शिव दुग्धाभिषेक -सत्य घटने वर आधारित
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about शिव दुग्धाभिषेक -सत्य घटने वर आधारित
- 11 comments
- Log in or register to post comments
- 12812 views
मनातले छोटे मोठे प्रश्न किंवा विचार - भाग ६४
Taxonomy upgrade extras
ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार व प्रश्न मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
===========================================================================================================
- Read more about मनातले छोटे मोठे प्रश्न किंवा विचार - भाग ६४
- 130 comments
- Log in or register to post comments
- 102922 views
निर्गुणी भजने (भाग १) प्रास्ताविक
अत्तर

.
- Read more about अत्तर
- 20 comments
- Log in or register to post comments
- 9110 views
आधार संलग्न डिजिटल वॉलेट - फसवणूक करणा-यांसाठी खजिना
‘डिजिटल वॉलेट’ हे म्हणजे दुसरे तिसरे काही नसून इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पैसे अदा करण्याची एक प्रणाली आहे. ही सेवा पुरवणा-या कंपन्या आकर्षक जाहिरातींद्वारे आपले आधार संलग्न बँक खाते या प्रणालीशी जोडण्याचे आवाहन करतात. अशा प्रकारची खाती उघडण्यासाठी लागणारे कागदपत्रं फार नाहीत, तसेच फार काही माहितीही द्यावी लागत नाही. याचाच फायदा घेऊन काही ‘सुपीक’ डोक्याच्या ठगांनी याचा गैरवापर केला.
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about आधार संलग्न डिजिटल वॉलेट - फसवणूक करणा-यांसाठी खजिना
- Log in or register to post comments
- 2094 views
डायल
सेकंदामिनिटांचे थेंब डायलवर येतात
तासांच्या नद्या नि वर्षांचे महापूर डायलवर येतात
अंतरांचे संदर्भ डायलवर येतात
कललेली उन्हे
उतरते जिने
केले- न केलेले गुन्हे डायलवर येतात
धुळीतली पावलं डायलवर येतात
उमटलेले ठसे डायलवर येतात
हरवलं आकाश
निसटलं अवकाश
डायलवर येतात
चढते उतरते सूर
बदलते नूर
डायलवर येतात
काचांचे आरसे
भिंगं नि चश्मे
कप नि ग्लासं
तुकडे नि चुराही कधी -
डयलवर येतात
उत्तर रात्रींची टळटळीत उन्हं डायलवर येतात
अचूक जमलेला कोन
न शमलेलं मौन
हरलेल्या डावांचे चढलेले लोण डायलवर येतात
आताशा मात्र
पुनरपि कधी
क्वचित् कदापि
यश्चित् कश्चित
डायल टोन येतात
- Read more about डायल
- 5 comments
- Log in or register to post comments
- 2925 views
..थांबले ट्राफीक आता...
थांबले ट्राफीक आता.
माग लवकर भीक आता.
शांततेचा पॅक्ट झाला
वाढले सैनीक आता
जा पुरा व्यवहार झाला
तुझि नको जवळीक आता!
लग्न झाले..ते हि झाले
चांगले सोशीक आता..
दु:ख झाले भोगुनीया
हासणे ऐच्छिक आता.!
(प्रश्न झाले मांडुनिया
उत्तरे ऐच्छिक आता!)
लागु केली कर्जमाफी
काढ लवकर पीक आता!
उंच त्याचा भाव नेला
वाढले भावीक आता...!
विसर सारे शीकलेले
एवढे तू शीक आता
चेहरा सभ्य दिसावा
शिकुन घे ही ट्रीक आता.
हा लढा अंतिम आहे
फक्त थोडे टीक आता
- कानडाऊ योगेशु
- Read more about ..थांबले ट्राफीक आता...
- 16 comments
- Log in or register to post comments
- 12189 views
एलिझाबेथ टेलर म्हणजेच आईचा विश्वास सार्थ ठरवणारी-वेलवेट ब्राऊन...
मदर्स-डे प्रीत्यर्थ
अविस्मरणीय हॉलीवुड-दोन
आईचा विश्वास सार्थ ठरवणारी-वेलवेट ब्राऊन...
आपल्या भारतीय समाजात लहानपणापासून मुलांच्या आवडी-निवडीकडे बारीक लक्ष्य दिलं जातं. त्यांचे सारे हट्ट पुरविले जातात, कौतुक केलं जातं. पण मुलींबद्दल असा दृष्टिकोण सहसा वापरला जात नाही. मुलीला प्रोत्साहन देऊन, तिला तिच्या मनाप्रमाणे वागू देणारी मंडळी फारच कमी, अगदी बोटांवर मोजण्या इतकी...(आता स्थिति बदलतेय) विशेष करुन चालीस-पन्नासच्या दशकांत तर भारतात हा विचार शक्यच नव्हता.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about एलिझाबेथ टेलर म्हणजेच आईचा विश्वास सार्थ ठरवणारी-वेलवेट ब्राऊन...
- 9 comments
- Log in or register to post comments
- 9523 views
आमची बटाट्याची चाळ
पु ल देशपांडे यांची ‘बटाट्याची चाळ’ हे पुस्तक हे मुंबईतील चाळीमधील लोकांचे वर्णन करणारे पुस्तक प्रसिद्धच आहे. काल मी आईकडे गेलो असता, गप्पांच्या ओघात आम्ही लहानपणी राहत असलेल्या चाळीतील लोकांचा विषय निघाला, आणि मला त्या पुस्तकाची आठवण झाली. आमच्या चाळीच्या दिवसाबद्दल बऱ्याच आठवणी निघाल्या. संध्याकाळी घरी परत आल्यावर माझ्या लहानपणाच्या, चाळीतील दिवसांबद्दल, तेथील आठवणीबद्दल लिहावे असे ठरवले.
- Read more about आमची बटाट्याची चाळ
- Log in or register to post comments
- 4517 views
खरे सत्य बोला
खरे सत्य बोला/ जपून जपून
तेज लपवून / ठेवा थोडे
अर्धोक्तीने करा / सत्य - सुरुवात
जनां भयभीत / करू नका
अंधाऱ्या अंबरी / विजेची उपज
बालकां समज/ नाही तिची
महा त्या तेजाने / अंधत्व नेत्रांना
साध्या माणसांना / कशासाठी?
क्षीण मानवाची/ क्षीण असे दृष्टी
प्रकाशाची सृष्टी / सोपी नसे
(आधारित)
- Read more about खरे सत्य बोला
- 2 comments
- Log in or register to post comments
- 2136 views