सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग १)
१. अभिरमन्यु उवाच:
सुभद्रेला त्या नराधमापासून झालेल्या बाळाचे नाव तिने ‘अभिमन्यु’ ठेवल्याचे कळले, तेंव्हा मी थोडासा सुखावलो खरा, पण ते क्षणभरच. त्या नराधमाविषयीचा माझा संताप लगेचच उफाळून आला, आणि माझी प्रतिज्ञा आणखीनच बळकट झाली.
- Read more about सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग १)
- 18 comments
- Log in or register to post comments
- 19898 views
शावीचा दिप्या
पंधरा वीस वर्षापूर्वीचा काळ जरा वायला होता. आता दहावीतच पोरं गळतात. जरा भाग्याची बारावीत गळतात. आता झोपटपट्टीत केबलचा फार काव राहिला नाही. घरटी डिश टेव्ह्या आल्या आहेत. शान मधे माय मावल्या दोन रिमोट हातात घेऊन देवयानी, सत्यजीत ,राधाच्या स्टोर्यात गुंगतात. माल धक्क्यात दमलेले , कुल्पीच्या गाडीवरुन शिणलेले , शिपवाले रिक्षाचालक बाप लोक हातगाडी वरचे चविष्ठ मुंडी पाय देशी बरोबर घेऊन, आपापला फलाफुला संसार देखत , घासटुकडा खाऊन लेकरांना कोरडं आरडंत ओरडंत झोपी जातात. कुल्पीच्या गाडीवाल्याची पोरं चायना , आणि रिक्षावाल्याची पोरं सँमसंग मोबाईलवर बिझी राहून.
- Read more about शावीचा दिप्या
- 11 comments
- Log in or register to post comments
- 14249 views
राग!
काल माझ्या शाळेतल्या मित्राने मला एका व्याख्यानाचा व्हिडीओ (http://youtu.be/U0S9179jgRc)बघायला सांगितला म्हणुन डाउनलोड करुन आवर्जुन बघितला.
या व्याख्यानाच्या शैलीने आमची पिढी घडवली
या शैलीला नाव काय द्यायचं सुचत नव्हतं
पण आता सुचलं - हे होतं "गद्यगायन"...
आवर्जुन बघायचं कारण
ते दोन गायक होते
पु. ल. देशपांडे आणि वाजपेयी
त्यांनी दोघांनी आळवला "राग सावरकर"
एकाची ग्वाल्हेर गायकी तर दुसर्याची गंधर्व गायकी
एकांनी आपली बंदीश कागद (नोटेशन) बघुन मांडली
तर दुसर्याने उत्स्फूर्तपणे...
हा "सावरकर" राग उत्तरांगप्रधान,
आलापी फारशी नाही. जयपुरसारखी एकदम उडी मारून बंदीशीला सुरुवात...
- Read more about राग!
- 2 comments
- Log in or register to post comments
- 4250 views
'दुनियादारी'च्या निमित्तानं
Taxonomy upgrade extras
काल 'दुनियादारी' पाहायचा विचार होता. 'उंह, मराठी सिनेमा तर आहे. मिळतील आयत्या वेळी तिकिटं' असा फाजील विश्वास. नडला. मल्टिप्लेक्स तर मल्टिप्लेक्स, सिंगल स्क्रीन थेटरातले खेळही हाउसफुल्ल!
- Read more about 'दुनियादारी'च्या निमित्तानं
- 49 comments
- Log in or register to post comments
- 49379 views
SHIP OF THESEUS
काल SHIP OF THESEUS हा सिनेमा बघण्याचा योग आला. अनेक जणांकडून हा सिनेमा चुकवू नकोस असं सांगण्यात आलं होतं. एकदा जाऊन तिकिटं न मिळणं हा सुखद धक्का देखील बसला होता. कालही सिनेमा हाऊस फुल्ल होता. एका ठिकाणी वाचलं होतं की पहिल्या विकांता चं कलेक्शन अंदाजे २५ - २७ लाख झालं . हा देखील एक सुखद धक्का . कारण याच आठवड्यात निखिल अडवानी चा D-DAY प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला आलेला प्रेक्षक वर्ग हा सिने आणि जाहिरात व्यवसायाशी निगडित असणारा होता आणि काही माझ्या सारखे चुकार लोक .
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about SHIP OF THESEUS
- 13 comments
- Log in or register to post comments
- 12780 views
वाटते मजला भिती -
जीवनाची सांगता ही वाटते मजला भिती
ऐकण्याला कोणि नाही वाटते मजला भिती
सागरावर का उसळती जीवघेणी वादळे
हा किनारा एकटा ही वाटते मजला भिती
ढोलताशा ऐकुनी मज खूप होतो त्रास हा
देवळातिल शांततेची वाटते मजला भिती
वाटले घ्यावा विसावा टेकुनी खांद्यावरी
वाट ती अडवील कोणी वाटते मजला भिती
माजलो पैशात लोळत चेहरा सुजला किती
ओळखेना आरसाही वाटते मजला भिती
जागणे अन् झोपणे का फरक नाही राहिला
जीवनाची ओढ नुरली वाटते मजला भिती
.
- Read more about वाटते मजला भिती -
- 3 comments
- Log in or register to post comments
- 2689 views
" चिऊ चिऊ चिडकी - "
बाळ दिसला
हळूच हसला
"ये ये" म्हणाला
खाऊ घे म्हणाला -
चिऊ चिऊ चिडकी
बंद खिडकी
चोच आपट
काचेवर टकटक -
बाळाने उघडली
चिऊ चिऊ आली
लाडूचा खाऊ
चोचीने घेऊ -
बाळाने मुठीत
लाडू लपवला
बाळ हळूच
खुदकन हसला -
चिऊ चिऊ चिडली
खाऊसाठी रडली
खिडकी बाहेर
"चिऊचिऊ" ओरडली !
.
- Read more about " चिऊ चिऊ चिडकी - "
- 3 comments
- Log in or register to post comments
- 4490 views
" आरती कंत्राटदाराची - "
जीव जाई, जीव जाई, कंत्राटदारा
थैली झटकुन खड्डेदुरुस्ती करा ||
साटे लोटे तुमचे जमले असेल
आगाऊ रक्कम घेतली असेल
लाज शर्म थोडी शिल्लक असेल
नैतिकता काही ध्यानीमनी धरा ||
पावसाळ्यात नेमके खड्डे पडावे
सगेसोयरे तुमचे त्यात धडपडावे
विरोधी प्रतिनिधीनी गृही ओरडावे
खाल्लेल्या पैशावर उपकार करा ||
अपचन अजीर्ण होऊ देऊ नका
डोळ्यावर कुणाच्या तुम्ही येऊ नका
आयकरवाले पहा घालतील डाका
घरच्या लक्ष्मीची आठवण करा ||
.
- Read more about " आरती कंत्राटदाराची - "
- Log in or register to post comments
- 2967 views
विद्यार्थ्यांची दुपारची जेवणे अर्थात मिड डे मिल
नुकत्याच बिहारमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर मीडियाचे व त्यायोगे जनतेचे लक्ष 'शाळेतील दुपारच्या जेवणावर' अर्थात 'मिड डे मिल' योजनेकडे वळले आहे. जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी व दु:खदायक आहे. या निमित्ताने ही योजना काय आहे? ती कशी राबवली जाते वगैरे शोध घ्यायचा प्रयत्न केला आणि तेव्हा मिळालेली माहिती सर्वांसमोर ठेवतो आहे. खरंतर, घटना घडून जाऊन काही दिवस उलटले आहेत पण माहिती जमवून टंकन करण्यात थोडा अधिक वेळ गेल्याने काहिशा शिळ्या झालेल्या पण अर्थातच महत्त्वाच्या विषयावर लिहावे असे ठरवले. या निमित्ताने या योजनेशी संबंधित विषयांवर चतुरस्र चर्चा होईल अशी अपेक्षा आहे.
योजना:
- Read more about विद्यार्थ्यांची दुपारची जेवणे अर्थात मिड डे मिल
- 32 comments
- Log in or register to post comments
- 23557 views
एक मजेशीर गणिती श्लोक
माझे मित्र श्रीपाद अभ्यंकर ह्यांच्या ब्लॉगवर येथे पुढील श्लोक वाचावयास मिळाला:
इन्द्रो वायुर्यमश्चैव नैऋतो मध्यमस्तथा।
ईशानश्च कुबेरश्च अग्निर्वरुण एव च॥
ह्या श्लोकाचा मूळ स्रोत सापडू शकला नाही पण जालापुरता त्याचा स्रोत म्हणजे वर उल्लेखिलेला ब्लॉगच दिसतो. हे जवळजवळ निश्चिततेने म्हणता येते कारण की जालावर जेथे जेथे तो दिसतो तेथे तेथे तो ’इन्द्रः वायुर्यमश्चैव...’ असा लिहिला गेला आहे. सन्धिनियमांनुसार तो ’इन्द्रो वायुर्यमश्चैव...’ असा लिहावयास हवा. ही छोटीशी चूक अभ्यंकरांच्या ब्लॉगमध्येच आहे असे दिसते. तदनंतर प्रत्येकाने ’कापा-चिकटवा’ मार्गाने तो उचलला असल्याने ती चूक प्रत्येक ठिकाणी संक्रमित झाली आहे. अभ्यंकरांच्या स्वत:च्या उल्लेखानुसार त्यांनी हा श्लोक ’अमृत’ ह्या जुन्या मराठी डायजेस्ट मासिकात सुमारे ४० वर्षांपूर्वी वाचला होता.
संस्थळावर पुष्क्ळ जागी तो भास्कराचार्यांच्या ’लीलावती’मध्ये आहे, इतकेच नव्हे तर भास्कराचार्यांची कन्या लीलावती हिनेच तो रचला आहे असे निराधार उल्लेख सापडतात. ही बहुतेक सांगोवांगीची दंतकथा असावी. उपलब्ध ’लीलावती’ मध्ये तरी श्लोक कोठेच दिसत नाही.
अशा कारणाने मूळ माहीत नसलेल्या आणि काही देवांच्या नावांची केवळ यादी अशा स्वरूपाच्या ह्या श्लोकामध्ये एक मजेदार गणित दडलेले आहे.
श्लोकामधील देव हे आठ दिशांचे राखणदार असे अष्टदिक्पाल आहेत.
सर्वप्रथम वायव्य दिशेपासून सुरुवात करून आठ दिशा घडयाळाच्या काटयांच्या दिशेने आणि तिनातिनाचा ओळींमध्ये लिहा:
वायव्य उत्तर ईशान्य
पश्चिम (मध्यम) पूर्व
नैऋत्य दक्षिण आग्नेय
आता प्रत्येक दिशेच्या जागी तिच्या दिक्पालाचे नाव लिहा:
वायु कुबेर ईशान
वरुण (मध्यम) इन्द्र
नैऋत यम अग्नि
आता प्रत्येक देवाच्या नावाच्या जागी वरील श्लोकामधील त्याची क्रमसंख्या लिहा. ह्या क्रमसंख्या अशा आहेत:
इन्द्रो(१) वायु(२)र्यम(३)श्चैव नैऋतो(४) मध्यम(५)स्तथा।
ईशान(६)श्च कुबेर(७)श्च अग्नि(८)र्वरुण(९) एव च॥
२ ७ ६
९ ५ १
४ ३ ८
संख्यांची ही मांडणी म्हणजे तिसर्या पातळीचा आणि ’१५’ बेरीज असलेला मॅजिक स्क्वेअर आहे. ह्याच्या उभ्या-आडव्या ओळी आणि दोन्ही कर्णांमधील आकडयांची बेरीज १५ आहे.
- Read more about एक मजेशीर गणिती श्लोक
- Log in or register to post comments
- 19056 views