तो खाऊ टाकून दिला होता. बाकी वडिलांकडून क्वचित पण भरपूर मार खाल्ला आहे, पण तो कशाकशासाठी ते मात्र लक्षात राहिलं नाही.
लहानपणी मी थोडी आडदांड असले तरी स्वभाव पहिल्यापासूनच शांत होता. मारहाणीचे प्रसंग आल्याचं फारसं आठवत नाही.पहिलीत असताना, स्कूलबसमधे एका मुलाने मला उगीचच मारलं म्हणून त्याच्याशी मारामारी केल्याचं स्मरतं. शेवटी त्याच्या मदतीला त्याची धाकटी बहीणही आल्यावर थोडं जड जाऊ लागलं, पण त्याचं डोस्कं असं चांगलं फोडून ठेवलं की पुन्हा माझ्या वाटेला गेला नाही.

निवांत पोपट Tue, 25/10/2011 - 21:16

कोण खरं सांगेल असं वाटत नाही. सांगितलच तर त्याला कुठल्यातरी सत्कृत्याचं लेबल लाऊन त्यातील शरमेच्या आणि अपमानाच्या भावनेवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न होईल.

डोस्टोव्हस्कीच्या इडियट नावाच्या कादंबरीत ही असाच काहीसा किस्सा आहे.पुस्तकाची नायिका एका पार्टीत प्रत्येकाला आपल्या पापांची कबुली देण्याचा खेळ खेळते.सहभागी लोक पापांची कबुली देतात. पण अशी की त्यांच्या पापाला सुध्दा एका उदात्त कृतीचे स्वरूप प्राप्त व्हावे.

इथं पण काही वेगळं होइल असं नाही.

प्रियाली Tue, 25/10/2011 - 21:57

In reply to by निवांत पोपट

मी माझ्या आईचे धपाटे आत्ताही खाते, म्हणजे धपाटे द्यावेत असेच काम मी करत असते. ;-) त्यामुळे या वयात मार खाण्यात मला आणि मारण्यात आमच्या मातोश्रींना कसलीही लाज वाटत नसावी. त्यांच्या हातचे धपाटे खाण्याचे भाग्य मला आजही आहे हीच मोठी गोष्ट. लहानपणी ते भाग्य वाटत नसे ही वेगळी गोष्ट. माझ्या वडिलांनी आमच्यावर कधी आवाजही उंचावला नाही, मार फार पुढली गोष्ट. आईचा हात वर आला की मी बाबांच्या शरणी जात असे.

बाकी, मी कोणाचा मार खाल्लेला नाही. शाळेत मुलींना मारातून सूट मिळते. हं! पण मी इतरांना भरपूर मार देत असते. त्यात माझ्या भावापासून- मुलीपर्यंत सर्वांचा समावेश आहे. फक्त मारणे म्हणजे चापटी किंवा धपाटे. मारामारी किंवा बडवाबडवी नाही.

यशवंत कुलकर्णी Tue, 25/10/2011 - 22:18

In reply to by बिपिन कार्यकर्ते

त्यांनी डोस्टोव्हस्की ( हे थोडंसं उभा का बस की सारखं वाटतं) वाचलाय हे दाखवण्याचा क्षीण प्रयत्न होता हो. ;-)

निवांत पोपट Tue, 25/10/2011 - 22:22

In reply to by बिपिन कार्यकर्ते

नाही, नाही. तसंच काही नाही! किस्सा आठवला आणि रिलेट होतोय म्हणून सांगितला एवढंच!

पण सगळे जसे वागतात तेच डोस्टोव्हस्कीने सांगितलं असलं तर??

शक्यता नाकारता येते का बिपीनजी?(कोणतीही!)

बिपिन कार्यकर्ते Tue, 25/10/2011 - 22:40

In reply to by निवांत पोपट

नाही! शक्यता नाकारता येत नाहीच. पण तुम्ही अगदीच सरसकटीकरण केले असे वाटले म्हणून लिहिले. आणि त्या सरसकटीकरणाला माझाच अपवाद होता म्हणून लिहिलेच. :)

अर्थात, अपवादाने नियम सिद्ध होतो असे म्हणूच शकतो आपण. ;)

क्रेमर Wed, 26/10/2011 - 00:24

In reply to by निवांत पोपट

कोण खरं सांगेल असं वाटत नाही. सांगितलच तर त्याला कुठल्यातरी सत्कृत्याचं लेबल लाऊन त्यातील शरमेच्या आणि अपमानाच्या भावनेवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न होईल.

ज्यांना बालपणी मार खावा लागला ते त्याला काही लेबल लावून सांगतील असे वाटत नाही. इतरत्र खाल्लेल्या माराबद्दल मात्र थोडीफार लेबलालेबली होण्याची शक्यता आहे. ठरवून लेबल लावण्यापेक्षा स्वत:लाच त्यांनी तसे स्पष्टीकरण दिलेले असण्याची शक्यता जास्त आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 26/10/2011 - 00:57

लहानपणी मी चिक्कार मार खाल्ला. अर्थात थोडंसं लागायचं, पण निळी-काळी होईपर्यंत मार देण्याची माझ्या आईची इच्छा नसायची. मी आणि भाऊ थोडे मोठे झाल्यानंतर तिलाच म्हणायचो, "कशाला मारतेस, तुलाच लागतंय?" मग मार थांबला, पण कान, दंडावर चिमटे सुरू झाले. ते दुखायचे. पण हे फक्त अभ्यासासंदर्भातच असायचं. इतर काही चुका झाल्या तर फक्त शाब्दिक मार मिळायचा.

आताही माझा शारीरिक हिंसेवर विश्वास नाही; पण पटलं नाही तर मी चिक्कार शाब्दिक हिंसा करते.

गवि, तुम्ही संपादित केलेला भाग पुन्हा टाकाच हो.