Skip to main content

दूध, आंदोलन, वगैरे वगैरे : १

तर अखेर ते दूध उत्पादकांचं आंदोलन संपलं आज. म्हणजे शहरी मध्यमवर्गीयांना तसा काही फरक पडत नव्हता. म्हणजे तशा कुणी शेतकरी सदृश इसमानं 'दुधोनॉमिक्स'वर एक-दोन पोस्टी टाकल्या होत्या आणि त्याला शहरी मध्यमवर्गीयांच्या "Yawn", वगैरे अशा सखोल, विश्लेषणात्मक, तसंच 'दुधाचा टँकर रस्त्यावर ओतणं हे कसं वाईट्ट आहे आणि त्यापेक्षा गरजूंना देणं कसं योग्य', अशा सर्वोदयी कमेंट्स वाचल्या म्हणून म्हटलं काही किरकोळ लिहावं. असं आहे, की दूध हा विषय शहरी उपभोक्त्यांनी बराच गृहीत धरण्याचा विषय झाला आहे हेच ते 'ऑपेरेशन फ्लड' वगैरेंचं खरं तर यश मानावं का असं वाटून राहिलं.

सामान्य माणसाची असामान्य कथा!

एका ख-या नायकाच्या कथेवर आधारित असलेला चित्रपट म्हणजे ‘सूरमा’. एकेकाळचा हॉकीच्या मैदानावरचा चकाकता तारा म्हणजेच, हॉकीचे माजी कर्णधार संदीप सिंह यांच्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट.

जान्हवी सामंत

स्पर्धा का इतर?

पुलंचं काय करायचं :

पुलंचं काय करायचं :

आजचं युग हे .. ब ब .. अबब युग आहे! आज मनुष्य एकाच वेळी अनेक टाइम झोन्स मध्ये जगू शकतो. माझं आजचं वाचन म्हणजे सकाळी जनरल काही पेपर चाळणे, नंतर काही जर्मन कविता ( एकदम जुन्या ) , मग बायकोसाठी एका पोलिश सुपरमार्केटच्या प्रॉडक्ट मॅगझीनचं वाचन, मग बाहेरची काही कामं करून आल्यावर चक्क श्रीदा पानवलकर यांची "साय" कथा, नंतर घरातली काही कामे करून नेटवर काही मराठी वाचन वगैरे... कालमहिमा हाच असावा !

स्पर्धा का इतर?

मल्टिप्लेक्समध्ये बाहेरचं खाणं

Taxonomy upgrade extras

Multiplex food
मल्टिप्लेक्समध्ये बाहेरचं खाणं न्यायला बंदी असावी की नसावी, ह्यावरची चर्चा लांबल्यामुळे वेगळा धागा काढला आहे.

ही बातमी समजली का - भाग १८०

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही.

स्वप्निल पाखरं...

स्वप्निल पाखरांना,
तमा का बंधनाची...?
उघडी सदा तयांना,
दारे भूत-भविष्याची...

मौजेत भिरभिरावे,
असीम भविष्यगगनी...
कधी हळवेही थोडे व्हावे,
बघता मागे वळोणी...

रंगतांना आकाश उद्याचे,
भरावा रंग विश्वासाचा...
रंगांत ह्या असावा,
एक रंग आठवणींचा...

येईल उद्या देखील,
तूफान वाटेत आडवे...
जून्याच ह्या भस्मासूराला,
बिंधास तू भीडावे...

चिमुकल्या पीलांसाठी,
बांधावे घरटे वात्स्ल्याचे...
उडण्यास अन् तयांना,
द्यावे पंख नव्या स्वप्नांचे...

- सुमित विसपुते
०५/०७/२०१८

माझाही वेटलौस- मुक्तचिंतन

प्रथम; मी काही ह्या विषयातला तज्ज्ञ नाही. खालील मजकुरामागे फक्त स्वानुभव आणि इंटरनेट ज्ञान कारणीभूत आहे. बरीचशी वाक्यं सपशेल चूकही असू शकतात. असतीलच. माझा शास्त्रशुद्ध म्हणावा असा घंटा काही अभ्यास नाहीए ह्यामागे. पूर्ण फिटनेस जगताचा मी काढलेला लसावि इथे मांडत आहे.

तरीही, वाढणाऱ्या स्व-विषुववृत्ताचा आकार कमी करण्यासाठी मी ब.रा.च. शोध घेतलेला आहे. एकेकाळी चतुरंगमध्ये कुठल्यातरी लेखात दोन तत्त्वं कोणत्यातरी विलायतीच माणसाने मांडलेली दिसली- दोनच प्रकारच्या गोष्टी खाऊ नयेत: जे तुमची आजी खायची नाही ते, आणि ज्याची व्यावसायिक जाहिरात होते ते.

ही बातमी समजली का - भाग १७९