Skip to main content

संसद: मान्सून सत्र २०१३

ऐसीअक्षरे वर आपण २०१२च्या मान्सून सत्रापासून सुरवात करत २०१२ चे हिवाळी अधिवेशन व २०१३ च्या बजेट अधिवेशनाशी संबंधित दैनैदिन कामकाज - काय प्रस्तावित होते, प्रत्यक्षात काय झाले - याचे वार्तांकन इथे वाचले व त्यावर चर्चाही केली. या उपक्रमाला येत्या मान्सून सत्राच्या निमित्ताने एक वर्ष पूर्ण होत आहे याचा आनंद आहे.

घाबरगुंडी

साले सगळे घाबरतात! साले सगळे घाबरवतात!

समोरून नेता आला
तावातावात बोलू लागला
हा आपला तो तुपला
ऐकलं नाहीस तर तू धुपला
तुमची भाषा धोक्यात आहे
तुमचा धर्म धोक्यात आहे
माझी उडाली घाबरगुंडी
मी मग तडक गेलो
त्यांना मत देऊन आलो
उगाच कशाला? माझा धर्म, माझी भाषा संपली तर!

समोरून दुसरा आला
तावातावात बोलू लागला
अमुक पॅटर्न तमुक फॉर्मॅट
आमचंच आतून सारं ग्याटमॅट
आमच्याविना आहे काय?
करियर धोक्यात आलं हाय
माझी उडाली घाबरगुंडी
मी मग तडक गेलो
त्या क्लासमध्ये दाखल झालो
उगाच कशाला? माझं करियर, माझे मार्क हरवले तर!

समोरून 'प.पू.' आले
तावातावात बोलू लागले

कोरा करकरीत!

समोरचा कागद कोरा तसाच पडलाय. तास झाला, तरी माझी नजर त्या कागदाच्या कोरेपणावरच खिळलेली. काहीतरी शोधत शोधत कपाट उघडलं आणि खाली पडला तो कागद. कोराकरकरीत.

कितीतरी वर्षापूर्वी तो कागद आवडला म्हणून विकत घेतला. आवडला कागद म्हणून एकच घेतला. ढीगभर घेऊन काय करायचे होते? एकाच कागदाचा तो कोरेपणा पुरला असता आयुष्यासाठी. त्यानंतर कितीतरी कागद पाहिले, त्यातले कितीतरी आवडले, काही विकत घेतले, काहींवरती वाणसामानाच्या याद्या लिहिल्या आणि काही चुरगळून फेकून दिले. हा कागद मात्र जपून ठेवला. कायम!!

एक अप्रकाशित पत्र

Taxonomy upgrade extras

वृत्तपत्रांमधून जे काही छापून येतं, त्यावरील सोयीच्या असतील तितक्याच प्रतिक्रिया छापल्या जातात, हा एक अनुभव.
प्रतिक्रिया छापताना 'संपादकीय धोरण' नावाची गोष्ट आढळत नाही, हा दुसरा अनुभव. त्यामुळे अनेकदा चुकीची माहिती प्रसारित होते.
तर इंटरनेटमुळे अशा गोष्टी लोक ब्लॉगवर, फेसबुकवर लिहून टाकताहेत आणि त्यामुळे पुष्कळ गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचू शकताहेत, हे आनंदाचेच.
उल्का महाजन या कार्यकर्त्या मैत्रिणीने लोकसत्तातील एका अग्रलेखाबाबत मतभेद नोंदवणारे एक दीर्घ पत्र लिहिले आहे. त्याचा दुवा इथे देते आहे. इथे त्याची चर्चा झाली, तर मतेमतांतरे समजू शकतील, असे वाटले, म्हणून आवर्जून देत आहे.

फुटकर

संपादित

संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित

(आणखी एक) कवितास्पर्धा

एक नैमित्तिक आणि एक प्रतिवार्षिक प्रसंग साजरा करण्यासाठी कवितास्पर्धेचे आयोजन करीत आहोत; तेव्हा 'ऐअ' च्या वाचकांनी आपल्या कविता पाठवाव्यात ही विनंती. कवितेसाठी विषय पुढीलप्रमाणे:

(१) विल्यम आणि केट, उर्फ ड्यूक अँड डचेस ऑफ केंब्रिज, यांना झालेली पुत्रप्राप्ती. भारतावर अजूनही इंग्रजांचं राज्य आहे अशी कल्पना कवितेमागे असावी. मातापित्यांचं अभिनंदन, जॉर्जबाळासाठी पाळणा, उर्वरित आयुष्य कॅमेराफ्लॅशसमोर जाणार असल्याबद्दल त्याचं सांत्वनगीत, अशासारखी या विषयाला सर्वसाधारणपणे धरून असलेली कोणतीही रचना चालेल.

मदत हवी आहे : फार्मा कंपनी साठी नावे सुचवा ...

Taxonomy upgrade extras

माझा मित्र फार्मा कंपनी सुरु करीत आहे तरी कृपया नावे सुचवा...
त्यास "A" पासून सुरु होणारे नाव सांगा ....
त्याचे पहिले product सलाईन आहे नंतर विविध औषधे आणणार आहे ...

माध्यमांची अविश्वासार्हता, सनसनाटीची खाज, की आणखी काही?

काही दिवसांपूर्वी 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये 'राहुल गांधी योग्य पर्याय: डॉ. सेन' ही बातमी वाचली. बातमीतला निवडक मजकूर :

>>मला राहुल गांधीचे व्यक्तीमत्व आवडते. ते माझ्याच कॉलेजमधून शिकले आहेत. मला त्यांच्याशी बोलताना कायमच आनंद वाटतो. राहुल हे लोकशाही विचारांमध्ये विश्वास ठेवतात. एक नागरिक म्हणून मला कायमच त्यांच्यावर गर्व आहे, असे सेन यांनी 'एनडीटिव्ही' या वृत्तवाहिनीवरून सांगितले. परंतु एक पंतप्रधान म्हणून त्यांच्यासाठी मतदान करण्यावर मी अद्याप विचार केलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.