“द नंबर यू हॅव डायल्ड डझ नॉट एक्सिस्ट.”
मी स्वतःला हातगाडी सारखं ढकलत ढकलत घरी चाललो होतो. ऑफिसला जाताना ढकलगाडी परत येताना पण ढकलगाडी. ऑफिसात कुठे ठेवणार नाही का?
ढकल ढकल एकदा फिरून रे....
शेजारून एक लांब लचक गाडी अगदी खेटून गेली. थोडा धक्का लागला असता म्हणजे? जो पाहावा तो माझ्या जीवावर उठलेला.सुखाने जगू देखील देत नाहीत, हे गाडीवाले.
कर्र कच्च त्याच गाडीवाल्याने अर्जंट ब्रेक लावले होते. गाडीतून झ्याक प्याक सूटवाला उतरला माझ्याकडे पळत येत होता. आता हा काय मला फायर करणार काय? माझी काहीही चूक नव्हती. मी थोडाच ऐकून घेणार होतो?
सूटवाल्याने येऊन मला मिठीच मारली की हो. कुठल्या तरी उग्र डीओचा घमघमाट दरवळला,
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about “द नंबर यू हॅव डायल्ड डझ नॉट एक्सिस्ट.”
- 2 comments
- Log in or register to post comments
- 3208 views
गेल्या काही महिन्यांत बघितलेल्या मालिका
ही मालिका बघायला मैत्रिणीनंच सांगितलं. ही मैत्रीण जवळ राहत नाही; आम्ही एकाच कंपनीत कामही करत नाही. किमान माझी अशी अगोचर मैत्रीण आहे. कोण जाणे, कदाचित ह्या नव्या कंपनीतही कुणी अशी अगोचर मैत्रीण भेटेल, आणि पैसा, सत्ता यांच्यामागे लागलेल्या लोकांच्या गर्दीकडे मला कदाचित सहज दुर्लक्ष करताही येईल.
- Read more about गेल्या काही महिन्यांत बघितलेल्या मालिका
- 2 comments
- Log in or register to post comments
- 3766 views
राधेश्यामी
खेकडा आणि कासव
"काकी, काल तुम्ही खेकड्याचं कालवण दिलं ते आम्हाला दोघांनाही खूप आवडलं!"
"छान. रेसिपी हवीय का तुला?"
"नाही हो, तुमच्या हातची चव ती निराळीच. रेसिपी दिलीत तरी मला तसं बनवता नाही येणार. बाय द वे, तुम्ही कासवाचं कालवण बनवता का?"
"नाही गं. आम्ही कासव नाही खात."
"हे छान झालं!"
"म्हणजे?"
"म्हणजे आम्ही पुढच्या महिन्यात युरोप टूरला चाललोय. आमचं टेरापिन कासव महिनाभर सांभाळाल का?"
- Read more about खेकडा आणि कासव
- 6 comments
- Log in or register to post comments
- 3638 views
फोर बाय सिक्स सोलकढी
"वेटर, फोर बाय सिक्स सोलकढी!"
(कालांतराने)
"हे काय?"
"सोलकढी."
"एवढीच?"
"हे बघा मिस्टर, एकतर दोन तृतीयांश असं नीट सांगण्याऐवजी तुम्ही चार षष्ठांश सांगितलंत. बरं तुमचा विभाजकांचा अभ्यास कच्चा असेल म्हणून मी काही बोललो नाही. पण दोनशे मिलीलीटरच्या सोलकढीचे दोन तृतीयांश म्हणजे आवर्ती अपूर्णांक येतो. शेवटी मला मोजायची प्रक्रिया थांबवावी लागली. तर ही आहे एकशेतेहत्तीस पूर्णांक चौतीस शतांश मिलीलीटर सोलकढी."
"क्काय?"
"बाॅन अपेतीत!"
- Read more about फोर बाय सिक्स सोलकढी
- 5 comments
- Log in or register to post comments
- 3469 views
सिलेंडरेला
आटपाट नगर होतं. त्या नगरात गॅस सिलेंडरची एजन्सी लाभलेला एक इसम राहत होता. त्याची पहिली पत्नी आता भूतलावर नव्हती त्यामुळे त्याने दुसरे लग्न केले होते.
द्वितीय पत्नी आपल्या सावत्र मुलीचा छळ करी. आपल्या सख्ख्या मुलींना चुलीवरच्या चांगल्याचुंगल्या चीजवस्तू चारी; आणि सावत्र मुलीला गॅस सिलेंडरची डिलिव्हरी करायला पाठवी. तिचाकी सायकल दामटत नगरभर गॅस सिलेंडर पोहोचवणाऱ्या त्या मुलीला सर्वजण सिलेंडरेला म्हणत.
- Read more about सिलेंडरेला
- 9 comments
- Log in or register to post comments
- 4499 views
मी वसंतराव
मी वसंतराव हा चित्रपट मी काल पाहिला. तसा बरा आहे चित्रपट. म्हणजे याहून खूप वाईट करता आला असता.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about मी वसंतराव
- 20 comments
- Log in or register to post comments
- 12022 views
शेजारच्या काकांचा पुरुषार्थ जागा झाला.
सगळ्या बायकांचा आता झेलेन्स्कीवर क्रश आहे, असं जाहीर केल्यावर काकांच्या न्यूनगंडाला पारावार राहिला नाही.
- Read more about शेजारच्या काकांचा पुरुषार्थ जागा झाला.
- 6 comments
- Log in or register to post comments
- 4406 views
शाळा - सुधीर बेडेकर
विचारवंत आणि लेखक सुधीर बेडेकर यांचे नुकतेच निधन झाले. ज्येष्ठ विचारवंत दि. के. बेडेकर यांचे ते सुपुत्र होते. ‘मागोवा’ आणि ‘तात्पर्य’ या नियतकालिकांचे ते संपादक होते. त्यांना आदरांजली म्हणून त्यांचा एक लेख साभार प्रकाशित करत आहोत.
---
- Read more about शाळा - सुधीर बेडेकर
- 7 comments
- Log in or register to post comments
- 4915 views
मी वसंतराव - कलाकाराचा मनस्वी संघर्ष
एखाद्या कलाकाराला किती पातळीवर संघर्ष करावा लागतो ते केवळ तो कलाकार आणि त्याचे सखेसोबतीच जाणतात. त्यांच्या संघर्षाचे असे काय महत्त्व जे त्यांच्या कलेत उतरते? ते बघायचे असेल तर सध्याचा मी वसंतराव हा चित्रपट बघणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात असे अनेक कलाकार लोकांपर्यंत उशिरा आले. पण जेव्हा आले तेव्हा कायमस्वरूपी आरूढ झाले. मी वसंतराव हा चित्रपट फक्त वसंतराव देशपांडे यांच्याबद्दल आहे का? नाही तो फक्त एक बायोपिक नसून महाराष्ट्रात नाटक, संगीत वगैरेवर घडामोडींचा एक कालपट आहे. ज्यात वसंतरावांचा एका पठडीबाहेरील गवय्याचा प्रवास आहे. वसंतराव रुढार्थाने कोण्या एका घराण्यातील नावाजलेले गायक नव्हते.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about मी वसंतराव - कलाकाराचा मनस्वी संघर्ष
- 3 comments
- Log in or register to post comments
- 3577 views