Skip to main content

भेंडी! सल्ला हवा आहे.

Taxonomy upgrade extras

सूचना -
१. थंड हवामानात राहणाऱ्या आणि बागकाम करणाऱ्या आमच्या मैत्रीण रुची ह्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना जळवण्यासाठी हा धागा काढलेला नाही.
२. भेंडी कशी लावावी ह्या विषयावर इथे चर्चा होऊन वाचकांना भेंडी लावण्याची इच्छा झाल्यास धागाकर्ती त्याला जबाबदार नाही.
३. भेंडीसारखे बुळबुळीत प्रतिसाद मनावर घेतले जातील. त्यामुळे भलत्या ठिकाणी भेंड्या (होय, भेंड्या) टाकू नयेत. लोकांना घसरायला होईल.

सूफी कव्वाल अमजद साबरी यांची पाकिस्तानात हत्या

Taxonomy upgrade extras

गुलाम फरीद साबरी यांचे सुपुत्र आणि प्रसिद्ध सूफी कव्वाल अमजद साबरी यांची पाकिस्तानात हत्या झाली आहे . इस्लामी मूलतत्ववाद्यांचे सूफी लोकांशी काय वैर आहे ते समजत नाही , पण कदाचित पुढील कारणे असावीत: 1. सूफी समाजांत स्त्रिया आणि पुरुष धर्माच्या उन्मादात एकत्र नाचतात. संगीत आणि हे एकत्र नाचणे दोन्ही कर्मठांना मान्य नाही . 2. सूफी अनेकदा देवाचा मित्र किंवा प्रियकर असा उल्लेख करतात . कट्टर इस्लाम मध्ये हे मोठे पाखंड आहे . "देव हा "निर्मित" जगाच्या ("creation"च्या)पलीकडचा आणि तुम्हाला कधीही कळू शकत नाही असा आहे, त्याची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही " अशी कर्मठांची श्रद्धा आहे . 3.

गोव्यातील इन्क्विझिशन

’इन्क्विझिशन’ ही रोमन चर्चमधील एक संस्था कॅथलिक चर्चचे पावित्र्य अबाधित ठेवण्याच्या हेतूने ९व्या ग्रेगरी - पोप असण्याचा काल १२२७ ते १२४१ - ह्या पोपने सुरू केली. पाखंड शोधून त्याचा नाश करणे हा त्याचा हेतु होता. त्या काळामध्ये युरोपात बहुतेक सर्व देशांमध्ये कॅथलिक चर्चचेच आदेश पाळले जात. प्रत्येक राजाने आपापल्या सत्तेच्या भागात इन्क्विझिटर नावाचे खास अधिकारी नेमून चौकशी करून शिक्षा देण्याचे विशेष अधिकार त्यांना द्यावेत आणि त्यांच्यासाठी विशेष सोयी निर्माण कराव्यात असा पोपचा आदेश होत. तदनुसार ’होली रोमन एम्परर’ दुसरा फ़्रेडेरिक आणि फ्रान्सचा राजा ९वा लुई ह्यांनी इन्क्विझिटर्स नेमले आणि संशयित पाखंडी व्यक्तींना पकडून अमर्याद काळापर्यंत तुरुंगात डांबून, तसेच त्यांना शारीरिक यातना देऊन त्यांच्याकडून पाखंड कबूल करवून घेण्याची अमर्याद सत्ता अशा इन्क्विझिटर्स कोर्टांना बहाल केली. पाखंड सिद्ध झाल्यास मृत्युदंड द्यायचे अधिकारहि त्यांना होते आणि राजसत्ता त्यांच्या कारभारात कसलाहि हस्तक्षेप न करण्यास बांधलेली होती.

लवकरच इन्क्विझिटर्स कोर्टांची ’न भूतो न भविष्यति’ अशी दहशत सर्व युरोपात पसरली. कबुली मिळेपर्यंत संशयिताचा छळ करणे, सांगोवांगीवरून किंवा कोणाच्या तक्रारीवरून संशयिताला ताब्यात घेणे असे प्रकार फैलावले. कोणाच्या पाखंडाची माहिती असतांनाहि ती कोर्टापुढे न आणणे हाहि गुन्हा ठरला आणि त्यामुळे स्वत:च्या सुरक्षिततेच्या भीतीमधून दुसर्‍यावर आरोप करणे असले प्रकार बळावले आणि इन्क्विझिटर्स कोर्टांची सत्ता आणि दहशत अमर्याद झाली.

ज्यू धर्म हा येशूच्या मारेकर्‍यांचा धर्म म्हणून आणि मुस्लिम धर्म ख्रिश्चनांची पवित्र स्थाने ताब्यात ठेवणारा प्रतिस्पर्धी धर्म म्हणून इन्क्विझिशनचे विशेष लक्ष्य ठरले. तसेच ख्रिश्चन धर्मविरोधी वर्तन, समलिंगी आणि अनैसर्गिक प्रकारचे लैंगिक वर्तन, एकाहून अधिक बायका असणे अशी गुन्ह्यांची संख्या वाढू लागली.

पश्चिम युरोपात, विशेषत: स्पेनमध्ये, मूरिश अरबांची सत्ता सुमारे ४०० वर्षे टिकून होती. फ्रान्सच्या सीमेपर्यंत त्यांचा प्रसार झाला होता. चार्ल्स मार्टेलने ७३२ मध्ये तूरच्या लढाईत अरबांचा फ्रान्समधील प्रसार थोपवला होता पण सर्व स्पेन अरबांच्या कमीअधिक ताब्यात होते. कास्तिलची राणी इझाबेला आणि आरगॉनचा राजा फर्डिनंड ह्याच्या विवाहानंतर स्पेनमधील ख्रिश्चन पक्षातील दुफळी मिटून आधुनिक स्पेनचा उदय होण्यास सुरुवात झाली - १५व्या शतकाचा दुसरा अर्धभाग - आणि त्यांच्या सत्तेच्या काळात इन्क्विझिशनला आणखीनच बळ मिळाले. अरब सत्तेचा शेवट करायला प्रारम्भ तर त्यांनी केलाच पण त्या बरोबरच सर्व ज्यू- धर्मियांची आपल्या देशातून त्यांनी हकालपट्टी केली. त्यांच्या ह्या कॅथलिक निष्ठेमुळे Their Most Catholic Majesties असे स्वत:ला म्हणवून घ्यायची मुभा पोपने त्यांना दिली होती.

वर वर्णिलेल्या पाखंडाला आणखी एक जोड ज्यू हकालपट्टीबरोबर मिळाली. ती म्हणजे relapsed christians असण्याचा आरोप. पुष्कळ ज्यू लोकांनी देश सोडण्याऐवजी धर्म बदलून कॅथलिक होणे पसंत केले होते. असे बाटगे हे धर्माशी खरेखुरे एकनिष्ठ नाहीत अशी शंका उपस्थित करून ज्यू लोकांना relapsed christians म्हणून त्रास देण्याचा नवा प्रकार सुरू झाला. कोणी असा ख्रिश्चन डुकराचे मांस खात नाही अशी शंका घेऊन त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याची प्रथा पडली. (Goya's Ghosts नावाचा चित्रपट यूट्यूबर उपलब्ध आहे. गोया ह्या प्रख्यात स्पॅनिश चित्रकाराची मैत्रीण इनेस ही डुकराचे मांस खात नाही ह्या आरोपावरून इन्क्विझिशनने तिल्या ताब्यात घेतले. दरबारामध्ये आणि चर्चमध्ये असलेले आपले वजन वापरून तिची सुटका घडवण्याचे गोयाचे प्रयत्न हा ह्या चित्रपटाचा विषय आहे.

इन्क्विझिशनचे काम मोठ्या गंभीरपणे चालत असे. आरोपींची शारीरिक छळ, बनावट साक्षी असे सर्व मार्ग वापरून चौकशी झाल्यावर काही सुदैवी सुटून बाहेर येत पण गुन्हा सिद्ध झालेल्यांना मालमत्ता जप्तीपासून जळून मारण्यापर्यंत अनेक शिक्षा होऊ शकत. वर्षामधून एक किंवा दोन वेळा अशा शिक्षांची सार्वजनिक अमलबजावणी होत असे. माद्रिद शहरामध्ये Plaza Mayor हा शहरातील प्रमुख चौक ही तेथील इन्क्विझिशनची जागा आजचे महत्त्वाचे टूरिस्ट डेस्टिनेशन झाले आहे. गावातील प्रमुख चौकामध्ये चारी बाजूंनी प्रेक्षकांची बसायची सोय करून उच्चासनावर इन्क्विझिटर न्यायालय बसत असे आणि दंडित आरोपी तेथे समारंभाने आणले जात. त्यांच्या शिक्षा येथे त्यांना वाचून दाखवल्या जात पण आपापल्या शिक्षा दुर्दैवी दंडितांना आधीच ठाऊक असत कारण शिक्षेच्या वेळी त्यांनी वापरायचे कपडे त्या त्या शिक्षेनुसार ठरलेले असत. जाळून मारण्याची - burning at stake - san benito नावाची पिवळी उंच निमुळती टोपी घातलेली असे आणि त्यांच्या अंगावरच्या पिवळ्या लांब कपड्यावर क्रूस, विस्तवाच्या ज्वाला आणि सैतानाच्या दूतांच्या चित्रांनी वेढलेले त्याचे स्वत:चे चित्र असे. हाच वेष पण क्रूसाशिवाय असा वेष केलेले म्हणजे गुन्हा सिद्ध झालेले आणि तरीहि माफी मिळालेले. स्वत:च्याच कपड्यात आलेले म्हणजे दंड भरून सुटका करण्यायोग्य गुन्हेगार अशा त्यांच्या दर्जाप्रमाणे शिक्षा असत. शिक्षा वाचून दाखविल्यानंतर धार्मिक अधिकारी दंडिताचा आत्मा जीजसच्या काळजीवर सोपवला आहे असे जाहीर करून दंडितांना राजाच्या हवाली करत आणि राजाचे यमदूत तेथेच आधी उभ्या केलेल्या शेकोट्यांवर दंडितांना बांधून जागीच शिक्षेची अंमलबजावणी करत असत. अशा ह्या मोठया नाटकी आणि गंभीर देखाव्याला auto da fe - act of faith असे नाव होते. (किंचित् अवान्तर. औरंगजेबाने संभाजीराजाला हालहाल करून ठार मारण्याची शिक्षा सुनावली. तेव्हाचे जे वर्णन आहे त्यामध्ये उंटावर बसवून आणि दोक्यावर विदूषकाची उंच टोपी घालून त्यांची मुघल छावणीभर मिरवणूक काढण्यात आली असे वाचले आहे. तशीच ही उंच टोपी दिसते.)

पोर्च्युगाल आणि स्पेनने अशिया-अमेरिकेमध्ये पाय पसरायला सुरुवात केल्यावर इन्क्विझिशन राजसत्तेपाठोपाठ ह्या नव्या प्रदेशांमध्येहि पोहोचले

नव्याने ताब्यात आलेल्या मेक्सिकोमध्ये असे auto da fe होत असत. मेक्सिको शहरातील नॅशनल पॅलेसमध्ये दिएगो गार्सिया ह्या प्रख्यात म्यूरलिस्टने रंगविलेली आणि मेक्सिकोचा सर्व इतिहास चित्ररूपाने दाखविणारी एक म्यूरल चित्रांची मालिका उंच जिन्याच्या दोहो बाजूस रंगविलेली आहेत. त्यातील auto da fe चे चित्र येथे खाली पहा. उंच टोपीतील दंडित आगीत जळण्याची वाट पाहात तेथे दिसतात.

Inquisition in Mexico

असेच इन्क्विझिशन गोव्यातहि येऊन पोहोचले आणि जुन्या गोव्यात आदिलशहाच्या पूर्वकालीन वाड्यामध्ये त्याची जागा होती. डेलॉन - M Dellon - नावाचा एक फ्रेंच डॉक्टर दमणमध्ये असतांना इन्क्विझिशनमध्ये सापडला. पवित्र कुमारी मेरीच्या चित्राला त्याने पुरेसा आदर दाखविला नाही अशा आरोपावरून त्याला ताब्यात घेण्यात आले. दमणमधील एका ख्रिश्चन बाईबरोबर त्याचे मैत्रीचे संबंध स्थापन होत होते ते दुसर्‍या एका प्रतिष्ठिताला आवडले नाही आणि त्याने डेलॉनला खोट्या आरोपात गोवले होते. आधी दमणमध्ये काही दिवस आणि नंतर सुमारे दोन वर्षे गोव्यामध्ये इन्क्विझिशनच्या कैदेत कष्टात काढल्यानंतर मोठ्या मुष्किलीने त्याची सुटका झाली आणि मोझांबिक-ब्राझील-पोर्च्युगालमार्गे तो अखेर मायदेशी म्हणजे फ्रान्सला पोहोचला. तेथे आपल्या गोव्यातील अनुभवावर एक पुस्तक लिहून १६८० साली प्रसिद्ध केले. ते आता भाषान्तररूपात उपलब्ध आहे. अनंत काकबा प्रियोळकरांनी गोवा इन्क्विझिशनच्या विषयावर जे पुस्तक लिहिले आहे त्यात डेलॉनचे अनेक संदर्भ मिळतात असे वाटते. (प्रियोळकरांचे पुस्तक मी पाहिलेले नाही.)

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

उडता पंजाब - एक रखरखीत वास्तव!

पाहिला मी काल "उडता पंजाब" चित्रपट.

सतत पंजाबला चित्रपटात " खेतो का खलीहानो का " "सोनी सोनी कुडीयों का आणि आदरातिथ्यात उत्तम असणारा असे (हे खरे असो वा नसो) सादर करणाऱ्या चित्रपटसृष्टीने पंजाबच्या खेडोपाड्यातील भयाण वास्तव दाखवण्याचे केलेले धाडस स्वागतार्ह आहे. मला व्यक्तीश: वाटते की असा चित्रपट दोन तीन वर्षांपूर्वीच आला पाहिजे होता. असो "बेटर लेट देन नेव्हर".

स्पर्धा का इतर?

शेतकऱ्यांनी ‘सुईसाईड बाँब’ बनावे : प्रकाश आंबेडकर

Taxonomy upgrade extras

आत्तापर्यंत सुमारे 2.8 लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. आंबेडकरांचे हे बोलणे शेतकऱ्यांनी गंभीरपणे घेणे अशक्य कोटीतले मानता येणार नाही . डॉ. प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला शेतक ऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी काँग्रेसच्या काळातही काही केले गेले नाही आणि आता भाजपच्या काळातही काही उपाय राबवले जाताना दिसत नाहीत. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी ‘सुसाईड बाँब’ बनावे, आत्महत्या करताना सोबत राजकीय पक्षाच्या नेत्याला घेऊन मरावे, असे सल्ला भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी दिला. काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांच्या सरकारांनी शेतकऱ्यांसाठी काही केले नाही.

"काळ्या शुक्रवार"ची कथा

गडद अंधारी / उभा वाल-मार्ट
प्रकाशाचे बेट/ झळाळते
दारामाजी उभे/ तीन चार जण
लठ्ठ धटिंगण /पोलिस ते
आशाळभूतांची / आतून बाहेर
रांग दूरवर /पसरे ती
तेलगु -मराठी/ चिनी पाकिस्तानी
सर्वांच्याच मनी/ आय-पॅड
उभा तेथे मीही/ दात काकडत
मुंग्यांच्या रांगेत/ हजाराव्वा
अमेरिके मधली /भयाण ती थंडी
कोणतीही बंडी/ अपुरीच
मरण थंडीत / जन काकडती
शिग्रेटी फुंकिती / भसाभसा
थंडीने भक्त ते/ आले काकुळती
स्वतःलाच देती/ फार शिव्या
(इतका तो मूर्ख / झालो मीही कसा
कोठून औदसा/ आठविली ?
फुफ्फुसात माझ्या /घुसे ब्रोन्कायटीस
रजा माझ्या वीस/ बुडतील!
आय-पॅड मिनी/ नच बनवीले
तर काय साले / मरतील?
)

अमेरिकेची पोलीस यंत्रणा वाटेल ती नावे पुराव्याशिवाय घालू शकते!

Taxonomy upgrade extras

अमेरिकेची दहशतवादासाठी जी संशयितांची यादी आहे (आठ लाख लोक!) तिच्यात कोणाचे नाव घालताना त्या व्यक्तीला बचावाची संधी दिली जात नाही . त्यामुळे एका अर्थी पोलीस यंत्रणा मनमानी करून त्यांना वाटेल ती नावे पुराव्याशिवाय घालू शकते . या मुद्द्यावर रिपब्लिकनांनी काल डेम चे विधेयक फेटाळले . ते योग्य वाटते . आज ज्यांना दहशतवादाच्या नावाखाली विमान प्रवासाची बंदी आहे त्यांना बंदूकही घेता येऊ नये अशा जातीचे विधेयक एक "सौम्य" रिपब्लिकन बाई आणणार आहेत . काय होते बघू या !

चवथ्या घरातील प्लूटो

http://i2.wp.com/1.bp.blogspot.com/-6OG97DdJlvU/VEMqze9nHwI/AAAAAAAARJs/fwUbZ45HJi8/s1600/tumblr_maklsqqnly1qbsjqno1_500.png?resize=312%2C400
.
चवथ्या घरातील प्लूटोबद्दल भरभरून लिहावंसं वाटतं. अजिबात सुखद तर नाहीच त्याचे वर्णन पण खरं तर क्लेशदायक, अक्राळविक्राळच आहे.
.

ललित लेखनाचा प्रकार

कोळी...

तलम, आकर्षक पण टिकाऊ शब्दांचं
मजबूत जाळं विणून
आयुष्याच्या समुद्रात भिरकावलं
माझ्यातल्या विचारवंत कोळ्यानं,
दुःख पकडण्यासाठी...
पण अडकावं कसं माझं शब्दातीत दुःख
शब्दांच्या जाळ्यात?
शब्दांच्या चिमटीतून सतत निसटत
विश्वरुप साकारत गेलंय हे दुःख..
समजलंच नाही माझ्यातल्या विचारवंत कोळ्याला..
हा समुद्रच दुःखाचा आहे..