Skip to main content

शतशब्द कथा -विषकन्या

पुणे मुंबई महामार्गावर लाल टॅाप घातलेली ती गाडीला टेकून पुस्तक वाचीत उभी होती.

च्यायला काय माल आहे, कदाचित कुणी नटी असावी! त्याने बाईकची स्पीड वाढवली आणि डोळ्यांना डोळे भिडताच एक हवाई चुंबन तिच्या दिशेने फेकले. तिने ही हाताने चुंबन हवेत उडवित प्रत्युत्तर दिले.

च्यायला पोरगी पटली. अररे... समोर वळण आहे तो विसरला होता. बाईक रोड डिवाईडर वर आपटली आणि तो दुसर्याबाजूला फेकल्या गेला.

किर्रर्र.... माझ्याच गाडी खाली यायचं होत का? आता बोंबला -ट्रक ड्राईवर.

अ‍ॅकलेशिया कार्डिया - सुटका-४

लिक्विड डाएट वर घरी पाठवल्यावर आपण यावर चार आठवडे कसे काढणार असे वाटत होते. कारण खालचा अर्धवट घसरलेला स्टेंट अर्धा अन्ननलिकेत आणि अर्धा जठरात लोंबत होता. त्यामुळे जठरावरचा वॉल्व्ह कायमचा उघडाच राहिला होता. काहीही द्रव पदार्थ प्यायला की थोड्याच वेळांत गॅसेस होऊन ते वर येऊ लागत. अर्ध्या तासात ते कमी होत. त्यानंतरच पलंगावर आडवे होता येत असे. रात्रीच्या वेळी तर, दर दोन तासांनी जाग येऊन उठून बसावे लागे आणि दोन घोट पाणी प्यायल्यावर ढेकरा कमी झाल्यावर परत झोपता येत असे. तर अशा तर्‍हेने, चार आठवड्यांनंतर या क्षेत्रांतील एका तज्ञ डॉक्टरची अपॉइंटमेंट मिळाली.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

चांदोबाचा दिवा

'
आई ग आई ,
चांदोबाचा दिवा
किती चांगला -
उंच उंच आकाशात
कुणी टांगला ..

आई ग आई ,
चांदण्यांच्या पणत्या
किती चांगल्या -
उंच उंच आकाशात
कुणी लावल्या ..

आई ग आई ,
दे ग शिडी मला
उंच उंच चढून -
चांदोबा-चांदण्या
आणीन मी काढून ..

आई ग आई ,
चांदोबा-चांदण्या
ठेऊन अंगणात -
रात्री छान खेळेन
त्यांच्या प्रकाशात ..
.

खूशखबर! खूशखबर!! खूशखबर!!! - अमेरीकेतल्या लोकानो, ऐका हो ऐका

खूशखबर! खूशखबर!! खूशखबर!!! - अमेरीकेतल्या लोकानो, ऐका हो ऐका;
तुम्ही पन्नास वर्षांचे असाल (जवळपास चालेल) आणि ४०१(क)+सेव्हिंग अकाउंटमधे $४५०,००० असले तर you are done! काम सोडा आणि उरलेलं आयुष्य सुखासमाधानाने भारतात घालवा. कसं? सोपं आहे. या धाग्याच्या भाराभर प्रतिसादातनं जमलेलं 'लोणी' - "महिन्याला एका माणसाला २५,००० रूपये१ बक्कळ झाले आणि महिन्याला २५,००० रूपयात चांगल्यापैकी भाड्याची जागा२ मिळते."

त्यामुळे, तुम्ही स्पाउझसकट तीस वर्ष अजून जगलात तर;

'गे प्राईड' कट्टा

हे असं काहीतरी एखाद्या सिनेमात वगैरे होतं. म्हणजे असं की आपल्याला मित्राकडे कधीही जायला चालतं, पण तेव्हा विशेष असं काही कारण, काम नसतं. पण घरच्या काही कारणांमुळे तिकडे जायला लागतं. आणि मग तिथला मुक्काम वाढतच जातो आणि मग आपल्याला आणखी उनाडायला आणखी जास्त संध्या (संधीचं अनेकवचन) मिळत जातात. या वेळेला अशी संधी फक्त सिनेमात वगैरे न राहता प्रत्यक्षातच आली. मुळात काय झालं वगैरे सगळं बिनमहत्त्वाचं आहे. पण वॉशिंग्टन डीसी भागातला माझा मुक्काम आणि रिकामा वेळ अचानक (वैश्विक तेजी यावी तसा) वाढला. मग त्या भागातच राहणाऱ्या धनंजय आणि अमुकला इमेलं केली.

फूड सेंटर का कोचिंग क्लासेस

नमस्कार मंडळी!

गेली पाच-सहा वर्षे नौकरी केल्यानंतर आता स्वतःचा व्यवसाय सुरु करावा असा विचार चालू आहे.

मला पूर्वी कुठल्याही व्यवसायाचा अनुभव नाही पण लागतील ते कष्ट करायची तयारी आहे.

तर ह्या विषयी काही शंका आहेत.

हा माझा पहिलाच अनुभव असल्यामुळे स्वताहून सगळ मुळापासून करण्यापेक्षा एखाद्या यशस्वी ब्रांडची फ्र्यान्च्याय्झी घ्यावी असा विचार आहे.

माझी गुंतवणुकीची मर्यादा ६-७ लाखापर्यंत आहे.

फूड सेंटर सुरु करणे जास्त चांगलं असेल की कोचिंग क्लास्सेस (IIT, CET इत्यादी)?

मूलतः मादक वगैरे

Taxonomy upgrade extras

(व्यवस्थापक : वाचनावरून निघालेली चर्चा वेगळ्या वळणावर गेल्यामुळे त्या धाग्यावर अवांतर वाटू शकेल, पण चर्चा अनेक वाचकांना 'मूलतः रोचक' वाटत असणे शक्य वाटल्यामुळे वेगळ्या धाग्यात हलवली आहे. अरुण जोशींना वाटल्यास ते मूळ प्रतिसादात भर घालू शकतात.)

मी मादक बायकांची मुबलक चित्रे असलेले मॅगझिन प्रवासात चाळतो. त्या पलिकडे पेसंस नाही.

पण साला कोणी मनोहर रहस्यकहानियाँ वैगेरे प्रकार शेजारी वाचू लागला आणि त्यात एखादे टायटल लै भारी दिसले कि अवश्य डोकावतो.

सध्या मासिक खर्च किती आहे?

Taxonomy upgrade extras

शंकाः त्रिकोणी मध्यमवर्गीय कुटुंबाला भारतात महिन्याला सध्या किती खर्च येतो?

संपादकः या प्रतिसादापासुन मुळ धाग्यावर अवांतर परंतु रोचक चर्चेचे स्वतंत्र धाग्यात रुपांतर करत आहोत. इच्छा असल्यास स्वयंसंपादनकरून धागाकर्ता विषय अधिक तपशीलात मांडू शकेल.