<b>आता संभवा की युगे युगे !</b>
एखाद्या बारक्या पोराने स्वतःच लावलेल्या फटाक्यांच्या मोठ्ठ्या
माळेच्या आवाजांना घाबरून माजघरात जाऊन लपावं तसा
अब्राहमी लोकांचा देव शेपूट गांxत घालून
कुठे जाऊन लपला आहे देव जाणे!
(जिहोव्वा तू परत ये ,
तुला कोणी रागावणार नाही,
सगळे तुझ्या चिंतेत आहेत
आईने जेवण सोडले आहे !)
थांबा थांबा: कोणत्या कत्तलीसाठी सध्या अश्रू गाळतो आहोत
याची गल्लत करू नका . (प्रत्येक जागच्या किंकाळ्या
वेगळ्या आहेत!) आपलं काय ठरलंय ?
१ ते २: ओर्लांडो
२ ते ३: सॅन बर्नार्डिनो
३ ते ४: पॅरिस
४ ते ५: ब्रसेल्स
६ ते ७: इस्तंबूल
७ ते ८: नीस
(आणि दहा पेक्षा कमी मेले असतील ते धरू सुद्धा नका ,
वेळ नाहीये ! मुडद्यामागे एक मिनिट देणे अधिक न्यायाचे होईल का
यावर विचार चालू आहे. )
नोआखली मध्ये, कोलकोत्या मधे पांढऱ्या पंचातला एक म्हातारा
काठी टेकत टेकत फिरू लागला
की सुरे, बंदुका, तलवारी हळूहळू म्यान होत,
आगी आपोआप विझत म्हणे
ख्रिस्त, बुद्ध, गांधी हे असले पंटर नेमक्या वेळेला कुठे गायब झाले रे?
संभवा मी युगे युगे वगैरे विसरलेले दिसतात !
बोंबला !
: मिलिंद पदकी
कळले तुम्ही कुठल्या संदर्भात
कळले तुम्ही कुठल्या संदर्भात कुठल्या वाक्यावर जोर देत होतात ते. तरीही मुद्दा असा आहे कि
" अमेरीकेतेल्या काही लोकांनी गुलामगिरी संपवण्यासाठी काळ्या लोकांसाठी लायबेरीया हा देश तयार करुन दिला. गम्मत म्हणजे अमेरीकेतुन एक गुलाम लायबेरीयात आला. त्यानी लगेच आफ्रीकेतल्या दुसर्या काळ्यांना पकडुन त्यांची गुलाम म्हणुन अमेरीकेत विक्री चालु केली."
हि संपूर्ण घटना इतकी विकृत होती कि , त्यातील ( संदर्भ सोडून ) एकच वाक्य निवडून फक्त त्यातील विकृती highlight करणे मला अयोग्य आहे असे वाटले . ( माझे वैयक्तिक मत ) . म्हणुन तुम्ही ज्या वाक्यावर जोर दिला नाहीत त्याची थोडीसी पार्श्वभूमी लिहिली . अवांतर : १८४८ पासून या देशाचे इतके कुत्रा हाल चालू आहेत कि त्याला तोड .... फक्त कॉंगो मधील कुत्रा हाल परिस्थिती .
अवांतर : १८४८ पासून या देशाचे
अवांतर : १८४८ पासून या देशाचे इतके कुत्रा हाल चालू आहेत कि त्याला तोड .... फक्त कॉंगो मधील कुत्रा हाल परिस्थिती .
म्हणे १८ व्या शतकात इंग्लंडचे कैदी ( म्हणजे गुन्हेगार असावेत ) औस्ट्रेलियात नेऊन सोडले. तिथे गेल्या २ दशकात कुत्राहाल परिस्थिती झाली असा गळा काढलेला ऐकला तरी नाहीये.
लायबेरीया ला नैसर्गीक संप्पती आहे, समुद्र किनारा आहे. पश्चिम युरोप जवळ आहे. जेंव्हा हे गुलाम नेऊन सोडले असतील तेंव्हा फार तर २-५ लाख असतील. ज्यांना करायचा आहे त्यांना स्वर्ग निर्माण करता आला असता.
मला सांगायचे इतकेच आहे, सारखे सारखे बाहेरच्या शक्तींवर बोटे दाखवण्यापेक्षा स्वताकडे बघावे आणि सुधारणा कराव्यात. ज्याच्यात हा गुण मुलभुत असतो ते बदल घडवुन आणतात. बाकीचे दुसर्यांच्या नावानी खडे फोडत बसतात.
" म्हणे १८ व्या शतकात
" म्हणे १८ व्या शतकात इंग्लंडचे कैदी ( म्हणजे गुन्हेगार असावेत ) औस्ट्रेलियात नेऊन सोडले. तिथे गेल्या २ दशकात कुत्राहाल परिस्थिती झाली असा गळा काढलेला ऐकला तरी नाहीये. "
ताई , ऑस्ट्रेलियातील मूळ रहिवासी असलेले अबोरिजिनल्स यांचे काय कुत्रा हाल झाले याची आपल्याला कल्पना दिसत नाहीये . ते जवळ जवळ नामशेष झाले होते. त्यांना बेलगाम पध्धतीने मारून टाकल्यामुळे !!!
राहता राहिला प्रश्न गळा काढलेले तुम्ही ना ऐकल्याबद्दल : एकतर ऑस्ट्रेलियातील भौगोलिक परिस्थितीमुळे तिथे मूळ लोकसंख्या खूप कमी होती ( मध्ये मोठे वाळवंट व राहण्यायोग्य , शेती करण्यायोग्य वगैरे जागा अतिशय कमी ... आजही हीच परिस्थिती आहे ) आणि हि कत्तल /शिरकाण हे साधारण दीड दोन शतकांपूर्वी झाली . त्याच्या बद्दल कोणी गळा काढला जरी असेल तरी तो तुमच्या पर्यंत कसा पोचणार आणि कोण पोचवणार ?
" लायबेरीया ला नैसर्गीक संप्पती आहे, समुद्र किनारा आहे. पश्चिम युरोप जवळ आहे. जेंव्हा हे गुलाम नेऊन सोडले असतील तेंव्हा फार तर २-५ लाख असतील. ज्यांना करायचा आहे त्यांना स्वर्ग निर्माण करता आला असता. "
माझ्या माहितीनुसार हि संख्या लाखांमध्ये नव्हती !!! . आणि केवळ नैसर्गिक संपत्ती , समुद्र किनारा असला म्हणजे स्वर्ग तयार करता येतो हे विधान जरा भाबडे नाही का वाटत ? स्वर्ग वगैरे निर्माण करायला याहून बऱ्याच जास्त लागत असाव्यात का ? माझी तुम्हाला विनंती आहे कि या विषयावर तुम्हाला एवढी कळकळ / इंटरेस्ट असेल तर निदान वरवरच्या माहितीकरिता मी वर लिहिलेले पुस्तक वाचाल का ? पुण्यातल्या असलात तर ब्रिटिश library मध्ये आहे . ( आपण मेम्बर नसलात तर मी issue करवून देऊ शकतो ) या गोष्टी थोड्या complex असतात हो !!!
५०-१००-२०० वर्षापूर्वी काय
५०-१००-२०० वर्षापूर्वी काय झाले आणि काय झाले नाही ह्याच्याशी मला काही घेणे देणे नाही. रादर कोणीच ती ओझी बाळगु नयेत.
रीसेंट पास्ट, वर्तमान आणि भविष्य बघावे.
तसेही मला वाचायचेच असेल तर कर्तृत्ववान व्यक्ती/समाजाबद्दल वाचायला आवडते. दुसर्यांनी कसे ठोकले ह्याची वर्णने रीसीव्हींग एंड च्या बाजुनी लिहीलेल्या गोष्टी नकोत प्लीज. हा, पूर्वी ठोकले गेल्यावर पुन्हा जोमानी निर्माण केले असेल असे समाज असतील तर त्यांच्या बाबतीत वाचायला आवडते.
हि संपूर्ण घटना इतकी विकृत
हि संपूर्ण घटना इतकी विकृत होती कि , त्यातील ( संदर्भ सोडून ) एकच वाक्य निवडून फक्त त्यातील विकृती highlight करणे मला अयोग्य आहे असे वाटले
तो संदर्भ लिहीण्याचे माझे कारण होते. तुम्ही म्हणलात तसे गोरे लोक तर काळ्यांसाठी परकेच होते, त्यामुळे त्यांनी गुलाम केले वगैरे समजु शकतो.
मला दाखवायचे होते की एका काळ्याला संधी मिळाल्यावर त्यानी त्याच्याच लोकांना गुलाम म्ह्णुन विकायला सुरुवात केली. एकवेळ त्यानी गोर्यांना गुलाम म्हणुन विकले असते तरी समजु शकले असते.
रादर त्या काळ्या गुलाम पुरवणार्या माणसावर अमेरीकेत खटला चालवला गेला.
अमेरीकेतुन एक गुलाम
In reply to विनोदी विधान by अबापट
माझा मुद्दा हा होता. तुम्ही वेगळेच पकडुन बसला आहात.