डुबरगेंडा
डुबरगेंडा सर अशी सुरुवात मी इथे करत आहे ती केवळ तुम्हाला ते शिक्षक होते हे कळण्यासाठी. तोंडारमधे आम्ही कोणत्याही शिक्षकाला सर म्हणत नसू. गुर्जी आणि बाई अशा संज्ञा आम्ही तिथे वापरत असू. डुबरगेंडा सर मात्र गुर्जी या सन्मानाला देखिल कोणाला पात्र वाटत नसत. त्यांचा उल्लेख इतर शिक्षकांत आणि मुलांत एकेरीने होई. इथे 'त्यांच्या' हा शब्द देखिल ओव्हरएक्सप्रेशन आहे. तेव्हा तरी आम्ही त्याला एकेरीच संबोधत असू. तो कोणालाच आवडत नसे. त्यालाही कोणी आवडत नाही असे वाटायचे. त्याच्या नावाची मला फार गंमत वाटत असे. असले नाव कोण बरे आपल्या मुलाला ठेवले असेल?
- Read more about डुबरगेंडा
- 77 comments
- Log in or register to post comments
- 64513 views
कॉन्झर्वेटिव विचार व मुक्त अर्थव्यवस्था
Taxonomy upgrade extras
(समलैंगिकतेच्या धाग्यावर कॉंझर्वेटिव विचारसरणी व मुक्त अर्थव्यवस्था यांच्यातल्या संबंधांविषयी चर्चा सुरू झाल्यामुळे हा वेगळा धागा काढत आहे. त्या धाग्यावरचे त्या संबंधातले प्रतिसादही इथे हलवत आहे. पहिले काही प्रतिसाद योग्य क्रमाने आले नसतील तर त्याबद्दल क्षमस्व.)
अमेरिकन कॉन्झर्वेटिव विचार एकाच वेळी अर्थव्यवस्थेमध्ये मुक्तता म्हणजे निर्बंधांचा अभाव आणि वैयक्तिक आयुष्यात पारंपारिक निर्बंधांवर ह्या दोन्ही विचारधारा आपल्यामध्ये कसा सामावून घेऊ शकतो ह्या प्रश्नाचे उत्तर अमेरिका देश कसा घडला ह्यामध्ये आहे असे मला वाटते.
- Read more about कॉन्झर्वेटिव विचार व मुक्त अर्थव्यवस्था
- 24 comments
- Log in or register to post comments
- 13064 views
टीव्ही: नॉस्टाल्जिया, नौटंकी आणि निरीक्षणं
मला टीव्ही बघायला जाम म्हणजे जामच आवडत असे. दूरदर्शनचं ते ’टॅऽऽणॅणॅणॅ-टॅणॅणॅऽऽणॅणॅऽऽ’, माना वेळावून मानेचे व्यायाम दाखवणारा दाढीवाला सरदारजी, मूकबधिरांसाठीच्या बातम्या, ’एक चिडिया... अनेक चिडिया’वालं ऍनिमेशन, ’मिले सूर मेरा तुम्हारा’... असं करत करत नाना रस्ते घेता येतील नि शेवटी आपण ’काय साला दर्जा असायचा त्या काळात टीव्हीचा! नाहीतर हल्ली...’पर्यंत एकमुखानं येऊन पोहोचू.
पण ते कढ पुढे कधीतरी काढू. तूर्तास तरी हा लेख माझ्याबद्दलचा आहे.
- Read more about टीव्ही: नॉस्टाल्जिया, नौटंकी आणि निरीक्षणं
- 43 comments
- Log in or register to post comments
- 26578 views
लेगो बाहुल्यांच्या जगात
1975 साली मी युरोपमधल्या माझ्या पहिल्यावहिल्या सफरीनंतर जेंव्हा भारतात परत येत होतो तेंव्हा माझा 6 वर्षाचा मुलगा, त्याला अपेक्षित असलेली चॉकोलेट्स आणि खेळणी हातात कधी पडतील,यासाठी माझी आतुरतेने वाट बघत असणार आहे याची मला पूर्ण कल्पना होती. लंडन मधील माझ्या वास्तव्यात, माझे तुटपुंजे बजेट आणि त्या काळात असलेली आणि मुंबईला पोचल्यावर तोंड द्यावे लागणारी, जाचक कस्टमची बंधने, यांच्या मर्यादेत बसतील अशा शक्य तेवढ्या गोष्टी मी त्याच्यासाठी हॅरॉड्स या सुप्रसिद्ध दुकानातून खरेदी केल्या होत्या.
- Read more about लेगो बाहुल्यांच्या जगात
- 12 comments
- Log in or register to post comments
- 12020 views
फसवणूक
Taxonomy upgrade extras
परवा एका डॉक्टरांशी गप्पा मारत होतो ,डॉक्टर तसे जवळचे मित्रच आहेत ,पण बोलता बोलता त्यांनी जे संगितले ते अतिशय धक्कादायक होते ...
आजकाल मूल होत नसलेल्या जोडप्यांना स्पर्म काऊंट लो असला तरीही सर्रास आयव्हीएफ सल्ला दिला जातो. आणि हे उपचार करणार्या डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्स चा धंदा मुंबई,नवी मुंबई, पुणे इत्यादि ठिकाणी जोरात सुरू आहे .
पण या उपचारात जे पुरुषाचे बीज वापरले जाते , ते नक्की त्याच जोडप्यातील पुरुषाचे असते का? तर याचे उत्तर धक्कादायक आहे. हजारो निष्पाप जोडप्यांची घोर फसवणूक होत आहे .
- Read more about फसवणूक
- 8 comments
- Log in or register to post comments
- 9811 views
आयचाघोरसचा सिद्धांत
तुला ल सा वि चा अर्थ समजत नसताना
तू माझा म सा वि(कायला) काढलास
लाज वाटत नाही? त्रिज्या मेली तुझी
कोन वाकला आणि वर्गमुळ खपलं
चौकोनात फिरणार्या तुला
वर्तुळात त्रिकोण काढून
नव्वद अंशातून बगितलं हळूच
टँजंट का मारलास मला?
मी भेदतच होतो परिघ
शेवटी षटकोनातून बाहेर पडलास तू
पोटरूपी वर्तुळावर "पाय" (२२/७) देऊन काय साधलंस?
शेवटी कितीही वेगात फिरली
तरी अक्ष तोच राहतो, अक्ष तोच राहतो
अक्ष तोच राहतो
अक्ष तोच राहतो
अक्ष तोच राहतो (हा एको आहे)
- Read more about आयचाघोरसचा सिद्धांत
- 37 comments
- Log in or register to post comments
- 10797 views
२०१४च्या निवडणूका आणि आपण
Taxonomy upgrade extras
गेल्या रविवारी ४ राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागले. त्यावरून २०१४च्या निवडणुकांचे आडाखे बांधणं सुरू झालं. मोदी लाट, केजरीवाल आणि आआपा वगैरे वर छान चर्चा चालु होती. आणि परवा कलम ३७७ वरचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागला. या दोन्ही मुळे जालावर लेख, प्रतिक्रिया, आरोप-प्रत्यारोप यांचा एकदम मोठा धुराळा उडला आहे. यात ऐसी वर आणि मिपावर एक दोन interesting\ रोचक प्रतिक्रिया वाचल्या. त्यात लिहिलं होतं की ३७७ मधून समलैंगिक लोकांना मोकळं करण्याचं आश्वासन जो पक्ष देईल त्याला मी माझं मत देईन. आता प्रत्येक जण या मुद्द्यावर आपलं मत ठरवणार नाही.
- Read more about २०१४च्या निवडणूका आणि आपण
- 32 comments
- Log in or register to post comments
- 12278 views
और नही बस और नही…
काहींच्या आयुष्यात परीघावरच राहण्याचा योग असतो. केंद्राकडे त्यांना गुणवत्ता असुनही जाता येत नाही. हिन्दी चित्रपट सृष्टीत महेंद्र कपूरच्या बाबतीत असंच घडलं असं मला वाटतं. एक नम्र स्वभावाचा अतिशय सभ्य माणुस यापलिकडे मी त्याच्या बद्द्ल काही वाचलेलं नाही. स्वतः महेंद्र कपूरला त्याची उपेक्षा झाली असं कधी वाटलं का याचा देखिल मला अंदाज नाही. पण माझं स्वतःचं मत या अतिशय गुणी गायकाबद्द्ल हेच आहे की गुणवत्ता झाकली गेली. कलेचं चीज पुरेसं झालं नाही. या लेखात त्याची कारणं शोधण्याचा प्रयत्न आहे.
- Read more about और नही बस और नही…
- 48 comments
- Log in or register to post comments
- 18072 views
मी तुझा चंद्र झालो
मी तुझा चंद्र झालो....
केव्हा काय विचारतेस?
तोंड धुता धुता
हळू हळू वृद्धिंगत होणार्या कपाळरूपी किनारपट्टीकडे पाहून
कुठपर्यंत पाणी मारावं समजलं नाही
.........तेव्हाच.
- Read more about मी तुझा चंद्र झालो
- 7 comments
- Log in or register to post comments
- 3862 views
कांदा संस्थानात स्वप्नदोषावर बंदी
कांदा संस्थान, (प्रतिनिधी). दि. ११. - कांदा संस्थानात आज बहुसंख्येने स्वप्नदोषांना फौजदारी गुन्हा ठरवले गेले. या ग्रामसभेला नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली होती. ऐसी अक्षरेची प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित होती, तिच्याकडून मिळालेला हा वृत्तांत.
- Read more about कांदा संस्थानात स्वप्नदोषावर बंदी
- 27 comments
- Log in or register to post comments
- 13669 views