Skip to main content

शेजारच्या काकूकाकांनी केसावरून गाठला स्वर्ग

कोथरूड, १२ फेब्रुवारी

शेजारच्या काकांना साबुदाण्याची खिचडी खूपच आवडते. "माझ्याएवढी साबुदाण्याची खिचडी कुणालाच आवडत नाही,?" असं काका संध्याकाळी कॉलनीतल्या मुलांना सांगत होते. दर शनिवारी संध्याकाळी काका साबुदाण्याची खिचडी करतात. "आपल्याकडे पाहुणे बोलावायचे तर ते शनिवारी संध्याकाळीच" असंही काकांनी ठरवून टाकलं आहे.

खिचडी

शब्दखूुळ

कधीकधी एखादं भुत जगातल्या अनेकांच्या मानगुटींवर (की मनांवर) एकदम बसतं, जगाला पछाडून टाकतं. तसंच काहीसं जॉश वॉर्डलनी बनवलेल्या वर्डलनी झालं. पाच अक्षरी इंग्रजी शब्द ओळखण्याचा हा साधा खेळ. सहा खेळ्यांमध्ये गुप्तशब्द ओळखायचा. प्रत्येक प्रयत्नानंतर तुमच्या अक्षरांपैकी किती बरोबर आहेत याबद्दलची माहिती मिळते. खरं तर त्याच्या साधेपणामुळेच तो पुर्ण जगाला आपल्या कह्यात घेऊ शकला. त्याने म्हणे तो आपल्या गर्लफ्रेंड करता लिहिला. तिचं प्रेझेंट मागवायला वेळ न मिळाल्यामुळे. खेळातील यादीत तेवीसशे गुप्तशब्द आहे. गुप्त कसले, ओपन सिक्रेट आहेत ते.

घराविषयीच्या नोंदी

हिजाब की शिक्षण? असं एक राजकीय धार्मिक द्वंद्व सध्या सुरू आहे. कर्नाटकातल्या उडपी जिल्ह्यात - बुरखा घालून कॉलेजात जाणाऱ्या मुलीसोबत काय झालं, हे आपण पाहिलं. सोशल मीडियावर या सगळ्या गोंधळाचे पडसाद उमटले. वेगवेगळे ट्रेंड्स सुरु झाले. हिजाब बुरख्याच्या बाजूने-विरोधात हिरीरीनं मतं मांडली जाऊ लागली. निधर्मीवादाच्या आड लपून स्त्री-स्वातंत्र्याचे आम्हीच जणू कैवारी अशा थाटात अतिरेकी उजव्या संघटनांचे नॅरेटिव्हज, सदाहरित आय.टी.सेलची कर्तबगारी, पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी, आस्तिक विरूद्ध नास्तिक, स्त्रीवादी विरुद्ध स्त्रीवाद न मानणारे अशा अहमहमिकेत इस्लामोफोबियाचा मुद्दा जरा मागेच पडला.

ललित लेखनाचा प्रकार

फुर्रोगामी फियास्को

आज्ञा पाळणारे आज्ञाधारक
आदेश पाळणारे गुलाम
हुकुम देणारे हुकुमशहा
फतवा मानणारे धार्मिक
मंगळसूत्र आणि कुंकू
स्रीवर लादलेली बंधने
स्त्रीचं गृहकृतदक्ष राहणं
जेन्डर बायस्ड अन् स्टिरिओटाईप
हिजाब अन् बुरखा हर चॉईस
हलाला आणि मुताह विवाह
धार्मिक स्वातंत्र्याचे रितीरिवाज
तीन तलाक धार्मिक अधिकार
वटपौर्णिमा किंवा करवा चौथ
स्रीत्वाच्या गुलामीचं जोखड
मासिक धर्मात स्त्रीची अलिप्तता
म्हणजे स्त्रीत्वाचे शोषण
इद्दाह मात्र धार्मिक पवित्र विधी
"संविधान की मनुस्मृती" नारा असतो प्रोग्रेसिव्ह
"संविधान की शरिया" नारा कम्युनल प्रोपागंडा

शेजारच्या काकवा गंमत ऐका

मैत्रीण - अरे यार! तुला गुरुत्वाकर्षणात चुंबकीय आकर्षण वाढवता येणार नाही का? एवढी गणित-गणित करत असतेस आणि साधी बेरीज नाही का करता येत तुला?

रावबाजी

('महाराष्ट्र टाइम्स'मध्ये एकेकाळी सदरलेखन करणाऱ्या श्री. बा. जोशी यांच्या ‘उत्तम मध्यम’ या पुस्तकातील ‘विषण्ण आणि विलक्षण’ हा लेख आवडल्यामुळे त्या लेखाचे काही संपादित अंश ‘ऐसी’वरील वाचकांसाठी!
पेशवाई बुडविणारा म्हणून प्रसिद्ध पावलेल्या दुसऱ्या बाजीरावाच्या ‘रावबाजी’ जीवनशैलीचे हे किस्से ‘ऐसी’करांनाही आवडतील!
)

"लता" माझ्यासाठी कोण होती ?

तिला अगं जागं म्हणणं हा खरंतर अगोचरपणा ! पण स्वतःचं अस्तित्व जाणवलं तेव्हापासून जिचे स्वर स्मृतींच्यात सामावलेले आहेत तिला आणखी काय म्हणणार? तिनी गायलेली काही गाणी माझी आईही फार सुंदर म्हणायची. आईचा आवाज कितीही प्रिय असला तरी "लताच्या" आवाजातला दैवी स्पर्श अगदी त्या बालवयातही जाणवल्यावाचून राहिला नाही. त्यासाठी कोणालाही विशिष्ट भाषा, वय,संगीताची समज अगर अभ्यास असणं अजिबात गरजेचं नव्हतं. प्रेमगीतं, विराण्या, देशभक्तीपर गीतं, भजनं सगळं सगळं तितक्याच समर्पकपणे म्हणणारी ही एकमेव गायिका! मंगेशकर भावंडानी एकेकाळी हिंदी - मराठी संगीतविश्व व्यापूनच टाकलं होतं.