भारत २०११ जनगणना - विदा कुठे आहे?
निनाद
भारतात २०११ साली जनगणना झाली पण यातील धार्मिक विदा प्रसिद्ध केला गेला नाही. हा विदा कुठे मिळेल हे कुणी सांगू शकेल का?
दुवा http://censusindia.gov.in/Census_And_You/religion.aspx येथे फक्त २००१ चा विदाच मिळतो.
२०११ चा इतर विदा मिळतो पण धार्मिक विदा मिळाला नाही.
विदा पाहण्यासाठी इतर कोणता दुवा आहे का?
इथे वाच, इथेही हाच प्रश्न आहे
इथे वाच, इथेही हाच प्रश्न आहे आणि याचे उत्तरही माझ्या अंदाजाच्या जवळ आहे :)
विदा
पुढिल पानांवर २०११चा विदा आहे:
पॉप्युलेशन एन्युमरेशन
गृहस्थिती विषयक
या व्यतिरिक्त या दुव्यावर पीडीएफ मध्ये सारांश आहे.
याशिवाय यादुव्यावर एक चांगली पीपीटी आहे. जी २०११च्या प्रोव्हिजिनल डेटावर अवलंबून आहे.
तुम्हाला हवे असलेले धार्मिक कंपोझिशन इथे मिळेल, पण सध्या ते २००१चे आहे. २०११चे अजून मिळाले नाही. २०११ चे विश्लेषण अजून चालु असल्याने सगळा विदा प्रकाशित झालेला नसावा. (काही राजकीय कारणाने तो निवडणूकीनंतर प्रकाशित झाल्यास आश्चर्य नाहीच ;) )