Skip to main content

कोंबडी म्हणाली कोंबड्याला (चार चारोळ्या)

'पहाटे ओरड पाहिजे तेवढे-'
कोंबडी म्हणाली कोंबड्याला,
'ऐकावी लागणार दिवसभर
नंतर पक् पक् माझी तुला !'

मांजर निघाले घाईघाईत
शिकार उंदराची करायला -
आडवा आला माणूस नेमका
परतावे लागले मांजराला !

मुंगळयाने पाहिली गुळाची ढेप
निघाला तुरुतुरु खायला -
मधेच एक माशी शिंकली
माणसाच्या पायाखाली आला !

एक खेकडा सकाळी उठला
पूर्वेकडून पश्चिमेला निघाला -
संध्याकाळ होईपर्यंत
उत्तरेला नेमका पोहोचला !