बाबागाणी..१
गवि
झोप आता माझ्या बाळा वाजले रे बारा..
दुधासाठी पिशवी लावून येतो दारा..
पाहू नको शिनचॅन, फार वांड झालाय..
झोपवण्या तुला बघ डोरेमॉन आलाय..
बाबाच्या ढेरीवर टाक तुझे पाय..
बापाचाच माल तुझ्या, पर्वा तुला काय?
गळा माझ्या मिठी मारुन झोप ढाराढूर..
उद्या मला सुट्टी, उद्या जाऊ दोघे भूर..
लपवून ठेवू उद्या आजोबांची सिगरेट
कोणालाच ठावे नाही, तुझं माझं सिक्रेट..
-गवि
भारीच गाणं. पण हे गाणं ऐकून
भारीच गाणं.
पण हे गाणं ऐकून पोरं झोपणार नाही, खुदुखुदु हसत बसेल आणि अजून गाणी ऐकवा म्हणून हट्ट धरून बसेल.