शेरलॉक-३
बीबीसीच्या 'शेरलॉक' या मालिकेच्या तिसर्या सीझनचा पहिला भाग नुकताच प्रसारित झाला. 'ऐसी...' वर या मालिकेचे अनेक चाहते आहेत असे आमच्या लक्षात आले आहे. त्यामुळे एकेकाशी खरडीतून चर्चा करण्यापेक्षा सर्वांशी एकत्रच या सीझनवर चर्चा करता यावी यासाठी हा धागा काढला आहे. कोणाला या सीझनमधले काय आवडले, काय आवडले नाही, पुढच्या भागांबद्दलचे कुणाचे काय आडाखे आहेत हे जाणून घ्यायला आवडेल.
वेषांतर
या भागातल्या मला आवडलेल्या गोष्टींपैकी एक म्हणजे, होम्सचं वेषांतर. मी कधीपासून अशा प्रसंगाची वाट पाहत होते. रॉबर्ट डाउनी ज्यु.च्या पहिल्या होम्सपटात होम्सचं वेषांतर खूप छान घेतलं आहे. पण त्यात प्रॉप्स जास्त वापरले होते. 'शेरलॉक'मध्ये प्रॉप्स फारच कमी होते आणि सगळा भर चेहरा, केशभूषा, आवाज, हावभाव यांच्या बदलावर होता. हे आवडलं. हे जास्त शेरलॉकी वाटलं. दोन्ही वेषांतरांतली समान गोष्ट म्हणजे दोन्हींत होम्स वेषांतर इम्प्रोवाईज करतो. म्हणजे तो पहिलं प्रॉप घेतो, तेव्हा त्याला हे माहीत नसतं की आपण पुढचं प्रॉप कोणतं घेणार आहोत.
प्रॉप म्हणजे
http://en.wikipedia.org/wiki/Theatrical_property
मी हा शब्द चुकीच्या अर्थाने वापरला आहे बहुधा. मला नवीन सोंग घेण्यासाठी वापरलेल्या वस्तू (टोपी इ.) असा अर्थ अभिप्रेत होता.
वरचाच माझा प्रतिसाद इथे
वरचाच माझा प्रतिसाद इथे पेस्टवतेय: -
माझी नाही निराशा झाली. बादवे, ज्यांनी अजून पाहिला नसेल त्यांनी पुढे वाचू नये.
मॉफ्टिसपुढे मोठी आव्हानं होती. दोन वर्षं लोक 'कसा जगला शेरलॉक' या कूटप्रश्नावर बॅण्डविड्थ खर्ची घालत होते आणि जॉन नि शेरलॉक एकमेकांशी सलोखा कसा करतील यावर गोष्टीच्या गोष्टी लिहीत होते. अशात मॉफ्टिसनं काहीही केलं असतं, तरी ते समाधानकारक होण्याची शक्यता नव्हतीच. पण माझ्या मते त्यांनी अजिबात अपेक्षाभंग केला नाही. विशेष आवडलेल्या गोष्टी या अशा:
- अनेक ठिकाणी फॅनडमला घातलेले डोळे. फॅनडममधे प्रचलित असलेले वेगवेगळे 'कॉन्स्पिरसी थिअरीज'च्या जातकुळीचे सिद्धान्त या भागात धमाल पद्धतीत वापरले आहेत नि तरी शेरलॉक कसा जिवंत राहिला याचं निराळं बरचंसं तर्कशुद्ध स्पष्टीकरणही आहे.
- मायक्रॉफ्ट नि शेरलॉकची भारीपैकी, गुंतागुंतीची, वेगवान, बरंच सांगणारी-बरंच दडवणारी जुगलबंदी
- होम्स बंधूंचे पालक. चक्क. :ड
- शेरलॉक आणि जॉन दोघेही भावनिक पातळीवर व्यवस्थित गंडलेले लोक आहेत. पिस्तुलं, पाठलाग, रहस्य, खून, धमक्या, बॉम्ब यांत ते जितक्या सहजतेनं वावरतात, तितकीच त्यांची भावनिक गोष्टींना सामोरं जाताना फाफलते. त्यांची तारांबळ आणि हळूहळू येणारी प्रगल्भता हा या मालिकेचा सर्वांत वेगळा नि रंजक भाग आहे. त्या बाबतीत या भागानं पूर्ण समाधान केलं.
- मेरी मॉर्ट्सन. जॉनची प्रेयसी. अॅमंडा अॅबिंग्टन केवळ गोड. अतिशय मजा येते ती, बेनेडिक्ट आणि मार्टिन यांच्यातले सीन्स पाहताना.
नाही म्हणायला, अॅन्डरसनसोबतचा शेरलॉकचा सीन मला विशेष नाही आवडला. थोडा कापला असता तर काहीच बिघडलं नसतं. तशीच ट्रेन्सची दृश्यं आणि जॉनला बॉनफायरमधून वाचवतानाचा पाठलागाचा सीक्वेन्स हे दोही जरा लांबलं आहे. पण एकुणात पुढच्या भागात काही उत्तरं मिळणं शिल्लक आहे. त्यासाठी वाढवलेली उत्कंठा आणी आधीच्या प्रश्नांना दिलेली उत्तरं, एकाएकी मिळालेली प्रचंड लोकप्रियता आणि त्यामुळे वाढलेल्या अपेक्षा हे सगळं पाहता मी खूश आहे.
आता विसूनाना आणि अनुपच्या प्रतिसादावरः
१. उद्याचा एपिसोडही तुम्हांला फारसा आवडेलसा नसण्याची शक्यता आहे असं जालावरच्या रिपोर्ट्सवरून वाटतंय. ;-)
२. अगदी सुरुवातीपासून शेरलॉकमधे शेरलॉकच्या मानवी असण्याला मॉफ्टिसनं महत्त्व दिलंय. एरवी रहस्यकथा अनेक. त्यांचं मला फारसं अप्रूप नाही. च् च्, त्यांना कमी नाही लेखत. पण मला त्याचं फारसं अप्रूप नाही वाटत. रहस्य आणि उकल यात बरेचदा अनपेक्षित असं काही नसतं. याउलट तर्कशुद्धता अधिक ह्यूमन कोशंट अशी ही शेरलॉकी आवृत्ती मला खूप वेगळी वाटते, आवडते. परिणामी हा भाग मला थोडासा सैल वाटला, पण ठीकच. आय वोण्ट अॅट ऑल कम्प्लेन. :)
राधिका - वेषांतराबद्दल अगदी अगदी! रॉ.डा.ज्यु.ची आठवण झालीच. पण तसंही मॉफ्टिसनं म्हटलंच आहे, 'एव्हरीथिंग इज कॅनन'.
अपेक्षाभंग
'शेरलॉक' ची फार उत्कंठा लागून राहिलेली होती. त्याला बरीचशी कारणे वैयक्तिक स्वरुपाची आहेत. पण 'मैं आज इस जहान को ठुकरा के पी गया' असे काहीसे हाती लागेल असे वाटले होते. भ्रमनिरास झाला. सुदैवाने जालावरच्या एका मित्राने भेट म्हणून पाठवलेला जेरेमी ब्रेटच्या होम्सचा पूर्ण संच माझ्याकडे आहे. त्यातली एक तबकडी लगोलग पाहिली आणि जिवाला बरे वाटले.
मला 'एलेमेंटरी' मधला होम्स 'शेरलॉक' मधल्या होम्सपेक्षा अधिक आवडू लागला आहे.
अरेरे
सुदैवाने जालावरच्या एका मित्राने भेट म्हणून पाठवलेला जेरेमी ब्रेटच्या होम्सचा पूर्ण संच माझ्याकडे आहे. त्यातली एक तबकडी लगोलग पाहिली आणि जिवाला बरे वाटले.
इथपर्यंत मी समजू शकते.
मला 'एलेमेंटरी' मधला होम्स 'शेरलॉक' मधल्या होम्सपेक्षा अधिक आवडू लागला आहे.
पण ही वेळ येण्याइतका 'शेरलॉक'चा हा भाग नावडावा?
'माणसाळलेल्या' होम्समुळे का?
दुसरा भाग पाहण्यापूर्वी
१. शेरलॉक जॉनला आपण जिवंत आहोत हे सांगतो तो प्रसंग त्यातल्या जॉनच्या प्रतिक्रियेमुळे फारच आवडला. सर्वांत शेवटी जॉन भयंकर रागावून सरळ शेरलॉकच्या नाकाडावर आपलं डोकं आपटतो हे तर झकासच.
२. आधीच्या एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे वेषांतर आवडलं.
३. कॉन्स्पिरसी थिअरीजची खिल्ली उडवली हे आवडलं. पण हा भाग प्रिक्वेल म्हणून प्रसारित केलेल्या मिनि एपिसोडसाठी जास्त साजेसा होता असं वाटतं. मुख्य भागांतला वेळ यासाठी खर्ची पडायला नको होता.
४. जॉनला 'डॅमसेल इन डिस्ट्रेस' झालेलं पाहून फारच मजा वाटली. पण तोही भाग लांबला आहे या मेघनाच्या मताशी सहमत.
५. केस फारच छोटी होती, त्यातलं रहस्य फार चांगलं नव्हतं आणि त्यात शेरलॉकच्या बुद्धिमत्तेची चुणूक नीटशी दिसली नाही त्यामुळे त्या बाबतीत नाराज आहे.
६. शेरलॉकने आपण मरण्याचं नाटक कसं केलं याचं दिलेलं स्पष्टीकरण आवडलेलं नाही. त्यात अनेक लोकांना तो जिवंत असल्याचं माहित आहे आणि हे शेरलॉकला साजेसं मुळीच नाही. परंतु भागाच्या शेवटी जॉनशी त्याचं जे बोलणं झालं त्यावरून हे स्पष्टीकरण खरं नसल्याची शंका येते आहे.
शेरलॉकच्या दुसर्या भागाबद्दल
शेरलॉकच्या दुसर्या भागाबद्दल (साइन ऑफ थ्री):
हा भाग अगदी 'न-शेरलॉकी', 'फॅनफिकी', 'रॉमकॉम' झाल्यामूळे बरेच शेरलॉकप्रेमी नाराज आहेत. या नाराजीत तथ्य नाहीच असं नाही, कारण या भागात जॉनचं लग्न आणि त्याला शेरलॉकनं दिलेल्या प्रतिक्रिया हाच मुख्य गाभा आहे. एक लहानशी हुश्शार केसुकली आहे, पण त्यातही भावनिक प्रतिक्रिया आहेतच ("वी वुडण्ट डू इट टू जॉन वॉट्सन!"). पण मला त्यात काही आक्षेपार्ह दिसलं नाही. मी फार मनापासून एन्जॉय केला हा भाग.
कारणं अशी - एकतर मॉफ्टिसच्या म्हणण्यानुसार हा 'डिटेक्टिव शो' नसून 'शो अबाउट ए डिटेक्टिव' आहे. खेरीज (ही पुनरावृत्ती आहे, स्वारी) सुरुवातीपासून त्यांनी व्यक्तिरेखांचा जो ग्राफ विकसित केलाय, त्याला या भागाची गोष्ट धरून आहे. अगदी पहिल्या सीझनमधला शेरलॉक उद्धट, थंड डोक्याचा, फटकळ, माणूसघाणा आहे. दुसर्या सीझनमधला शेरलॉक बराच माणसाळलाय. एका भागात तो ऑलमोस्ट आयरीनच्या प्रेमात पडतो, मॉलीची माफी मागतो, दुसर्याच चक्क स्वतःची चूक कबूल करतो आणि जॉनला मस्का लावतो, तिसर्यात मित्रांची किंमत किती असते हे पचवतो. या सीझनमधे त्याची इमोशनल, व्हर्ल्नरेबल बाजू दिसणं साहजिक आहे. इनफॅक्ट तसं न दाखवता त्यांनी थंड डोक्याचा, मॅचो, डिडक्टिंग मशीन असलेला शेरलॉक रंगवला असता तर ते कृत्रिम झालं असतं.
माझा अंदाज असा की - या भागात या सगळ्या इमोशनल गोष्टी करून, शेरलॉकला व्हर्ल्नरेबल करून, मेरीची व्यक्तिरेखा छानपैकी तपशीलवार रंगवून पुढच्या भागात तिला मॉफ्टिस मारून टाकतील आणि शेरलॉक नि जॉन पुन्हा एकदा २२१ बीमधे (आणि पूर्ववत वेगवान पाठलाग आणि गोळीबंद डिडक्शन्सच्या जगात) परततील. (हे तर डॉयलबुवांनीही लिहिलंच आहे!)
अधिक महत्त्वाचा प्रश्नः
बुद्धिमान माणसांच्या भावनिक वाढीला आणि त्यातल्या गुंत्यांना आपण इतकं कमी / फिल्मी / टाकाऊ का लेखतो?
मला पण आवडला हा एपिसोड.
मला पण आवडला हा एपिसोड. मेरीचं पात्र फार म्हणजे फारच आवडलं. मेरीला मारून टाकतील त्यावेळी वाईट वाटेल मला.
अजुन एक आवडलेली गोष्ट म्हणजे सगळ्यांचंच आपपसांत वाढलेलं कम्युनिकेशन. शेरलॉक बेस्ट मॅन स्पीच कसं देणार याची चिंता सगळ्यांनाच आहे. एपिसोडचा फ्रेश लुक आवडला.
न आवडलेली गोष्ट - मायक्रॉफ्टचा अतीशय वाढवलेला रोल. अगदीच नाही आवडलं ते मला.
वेडिंगच्या केसच्या वेळी उगाच होतं शेरलॉक मायक्रोफ्टशी बोलतोय ते.
एकूण, मजा आली मला. पुन्हा आता शेवट आला. या वेळी किती वर्ष वाट पाहायला लावणारेत नेक्स्ट सीझन साठी कुणास ठाउक!
तुला मायक्रॉफ्ट नाही आवडत?
तुला मायक्रॉफ्ट नाही आवडत? मला लई म्हणजे लईच आवडतो तो.
तेव्हा मायक्रॉफ्ट शेरलॉकशी बोलताना दाखवलाय याचं कारण माझ्या मते - त्याचा शेरलॉकच्या विचारप्रक्रियेवर प्रभाव आहे. शेरलॉक त्याच्याशी कितीही भांडत असला तरीही. 'केअरिंग इज नॉट...' हे मायक्रॉफ्टचंच गुरुवचन!
अधिक महत्त्वाचा
अधिक महत्त्वाचा प्रश्नः
बुद्धिमान माणसांच्या भावनिक वाढीला आणि त्यातल्या गुंत्यांना आपण इतकं कमी / फिल्मी / टाकाऊ का लेखतो?
भावनिक वाढीसाठी आणि त्यातल्या गुंत्यासाठी शेरलॉक बघत नसल्याने स्वारस्य कमी होते. शेरलॉकची भावनिकता सटल आणि अधिक अव्यक्त आहे हे त्याचं बलस्थान आहे, त्याला जेवढं ठळक करुन सांगितलं जाईल तेवढं ते त्याच्या भुमिकेसाठी मारक असेल, त्या भावनिक गुंत्यासाठीच जॉनचे पात्र कथेत असते, त्याची रिडन्डन्सी झाल्यास जॉनची कथेतली गरज कमी.
मुद्दा भावनिक गुंतागुंतीला
मुद्दा भावनिक गुंतागुंतीला कमी लेखण्याचा नाहीये. ती भावनिक गुंतवणूक ज्या प्रसंगांमधून दिसणं अपेक्षित आहे ते प्रसंग ओढून ताणून आणलेले वाटले. आधीच्या भागांमध्ये जे गोष्टीच्या ओघात सहजपणे येऊन जायचं फक्तं ते दाखवण्यासाठी या भागात काही प्रसंग घातलेले आहेत आणि ते रंगलेले नाहीत.
हं
आधीचे दोन सीझन मागच्याच महिन्यात पाहिले होते आणि आवडले होते. तिसर्या सीझनची भरपूर उत्सुकता लागली होती.
तिसर्या सीझनचा पहिला भाग ठीकठाक वाटला. दुसरा भाग मात्र चांगलाच रटाळ वाटला. काही घडतच नाही, नावाला एक फुसुकपाणी केस घातली आहे. भावनिक, माणसासारखा वाटणारा म्हणून असा होम्स असणार असेल, तर असो बापडे. मला तर कंटाळा आला. असो. तिसरा भाग बघायची उत्सुकता कमी झाली आहे!
तिसरा भाग बराच बरा वाटला
निदान मेरी-जेनिन 'डबल क्रॉस' तरी बराच बरा होता. पण शरलॉक Charles Augustus Magnussen चा खून करून प्रकरण संपवतो हे काही बरे नाही वाटले. तो शॉर्टकट झाला.
(रेकॉर्डींग केले आहे. हा भाग पुन्हा एकदा पहावा असे म्हणतोय. तितकी त्याची लायकी आहे.)
मोरिआर्टी परत येतोय हे बरे आहे -शरलॉकला च्यॅयलेंज करायला!
मला अजिबातच पटलेला
मला अजिबातच पटलेला नाही.
पहिल्या नि बर्याच प्रमाणात दुसर्या भागात त्यांनी नेहमीपेक्षा निराळं वळण घेतलं - ते आवडण्याबद्दल दुमत संभवणं अपेक्षित आहे. पण हा भाग? क्वाइट क्रिस्प.
मॉरिआर्टी तोच आहे की त्याचा भाऊ आहे (जिम / जेम्स), की नुसतीच हुलाहूल आहे (स्विमिंग टँकचा सीन काहीही तर्कशुद्ध कारण न देता गुंडाळला गेला होता), की चक्क मायक्रॉफ्टचा डाव आहे... ठाऊक नाही. मेरीबद्दल - ती मेली असती तर मी जास्त खूश झाले असते. पण तसंही... पुढच्या भागात मरेल!
तिसर्या सिझनचा पहिला भाग
तिसर्या सिझनचा पहिला भाग पहिला... शेरलॉक-वॉटसन ची ग्गो-ग्गोड हणामारी आणि शेरलॉक फॅन्सक्लब चे तर्क-विर्तक ह्यात मूळ केस अगदी नावाला घातली आहे आणि तशीच गुंडाळून टाकली आहे असे वाटले... थोडक्यात 'शेरलॉक पट्टीतील' भाग आजिबात वाटला नाही आणि निराशा झाली. पुढील दोन भागात काहीतरी दमदार शेरलॉक शैलीतील पहावयास मिळेल ह्याची अपेक्षा!!!
हे प्रतिसाद इकडे आणावेत ही विनंती.
http://www.aisiakshare.com/node/2427#comment-42568 -हे प्रतिसाद इकडे आणावेत ही विनंती.