Skip to main content

खरच स्त्रिया इतक्या मजेत आहेत?

Taxonomy upgrade extras

.नमस्कार.
ह्यावेळी ऐसीवरती अधिक विचारमौक्तिके प्राप्त झालित.
हिंमत , वेळ आणि पेशन्स्/सहनशक्ती असेल त्याने आपापल्या जिम्मेदारीवर प्रतिवाद करावा.
************************अजोंची विधाने सुरु*******************************************************
वेल, जैविकतेच्या बाहेर, सामाजिक परिस्थीतींमुळे स्त्रीया अधिक बुद्धिमान असतात. त्या जास्त समंजस असतात. जास्त भावूक असतात. पुरुषांच्या तुलनेत त्या कमी दुष्ट असतात. पुरुषांसाठी तर त्या दुष्ट नसतातच म्हटले तर चालावे. त्यांना इगो कमी असतो. जनरली पुरुष कचरा करत असतात नि त्या तो सावरत असतात. एकूणात त्यांची मूल्येदेखिल पुरुषांपेक्षा श्रेष्ठ असतात.

ही बातमी समजली का? - ३७

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं.

अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १००च्या वर प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढण्यात येईल.

=========

गणितस्य कथा: रम्या: |

एकंदरीत मानवी संस्कृतीच्या प्रगतीमध्ये गणित या विषयाचा सिंहाचा वाटा असूनही गणित, गणितज्ञ, आणि गणिताचा इतिहास या बाबतीत समाजात सर्वसाधारणपणे अनभिज्ञता आढळते. अच्युत गोडबोले आणि माधवी ठाकूरदेसाई या लेखकद्वयीनं मात्र या परिस्थितीला छेद देऊन अगदी अनादी काळापासून ते आजच्या आधुनिक उच्चस्तरीय गणितापर्यंतच्या या विषयाच्या प्रवासातले महत्वाचे टप्पे, ते गाठण्यात महत्वाचा वाटा असणारे गणितज्ञ आणि एकूणच गणिती प्रक्रियेचा गुंतागुंतीचा इतिहास वाचकांपुढे रंजकपणे मांडला आहे – त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडके!

- डॉ. श्रीकृष्ण दाणी

समीक्षेचा विषय निवडा

भुताळी जहाज - ९ - जोयिता

पृथ्वीवरील सर्वात मोठा समुद्र म्हणजे पॅसिफीक महासागर! उत्तरेला आर्क्टीक महासागर, पश्चिमेला आशिया आणि ऑस्ट्रेलिया, पूर्वेला अमेरीका आणि दक्षिणेला अंटार्क्टीक महासागराच्या दरम्यान पसरलेला अफाट सागर म्हणजे पॅसिफीक! पृत्थ्वीवरील सर्व भूभागांच्या एकत्रित क्षेत्रफळापेक्षाही जास्त विस्तार असलेला पॅसिफीक महासागर म्हणजे अनेक चमत्कृतीपूर्ण गोष्टींचा अवाढव्य खजिना आहे! पृथ्वीवरील सर्वात खोल असलेली मरियाना ट्रेंच (गर्ता) ही पॅसिफीकमध्येच आढळून येते. (समुद्रपृष्ठभागापासून १०.९५ किमी खोल!)

सदू भारतीय क्रिकेट टीम मध्ये?

श्रीयुत सदानंद सुखात्मे उर्फ सदू, खरा मुंबईकर. सचिवालयात कार्यरत. मुंबईत सध्या अच्छे दिन आल्या नसल्याने, सदूची सुखाची नौकरी सुरु आहे. सकाळी ९ वाजता सदू घर सोडतो आणि सांयकाळी ५.३० वाजता पुन्हा घरात. अशी ८ तासाची सुख-चैनीची सरकारी नौकरी. खरोखरंच सदू नावाप्रमाणे सुखात्मे अर्थात सुखी आहे. सचिवालयातल्या इतर बाबूंप्रमाणे सदूला ही क्रिकेटचा भयंकर शौक. क्रिकेट वर ‘एक्स्पर्ट कॉमेन्ट’ देण्यात सदू स्वत:ला पटाईत समजत होता. कुठल्या खेळाडूने कसे खेळले पाहिजे त्याचे विशद वर्णन तो करत असे. इंग्लंड सिरीजमध्ये भारतीय टीमची दुर्दशा पाहून इतरांप्रमाणे तो ही दुखी होता.

भुताळी जहाज - ८ - ओरँग मेडान

आफ्रीकेच्या पूर्व किनार्‍यापासून ते पार ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम किनार्‍यापर्यंत आणि दक्षिणेला पार अंटार्क्टीक समुद्रापर्यंत पसरलेला सागर म्हणजे हिंदी महासागर! त्याच्या काठांवर असलेल्या अनेक चित्र-विचित्र देशांइतकाच गूढ! अनेकविध संस्कृती या सागराच्या किनार्‍याने नांदताना दिसतात. पृथ्वीवरील तिसर्‍या क्रमांकाचा महासागर असलेला हिंदी महासागर जहाजं, विमानं आणि माणसांना कोणतीही खूण न ठेवता गायब करण्यात मात्रं इतर महासागरांइतकाच पराक्रमी आहे!

१९४७ च्या जून महिन्यात मलेशिया आणि सुमात्रा यांच्या दरम्यान असलेल्या मलाक्काच्या सामुद्रधुनीतून एका जहाजाचा मदतीसाठी आक्रोश करणारा संदेश मिळाला.

"विक्षिप्त" मन...

खूप दिवसांनी काहीतरी लिहायला घेतोय, आणि नेहमीप्रमाणे सुरुवात कुठून अन कशी करावी हे दोन प्रश्न डोळ्यांसमोर घिरट्या घालत होते.
यामुळेच कदाचित थोडा उशीर झाला हे लिहणं सुरु करायला. विषय तसा फारसा काही विशेष नाहीये, पण सांगावासा वाटतोय, मनमोकळ बोलावासा वाटतोय.

Office मध्ये थोडं काम असल्याने, त्यादिवशी bus ऐवजी bike ने गेलो होतो, कारण उशीर होणार होता हे ठाऊक होतं.
माझी कामं आटपून मग मी घरी जायला निघालो, थोडं पावसाचं वातावरण आधीच होतं, पण तेव्हा तो थांबलेला होता.
bike सुरु केल्यावर कुणास ठाऊक का पण हळू-हळूच घरी जावं असं वाटत होतं म्हणून speed जरा कमीच ठेवला होता मी.

भुताळी जहाज - ७ - विचक्रॅफ्ट

फ्लोरीडाचा पूर्व किनारा, बर्म्युडा बेटांचा दक्षिण किनारा आणि प्युर्टो रिकोचा उत्तर किनारा यांतील प्रदेश हा पृथ्वीवरील अतिशय गूढ असा प्रदेश आहे. हा प्रदेश त्रिकोणी आकाराचा आहे, लंबवर्तुळाकार आहे अथवा ट्रॅपिझियमच्या आकाराचा असेल, परंतु त्यातील गूढपणा त्यामुळे रतिभरही कमी होत नाही. पार क्रिस्तोफर कोलंबसच्या काळापासून हा प्रदेश वेगळाच आहे असं मानवाच्या ध्यानात आलेलं आहे. या प्रदेशात अनेक जहाजं, विमानं आणि माणसं कोणताही मागमूस न ठेवता अनाकलनीय रितीने गायब झालेली आहेत.

बर्म्युडा ट्रँगल!

भुताळी जहाज - ६ - बेकीमो

पृथ्वीवरील महासागरांचा इतिहास लिहायचा झाला तर सर्वात गूढ आणि चमत्कारीक महासागर म्हणून आर्क्टीक समुद्र सर्वात वरचा क्रमांक पटकावेल. या महासागरात अनेक गोष्टी का आणि कशामुळे होतात याचं कोणतंही स्पष्टीकरण अनेकदा मिळत नाही. कोणत्याही तर्काच्या आणि शास्त्रीय स्पष्टीकरणाच्या कसोटीवर न उतरणार्‍या अनेक चित्रविचित्र घटना इथे घडल्याच्या दोन शतकांपासूनच्या नोंदी सापडतात! अनेक जहाजं आणि माणसं या सागरात कोणताही मागमूस न ठेवता गडप झालेली आहेत. दक्षिण धृवावर सर्वप्रथम पाऊल ठेवणारा रोआल्ड अ‍ॅमंडसेन, सुप्रसिध्द संशोधक सर जॉन फ्रँकलीन ही चटकन आठवणारी नावं!