दिवाळी २०२१
आनंदी असण्यासाठी जग बदलायलाच हवं का? - आलँ बादियु (भाग ३)
आनंदाची अशी एक व्याख्या होऊ शकते : आपण अजाणतेपणे बाळगून असलेल्या क्षमता स्वतःमध्ये सक्रिय क्षमता म्हणून असल्याचा शोध लावणं. जग कसं बदलायचं? याचं उत्तर खरोखरच उत्साहवर्धक आहे : आनंदी राहून. पण याची आपल्याला किंमत मोजावी लागते, ती म्हणजे, वेळोवेळी खरोखरच असमाधानी असणं. ही एक निवड आहे, आपल्या आयुष्यामधील खरी निवड. ही खरी निवड खरं आयुष्य जगण्याशी निगडित आहे.
विशेषांक प्रकार
- Read more about आनंदी असण्यासाठी जग बदलायलाच हवं का? - आलँ बादियु (भाग ३)
- Log in or register to post comments
- 4862 views
आजच्या राजकारणाविषयी - आलँ बादियु (भाग २)
आज खरी विरोधी भूमिका, खरा उठाव, 'आता राजकारण नको, राजकारणाबद्दल बडबड पुरे!' असे म्हणण्यात नक्कीच नाही. किंबहुना, आपण आपल्याला असे काम नेमून दिले पाहिजे जे पक्के याच्या अगदी उलट म्हणेल : अखेर राजकारण, अस्सल राजकारण! राजकारणाच्या बहुलतेसाठी एक पुनर्रचित अवकाश. लांबच्या पल्ल्याचे राजकारण. - आलँ बादियु
विशेषांक प्रकार
- Read more about आजच्या राजकारणाविषयी - आलँ बादियु (भाग २)
- Log in or register to post comments
- 4111 views
आय. आय. टी.त गणित शिकवताना (गणिताच्या निमित्ताने – भाग १२)
शिक्षक म्हणून केलेल्या ह्या प्रवासात मीही अनेक गोष्टी शिकलो. या लेखात माझ्या आय. आय. टी.मधील चव्वेचाळीस वर्षांच्या अनुभवांविषयी लिहिणार आहे. हे अनुभव इतर ठिकाणी थोड्या-फार फरकाने लागू पडतीलही. प्राध्यापक बालमोहन लिमये यांच्या साप्ताहिक लेखमालेतील अखेरचा भाग.
विशेषांक प्रकार
- Read more about आय. आय. टी.त गणित शिकवताना (गणिताच्या निमित्ताने – भाग १२)
- 15 comments
- Log in or register to post comments
- 19795 views
तमस - दुभंगाचं दस्तावेजीकरण
प्रस्तुत लिखाण आहे याच मालिकेतल्या भीष्म सहानी यांच्या 'तमस' कादंबरीवरचं. Name your poison म्हणतात ना. तर हा 'अमुचा प्याला दु:खाचा.'
विशेषांक प्रकार
- Read more about तमस - दुभंगाचं दस्तावेजीकरण
- 3 comments
- Log in or register to post comments
- 4746 views
पदार्थविज्ञान आणि मानवी संस्कृतीचा उत्कर्ष
पदार्थविज्ञानात गेल्या हजारो वर्षांत लावलेले/लागलेले निरनिराळे शोध, तांबं, कांत्स, लोखंड, पोलाद, सिरॅमिक, नॅनो टेक्नॉलॉजी आणि त्यांचा मानवी संस्कृतीवर झालेला परिणाम याचा आढावा.
विशेषांक प्रकार
- Read more about पदार्थविज्ञान आणि मानवी संस्कृतीचा उत्कर्ष
- 8 comments
- Log in or register to post comments
- 7212 views
गरज ही शोधाची जननी : आधुनिक वैद्यक संशोधनाचा संक्षिप्त आढावा
आधुनिक वैद्यकशास्त्रात झालेल्या बदलांचा, रसाळ शैलीतला तपशिलवार आढावा, डॉ. पद्माकर पंडित यांच्या मुलाखतीतून.
विशेषांक प्रकार
- Read more about गरज ही शोधाची जननी : आधुनिक वैद्यक संशोधनाचा संक्षिप्त आढावा
- 24 comments
- Log in or register to post comments
- 24140 views
बदलाचा प्रश्न - आलँ बादियु (भाग १)
"बदल हाच जगाचा नियम आहे," असं जगच बदललं पाहिजे, असं आलँ बादियु का म्हणतात? त्यांनी २०१२ साली दिलेल्या व्याख्यानाचं भाषांतर.
विशेषांक प्रकार
- Read more about बदलाचा प्रश्न - आलँ बादियु (भाग १)
- Log in or register to post comments
- 9349 views
ननैतिक प्रश्न आणि माझे फ्रॉयडियन सोहळे
झरझर वाचून संपवलेलं पत्र संपदानं खाली ठेवलं. तिला आता शाल्मलीचा राग आला होता. म्हणजे या कारणामुळे तिचं अभिषेकसोबत जमलं नाही तर. पण हिने मला काहीच कसं सांगितलं नाही. आणि शिरीषबद्दल तर शंका होतीच, पण आता तर हे स्पष्टच झालं. संपदा स्वत:शीच बोलत होती. शाल्मलीचं अभिषेकसोबत जुळलं नाही याचं वाईट वाटून घ्यावं की तिचं आणि शिरीषचं काही तरी सुरू आहे, अशी शंका आपल्याला होती ...
नक्की काय सुरू होतं या मुलीचं?
विशेषांक प्रकार
- Read more about ननैतिक प्रश्न आणि माझे फ्रॉयडियन सोहळे
- 8 comments
- Log in or register to post comments
- 11527 views
सुरकुती
कागद रंगवून लिखाण घडण्याचा प्रश्नच नव्हता. आणलेले कागद तसेच पडले होते. मन जाग्यावर नव्हतंच. त्या दिवशी घरून निघाल्यावर विघ्नेश थेट गावाला बाबांकडे गेला होता. दिवेलागणीची वेळ. बाबा बाहेरच खुर्चीवर बसले होते. बाजूलाच काकूही होती. आई गेल्यावर बाबांची काळजी काकूच घेते. तिने घरात येऊन राहायला विघ्नेशची आधीपासूनच ना नव्हती. मोठ्याचा, विनोदचा विरोध अपेक्षित होताच.
विशेषांक प्रकार
- Read more about सुरकुती
- 2 comments
- Log in or register to post comments
- 3701 views
मराठी भाषेची आधुनिकता – काही टिपणं
दुसरं उदाहरण – मिस्टर. याला यजमान, पती, नवरा, धनी इत्यादी पर्याय असले तरी प्रत्येक पर्याय हा कोणतं तरी वेगळंच वापराचं क्षेत्र दर्शवतो. यजमान – पूजा, यज्ञविधी, पती – कायदेशीर, नवरा – अनौपचारिक, धनी – ग्रामीण. त्यामुळे यांपैकी काहीच नको आणि इंग्रजीतून उसनवारी होते...
मराठीतले भाषाव्यवहार, भाषांतरांबद्दलची मतंमतांतरं आणि भाषेतली आधुनिकता याबद्दल भाषातज्ज्ञ चिन्मय धारूरकर यांचा लेख
विशेषांक प्रकार
- Read more about मराठी भाषेची आधुनिकता – काही टिपणं
- 10 comments
- Log in or register to post comments
- 13824 views