Skip to main content

रॅबिट प्रुफ फेन्स

रॅबिट प्रुफ फेन्स

सुमारे १९३०चा सुमार. पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या ग्रामीण भागातली जिगालाँग ही एक छोटीशी आदिवासी वस्ती. ही वस्ती रॅबिट प्रुफ फेन्स या कुंपणाला लागून होती. या गावात तीन बहिणी आपली आई आणि आज्जी यांच्या सोबत रहात असत. चवदा वर्षांची मॉली, आठ वर्षांची डेझी आणि दहा वर्षांची ग्रेसी. स्वच्छ निळे आकाश आणि जमिनीशी असलेले घट्ट नाते यांच्या बळावर आनंदात दिवस चालले असत.

समीक्षेचा विषय निवडा

निर्भया - दिल्ली आणि मुंबई नंतर सगळं शांत शांत का ?

Taxonomy upgrade extras

निर्भया बलात्कार प्रकरण खूपच वाईट होतं. या प्रकरणात मेडीया एक झाला होता आणि देशभर, नव्हे जगभरात रान पेटवलं होतं. पुढे खटला चालला, वेगवान चालला, तावातावाने चर्चा झाल्या...

पुढे काय ?

पुढे मुंबईची केस घडली. मग पुन्हा तोच घटनाक्रम.

निर्भया आणि मुंबईची घटना या दरम्यान देशभरात सगळंच आलबेल होतं का ? निभयाच्या आधी आणि मुंबईच्या नंतरही आता सगळं काही ठीक चालू आहे का ? जर निर्भयाची केस दिलीत न घडता अन्यत्र घडली असती तर त्या घटनेला इतकंच महत्व दिलं गेलं असतं का ? त्यातून ती गरीब किंवा दलित समाजातील मुलगी असती तर अशीच आग लागली असती का ?

मेटामॉरफोसिस(?)

काहीवेळेस लहान असतानाचे फोटो बघितले कि अस वाटत कि मी त्या फोटोमधल्या गोंडस निरागस बाळासारखा कधी नसावाच. सगळ्यांनाच तसच वाटत असाव आपल्या बालपणीचे फोटो बघितल्यावर,आपण स्वताच स्वताला अनोळखी वाटू लागतो.एखाद्या आयलंडसारख वाटत.चोहोबाजूंनी समुद्राच्या लाटा अंगावर येन आदळत आहेत.त्यांच्यामध्ये एक तीव्रता आहे ती जाणवायला पाहिजे. दाढी मिश्या येण.सेक्स आर्गेनस संबंधी कळायला लागण या शारीरिक लक्षणांव्यतिरीक्त आतमध्ये मनात मोठ होण्याचा वय वाढल्याची जाणीव होते. पंचविशीकडे जाताना सगळ अर्ध अनुभवलेल त्याची संगती नाही लावता येत. पूर्वी फार रिबेल असणार मन सगळ काही स्वीकारत जात.

श्री. मकरंद साठे यांच्या Identity च्या संदर्भातील मांडणी बाबत पडलेले काही प्रश्न.

Taxonomy upgrade extras

सर्वप्रथम काही गोष्टी स्पष्ट करतो.
1-
खालील निबंधातील निवडलेला भाग ( मात्र जसा आहे तसा साठेंच्याच शब्दात) हा श्री. मकरंद साठे यांच्या सांस्कृतिक अस्मिता आणि जागतिकीकरण या अत्यंत प्रगल्भ अशा निबंधा चा एक लहानसा भाग मात्र आहे.पुर्ण पुस्तक मार्केट मध्ये उपलब्ध आहे ते विकत घेउन एकवेळ जरुर वाचावे अशी आग्रहाची विनंती.
2-

सुस्त शहराच्या गर्भातला कोलाहल

१.दुपार
प्रचंड कातळात कोरलेल्या
मंदिराभोवती माणसाची वस्ती
छोट्या छोट्या गल्ल्या
स्तब्ध वाडे
अधेमधे रांगोळ्या
वाळत घातलेले कपडे
वार्याने फडफडतात
सुस्त दुपारी
सुस्त शहरात
एक ओला वास
उंबर्यावर डोक टेकवून
झोपलेल मांजर
सगळीकडे देवच देव
उभी मूर्ति
आडवा झोपलेला देव
मंदीराच्या दगडी कळसावर 
उगवलेल गवत
अरूंद रस्त्यावर वाहनांचे
मिणमिणते आवाज
एका जुनाट हाँटेलमधला
रेडियोचा नास्टेल्जिक आवाज
शहर पेंगत झोपून जात
संध्याकाळ होते
शहर जांभया देत उठत

२.मार्केट
ताज्या भाज्यांचा ताजा रंग
गर्दीला धक्के देणारी गर्दी
नवीन रस्ते
गुळगुळीत स्ट्रीटलँम्पचा
पिंगट प्रकाश

फंडामेंटल अनालिसिस

Taxonomy upgrade extras

सर्वप्रथम जे माझे पूर्वग्रह आहेत ते सांगणे योग्य होईल.
१. मुद्दल सुरक्षित ठेवणे, हे माझे मूळ ध्येय आहे. वॉरन बफेच्या शब्दात सांगायचे तर Always follow 2 rules: 1. Never lose money 2. Never forget rule 1.
२. गुंतवणूक करताना मी कधीही कोणावरही विश्वास टाकत नाही. इतर काय म्हणतील ते मी ऐकतो, पण निर्णय मात्र स्वत:चाच घेतो.
३. माझा स्टॉक ब्रोकर्सवर विश्वास नाही.
४. आर्थिक सल्लागार वापरायची वेळ येते, तेव्हा मी प्रथम conflict of interest बघतो आणि fee-only सल्लागाराचा सल्ला घेतो. ( fee-only म्हणजे ज्याला कमिशन मिळत नाही, फक्त माझ्याकडून फी मिळते.)

ऐसी अक्षरे सांस्कृतिक कट्टा १ - पुणे फिल्म फेस्टिवल

सध्या ऐसी सदस्यांसाठी कट्टा करण्याचं घाटतं आहे. त्यावरून आठवलं. ऐसी अक्षरेतर्फे काही सांस्कृतिक कट्टे व्हावेत अशी इच्छा स्थापनेपासूनच व्यक्त केलेली होती. त्यात नुसतंच कट्ट्याला भेटण्यापेक्षा काहीतरी कार्यक्रम एकत्र करावा, पहावा आणि त्याबरोबर गप्पाटप्पा व्हाव्यात अशी कल्पना होती. पुण्यात लवकरच सुरू होत असणारं फिल्म फेस्टिवल ही या दृष्टीने उत्तम संधी आहे.

सांस्कृतिक कट्ट्यांमध्ये येऊ शकणाऱ्या गोष्टी.

धाग्याचा प्रकार निवडा:

पुरोगामी मराठा

Taxonomy upgrade extras

आमच्या वस्तीतला धोन्नाना कायम म्हणायचा , खरं बामन परवडले पण मराठा नकू , आज पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या मराठा तरुणांची मते पाहून मला धोन्नानाच्या बोलण्यात तथ्य जाणवते. लाखावर उत्पन्न घेणारा उसलावा शेतकरी ज्याच्या घरीदारी टयाकटर बुलट दुध डेरी पंचायत समिती सक्रीय सहभाग इतियादी..! त्याच्या आंदोलनासाठी डोळ्यात पाणी आणणारे पुरोगामी मराठा तरुण लाखावर इनकम कमावणारा उसलाव्या रानात मजुरी करणाऱ्याला काय किती देतो याचा विचार करत नाहीत. त्यांची वास्तपुस्त करताना दिसत नाहीत .

परदेशातील भारतिय

Taxonomy upgrade extras

परवाचीच गोष्ट मी ज्या स्पीच क्लबमध्ये जाते तेथिल एका गोर्‍या बाईने एक "काल्पनिक" गोष्ट सांगीतली. तिला पूर्वीचा काळ रेखाटण्याची असाइनमेन्ट होती.या कथेत तिने स्वतःचे नाव गुंफले होते व ते संपूर्ण स्पीच "विचक्राफ्ट अर्थात चेटूकविद्या" या विषयाला वाहीलेले होते. "चेटूकविद्येच्या आरोपावरुन स्त्रियांना देण्यात येणारा मृत्यूदंड" ही अघोरी पद्धत पूर्वी कशी बोकाळलेली होती अन त्याविरुद्ध कोणी काय कार्य केले अशा स्वरुपाचे ते रोचक स्पीच होते.मला एक गोष्ट खटकली ती म्हणजे त्या बाईने "इन्डियन स्लेव्ह" टुटूबा म्हणून केलेला उल्लेख.

प्रामाणिक मत

आपुलकी, प्रेमभाव, माया ममता हे शब्द नुसत्या कानालाही किती गोड वाटतात. शब्दांचा स्पर्शही आकर्षक, मनोवेधक वाटतो. अनुभव तर सोडाच मायेची दोन शब्दासुद्धा दोना जन्मीचे पारणे फेडून जातात. शरीराची कसकस, मनाची धगधग शांत करुन एक मऊ मुलायम पांघरूण घालून जातात. सुखावून जीवाला पुनश्च धड़पडण्याची , जगण्याची जिद्न्यासा देतात.