कविता समजुन घेतांना- भाग १
Taxonomy upgrade extras
वाचनाचं वेड असल्याने आणि कविता हा प्रकार प्रचंड आवडता असल्याने अधाशासारखा मिळेल ती कविता वाचत सुटायचो. कधी फ़ार च सुंदर तर कधी फ़ार च टुकार कविता भेटायच्या. पण सुंदर ग्रेट कविता असा काही अनोखा आनंद देतात की ज्याची काही तुलनाच करु शकत नाही. याच नादातुन समीक्षा ही वाचु लागलो मग मात्र थोडा मुळ कविता वाचनाचा आनंद डीस्टर्ब झाला. विनाकारण एक नेणीवेच्या पातळीवर इव्हॅल्युएशन व्हायला सुरुवात झाली. मग कन्फ़्युज झालो मग थोडी चिडचीड ही होउ लागली. ती अशी की अरेच्च्या इतकी सुंदर कविता होती यावर विचार करण टाळुन नुसती फ़ीलींग लेव्हल वर च रेंगाळु दिली असती तर कीती छान झाल असत.
- Read more about कविता समजुन घेतांना- भाग १
- 16 comments
- Log in or register to post comments
- 19848 views
रस्त्यावर वाहन चालविणारे (रूपक कथा)
त्या दिवशी सुनीलला भेटायला त्याच्या घरी गेलो. बिछान्यावर पडलेला होता. डाव्या पायाच्या मांडीत लोखंडी रॉड टाकलेली होती. त्याला विचारले, कसं झाले हे सर्व. तो म्हणाला, तुझ्या सारख्या नियम पाळणाऱ्या एका मूर्ख माणसामुळे ही पाळी आली. मी म्हणालो, साला स्पष्ट बोल कि काय म्हणायचं आहे ते. उगाच माझ्या डोक्यावर खापर नको फोडू? तुला माहितच आहे, बाईक चालविताना मी ट्रफिकचे कुठलेच नियम-कायदे पाळत नाही. किक मारल्या बरोबर बाईक हवेत उडाली पाहिजे तरच चालविण्यात मजा. त्या रात्री घरी परतताना असेच हवेत उडत जात होतो. एका ट्रफिक सिग्नल वर लाल बत्ती होती. नेहमीप्रमाणे पर्वा केली नाही.
- Read more about रस्त्यावर वाहन चालविणारे (रूपक कथा)
- 121 comments
- Log in or register to post comments
- 38947 views
असॉल्ट आणि सेक्शुअल असॉल्ट - परिप्रेक्ष्य
Taxonomy upgrade extras
लैंगिकता फक्त योनी/शिस्नापुरती मर्यादित नसते. -- मास्टर्स आणि जॉन्सन.
'मास्टर्स आणि जॉन्सन' चं म्हणण काय आहे हे लक्षात आलं नाही, थोडं विस्तारून सांगता येईल काय?
स्त्रियांवर होणार्या अत्याचारांमधे विनयभंग किंवा लैंगिक गुन्ह्यांमध्ये शारिरीक हिंसाचार हा इतर शारिरीक हिंसाचाराप्रमाणेच असतो, टक लावून पहाणे, शेरेबाजी करण्यामध्ये शारिरीक कृतीचे संकेत असतात त्यामुळे तोही एकप्रकारे हिंसाचारच समजला जावा, पण ह्या संदर्भात लैंगिक भावनेला महत्त्व येण्याचे कारण सांस्कृतिक असावे काय? येथील सदस्य ह्याबद्दल नक्की कसा विचार करतात हे कळावे हा हेतू आहे.
- Read more about असॉल्ट आणि सेक्शुअल असॉल्ट - परिप्रेक्ष्य
- 66 comments
- Log in or register to post comments
- 42211 views
चुकीचा संदेश
प्रिय चार्वी
फेसबुकावर एक भिरभिरणारा एक व्हीडीओ नुकताच पाहीला आणि मला धक्का बसला. स्त्री-सक्षमीकरणाचा संदेश चुकीच्या रितीने त्यात दिला आहेच पण त्याचे परिणाम समाजमनावर किती विचित्र परिणाम होऊ शकतात याचा विचार त्या क्लिपच्या (बिनडोक) निर्मात्याने अजिबात केलेला दिसत नाही.
तू अशा परिस्थितीत सापडलीस आणि अशीच वागलीस तर बाप म्हणुन मला ते अजिबात आवडणार नाही. विचार कर गर्दीमध्ये जर हे घडलं तर तर तिथला जमाव नाहक एका निरपराध तरूणाला मरेपर्यंत मारू शकतो. विचार न करता प्रत्युत्तर म्हणजे सक्षमीकरण नाही.
मग काय करायचे?
- Read more about चुकीचा संदेश
- 6 comments
- Log in or register to post comments
- 4595 views
आपण का लिहिता ?
Taxonomy upgrade extras
आज आपण अंतर्जालावर लिहितो. पण का लिहतो? हा एक प्रश्न किती दिवसांपासून मनात येतोय. आपण लिहितो त्या मागे काही कारणे असतातच. म्हणून हा प्रश्न.
माझ स्वत:चे म्हणाल तर वयाच्या पन्नासी नंतर अंतर्जालावर आपण लिहू शकतो हे आणि लोक ते वाचतील ही. मी मोडकी-तुटकी का होईना मराठीत लिहायचा निर्णय घेतला. अर्थात लिहिताना पुष्कळ समस्या आल्या पण लिहिणे सुरु ठेवले. माझा लिहिण्याचा उद्देश्य समाजातले आर्थिक, सामाजिक आणि राजनैतिक सत्य लोकांसमोर ठेवणे.
- Read more about आपण का लिहिता ?
- 41 comments
- Log in or register to post comments
- 24536 views
मिकेलांजेलोचा पालक - पास्तावाला
टेक्ससमधल्या उन्हाळ्यातल्या एका शनिवारच्या रम्य दुपारी धोधो ऊन पडत होतं. सकाळी सकाळी फार्मर्स मार्केट आणि नेहेमीची वाणसामानाची खरेदी करून अदिती आणि श्रीयुत अदिती फारच दमले होते. जेवणानंतर सोफ्यावर पसरून "आता पुढचा वेळ कसा घालवता येईल, याचा विचार दुसऱ्याने मांडला तर बरा", असा विचार करत आळसावत होते. अशा वेळेस दोघांचंही लक्ष टीव्हीच्या रिमोटकडे गेलं. अदितीला पुढची दुश्चिन्ह दिसायला लागली. "श्रीयुत अदितीने रिमोट मिळवला तर पुढचे दोन तास 'अमेरिकाज होम व्हीडीओज', 'सर्व्हायरमॅन', किंवा तसंलच काहीतरी जुनं पॉर्न बघायला लागेल. त्यापेक्षा आपण काहीतरी वेगळं पॉर्न बघायचा प्रयत्न केला पाहिजे.
- Read more about मिकेलांजेलोचा पालक - पास्तावाला
- 24 comments
- Log in or register to post comments
- 15955 views
फेमिनिष्ठांची मिथके
...
बातमीचा प्रकार निवडा
- Read more about फेमिनिष्ठांची मिथके
- 144 comments
- Log in or register to post comments
- 91089 views
नु शुऽऽऽ कुठं बोलायचं नाही!
वर्ग चालू असेल आणि बाईंना कळू न देता आपल्या शेजारच्या मैत्रिणीशी बोलायचं असेल, तर आपण काय करतो? आपण बाईंची नजर चुकवून हळूच तिच्या कानात पुटपुटतो. नाहीतर, आपल्या वहीवर लिहून तिला ’वाच’ असं खुणेनं सांगतो. तीच गोष्ट चार बाकं पलिकडे बसलेल्या मित्राला सांगायची असेल तर आपण काय करतो? बाईंची पाठ वळली, की हातवारे करून नाहीतर डोळ्यांनी खाणाखुणा करून त्याला सांगतो. पण सगळ्याच गोष्टी काही खाणाखुणांनी सांगता येत नाहीत. उदाहरणार्थ, ’मला भूक लागली’ हे खूण करून सांगता येईल. पण ‘काल बाबांनी रविवारच्या आयपीएल मॅचची तिकिटं आणली’ हे खूण करून कसं सांगणार? मग चिठ्ठीवर लिहून ती पास करण्याला पर्याय उरत नाही.
- Read more about नु शुऽऽऽ कुठं बोलायचं नाही!
- 33 comments
- Log in or register to post comments
- 22922 views
स्वामी त्रिकाळदर्शी उवाच: पुरोगामीस्य किम् लक्षणं?
आश्रमात स्वामीजी ध्यानमग्न बसलेले होते, अचानक त्यांनी डोळे उघडले, क्षणाचा ही बिलंब न करता मी प्रश्न विचारला, स्वामीजी मनात एक शंका आहे. स्वामी त्रिकाळदर्शी: काय शंका आहे बच्चा? मी: स्वामीजी पुरोगामी कोण असतो, त्याची लक्षणे काय? स्वामी त्रिकाळदर्शींच्या चेहऱ्या एक हास्याची लहर पसरली, ते म्हणाले बच्चा, समोर वडाचे झाड बघ, झाडाच्या डाव्या अंगाला एक वाळकी फांदी दिसते आहे न. मी म्हणालो होय, स्वामीजी. स्वामी त्रिकाळदर्शी: त्या फांदीला पुरोगामी फांदी असे म्हणतात. मी त्या वाळक्या फांदी कडे बघितले,मला काहीच कळले नाही.
- Read more about स्वामी त्रिकाळदर्शी उवाच: पुरोगामीस्य किम् लक्षणं?
- 142 comments
- Log in or register to post comments
- 54811 views
बागकामप्रेमी ऐसीकर : ३
Taxonomy upgrade extras
आधीच्या धाग्यात ९०+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा. घरगुती बागकामासंबंधित प्रश्न, शंका, विचार, माहिती, फोटो, योजना, कार्यक्रम, अपडेट्स इत्यादी गोष्टी या धाग्यात लिहिता येतील.
धागा क्र १, धागा क्र २
---
- Read more about बागकामप्रेमी ऐसीकर : ३
- 106 comments
- Log in or register to post comments
- 133733 views