Skip to main content

ऋणनिर्देश

#अंकाविषयी #ऋणनिर्देश #मन्वंतर #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२१

ऋणनिर्देश

गेलं संपूर्ण वर्षं आपल्यापैकी बहुतेकांसाठी आपापल्या घरांत अडकून पडण्यात गेलं. जुन्या-नव्या मित्रमैत्रिणींना भेटण्याचे बेत करण्यात गेलं. गेल्या वर्षात आपले काही जवळचे, ओळखीचे लोक आज आपल्यात नाहीत. जे आपल्याबरोबर, आपल्या आजूबाजूला आहेत त्यांच्याबरोबर ... ओके!

दिवाळी अंकासाठी ह्या वर्षीही खूप लोकांनी मदत केली; करत आहेत आणि आपण होऊन का एवढे या फाटक्यात पाय घालतात कोण जाणे! पण हे सगळे लोक मदत करतात म्हणून दिवाळी अंक काढण्याचं काम खूप सोपं होतं. अंकासाठी लेखन पाठवणाऱ्या, मुलाखती देणाऱ्या, वेगवेगळ्या लेखिकांशी ओळख करून देणाऱ्या लोकांचे आणि आवर्जून अंक वाचून, प्रतिक्रिया देणाऱ्या सगळ्यांचे मनापासून आभार.

राजेश घासकडवी, अवंती, रोचना, शैलेन, अमुक, नंदन, चिंतातुर जंतू, डॅशी, राजन बापट, आदित्य पानसे, जयदीप, मृण्मयी, उज्ज्वला, सई, अबापट, मिहिर, ३_१४ विक्षिप्त अदिती... आणि कुणाची नावं सुटली असल्यास क्षमस्व.

विशेषांक प्रकार

सन्जोप राव Fri, 29/10/2021 - 13:39

अंकाच्या मुख्य पानावर २०२० हे साल का दिसते आहे?

जयदीप चिपलकट्टी Mon, 01/11/2021 - 07:21

दिवाळी अंकातल्या लेखांच्या लेखकांची नावं देण्यात विसंगती जाणवते. उदा. अनिकेत गुळवणी हे ‘क्वीअर डेटिंग अॅप्स’ चे मूळ लेखक आहेत, आणि लेख त्यांच्याच नावावर टाकला आहे. (भाषांतरकार सई केसकरांच्या नाही.) पण ‘चंगळवाद’ हा मूळ आशिष नंदींचा असूनही तो भाषांतरकार उज्ज्वला यांच्या नावावर टाकला आहे. ‘वास्तुविचार’ हा पुष्कर सोहोनींनी लिहिला असल्याचं लेखावर म्हटलं आहे, पण तो ‘ऐसी अक्षरे’ ह्या आयडीच्या नावे टाकला आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 01/11/2021 - 08:03

In reply to by जयदीप चिपलकट्टी

ज्यांची खाती ऐसीवर सापडली, त्यांच्या नावांनी लेख टाकला. आशिष नंदी मराठी भाषिक नसल्यामुळे ते ऐसीवर फिरकण्याची शक्यता वाटत नाही. सोहोनींच्या बाबतीत ते खरं नाही; पण ऐन प्रकाशनाच्या वेळेस त्यांचा इमेल आयडीही न सापडल्यामुळे ...

पण, पण, पण... हे इंटरनेट आहे. हा संवाद वाचून कुणा व्यवस्थापकांना वाटलं की सोहोनींचं खातं काढून त्यांच्या नावावर लेख प्रकाशित करावा, तर तसं करण्याची सोय असते.

धनंजय Tue, 02/11/2021 - 21:12

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

व्यवस्थापकांनी मूळ लेखकाच्या निर्देशाने त्यांच्या नावाची खाती तयार केलीत तर ते चांगलेच आहे.
किमान -- "तुमच्या नावाने प्रसिद्ध करत आहोत" असे मूळ लेखकांना सांगितले, आणि (त्यांना संदेश पोचतात हे माहीत असले), आणि मूळ लेखकांनी काही हरकत घेतली नाही, तरी चालेल.
नाहीतर भाषांतरकाराच्या खात्यातून (खाते असल्यास), किंवा "ऐसी दिवाळी" किंवा असल्या कुठल्या व्यवस्थापकीय खात्यावरून लेख प्रसिद्ध करता येईल.

"ऐसी दिवाळीवर दिसणाऱ्या लेखाच्या विवक्षित मजकुराला जबाबदार कोण" याचे उत्तर वाचकांना सहज लक्षात आले पाहिजे, म्हणजे झाले.

चिमणराव Tue, 02/11/2021 - 20:12

करमणूक व्हावी हा दिवाळीचा आणि अंकाचा उद्देश साध्य झाला आहे. तसं मागच्या वर्षीच्या अंकाचं आणि दिवाळीचंही झालं नव्हतं.

लेखक आणि मंडळाचे कार्यकर्ते यांनी चांगलं काम केलं आहे.