Skip to main content

मॉडर्न नारी

जूना झाला मिनी स्कर्टही
फाडून घाली जीन पँट ही
शॉर्ट पँट मला दिसते भारी
नव्या युगाची मॉडर्न नारी

गाय बाय हाय फाय बोली
ओ शीट फक यू लै भारी
सॉरी म्हणून विसरून जा‌ई
नव्या युगाची मॉडर्न नारी

बीयर रम चालेल म्हणते
कमॉन यार! ती काय दारु असते?
हुक्का सिगरेट झोकात ओढते
नव्या युगाची मॉडर्न नारी

क्लब मध्ये रम्मी जूनी झाली
कॅसीनो डीस्कोची मजाच न्यारी
नवरात्री नाचते दांडीया गर्बाही
नव्या युगाची मॉडर्न नारी

वॉट्सऍप वर चॅटींग करते
फेसबूकवर शे‌अर करते
इंटरनेटवर नवराही मिळवते
नव्या युगाची मॉडर्न नारी

टेनिस बॉक्सिंग उत्तम खेळते
सी‌ई‌ओची पदे भुषवते
अवकाशातही भ्रमंती करते
नव्या युगाची मॉडर्न नारी

गुन्हेगाराला सजा देते
सैन्यातही अधिकार गाजवते
देशाचेही नेतृत्त्व करते
नव्या युगाची मॉडर्न नारी

लग्नात वरपूजा हवीच म्हणते
सालंकृत कन्यादान करायला लावते
करवाचौथ वट पौर्णिमा पुजते
नव्या युगाची मॉडर्न नारी

मुलगाच हवा सोनोग्राफी करते
सत्यनारायणाला नवस बोलते
बुवा बाबांच्या वार्‍या करते
नव्या युगाची मॉडर्न नारी

- देवदत्त परुळेकर

सिफ़र Thu, 13/02/2014 - 10:15

In reply to by बॅटमॅन

आत्ता ग बये याला पण माहितीपूर्ण ,
अच्चिच्त गच्ची गच्चीत टाकी असं काहीस म्हणावसं वाट्तेये ;)
चालू द्या :)

कान्होजी पार्थसारथी Thu, 13/02/2014 - 01:33

नेमक्या शब्दांत थेट अर्थ सांगणारी मॉडर्न कविता.
विशेष म्हंजे कवी कुठलीच स्पष्ट बाजु न घेता त्याच्या नज्रेत येणार्‍या बाबी मांडतो. (गाय बाय हाय फाय यात्ला यचा अनुप्रास!!)

राजन बापट Thu, 13/02/2014 - 01:57

कविता आवडली नाही.

या अशा प्रकारांमधली ही घटना म्हणजे "बॉस" आहे. : http://www.misalpav.com/node/6332

निदान असलं काहीतरी तरी येऊ द्यात :)

बॅटमॅन Thu, 13/02/2014 - 16:47

In reply to by राजन बापट

मुसुशेठ, इथे तुमच्याशी असहमती नोंदवतो.

मोकलायाची शुद्ध व्हर्जन खरेच सुंदर आहे.

इथे तसे काहीच नाही. दोन्हींची तुलना कुठल्याही बेसिसवर करणे शक्य नाही.