जो भी प्यार से मिला हम उसी के हो लिये :)
किशोर कुमार बद्दल मला नेहेमी एक गोष्ट महत्वाची वाटते कि जी गाणी त्याला मिळाली त्यातला काव्यगुण लक्षात घेतला तर तो रफीला मिळालेल्या एकाचढ एक गाण्याच्या तुलनेत कमी होता. किशोरला अगदी नंतरच्या काळात गुलजार सारखा प्रतिभावंत गीतकार मिळाला. तरीही त्याची गाणी लोकप्रिय झाली यातच किशोरदांचं यश आहे असं मला वाटतं. याबद्दल भिन्न मते असु शकतात पण रफीकडे किंवा तलतकडे असलेल्या गझल किंवा इतर अनेक क्लासिक म्ह्टली जाणारी गीते बाजुला ठेवली कि उरलेली उडत्या ठायीची गाणी किशोरच्या वाट्याला आली. तरीही त्याने ती लोकप्रिय केली. गाईड हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.
- Read more about जो भी प्यार से मिला हम उसी के हो लिये :)
- 10 comments
- Log in or register to post comments
- 7477 views
बॅन्का, ए.टी.एम.यंत्रे आणि रोख रक्कम काढणे
अलीकडे. एका कोणत्या गोष्टीचा मला मनापासून कंटाळा येत असला तर ती म्हणजे बॅन्केत जाऊन किंवा ए.टी,एम. मशीनमधून रोख रक्कम काढून आणणे. ज्या ज्या वेळी माझ्या लक्षात येते की आपल्या जवळची रोख रक्कम संपत आली आहे आणि आपल्याला आता बॅन्केला भेट देण्याची जरूरी आहे, मला उगीचच अस्वस्थ आणि तणावपूर्ण वाटत राहते. खरे तर मला हे पूर्णपणे माहीत असते की बॅन्केत असणारे पैसे हे माझेच आहेत आणि ते काढून आणण्याचा मला पूर्ण अधिकार आहे, तरीसुद्धा, बॅन्केतून पैसे काढून आणण्याचे काम मी वर्षानुवर्षे करत असूनही, मला मनावर उगीचच एक प्रकारचे दडपण आल्यासारखे वाटत राहते.
- Read more about बॅन्का, ए.टी.एम.यंत्रे आणि रोख रक्कम काढणे
- 9 comments
- Log in or register to post comments
- 8012 views
रशियन साहित्य व संस्कृतीचा आरंभ : 'प्राथमिक शाळेचा वृत्तान्त' आणि राजपुत्र व्लादिमिर
ऍलिस चुडोलिखित 'ऍन्ड क्वाएट फ्लोझ द वॉड्का, ऑर व्हेन पुश्किन कम्ज टु शोव' ह्या पुस्तकातील “बिगिनिंग्ज - द प्रायमरी स्कूल क्रॉनिकल ऍन्ड प्रिन्स व्लादिमिर” ह्या पहिल्या प्रकरणाचा स्वैर अनुवाद
गुरुर्बह्मा आणि संशोधनक्षेत्रातील निगरगट्टपणा
Taxonomy upgrade extras
आपल्याकडे आपल्या पुर्वजांनी गुरुचं माहात्म्य सांगताना कसल्याही मर्यादा पाळलेल्या नाहीत त्यामुळे गुरु हा प्रकार सोकावलेला असुन त्याची फळं आपल्याला भोगावी लागत आहेत. अगदी पुर्वापारपासुन कुणी आपल्या आवडत्या शिष्यापेक्षा दुसरा पुढे जाऊ नये म्हणुन अंगठा कापुन घेतं, तर कुणी मुलाला जास्त विद्या मिळावी म्हणुन कपट करतं. गुरुची झोपमोड होऊ नये म्हणुन शिष्याने भुंग्याला आपली मांडी पोखरु दिली तर त्याला काय फळ मिळाले? विद्या वापरायच्या ऐनवेळी विसरशील हा गुरुचा शाप. आणि अशा गुरुंच्या नावे गळे काढणारी, त्यांच्या नावाने पारितोषिके देणारी मंडळी नंतर अवतरली.
- Read more about गुरुर्बह्मा आणि संशोधनक्षेत्रातील निगरगट्टपणा
- 40 comments
- Log in or register to post comments
- 33510 views
अफ़लातुन चित्रकार Salvador Dali आणि त्याची विलक्षण Paintings भाग २

Cubism चा प्रभाव आणि त्या बाहेर पडण्याचे प्रयत्न
- Read more about अफ़लातुन चित्रकार Salvador Dali आणि त्याची विलक्षण Paintings भाग २
- 8 comments
- Log in or register to post comments
- 8644 views
अफ़लातुन चित्रकार Salvador Dali आणि त्याची विलक्षण Paintings भाग १
मित्रांनो !!!
सर्वप्रथम एक गोष्ट नम्रपणे नमुद करतो की मी चित्रकला या विषयातील तज्ञ नाही केवळ एक साधा रसिक आहे. त्यामुळे या लेखनात उणिवा-चुका असु शकतील, जाणकारांनी त्या भरुन-सुधारुन दिल्यास माझ्या व रसिकांच्या आकलन-आस्वादात वाढ होइल....!

The first man to compare the cheeks of a young woman to a rose was
Obviously a Poet; the first to repeat it was possibly an idiot. - Salvador Dali
- Read more about अफ़लातुन चित्रकार Salvador Dali आणि त्याची विलक्षण Paintings भाग १
- 9 comments
- Log in or register to post comments
- 20612 views
एक कट्टा तो बनता है!
एक कट्टा तो बनता है!
कुठल्याही वीकान्ताला, ठाण्यात, पुण्यात, मुंबईत... घरी, दारी, कुठेही.
कोणाकोणाला जमेल, आवडेल, कधी, कुठे... सांगा.
- Read more about एक कट्टा तो बनता है!
- 134 comments
- Log in or register to post comments
- 61191 views
मिथुन-धनु - "लिव्ह इन रिलेशनशिप"
ती पुस्तकांच्या जगात रमणारी, तर तो मोकळ्या आभाळाखाली मस्तमौला भटकणारा. ती किचकट गणिती प्रमेय सोडविण्यात जगाचे भान विसरणारी तर तो मानवी अंतरगाचा ठाव घेण्याची महत्त्वाकांक्षा ठेवणारा. हिला विशिष्ठ शब्द त्या शब्दाचा ध्वनी , नाद भुरळ घालणारा तर त्याला निसर्गसहवासात पक्षांच्या बोलीचे संमोहन.
मिथुन लग्नाची ती अन धनु लग्नाचा तो एकत्र येण्याचे फारसे प्रयोजनही नव्हते ना संधी पण आला बुवा योग जुळून. भेटले ते एकदा अन मग परत मग परत.
- Read more about मिथुन-धनु - "लिव्ह इन रिलेशनशिप"
- 19 comments
- Log in or register to post comments
- 25387 views
फडकु
वाहता माझा ब्लॉग, गप्पा गोष्टी वाच
कविता नक्की वाच, फडकु म्हणे
फिरवी हा रिक्षा, प्रतिसादाची भिक्षा
शराग्रासि वक्षा, लावुनिया
ध्यान केशरी बंदर, भाळी टिळा निरंतर
छुरी असे जुनी मैतर, फडकुसि
घाव सज्जनांचा, मिळे जो मालकांचा
म्हणे बाणा बाजीप्रभूचा , फडकु तो
बसे याला पार्श्व, सुंदरशी लाथ
इतरांची लावे वाट, दिसता क्षणी
गारठले डोळे, आखडले तन
तरी घासे रीन, फडकु हा
दर तेराव्या सेकंदा, घाली शिवीबाद
वाद घालणे हा नाद, फडकुला
सोडी आवेशात, मालकीचे एक पान
ना मिळता सन्मान, गुमान येई
असा फडकु जहरीला, फुत्कार टाकित
फिरे मागे जावळीत, वास काढीत
- Read more about फडकु
- 2 comments
- Log in or register to post comments
- 2749 views
लहान मुलांशी निगडीत प्रश्न
Taxonomy upgrade extras
परवा ईशान्यला (वय वर्षे ६) एका संमारंभानिमित्त एका फार्महाउसवर घेऊन गेलो होतो. तिथे त्याला बुजगावणे दाखवले. कितीतरी वेळ तो त्याच्याशी खेळत होता. तिथे लावलेले मुळा, कांदा, लसूण, कोबी, इ इ दाखवले. मग परत येताना मॉल मधे गेलो. तिथे एक अतिशय उंच टप्पा खाणारा चेंडू घेऊन दिला. गेमच्या तीन सीडी घेतल्या. 365 stories of animals/faries/ghosts/bedtime/mythology अशी १०-१२ पुस्तकांची सीरीज आहे. त्यातली तीन पुस्तकं उचलली. त्यातली माहिती आणि चित्रं अत्यंत गोड! मला एक dvd player घ्यायचा होता. म्हणून जंबोच्या दुकानात गेलो. Electronics च्या दुकानात ईशान्य पेटूनच उठतो.
- Read more about लहान मुलांशी निगडीत प्रश्न
- 61 comments
- Log in or register to post comments
- 70185 views