Skip to main content

फेमिनिष्ठांची मिथके

...

बातमीचा प्रकार निवडा

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/09/2014 - 19:27

In reply to by अजो१२३

पुन्हा एकदा - भारतात किती गुन्हे दडवले जातात हे मला माहित नाही. एक गुन्हा नोंदवला जातो तेव्हा ९ दडपले जातात का ९० हे मला माहित नाही. वरच्या आकडेमोडीच्या प्रतिसादात मर्यादित मुद्दा एवढाच होता की तुमची आधीची आकडेमोड चुकीच्या आकलनानुसार केलेली होती.

मुळात ही आकडेमोड म्हणजे 'दर्या में खसखस' प्रकारची आहे असं माझं मत, आकलन, विचार आहेत. ते का याचं स्पष्टीकरणही खालच्या प्रतिसादात दिलेलं आहे. यापुढे या विषयावर बोलण्यासारखं काही नवीन, सध्यातरी माझ्याकडे नाही. त्यामुळे मी थांबते.

बॅटमॅन Tue, 09/09/2014 - 19:28

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ती आकडेमोडच फक्त पाहिली तर तेवढ्यापुरते अजो बरोबर आहेत. तो आकडा १.८ आहे, १८ नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/09/2014 - 19:00

In reply to by सविता

आकड्यांच्या बाबतीत माझी काहीच भूमिका नाही. भारतात किती बलात्कारांची नोंद होत नाही हे मला माहित नाही आणि माहितीअभावी त्याबद्दल बोलण्याचं धाडस माझ्याकडे नाही.

स्त्रियांची परिस्थिती किंवा स्थितीचा विचार करताना फक्त बलात्कार आणि त्याची आकडेवारी याचा विचार करणं हेच मला मुळात पुरुषप्रधान वाटतं. पुरुषप्रधान संस्कृतीत थोर असणारी योनीशुचिता किती प्रमाणात मोडली जाते, फक्त यावरून स्त्रियांची स्थिती किती चांगली किंवा वाईट आहे हे ठरवणं हेच मला नामंजूर आहे. त्यामुळे अगदी अजोंच्या गृहितकातले आकडे विश्वासार्ह मानले तरीही त्याला किती महत्त्व द्यायचं? शिक्षण, नोकरी, आर्थिक स्वातंत्र्य, सबलीकरणाचे टप्पे यांच्यात तुलना करता काय दिसतं?

फक्त बलात्कार याच एका गोष्टीबद्दल बोलायचं असेल तरीही गुन्हा झाल्यानंतर पुढे काय? निर्भया किंवा जेसिका लाल सारख्या प्रश्नांना भारतात आता वाचा फुटायला लागलेली आहे, पण जेसिका लाल (किंवा प्रियदर्शिनी मट्टू) यांसारख्या परिस्थितीत, जिथे सामाजिक उतरंडीत फार वर पोहोचलेले लोक गुन्हेगार असतात तिथे न्याय मिळणं किती सोपं असतं? किती पीडीतांना न्याय मिळतो? न्याय मिळाला तरीही पुढे आयुष्य काय प्रकारचं असतं? अमेरिकेत अलिकडेच एका कृष्णवर्णीय मुलाला पोलिसाने गोळी घालून मारलं तर किती तरी आठवडे त्यावरून त्या गावात तणाव होता. आपल्याकडे खैरलांजीनंतर पुढे काय झालं? दोन्ही गुन्ह्यांमध्ये कुठलं क्रौर्य जास्त होतं? (दोन्हीकडे बोंब होतीच, पण त्यातल्या त्यात) कुठली परिस्थिती अधिक चांगली हाताळली गेली?

बलात्कार या गुन्ह्याची नोंद करणं कोणत्या देशात सोपं आहे? पुढे न्यायालयीन कारवाई होणं आणि प्रत्यक्षात शिक्षा होण्याचं प्रमाण किती आहे? पीडीतांना त्यापुढे मानाने जगण्यासाठी ज्या प्रकारच्या वैद्यकीय, सामाजिक इ., सोयींची, आवश्यकता असते त्याचा विचार कोणत्या देशात आणि किती होतो?

अमेरिकेतली परिस्थिती सगळी फार उत्तम आहे असा माझा अजिबात काहीही दावा नाही. अमेरिकेतही श्रीमंतांना न्याय 'विकत' घेता येतो; श्रीमंत (आणि गौरवर्णीय) लोकांचे गुन्हे शाबीत होऊन शिक्षा होण्याचं प्रमाण गरीब (आणि कृष्णवर्णीय) लोकांपेक्षा कमीच आहे. अमेरिकेतही स्त्रियांसमोर, विशेषतः गरीब परिस्थितीमधल्या, काही वेळेस गुन्हे करण्याशिवाय इलाज नसतो. (उदा: गरीब घरातली स्त्री एकल पालक असण्याची शक्यता, मध्यमवर्गीय स्त्रीपेक्षा जास्त असते. नोकरीसाठी गरीब स्त्रीला पर्याय नसतो. तिचं काम घरात बसून करण्यासारखं नसतं. बालसंगोपनगृहाचा खर्च परवडेल असं नसतं, घरातून पाठींबा नसतो. मग मुलांना गाडीत किंवा बागेत एकटं सोडणं असे गुन्हे करण्याशिवाय या स्त्रियांसमोर काही पर्याय नसतो.)

वर मांडलेल्या मुद्द्यांमधले कोणतेही आकडे मला माहित नाहीत, मी आत्तापर्यंत वाचलेले नाहीत किंवा ऐसीवर कोणीतरी काहीतरी म्हणतंय म्हणून हातातलं काम सोडून मी ते वाचणारही नाही. आकडे नसतानाही, फक्त किती टक्के स्त्रियांवर बलात्कार होतात याची चर्चा करणं, हे पृष्ठभाग खरवडण्यापलिकडे नाही हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. प्रश्नातल्या बारकाव्यांचं आकलन करून न घेता किंवा त्या बारकाव्यांकडे दुर्लक्ष करून दोन-चार आकडे दाखवून नक्की काय समजतं, हे मला खरोखर समजलेलं नाही. कदाचित माझ्या आकलनात काहीतरी गडबड असेल आणि या मुद्द्यांमध्ये काहीही दम नसेल.

बॅटमॅन Tue, 09/09/2014 - 19:14

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

स्त्रियांची परिस्थिती किंवा स्थितीचा विचार करताना फक्त बलात्कार आणि त्याची आकडेवारी याचा विचार करणं हेच मला मुळात पुरुषप्रधान वाटतं.

अज्ञानमूलक या शब्दाबदली पुरुषप्रधान हा शब्द घालून पुरुषद्वेषाचं एक रोचक उदाहरण पुरवल्याबद्दल आभार.

"आकड्यांकडे अज्जीच दुर्लक्ष करणं हेच मुळात स्त्रीप्रधान वाटतं" हे विधान आणि वरचे पुरुषप्रधानतेचे विधान यांत वट्ट फरक नाही.

अजो१२३ Tue, 09/09/2014 - 19:16

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आपल्या प्रतिसादाचा इतर सर्व आशय उचित असू शकतो. त्यातल्या भावनांशी माझी सहमती आहे. पण मला खूप सिमित मुद्दा मांडायचा होता, तो असा कि बलात्काराच्या बाबतीत भारत ठिक आहे.

बॅटमॅन Tue, 09/09/2014 - 19:19

In reply to by अजो१२३

तो असा कि बलात्काराच्या बाबतीत भारत ठिक आहे.

ते वाय का कुठलं तरी क्रोमोसोम म्हणे डिलीट होणारे पूर्णपणे. ते एकदा झालं की ना रहेगा पुरुष, ना होंगे बलात्कार! मग भारतच काय, अख्खे जगच बलात्कार-फ्री होऊन जाईल.

अजो१२३ Tue, 09/09/2014 - 19:30

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

नॉन रिपोर्टींग
अमेरिकेच्या ५४% पेक्षा जास्त मानाल तर अमेरिका आठी मुंड्या चीत.
अमेरिकेच्या ५४% इतकेच मानाल तर अमेरिका चारी मुंड्या चीत.
अमेरिका ५४% आणि भारत ९०% (१०% रिपोर्टींग) मानाल तरी भारत तिप्पट बरा.
अमेरिका ५४% आणि भारतात ९६-९७% (३-४% रिपोर्टींग) मानाल तर भारत अमेरिका समान.
अमेरिका ५४% आणि भारतात ९९% (१% रिपोर्टींग) मानाल तर अमेरिका श्रेष्ठ. पाहिजे तेवढा कनवाळा करा.

आता १% का ते १०% रिपोर्टींग ते आपणच ठरवा. कारण त्यापेक्षा जास्त ठरवायची मानसिकता असेल अपेक्षा नाही.

सविता Tue, 09/09/2014 - 11:55

In reply to by ऋषिकेश

पकडापकडीचा खेळ नको. फॉर वन्स, शांतपणे वाचल्यावर अजो काय सांगायचा प्रयत्न करतायेत ते मला कळले. (जरी त्यांनी मुद्द्याची सुरूवात आक्षेप घेता येईल अशा वाक्याने केली तरी!)

म्हणजे हे या धर्तीवर चाल्लेय

ऋ : तो रंग काळा आहे.
अजो : अहो पण तो रंग पांढरा नाहीये तर एक्दम त्याच्या उलट आहे.
ऋ : पण तुम्ही मान्य का नाही की तो काळा आहे?

तेव्हा जिथे खरोखर काही वेगळे मुद्दे येत असतील तर प्रतिसाद द्या (दोघेही), नवीन प्रतिसाद आले म्हणून आम्ही क्लिक करावे तर हेच गु-हाळ!

बॅटमॅन Tue, 09/09/2014 - 11:58

In reply to by ऋषिकेश

जर तुम्ही त्या विधानाचे व्यवस्थित खंडन करू शकत नसाल तर तसे मान्य का नाही करत?

उदा. मोदीराज्य कसे वैट्ट आहे हा नल हायपोथेसिस. सिद्ध करता येत नै म्हणून खरा मानावा की काय?

बॅटमॅन Tue, 09/09/2014 - 11:53

In reply to by अजो१२३

प्रचंड निरर्थक विधान आहे. आणि वास्तवाच्या विपरित.

कशावरून ते सांगा. 'तुझ्या ओळखीत किती बायकांवर बलात्कार झाले? नाही ना कुणी? झालं तर मग बलात्कार होतच नैत.' अशा क्व्श्चनेअरच्या प्रतीक्षेत. पण अर्थातच विदा द्यायचे कष्ट तुम्ही घेणार नाही हे माहिती आहे.

अजो१२३ Tue, 09/09/2014 - 11:58

In reply to by बॅटमॅन

बॅट्समॅन, नेशनमास्टर च्या डाटामधे, भारतात किती टक्के "दाबलेल्या केसेस" असतील तर भारताची स्थिती अमेरिकेसारखी होईल याचे गणित सोडव. मग पुढे चर्चा करू.

बॅटमॅन Tue, 09/09/2014 - 19:24

In reply to by अजो१२३

तुटपुंज्या विद्यावरून स्वर्गास जाणे हे नेहमीचेच आहे सबब चालूद्या.

The recent statistics comparing India and the U.S. imply higher rates here in the U.S., but the actual facts don’t quite add up. In 2012, over 24,000 cases of rape in India were reported, calculating approximately two rapes per every 100,000 people. In the U.S., the chance of a person being raped is reported to be 13 times more likely. But the severe discrepancy between the two countries isn’t exactly a mystery, as local surveys in Indian through the past 25 years revealed approximately 1 to 4 percent of Indian women acknowledged having been raped–which brings the rate of rape in India to between 50 and 200 times greater than reported by the Indian government.

बातमीचा सोर्स. खाली.

http://guardianlv.com/2013/09/rape-statistics-much-greater-than-reports…

अजो१२३ Tue, 09/09/2014 - 19:39

In reply to by बॅटमॅन

यातली सारी माहिती युनोचीच आहे. फक्त त्या ५० ते २०० च्या ढगातल्या गोळ्या आहेत. त्या बाबाला म्हणावं, असं लिहिताना किमान वर्ल्ड स्टॅट वाचायचे ते विधान लिहिण्यापूर्वी. अगदी वर्स्टे देश जो आहे त्याचा आकडा किती आहे ते पहा म्हणावं. ३६० पर लॅक त्याच्या किती पट भरतं ते पाहा म्हणावं. जगातला वाईटात वाईट आकडा ३० च्या आसपास आहे. शून्ये ठोकून त्यांनी दिली आणि तुम्ही वाचली.
------------------
धाग्यावरचा माझा शेवटचा प्रतिसाद.

बॅटमॅन Tue, 09/09/2014 - 19:41

In reply to by अजो१२३

त्यातलं बाकीचं रीझनिंग न वाचता, फक्त तुम्हांला पटते तेवढीच आकडेवारी घेतल्याबद्दल हबिणंदण.

अजो१२३ Tue, 09/09/2014 - 19:54

In reply to by बॅटमॅन

बाकीचं रिझनिंग? भारत काय पृथ्वीबाहेर आहे का? कि इथे यादवी चालू आहे? इथे का बलात्जार जगातल्या सर्वात वाईट देशांपेक्षा (जिथे यादवी युद्धे नि बोको हराम, इ इ आहे) १० पट जास्त आहेत असे मानावे?

अजो१२३ Tue, 09/09/2014 - 19:58

In reply to by अजो१२३

शेवटी अदितीचा कळवळा उचित आहे हे ठरवण्यासाठी माहितीतले सगळे गॅप वापरून (म्हणजे अमेरिकेत १:१, मी भारतासाठी गृहितक घेतले १:१०. पण त्याने तुमचा संतोष झाला नाही. तुम्हाला १:५० आणि १:२०० देखिल चालत आहे. आणि त्याकरिता तुम्ही आफ्रिकेत जिथे नेहमी वांशिक युद्धे आणि विस्थापने होतात त्यापेक्षा भारत दहापट घाण आहे म्हणायला तयार आहात.) खापर माझ्याच माथी फोडणार!!!

बॅटमॅन Tue, 09/09/2014 - 21:13

In reply to by अजो१२३

स्वतः शष्प रिसर्च न करता त्या आर्टिकलमधील आकड्यांना हवाबाण म्हणणे आणि बेसलेस तर्कटे खडी करणे बाकी रोचक आहे.

काळा मठ्ठ बैल … Tue, 09/09/2014 - 16:44

In reply to by अजो१२३

बॅट्समॅन, नेशनमास्टर च्या डाटामधे, भारतात किती टक्के "दाबलेल्या केसेस" असतील तर भारताची स्थिती ...

बॅट्समॅन
नाव चांगल आहे
कोण्तापण धागा असेल
कोण्तापण विषय असेल
कोणपण खेळत असेल
ह्यांची बॅटिंङ चालुच
चालुद्या

कुंदा गजानन फु… Tue, 09/09/2014 - 21:55

In reply to by काळा मठ्ठ बैल …

बॅटिङग म्हणजे कापडाचा तुकडा फुगवणारा तागा, बेडकाचा बैल बनवणारा, असतो त्याबद्दल बोलताय काय?

हे असं?

अजो१२३ Tue, 09/09/2014 - 12:09

In reply to by बॅटमॅन

अ- आमची अमेरिका लै चांगली. इथे स्त्रीयांवरील गुन्हे जास्त प्रमाणात 'रिपोर्ट होतात'. मला हे पाहून भारतीय स्त्रीयांची...
ब - अमेरिका पाहून भारताची कीव करायची गरज नाही. इथली परिस्थिती चांगली आहे.
क- ती कशी?
ब- अमेरिकेत २७.५ बलात्कार होतात. भारतात १.८.
क- मात्र यात रिपोर्टींग करेक्शन हवं.
ब- अर्थातच. आपण अमेरिकेचे पोलिस, समाज लै भारी म्हणून तिथे ९०% रिपोर्टिंग मानू. भारतात १०% मानू. तरीही भारतात 'एकूण परिस्थिती' तिप्प्ट चांगली. ते ही इतिहास आज कितीतरी पट बिघडला असताना.
क - !?!?
ब- जर ३%च रिपोर्टींग मानली (भारतात १००तले ९७ बलात्कार तस्सेच गेले तरी भारत अमेरिकेच्या समान निघतो.). १% वा २% म्हणाल तरच वाईट निघतो. तेव्हा प्लीज अमेरिका पाहून भारताला सहानुभूती नको.

अतिशहाणा Fri, 05/09/2014 - 20:57

इतरत्र स्कॉट अॅडम्स यांच्या लेखाचा दुवा (http://dilbert.com/blog/entry/is_feminism_sexist/) दिला होता. फेमिनिझम संदर्भात त्या लेखाला आलेली एक प्रतिक्रिया येथे द्यावीशी वाटली.

I remember hearing a survey where a bunch of men were asked if they were feminists. About 30% said yes. Then the pollster clarified that a feminist is someone who thinks women should have equal rights as men. Then when re-asked the question, over 90% said yes.

गब्बर सिंग Mon, 08/09/2014 - 14:26

माझी फायनान्स ची प्रोफेसर ... एमी डिटमार ... तिने हा पेपर पब्लिश केलाय. http://webuser.bus.umich.edu/adittmar/NBD.SSRN.2011.05.20.pdf

स्त्रियांना कंपनीच्या संचालक मंडलात राखीव जागा दिल्या की त्याचे कंपनीच्या ऑपरेटिंग परफॉर्मन्स वर अनिष्ट परिणाम होतात. त्याबद्दल आहे. पृष्ठ क्र. ३२ वर थेट उडी मारणे - निष्कर्ष सेक्शन.

In 2003, a new law required that 40 percent of Norwegian firms’ directors be women – at the time only nine percent of directors were women. We use the pre-quota cross-sectional variation in female board representation to instrument for exogenous changes to corporate boards following the quota. We find that the constraint imposed by the quota caused a significant drop in the stock price at the announcement of the law and a large decline in Tobin’s Q over the following years, consistent with the idea that firms choose boards to maximize value. The quota led to younger and less experienced boards, increases in leverage and acquisitions, and deterioration in operating performance, consistent with less capable boards.

----

पुरुष प्रधानतेच्या समर्थकांनी लगेच "जितं मया" म्हणून उड्या मारू नयेत. हा विजय आहे पण तो पुरुषप्रधानतेचा नाही.

सविता Mon, 08/09/2014 - 17:04

In reply to by गब्बर सिंग

राखीव जागा हा एका प्रकारे गुणवत्ता मारकच असते मग ते स्त्रीयांसाठी असो वा इतर! माझा स्त्री आरक्षणाला विरोध आहे, ३३ वा अगदी ५०% सुद्धा!

ज्या ठिकाणी गुणवत्ता क्रिटिकल असते, तिथे गुणवत्ता सोडून दुसर्या कोणत्याच निकषावर निवड नको! जर याचा अर्थ सर्व पुरूष असं झालं तरी चालेल, आणि अर्थात मग याच निकषांवर १००% स्त्रिया आल्या तर कुरकुर चालणार नाही!

मला प्रश्न हा पडतो की, आरक्षण देऊन गप्प बसवले नाही तर स्त्रिया कोणत्या ठिकाणी फक्त ५०% जागा मिळवतील का पुरूषांना दे माय धरणी ठाय करतील? ;)

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 08/09/2014 - 18:09

In reply to by गब्बर सिंग

... the constraint imposed by the quota caused a significant drop in the stock price at the announcement of the law

ही पुरुषप्रधानता नाहीच असं म्हणता येईल का?

Nile Mon, 08/09/2014 - 20:21

In reply to by गब्बर सिंग

पुरुष प्रधानतेच्या समर्थकांनी लगेच "जितं मया" म्हणून उड्या मारू नयेत. हा विजय आहे पण तो पुरुषप्रधानतेचा नाही

विजय कसला आहे हे ही स्पष्टपणे गब्बर सिंग यांनी सांगून टाकावे अशी विनंती.

नितिन थत्ते Mon, 08/09/2014 - 21:32

In reply to by Nile

इन्क्लूजन व्हावे म्हणून "फडतूसांना" सामील करून घेऊ नये या विचाराचा विजय आहे असे गब्बर यांना वाटत असावे.

गब्बर सिंग Mon, 08/09/2014 - 23:59

In reply to by नितिन थत्ते

इन्क्लूजन व्हावे म्हणून "फडतूसांना" सामील करून घेऊ नये या विचाराचा विजय आहे असे गब्बर यांना वाटत असावे.

चूक.

ज्यांना सामावून घेतले गेले किंवा ज्यांना इन्क्लुड करून घेण्यासाठी तो कायदा केला गेला ते फडतूस नसण्याची शक्यता महाप्रचंड होती / आहे.

गब्बर सिंग Tue, 09/09/2014 - 00:09

In reply to by Nile

यात विस्तारून सांगण्याजोगे फारसे काहीही नाही. When Govt puts equalitarian agenda above liberty of individuals (in this case businessmen and shareholders) - their decisions result in a tax on shareholders. This tax is in the form of reduced returns on investments. याचा परिणाम - सर्व शेअरहोल्डर्स ची आवक/संपत्ती कमी होण्यात होतो. अर्थातच बिझनेसमन ची सुद्धा. This is a proper example of - A, B, C decide what D and E should do for F.

Nile Tue, 09/09/2014 - 01:02

In reply to by गब्बर सिंग

When Govt puts equalitarian agenda above liberty of individuals (in this case businessmen and shareholders) - their decisions result in a tax on shareholders. This tax is in the form of reduced returns on investments. याचा परिणाम - सर्व शेअरहोल्डर्स ची आवक/संपत्ती कमी होण्यात होतो. अर्थातच बिझनेसमन ची सुद्धा. This is a proper example of - A, B, C decide what D and E should do for F.

समजा, ४०% ऐवजी, १५% (म्हणजे ~५०% वाढ) राखीव जागा ठेवल्या असत्या, आणि समजा, त्यामुळे निर्माण झालेल्या बोर्डाचे संतुलन साधारण राहिले असते तर तुम्ही लगेच उलटे विधान केले असते का? ("he quota led to younger and less experienced boards,")

बाकी, जर असमानता असेलच तर बोर्ड डिरेक्टर सारख्या पदांपर्यंत पोहोचणे दुर्लक्षलेल्या घटकाला सोपे नाही. त्याकरता दोन-पाच पिढ्यांचा अभ्यास व्हायला हवा असे तुम्हाला वाटत नाही का? शिवाय, नॉर्वेमध्येच इतर ठिकाणी अशा निर्णयामुळे काय परिणाम झालेत?

१% लोकांनी त्यांच्या राहणीमानात फरक झाल्याने इतर ९९% करता केलेले नियम चुकीचे आहेत असा निष्कर्ष काढण्याची तुमची गरूडझेप वाखाणण्याजोगी आहे.

पेपरमधून

Will perceptions of female corporate leaders chang
e, and if so, will this change the career
paths of young women? The search for answers to these and many
other interesting questions are
important avenues for future research

यावरून मला तरी "काढलेला निष्कर्ष" हा फक्त ह्या काळाकरता अन वरील उदाहरणा करता आहे, यावरून लाँग टर्म निष्कर्ष काढणे योग्य नाही, असा अर्थ कळतो. तुम्हाला वेगळा अर्थ लागतो आहे का? हो, तर का?

बाकी, ही लिंक फेमिनिष्ठ मिथकांच्या धाग्यात का बरे दिली असावी, हा प्रश्न विचारत नाही.

गब्बर सिंग Tue, 09/09/2014 - 02:45

In reply to by Nile

समजा, ४०% ऐवजी, १५% (म्हणजे ~५०% वाढ) राखीव जागा ठेवल्या असत्या, आणि समजा, त्यामुळे निर्माण झालेल्या बोर्डाचे संतुलन साधारण राहिले असते तर तुम्ही लगेच उलटे विधान केले असते का? ("he quota led to younger and less experienced boards,")

माझे विधान जे आहे ते अधिक सुस्पष्ट मांडतो - १५% च काय पण १% जरी राखीव ठेवल्या तरीही ते मला नामंजूर आहे.

या कायद्याच्या मुळाशी असलेला मुद्दा - स्त्रिया बोर्ड लेव्हल पर्यंत पोहोचू शकत नाहीत (कारणे अनेक आहेत व ती खाली मांडत आहे.). म्हणून राखीव जागा मँडेट करून त्यांना तिथे पोहोचवायचे व त्याद्वारे स्त्रियांना संधी मिळवून द्यायची व त्यातून (सरकारच्या दृष्टीने इष्ट परिणाम म्हणून) स्त्रियांना स्किल डेव्हलपमेंट (on the job training and resultant skill development) ला वाव द्यायचा, अनेक बोर्डांवरती (उच्चपदस्थ) असल्यामुळे स्त्रियांचे सामाजिक स्टेटस उंचावायचे, बोर्ड वरील व्यक्तीसमूहाची जेंडर डायव्हर्सिटी वाढवणे, व त्यापदावरील व्यक्तीची आवक जी बक्कळ असते व ती स्त्रियांना मिळणे, .. और चूंकी ४०% बोर्ड मेंबर्स महिलाए है ... त्या एकंदरित लेबर फोर्स मधे स्त्रियांविरुद्ध जर भेदभाव होत असेल तर तो भेदभाव वरून प्रेशर आणून रोखतील - हे हेतू आहेत. (या जोडीला इतर हेतू ही असतील.)

१) कोणतीही एक विशिष्ठ व्यक्ती (स्त्री असो वा पुरुष) - ही एखाद्या पदावर पोहोचत नाही त्याचे एक (एकमेव नव्हे) कारण क्षमतेचा अभाव असू शकते.
२) इच्छाशक्तीचा अभाव हे देखील असू शकते.
३) संधीचा अभाव हे देखील असू शकते. ( butter-fly effect, lack of education, lack of upbringing "required" for that particular position, etc. ). याचा परिपाक स्किल डेव्हलपमेंट मधील तूट.
४) भेदभाव
५) इतरही कारणे असू शकतात्/असतात.
६) Combination of 1 to 5 above.

यातील भेदभाव हे एकमेव कारण असे आहे की ज्याचे विवेचन करणे गरजेचे आहे.

-

माझे मुद्दा हे आहेत - की -

१) स्त्रियांविरुद्ध भेदभाव केल्यामुळे त्यांना संधी मिळत नसेल तर त्याची शिक्षा शेअर होल्डर्स ना द्यायची नाही. बोर्ड हे शेअरहोल्डर्स नेमतात. शेअरहोल्डर्स चे हितसंबंध जपणे हा बोर्डाचा मुख्य अजेंडा असतो. If shareholders want they can and will appoint a woman at that position if (they think) they want to correct the pattern of discrimination against women by giving preferential treatment to women.

२) भेदभाव विरोधी कायदे हे भेदभाव करणार्‍यास मदत करणारे असतात.

३) या भेदभाव विरोधी कायद्यांमुळे शेअरहोल्डर्स चे नुकसान होते व बिझनेसमन चे ही. व ज्यांच्या हितरक्षणासाठी कायदे केले जातात त्यांच्याही स्पर्धात्मक संधी हिरावून घेतल्या जातात.

४) भेदभाव विरोधी कायद्यांमुळे फक्त पॉलिटिशियन्स ना मते मिळतात व "आम्ही उच्च्/उदात्त उद्देश वाले आहोत" अशी उरबडवेगिरी करण्यात त्यांना यश मिळते.

----

बाकी, जर असमानता असेलच तर बोर्ड डिरेक्टर सारख्या पदांपर्यंत पोहोचणे दुर्लक्षलेल्या घटकाला सोपे नाही. त्याकरता दोन-पाच पिढ्यांचा अभ्यास व्हायला हवा असे तुम्हाला वाटत नाही का? शिवाय, नॉर्वेमध्येच इतर ठिकाणी अशा निर्णयामुळे काय परिणाम झालेत?

असे खरे असले तरीही - एखादी बाब माझ्यासाठी कठिण आहे म्हणून इतरांना ती माझ्यासाठी सोप्पी करायला "जबरदस्तीने" लावायची (व ते ही मोबदला न देता) ह्यास माझा विरोध आहे.

माझे म्हणणे मी पुन्हा एकदा सुस्पष्ट मांडतो -

१) कोणतीही व्यक्ती भेदभाव करत असेल (based on irrelevant considerations ) तर ते त्या व्यक्तीसच मारक असते. पण भेदभाव विरोधी कायद्याचा परिणाम असा सुद्धा होतो की - जिच्या विरुद्ध भेदभाव केला जातो तिच्याही संधी कमी करण्यात होतो.

२) सोपे नाही हे खरे आहे. पण म्हणून A and B imposing it on C to make it सोपे for D - is not acceptable. सरकारच्या जबाबदारीच्या थेट विरुद्ध आहे हे.

-----

१% लोकांनी त्यांच्या राहणीमानात फरक झाल्याने इतर ९९% करता केलेले नियम चुकीचे आहेत असा निष्कर्ष काढण्याची तुमची गरूडझेप वाखाणण्याजोगी आहे.

तुमच्या रिटायरमेंट पोर्टफोलिओ मधे तुमच्या शेजारच्या व्यक्तीस निर्णय घेण्याचे अधिकार परस्पर व तुमच्या परवानगिविना व कोणत्याही मोबदल्याविना दिले जाऊ नयेत - असा माझा मुद्दा आहे.

(आता लगेच अ‍ॅपल्स व ऑरेंजेस चा आक्षेप घेऊ नका. किंवा - गब्बर - एका "मिलियन डॉलर पोर्टफोलिओ" ची तुलना "बिलियन डॉलर कंपनीशी" करीत आहे - असाही आक्षेप घेऊ नका - कारण हे उदाहरण आहे.)

दुसर्‍या शब्दात सांगायचे तर - हे भेदभाव विरोधी कायदे हे व्यक्तीचे विकल्प कमी करतात. व सरकारचे काम व्यक्तीचे विकल्प कमी करणे हे नाही.

---

वरील विधानांपैकी फक्त - भेदभाव विरोधी कायदे हे भेदभाव करणार्‍यास मदत करणारे असतात - हे एकमेव विधान असे आहे की ज्याचे अधिक विवेचन केले जाऊ शकते. बाकीचे मुद्दे अधिक विवेचनाची गरज संपुष्टात आणण्याइतके स्पष्ट आहेत.

'न'वी बाजू Tue, 09/09/2014 - 05:32

In reply to by गब्बर सिंग

पण भेदभाव विरोधी कायद्याचा परिणाम असा सुद्धा होतो की - जिच्या विरुद्ध भेदभाव केला जातो तिच्याही संधी कमी करण्यात होतो.

(ठळकीकरण माझे.)

या आर्ग्युमेंटावरून, आम्हाला आमच्या लाडक्या 'अ‍ॅस्टेरिक्स' मालिकेतील 'ओबेलिक्स अ‍ॅण्ड को.' या अंकातील एका प्रसंगाची आठवण झाली. तेथेही असेच काहीसे आर्ग्युमेंट केलेले आहे. (इच्छुकांनी प्रस्तुत दुव्यावरील छापील पृष्ठ क्र. ३९वरील दुसर्‍या चित्रपंक्तीतील पहिली दोन चित्रे पाहावीत. डिस्क्लेमर: प्रस्तुत दुव्यावरील मजकूर ही प्रस्तुत कॉमिकची बहुधा कोणीतरी (प्रताधिकाराचा भंग करून) स्क्यान करून आंतरजालावर चढवलेली पीडीएफ आवृत्ती असावी, असे वाटते. पण तूर्तास खपवून घेऊ.)

तेव्हा, खरे आहे. जिच्याविरुद्ध भेदभाव केला जातो, तिला आधीच संधी कमी आहेत; त्याही नष्ट करता कामा नयेत, नाही का?

(अतिअवांतर: श्री. गब्बर सिंग हे सपोज़ेडली अर्थशास्त्राचे अभ्यासक आहेत - बोले तो, निदान माझी तरी अशी समजूत आहे - ही बाब लक्षात घेता, प्रस्तुत दुव्यावरील अंकातील अथपासून इतिपर्यंत आख्खीच्या आख्खी ष्टोरी त्यांस बहुधा रोचक आणि उद्बोधक वाटावी, असा आमचा आपला एक कयास आहे. चूभूद्याघ्या.)

गब्बर सिंग Tue, 09/09/2014 - 06:00

In reply to by 'न'वी बाजू

मी वाचले ते पान. मला फारसे काही समजले नाही.

स्लेव्ह, राईट टू वर्क वगैरे आहे. पण डोक्यावरून गेले.

Nile Tue, 09/09/2014 - 22:27

नेहमीप्रमाणे नीट न वाचताच चर्चा चालू आहे असे दिसते.

, says only 46% of U.S. rape cases get reported to the police

वॉलस्ट्रीट जर्नलचा दुवा तपासला, ( https://rainn.org/get-information/statistics/reporting-rates ) या दुव्यावर ४६% आकडा कसा आला ते दिसत नाही. दुव्यावरील चित्रानुसार ४०% आकडा असावा. त्या करता संदर्भ म्हणून १. Justice Department, National Crime Victimization Survey: 2008-2012 दिलेला आहे. या अहवालातात ४० किंवा ४६ हे दोन्हीही आकडे बलात्कारासंबंधात मला तरी अजून दिसले नाहीत. (अहवाला वरवर, चाळला. कोणी शोधून देणार असेल तर आगाऊ धन्यवाद.)

. It shows 1.8 incidents of reported rape in India per 100,000 people in 2010 compared to 27.3 in the U.S

त्या दुव्यातील नोटः

Please note that when using the figures, any cross-national comparisons should be conducted with caution because of the differences that exist between the legal definitions of offences in countries, or the different methods of offence counting and recording.

याच दुव्यावरील लहान मुलांविरुद्धच्या लैंगिक गुन्ह्यांचे भारतातील प्रमाण ०.५ प्रति १००,००० इतके कमी आहे. तेच कॅनडाचे, ~११, जर्मनी ~१४, नेदरलंड ~७, अरब एमीरेट्स, ०.१, पॅलेस्टाईन, ०.३ , येमेन १ वगैरे. आता ह्या आकड्यांवरून भारतापेक्षा अरब देश वगैरे चांगले आहे असा निष्कर्ष काढणार का?

पहिल्या दुव्यातील उद्धृत;

However, the percentage of serious violent
victimizations involving a weapon and reported to the police
increased from 55% in 2010 to 67% in 2011. In 2011, a greater
percentage of robbery (66%) and aggravated assault (67%)
victimizations were reported to the police, compared to simple
assault (43%) and rape or sexual assault (27%) victimizations.

अमेरीकेत दारूच्या प्रभावाखाली केलेल्या परस्परसंमत संभोगाला बलात्कार मानायचे का नाही यावर वाद आहेच (कारण, संमती होती का नव्हती हे सिद्ध करणे अवघड आहे). http://www.msnbc.com/msnbc/maryville

ही सगळी गुंतागुंत पाहता, अर्धवट माहितीद्वारे कल्पनेचे इमले बांधणार्‍या लोकांचे कौतुक वाटते.

मागे एकदा मी 'डोमेस्टिक व्हायलन्स' वरती थोडेफार 'संशोधन' केले होते, तेव्हा भारतात [एकूण (आणि टक्केवारीने)] अमेरीकेपेक्षा जास्त डोमेस्टीक व्हायलन्स आहे हे जवळपास मला पटले होते. (अभ्यासाकरता एक दुवा), असे असता भारताचे बलात्कारचे(च) प्रमाण कमी असेल असे मानणे अवघड आहे.

जाता जाता एक प्रसंग, मागे एकदा आमच्या युनिव्हर्सीटीतील पोलिस डिपार्टमेंटमध्ये गेलो होतो, तिथे एक रडून डोळे लाल झालेली मुलगी आलेली होती. (बॉलीवूड सिनेमात दाखवतात तसे पोलिस इथे टेबलं खुर्च्यावर नव्हते, तर खिडक्या होत्या), शेजारच्याच खिडकीत ती तक्रार नोंदवत असल्याने मला तीची तक्रार व्यवस्थित ऐकू आली. एक्स बॉयफ्रेंडने तीला मोबाईलवर मेसेज करून सतावल्याने ती हरॅसमेंटची तक्रार नोंदवायला आली होती. (बाकी हलकट लोकांनी लगेच तु कशाला गेला होतास पोलिस डिपार्टमेंटमध्ये वगैरे फालतू प्रश्न विचारू नयेत.)

बॅटमॅन Wed, 10/09/2014 - 01:57

In reply to by Nile

(बाकी हलकट लोकांनी लगेच तु कशाला गेला होतास पोलिस डिपार्टमेंटमध्ये वगैरे फालतू प्रश्न विचारू नयेत.)

कशाला गेला होतास ********ला इ.इ.

तदुपरि- मेलेल्या मध्यमवर्गीयास पुनरेकवार कत्लेआम करून यावर एखादा लेख पाडणेचे करावे.

अजो१२३ Wed, 10/09/2014 - 12:00

In reply to by Nile

युनो स्वतः जाऊन कोणत्याही देशात कोणतेही स्टॅट मोजत बसत नाही. त्या त्या सरकारांनी दिलेले आकडे एकत्र करते. सर्वत्र तोच विदा वापरला आहे.

अजो१२३ Wed, 10/09/2014 - 11:06

ईथले भारतीय सांख्यिकीला नाकारणारे प्रतिसाद वाचले तर भारतीयत्वाबद्दलच्या न्यूनगंडाची कीव वाटते. बलात्काराचे अंडररिपोर्टींग १:९० वैगेरे प्रमाणात होते म्हणणारे हे का पाहत नाहीत कि इथला समाज योनिशुचितेबाबत प्रचंड संवेदनशील आहे. नुसते मुलींना छेडले तर दोन महिने न विझणारी आग अख्ख्या जिल्ह्याला लागते अशी उदाहरणे आहेत, पुढचे जाऊच. त्यातूनही भारतीय स्त्रीता खूप कंझर्वेटीव आहेत, त्यांचा तथाकथित हितचिंतक समाज त्यांचेवर सतत पहारा ठेवतो, दोन लिंगाना शक्यतो एका सीमेपलिकडे वेगळे ठेवले जाते, नि बलात्कार होईल अशी परिस्थिती इथे कमी संभवते.
-------------
ते एक असो. जर भारतात असं अंडररिपोर्टिंग इतक्या विकृत प्रमाणात आहे असं मानायचं असेल तर तेच जीडीपीचं मानाल का? म्हणजे इथले लोक चोर आहेत, ९० रुपये कमवले कि एक रुपया कमावला म्हणून सांगतात आणि आपली कर , इ जबाबदारी टाळतात. असे म्हणत भारत हा प्रत्यक्षात अमेरिकेपेक्षा ८-१० पट गरीब नसून १०-१२ पट श्रीमंत आहे असे म्हणाल का? आणि असं म्हणायला कारण देखिल आहे. भारतात आर्थिक मूल्ये, वर्क एथिक ना के बराबर आहेत.

बॅटमॅन Wed, 10/09/2014 - 11:45

In reply to by अजो१२३

विद्याचा प्रतिकार विद्याने न करणे बाकी रोचक आहे. म्हणजे बलात्काराचे अंडररिपोर्टिंग फार आहे हे पटत नसेल तर चर्चा जीडीपीकडे वळवायची सो दॅट पब्लिकचं लक्ष विचलित होईल. युक्ती उत्तम आहे, पण ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी ;)

बॅटमॅन Wed, 10/09/2014 - 11:56

In reply to by अजो१२३

त्याचा यथायोग्य प्रतिवाद निळे यांच्या प्रतिसादात आहे, पण तो न पाहता चर्चा डिफ्लेक्ट करणे सुरूच आहे.

बॅटमॅन Wed, 26/11/2014 - 00:16

ज्याप्रमाणे ब्राह्मणेतर जन्ता आणि संस्कृतबद्दलची नेहमीची सायटेशन्स देऊन काही आकलन वाढत नाही त्याप्रमाणेच आहे ते. अर्थात त्याबद्दल तक्रार नाही कारण त्यामागचा उद्देश आकलन वाढवणे हा नाही हे माहितीच आहे.

हा प्रतिसाद इथे का हलवला याचे स्पष्टीकरण मिळाल्यास बरे. याची ओरिजिनल जागा इथे आहे. मस्त पोरकट प्रकार आहे.

बॅटमॅन Wed, 26/11/2014 - 00:25

This comment has been moved here.

हा प्रतिसाद हलवणे हा निव्वळ पोरकटपणा आहे. पण त्यामुळे झालेल्या उद्बोधनामुळे छान करमणूक झाली, बहुत धन्यवाद.

मूळ प्रतिसादः

ज्याप्रमाणे ब्राह्मणेतर जन्ता आणि संस्कृतबद्दलची नेहमीची सायटेशन्स देऊन काही आकलन वाढत नाही त्याप्रमाणेच आहे ते. अर्थात त्याबद्दल तक्रार नाही कारण त्यामागचा उद्देश आकलन वाढवणे हा नाही हे माहितीच आहे.