Skip to main content

जुन्या आणि नव्या काळची गोष्ट

- अन्यत्र पूर्वप्रकाशित (६ वर्षापूर्वी. गेले ते दिन गेले ;) )-

लहानपणी एक मस्त गोष्ट वाचली होती काहीशी अशी की एका शेतकर्‍याची बायको अतिशय असंतुष्ट असते आणि तिला मोठं घर हवं असतं. मग शेतकरी १ युक्ती करतो त्याच्या लहान घरातच कोंबड्या, बकर्‍या, गाय आणून बांधतो. खूप दिवस जातात बायको त्रागा करते करते पण शेवटी रुळते. असह्य दुर्गंधी, अजीबात जागा नसणे या गैरसोईंमध्ये दोघे रहात असतात. पुढे शेतकरी परत सगळी जनावरं गोठ्यात नेऊन बांधतो आणि बायको जाम खूष होते तिला आता तेच घर मोठं, ऐसपैस वाटू लागतं, नवरा तालेवार वाटू लागतो आणि सर्व काही आलबेल होतं.
.

"मैं तो मर कर भी मेरी जान तुझे चाहूँगा…."

"मैं तो मर कर भी मेरी जान तुझे चाहूँगा…."

" आताशा वातावरण जरा छानच असू लागलय. दिवसा रिमझिम थंड वारा वाहतच असतो हल्ली. त्यातून जागरणाची सवय,अश्यातच आपण मल्हार रागावर आधारित असलेलं एक गाणं ऐकतो. पाऊस,थंड हवा, गडद रात्र,आपण एकटे राग मल्हार, उत्तम शब्द आणि आवाज… त्या आवाजाबद्दल काय बोलावं! तो आवाज, सीमेपलीकडचा आवाज… तो आवाज… ज्यानी दोन्ही, एकमेकांना वैरी समजणाऱ्या देशांतल्या तमाम " रसिक " जनतेला भुरळ वगैरे घातली, तो आवाज,ज्यानी लोकांना एक प्रकारचं वेडच लावलं, तो आवाज,ती मिठी छुरी "मेहदी हसन" नावाची.

स्पर्धा का इतर?

‪निर्गुणी भजने‬ (भाग २.७) सुनता है गुरु ग्यानी - समाप्त

-------------------------------
भाग १ | भाग २.१ | भाग २.२ | भाग २.३ | भाग २.४ | भाग २.५ | भाग २.६
-------------------------------
मागच्या भागात "ओहं सोहं बाजा बाजे" मधील ओहं सोहं चा अर्थ लावताना मी आघाताशिवाय होणारा म्हणून अनाहत असलेला “ओम” चा अपभ्रंश म्हणजे “ओहं” तर शब्दविरहीत, न जपतादेखील जपला जाणारा ध्वनीमंत्र म्हणजे “सोहं” असे लिहिले होते. त्यावर माझ्या एका मित्राने अपभ्रंशाची कल्पना मानली पण, 'ते सोहं सोहं असेच आहे आणि पहिल्या सोहंचा अपभ्रंश हॊउन ओहं म्हटले गेले आहे', असे मत नोंदवले.

चूड...

चूड पेटवली आणि धडाडून उठल्या ज्वाळा
बघता बघता वेढून टाकतील मला असं वाटलं..
माझाच घास घेवू बघण्याइतक्या उन्मत्त..
चोहीबाजूंनी..
अक्राळविक्राळ ज्वाळा...
त्याचा असह्य विरह एकदमच अंगावर आल्यासारख्या..
त्याच्यापर्यंत कधीच पोहचू न शकणारी माझी तळमळ
बाहेर आल्यासारख्या..
त्याच्या आत्ममग्न अनभिज्ञतेला माझ्या प्रेमाची दखल घ्यायला लावण्याच्या अट्टहासासारख्या..
आता व्यर्थ आहे या ज्वाळांच्या तडाख्यातून स्वतःला वाचवणं..
पण ही आग पुरती भस्मही करुन टाकत नाहीये मला..
बचावतेच आहे मी..
असह्य वेदनेत तळमळण्यासाठी..
रोज कणाकणाने मरण्यासाठी...
अजून आहेच बाकी माझं जळणं...
डेनेरस,

मी आणि शाळेचे Reunion - (भाग ३) - फुलराणी

----------------------
भाग १ | भाग २ | भाग ४ | भाग ५ | भाग ६
---------------------
माझी नववी, दहावीच्या आधी आली आणि आठवीच्या नंतर. आठवीत असताना अनेक नवीन गोष्टी घडल्या. माझा अवखळ स्वभाव पाहून शाळा सुटताना सर्व विद्यार्थी रांगेत नीट जात आहेत की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी माझीच नेमणूक करण्यात आली. त्यामुळे मला आवरण्याचा शिक्षकांचा त्रास वाचला. आणि मला ती दिसली. छान होती. छोटीशी. तिचे कपडे कडक इस्त्रीचे असायचे. चेहऱ्यावर एक उदास हसू असायचे. जणू कुणाला तरी शोधत असावी. मी बघितले की तिची नजर खाली जायची. एकदा ती माझ्याकडे बघून हसली असे मला वाटले आणि इतके दिवस मनाचे श्लोक, मूर्खांची लक्षणे, मारुतीस्तोत्र वगैरेंच्या पाठांतरात प्रत्यक्ष कल्याण स्वामींशी स्पर्धा करणाऱ्या माझीच छाटी उडाली.

ओर्लान्डो मधील कत्तल : काही निरीक्षणे

Taxonomy upgrade extras

ओर्लान्डो मधील कत्तल (पन्नास ठार , त्रेपन्न जखमी (पाच अत्यवस्थ )): काही निरीक्षणे
१. मारेकरी ओमर मातीन (अफगाण वंशाचा , पण अमेरिकेत जन्मलेला व वाढलेला, वय वर्षे तीस ) याने अल कायदा आणि हेजबुल्ला यांच्याशी आपले संबंध असल्याचे भाष्य केले होते (जी पोकळ वल्गना ठरली )
२. ओमारचे एफ बी आय बरोबर ३ इंटरव्यू आणि दहा महिने कसून चौकशी झाली होती . "पुरेसा धोका न आढळल्यामुळे" ती बंद करण्यात आली .
३. स्वयंचलित मशीनगन्सवर बिल क्लिंटन ने बंदी घातली होती . पण ती मर्यादित काळापुरती होती आणि आता अस्तित्वात नाही.ओमर त्यामुळे एक आठवड्यापूर्वी स्वयंचलित मशीन गन विकत घेऊ शकला . (जी "ऑन लाइन " सहज मिळते ).

गुरु - मंगळ युती (ज्योतिष)

ज्यांना ज्योतिष या विषयात रस नसेल त्यांनी अन्य धाग्यावरती जावे.
इंग्रजी शब्द अति वापरले आहेत त्याबद्दल खेद आहे. पण सहजतेने जे विचार येत गेले ते तसेच्या तसे ...
प्रत्येक ललीत हे लेखकाचे आत्मचरित्रच नसते हे बरेचजण विसरतात. तेव्हा फक्त एक Reminder ;)
________________
गुरु ग्रह हा खरं तर देवांचा "गुरु" आका ग्रहांमधील - आलोकनाथ ;). -

"बुद्धीभूतं,त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतीम|"

मंगळ हा ग्रहांमधील कुमारवयीन, अँग्री यंग मॅन.

"कुमारं शक्तीहस्तं च मंगलम प्रणमाम्यहम|"

मी आणि टीपू सुल्तान - एक आठवण

मी १०-११ वर्षांचा असेल, तेंव्हाची गोष्ट, उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या घरी अर्थात भंडारा येथे आलो होतो. आजोबा वैद्य होते. त्यांचे पूर्वज तीन-चार पिढ्यांपूर्वी आंध्र प्रदेशाहून भंडारा येथे आले होते. भंडार्याच्या नवाबाने त्यांना एक वाडा बांधून दिला आणि काही शेती हि त्यांच्या नावे केली होती. वाडा मोठा आणि दुमंजली होता.

ललित लेखनाचा प्रकार

मी आणि शाळेचे Reunion - (भाग २) - सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद

---------------------------------
भाग १ | भाग ३ | भाग ४ | भाग ५ | भाग ६
---------------------------------
मी शाळेत असताना मैत्रीण असणे ब्रम्हह्त्येइतके महापातक होते. आणि मी पापभीरू असल्याने माझ्यातील कुमारसुलभ भावनांना मुरड घालण्यात तत्कालिन समाजपुरुषाला यश आले होते. अनेक मुली मैत्रीण होण्याची क्षमता बाळगून आहेत आणि काही तर त्याहून अधिक क्षमतेच्या आहेत हे कळत असून देखील मी ब्रम्हहत्या न करताच शाळेतून बाहेर पडलो होतो. त्याशिवाय मला शाळेत वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे मित्र होते. म्हणजे पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी प्रत्येक वेळी मी नवीन मित्रांच्या घोळक्यात असे. घोळका पण छोटासा, मी धरून चार मित्र. दहावीनंतर ते पण सुटले. याचा अर्थ प्रत्येक वेळी मी आधीच्या मित्रांपेक्षा जास्त वेगाने सजाण होत होतो असा काढून मी स्वतःला समजावीत असलो तरी याचा अजून एक अर्थ दर तीन वर्षात माझे मित्र मला कंटाळत असतील असाही होऊ शकतो हे सत्य मी नाकारू शकत नव्हतो. त्यामुळे मित्रांच्या गोड आठवणींपेक्षा मित्र सुटल्याच्या हुरहुर लावणाऱ्या आठवणी जास्त असल्याने, Reunion ला जावून कुणाशी काय बोलणार? कुणाला आपल्याशी बोलण्यात रस असणार? आणि आता तर एक गांधीबाबा पण गेले, अश्या विचाराने खिन्न होऊन घरी पोहोचलो.

स्मरणरंजन - भाग १

Taxonomy upgrade extras

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, स्मरणरंजन मांडण्यासाठी आहे. बरेचदा जसजसे वय वाढत जाईल तसतसा, स्मरणरंजन हा माणसाचा स्थायीभाव होत जातो. काही आठवणी पुन्हा पुन्हा किंवा आवेगाने येत असल्याने आपण विसरू शकत नाही.