Skip to main content

आयुष्यावर काही क्षणिका

कमरेच्या दुखण्या मुळे गेल्या काही दिवसांपासून घरीच होतो , बिस्तरावर पडल्या -पडल्या मन स्वैर-भैर भटकत होत. आयुष्य म्हणजे काय एकच विचार मनात येत होता.

जगणे म्हणजे सूर्याचा प्रकाश, दिवस आणि रात्र ... (ब्लोग वर पूर्व प्रकाशित)



(१)

आहे गगनी सूर्य जोवरी
वेचून घ्या आनंदी फुले.

(२)

किती ही जोडा
उरणार शेवटी "शून्य".

(३)

सकाळची चंचलता
दुपारची स्थिरता
सायंकाळची उदासीनता
विराम रात्रीचा.

(४)

अस्ताचलचा सूर्य
रोखण्यास धावतो.
हरणार युद्ध
रोज खेळतो.

प्रकाश घाटपांडे Wed, 22/01/2014 - 20:46

>>आयुष्य म्हणजे काय एकच विचार मनात येत होता.
सलील संदीप च्या कुठल्यातरी कवितेत आयुष्य म्हणजे कांदे पोहे म्हटलय ब्वॉ! काय भानगड आहे काही कळत नाही. प्रत्येक जण आयुष्य म्हणजे काहीतरी वेगळच म्हणत असतो. मला तर जन्म व मृत्यु यातील अंतराला आयुष्य म्हटलेल पटत ब्वॉ!

सिफ़र Wed, 22/01/2014 - 20:59

आहे गगनी सूर्य जोवरी
वेचून घ्या आनंदी फुले.

छान
पण "शून्य" तरी उरेल का?
fact("शून्य") = १ ना ? म्हणून तेही उरणे नाहीच असो... कविता आवडली :)