Skip to main content

न्यूयॉर्क आणि वॉशिंटन डी सी मधे कट्टा करूया का?

नमस्कार.
पुढील एका महिन्याच्या कालावधीत (२० आक्टोबर पर्यंत) न्यूयॉर्क आणि वॉशिंटन डीसी मधे कट्टा करूया का?
कोण कोण ऐसीकर या दोन्ही शहरात आहेत? मी सध्या आल्बनीमधे आहे, आणि खास म्युझियम्स बघण्यासाठी या दोन्ही शहरांचा आठवडाभराचा प्रवास करण्याचा बेत करत आहे.
कट्ट्याचे वेळी एकाद्या म्यूझियमची सफर करू शकतो, किंवा अन्य कुठेतरी मोकळ्या जागी जमू शकतो, आणि पुरेसा वेळ असल्यास मी तैलरंगात निसर्गचित्रणाचे प्रात्यक्षिक करू शकतो.

माझा इथला फोनः ५१८ ८३१ १७९१.

नितिन थत्ते Thu, 18/09/2014 - 06:25

चालेल.

मी पण येईन. ठरलेल्या ठिकाणाचे मुंबईपासूनचे तिकीट आणि व्हिसा पाठवून द्यावा. :D

मी Thu, 18/09/2014 - 08:32

In reply to by नितिन थत्ते

आणि पुणे-मुंबई टॅक्सी भाडे पण. अहो पण उतरणार कोणाकडे? त्याचीही व्यवस्था करायला सांगूया. ;)

मन Thu, 18/09/2014 - 09:41

In reply to by मी

त्यासोबतच बेबडेओहोळ ते पुणे असे एस टी भाडे पाठवून देणेचे करावे. हजर होइन.
असो. कट्ट्यास शुभेच्छा! चित्रपूर्ण - कलापूर्ण कट्टा होवो!

'न'वी बाजू Thu, 18/09/2014 - 14:51

In reply to by मी

गेलोच आहोत तर राहू थोडे दिवस म्हणत होतो

...थोडे दिवस राहू, तूपरोटी खाऊ, धष्टपुष्ट होऊ नि परत येऊ.

(ह्यालोवीनपर्यंत राहिल्यास भोपळा पोखरायला निमित्तही मिळेल. मग आहेच 'टुणुक टुणुक'.)

मी Thu, 18/09/2014 - 15:10

In reply to by 'न'वी बाजू

...थोडे दिवस राहू, तूपरोटी खाऊ, धष्टपुष्ट होऊ नि परत येऊ.

तूपरोटी वगैरे वा!, शनवार सोडून बराच काळ लोटलेला दिसत आहे, आणि परत येण्यावर फार भर आहे इथे, ते अनुपराव पण कशाला उतरायचं म्हणत होते.

>>ह्यालोवीनपर्यंत राहिल्यास भोपळा पोखरायला निमित्तही मिळेल.

सर्वपित्री अमावस्येला भोपळ्याचं फदफदं?

वामा१००-वाचनमा… Thu, 18/09/2014 - 21:07

In reply to by बॅटमॅन

:) मला तरी विनोदी वाटतो अन. पण अळूचं फदफदं लागतं मस्त. पूर्वी लग्नाच्या जेवणावळीत असायचं आमच्या पुण्यात ;)

अतिशहाणा Thu, 18/09/2014 - 17:25

In reply to by अनुप ढेरे

उमेरिकन लोकं ठेऊन घेतील का अशी शंका/ भीती उत्पन्न होऊ शकते. म्हणून मी ती शंका उपस्थित केली.

ठेऊन घेतील हा वाक्प्रयोग लैच अश्लील वाट्टो राव.

अनुप ढेरे Thu, 18/09/2014 - 21:33

In reply to by अतिशहाणा

काय ओ... उमेरिकन लोकांच्या आतिथ्याबद्दल शंका उपस्थित केली तर लगेच विषयांतर?? छान युक्ति! अमेरिकन दिस्तें !!

धनंजय Thu, 18/09/2014 - 21:13

अरे लोकहो!!!

मूळ विषयाला धरून : चित्रगुप्त यांना भेटायला, त्यांच्याबरोबर चित्रकला बगैरे बघायला जरूर आवडेल. वॉशिंगटन गाव माझ्याकरिता जवळ आहे. न्यूयॉर्क तसे लांब आहे.

Nile Thu, 18/09/2014 - 23:07

एरवी अमेरीका म्हणल्यावर लगेच शिव्यांची वाखोली वाहणारे लोक तिकिट मिळाले तर अमेरीकेत यायला उतावीळ झालेले पाहून गंमत वाटली!

बाकी, (अमेरीकेच्या) पश्चिमेला येणार असलात तर कळवा हो चित्रगुप्त.

मन Fri, 19/09/2014 - 09:13

In reply to by नितिन थत्ते

+१
अवांतर :-
मूळचा जर्मनीतला कार्ल मार्क्स १८५० नंतर इंग्लंडात रहायला गेला.(बहुतेक लंडनमध्ये होता.)
त्याकाळातलं लंडन म्हणजे... लोकशाही, नामधारी राजसत्ता आणि मोठ्ठं जागतिक साम्राज्य, भरभराटिला आलेले औद्योगीकरण व समृद्धी ह्या सर्वाचा कळस होते.
मार्क्स तिथेच बसून ह्या सर्वांच्या नावाने ठणाणा करीत होता.

Nile Fri, 19/09/2014 - 09:47

In reply to by मन

अहो कट्टे काय भारतातही होतातच की! नाही अमेरीकेचं प्रेम तर राह्यलं! आम्ही आपलं विचार करत होते आलातच तुम्ही लोक तर अमेरीका दाखवावी म्हणून. नाही तर नाही, डॉलर्स वाचले!

अनुप ढेरे Fri, 19/09/2014 - 12:19

In reply to by नितिन थत्ते

मुंबई/ठाण्याचे लोक फार दानशूर असतात. अमेरिका कट्ट्याची तिकिटं ठाणेकरांनी स्पॉन्सर करावीत अशी विनंती. तिकडच्या खर्चासाठी तिकडेही मुंबईकर/ठाणेकर आहेत म्हणे.

अनुप ढेरे Fri, 19/09/2014 - 12:34

In reply to by नितिन थत्ते

एकदा तिकिट काढल्यावर ते कुठून काढलंय यानी काय फरक पडणारे. बाकी इथले ठाणेकर 'विशेष' आहेत असं म्हणताय का थत्ते चाचा?

नितिन थत्ते Fri, 19/09/2014 - 14:03

In reply to by अनुप ढेरे

नै नै...

लहानपणचा ज्योक असे.

आमचे मुंबईचे नातेवाईक "ठाण्याला राहतो" या वरून आमच्यावर ज्योक करायचे. (पुण्यात त्याचा इक्विव्हॅलंट 'येरवडा' असे).

धनंजय Fri, 19/09/2014 - 16:55

संपादकांना विनंती : धागा "आगामी कट्टे" खाली हलवावा. अनेक कट्ट्यांना लागू असणारा येथील खेळकर उपधागा त्या ठिकाणी वेगळा उपधागा असावा. जेणेकरून या विवक्षित कट्ट्याबाबत तपशिलांचे प्रतिसाद सरमिसळणार नाहीत.

ऋषिकेश Mon, 22/09/2014 - 17:01

कट्ट्याला शुभेच्छा!

या धाग्यावर कृपया मुळ कट्ट्याच्या प्लानिंगमध्ये खंड पाडू शकतील असे प्रतिसाद टाळावेत / अन्य योग्य त्या धाग्यावर / (व अशा अवांतर प्रतिसादाची लांबी बरीच मोठी असल्यास) वेगळा धागा काढून ते व्यक्त करावेत.