अंधश्रद्धा पण आधुनिक
Taxonomy upgrade extras
काही लोक खरोखरीचे पुरोगामी असतात. काही नसतात. काही दिशा भरकटलेले असतात. म्हणजे त्यांची इच्छा शुद्ध पुरोगामी असायची असते पण त्यांना पुरोगामीत्वाची दुसरी बाजू माहितच नसते. त्यांचे मते 'पारंपारिकतेला बदडणे' हीच काय ती पुरोगामीता. भारताच्या दृष्टीकोनातून पाहता अशा बर्याच गोष्टी आहेत ज्या पारंपारिक नाहीत, पण प्रतिगामी आहेत. मी इथे त्यांची यादी बनवायचा प्रयत्न करत आहे. सखोल विश्लेषण अर्थातच मी दिलेले नाही.
- Read more about अंधश्रद्धा पण आधुनिक
- 47 comments
- Log in or register to post comments
- 49534 views
बीएमएम२०१५: निबंध स्पर्धा
माझ्या मनातील अधिवेशन
प्रॉव्हीडन्समधील आपले अधिवेशन तर उत्तमच झाले.
काही गोष्टी आपल्याला आवडल्या, काही गोष्टी थोड्या वेगळ्या करता आल्या असत्या, काही गोष्टी अधिक करता आल्या असत्या.
आपल्या मनातले अधिवेशन आणि आलेला अनुभव प्रत्येक वेळा निराळाच असतो.
आम्हा एल ए करांना आपले मनोगत जाणून घ्यायचंय. त्यासाठीच एक निबंध स्पर्धा आयोजित करत आहोत,
विषय आहे "माझ्या मनातील अधिवेशन".
सुमारे १००० शब्द मर्यादेत (इंग्लिश किंवा मराठी मध्ये) आपले विचार आमच्या कडे १५ जानेवारी २०१४ पर्यंत खालील पत्त्यावर ईमेल करा.
- Read more about बीएमएम२०१५: निबंध स्पर्धा
- 4 comments
- Log in or register to post comments
- 6291 views
बीएमएम२०१५:बोधचिन्ह आणि घोषवाक्य स्पर्धा (logo and slogan competition)
मंडळी,
कुठल्याही संस्थेचे बोधचिन्ह आणि घोषवाक्य म्हणजे संस्थेचा अभिमान, तिचा इतिहास आणि कर्तुत्व जगासमोर थोडक्यात मांडायची संधी. पुढच्या पिढीला संदेश आणि दिशा द्यायची संधी.
Dan Brown च्या दा विन्ची कोड पासून शिवाजी महाराजांच्या छत्रपती मुद्रेपर्यंत आणि रेड क्रॉस च्या चिन्हापासून हिटलरच्या स्वस्तिकापर्यंत आतापर्यंत आपण अनेक बोधचिन्हे पाहिली.
जय जवान जय किसान, गर्जा जयजयकार क्रांतीचा या घोषवाक्यांनी आपण देशभक्ती साठी प्रेरित झालो आणि सागरा प्राण तळमळला सारख्या काव्यांनी आपण हळवे झालो.
- Read more about बीएमएम२०१५:बोधचिन्ह आणि घोषवाक्य स्पर्धा (logo and slogan competition)
- 31 comments
- Log in or register to post comments
- 17679 views
पुण्यातला हिवाळा
ऑक्टोबर मधल्या गरमीचे कंटाळवाणे दिवस सरता सरत नसताना अचानकपणेच यावर्षी हिवाळा पुण्यात येऊन दाखल झाला. भारतीय द्वीपकल्प किंवा निदान या द्वीपकल्पातील मध्यवर्ती भागात असलेल्या दख्खनच्या पठारी प्रदेशाला, खरे तर उष्ण कटिबंधीय प्रदेश म्हणणेच योग्य ठरावे, कारण वर्षातील बहुतेक महिने या प्रदेशात गरम हवाच सातत्याने असते. परंतु विषुववृत्ताच्या बर्याच उत्तरेला किंवा दक्षिणेला असलेल्या भूप्रदेशांवर जसे उन्हाळा-हिवाळा हे दोनच ऋतू येतात तसे दख्खनच्या पठारावर न येता प्रत्यक्षात 3 ऋतू येतात. हा तिसरा अगांतुक ऋतू, उन्हाळा पराकोटीला पोचलेला असताना सुरू होणार्या नैऋत्य मॉन्सून वार्यांबरोबरच अचानकपणेच येतो.
- Read more about पुण्यातला हिवाळा
- 63 comments
- Log in or register to post comments
- 30100 views
का रे बा विठ्ठ्ला का न भेटी मला?
का रे बा विठ्ठ्ला का न भेटी मला?
का रे बा विठ्ठ्ला का न भेटी मला? ||धृ||
गेलो तुळशी मंजीरा घ्याया
तेथे न तू गावला राया ||१||
गेलो राऊळी शोधाया
शोध व्यर्थ गेला वाया ||२||
चंद्रभागेकाठी तू न सापडेना
तुझ्याविण मन शांत होईना ||३||
शोध घेतला शोध घेतला
अंती नाही तू भेटला ||४||
पाषाण म्हणे का शोधसी इथेतिथे
चित्ती तुझ्याच विठ्ठल वसे ||५||
- पाभे
- Read more about का रे बा विठ्ठ्ला का न भेटी मला?
- 4 comments
- Log in or register to post comments
- 4119 views
चित्रकलेचा मास्तर
चित्रकलेचा मास्तर
कधीतरी वर्गात यायचा
पांढरा सदरा आणि पांढरा ढगळ पायजामा घालून नीळची झाक असलेला आणि
काळ्या चेहर्यावरच्या ठळक सुरकुत्या
सर्व मुलांचा दंगा संपल्यावर निर्विकारपणे आमच्याकडे पाठ करून फळ्यावर लिहायचा
"चित्रकला"
पुनहा डस्टरने पुसून रेषा व्यवस्थित करायचा
मग सगळ्यांना काहीही चित्र काढा म्हणायचा
गाय,म्हैस,कुत्रा,झाड,पक्षी ,पान,फुल...
मास्तर खुर्चीत बसून दोन्ही पाय वर घेऊन बसायचा
हातांच्या लयबद्ध हालचालीने तंबाखू मळायचा
त्याच्या अंगाला कायम तंबाखूचा वास यायचा
त्याची जुनी सायकल आणि तो
सायकलवर बसून टांग मारून जात असताना तो खूप आर्टी दिसायचा
- Read more about चित्रकलेचा मास्तर
- 3 comments
- Log in or register to post comments
- 2427 views
मिनीमम वेज ( किमान वेतन)
Taxonomy upgrade extras
सध्या गाजत असलेल्या देवयानी खोब्रगडे प्रकरणात एक मुद्दा प्रकर्षाने समोर येतो तो म्हंजे ‘किमान वेतन ‘ अर्थात ‘मिनीमम वेज’. इथे मी ‘मिनीमम वेज’ संधर्भात काही तांत्रिक मुद्दे संक्षिप्त स्वरुपात मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. हा लेख तीन भागात विभागला आहे. प्रथम विभागात किमान वेतनाला विरोध का आहे ते समजावून घेऊया आणि दुसर्या भागात त्याचा समर्थन करणारी बाजू पाहूयात. तिसऱ्या भागात दोन्ही बाजू विचारात घेऊन याची भारतातल्या घरकाम करणाऱ्या कामगानबद्दल काही उपाय निघतील का ते पाहूयात.
भाग १ -
- Read more about मिनीमम वेज ( किमान वेतन)
- Log in or register to post comments
- 25993 views
ब्रेकिंग न्यूजची आस
आजची शिक्षणपद्धति
पसरणारी वेश्यावस्ती
हाँलमधला टिवी
टायलेटमधला पेपर
कमोडवर बसून वाचलेल़्या
करप्शनच्या बातम्या
रात्रीच्या बाँमबहल्ल्यात फक्त बारा ठार
बसचा शेड नसलेला स्टाँप
एक बेवारस बँग
घरी परतण्याआधी
मला निकामी करा
बाँम्ब विव्हळतो
शहराच्या पायथ्याला
डेरे टाकून बसलेल्या झाडाची मूळ
उखडत आहेत मूळापासून
लीव इन मध्ये मूव होणच चांगल आहे
नाहीतर कुत्र्यासोबत राहा
वीकेंडला कुठे बीअर प्यायची
बीअरचा फेस
आणि माझा देश एकच आहे
सी यू अँट न्यूली ओपनड इटालियन रेस्तरां
आणि नंतर आईस्क्रीम खायला जाउया
आईस्क्रीम वितळेपर्यंत
ट्रफिकपण शांत झाली असेल
मला फक्त फ्लँटवर पोचायच आहे
- Read more about ब्रेकिंग न्यूजची आस
- 2 comments
- Log in or register to post comments
- 2633 views
देवयानीवरचा ताजा आरोप खोटा
देवयानी खोब्रागडे यांचं अमेरीकेत जे प्रकरण चालू आहे हा देशाचा अवमान आहे. अशा वेळी तिच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. असं असताना बातम्यांची मोडतोड करून तिचे वडील म्हणजे जणू कुणी बराक ओबामांपेक्षा शक्तीशाली व्यक्ती आहेत आणि त्यांनी सांगितलं कि सरकार गुडघे टेकवतं अशा थाटाच्या बातम्या प्रसिद्ध होऊ लागल्या आहेत. मी स्वतः अनेक वाहीन्यांना अशा बातम्या प्रसारीत करू नये ही विनंती केली आहे. काहींनी ती मान्य केली आहे. कारण ही वेळ त्या आरोपांना उत्तर देत बसण्याची नाही. सध्या तिला भारतात आणणे महत्वाचे आहे.
- Read more about देवयानीवरचा ताजा आरोप खोटा
- 19 comments
- Log in or register to post comments
- 21809 views
'गाय' चे चोवीस कोटींचे चित्र, आणि साबरमतीच्या संताचे टमरेल

'गाय' चं एक चित्र मुंबईतल्या एका लिलावात सुमारे चोवीस कोटी रुपयात विकलं गेलंय म्हणे.
'गाय' हा थोर आधुनिक भारतीय चित्रकार.
त्यामुळे समस्त थोर्थोर आधुनिक भारतीय चित्रकारांचा ऊर अभिमानानं दाटून आलाय, आणि त्यांची आशा पल्लवित झालीय म्हणे.
त्यातून 'गाय' हा मराठी माणूस. मुंबईकर.
त्यामुळे तमाम मराठी मुंबईकरांचा ऊर अभिमानानं दाटून आलाय, आणि त्यांची आशा पल्लवित झालीय म्हणे.
'गाय' थंडीत मफलर गुंडाळून हिंडायचा.
- Read more about 'गाय' चे चोवीस कोटींचे चित्र, आणि साबरमतीच्या संताचे टमरेल
- 12 comments
- Log in or register to post comments
- 8857 views