दोन दशकं- पहिल्या नशाची.
योग जुळून यावेत, तसे काही सिनेमाही जुळून येतात. मनाच्या कोपर्यात घर करून बसणारे हे सिनेमे आपण आपल्या वाढत्या वयासोबत हृदयात जपून ठेवत असतो. बऱ्याचदा ह्या सिनेमांनी ओलांडलेला काळाचा टप्पा आपलयाला आपल्या वाढत्या वयाची जाणीव करून देत असतो. नव्वदीच्या दशकात भारतीय सिनेमाला पहिल्या प्रेमाची आठवण करून देणारं गाणं म्हणजे “पहला नशा, पहला खुमार”. आजही बॉलीवूडच्या कल्ट सिनेमात मानाचं स्थान पटकावून बसलेल्या ‘जो जीता वोही सिकंदर’ ह्या सिनेमाने तरुण पिढीला ह्या ‘लव अँथम’ सोबत बरंच काही दिलं. २०१२ मध्ये ह्या सिनेमाला प्रदर्शित होऊन दोन दशकं होतील, हे सांगूनही खरं वाटणार नाही.
- Read more about दोन दशकं- पहिल्या नशाची.
- 9 comments
- Log in or register to post comments
- 7433 views
मृत्युचिन्ह
प्रिय मृत्यो,
नश्वर जगातल्या एकमेव खऱ्या मित्रा,
लोक तुला काय काय म्हणतात ....
आयुष्य थांबवतोस म्हणून पूर्णविराम .
पुनर्जन्माच्या संकल्पनेनुसार अर्धविराम ;
नंतर येणाऱ्या अनेक जन्मांतला एक संपला म्हणून स्वल्पविराम ,
पुढल्या जन्मास जोडणारा म्हणून संयोगचिन्ह -
अर्ध्यातूनच उठवलंस तर अपसारणचिन्ह ---
विशेष असलास तर 'एकेरी अवतरणात'
अतिविशेष असलास तर "दुहेरी"
जगातलं
न थांबलेलं आश्चर्य उद्बारचिन्ह !
अन न सुटणारं कोडं : प्रश्नचिन्ह ?
(पूर्वप्रकाशित)
- Read more about मृत्युचिन्ह
- 7 comments
- Log in or register to post comments
- 5034 views
छायाचित्रण पाक्षिक-आव्हान ९ : रंग
पुढच्या पंधरवड्यासाठी विषय आहे: रंग
रंग - जर रंग नसले तर? हा अगदी टोकाचा विचार सोडला तरी प्रत्येक वस्तूबरोबर, पदार्थाबरोबर, प्राण्याबरोबर, फुलाबरोबर एक रंग नकळत डोक्यात पक्का झालेला असतो. रंगाचं अस्तित्व विलक्षण. स्पर्श, गंध, स्वाद, नाद या इतकाच रंग महत्वाचा. 'रंग' या विषयाला कसल्याही मर्यादा नाहीत! आकाशातले रंग, पाण्यातल्या प्रतिबिंबांचे रंग, फुले, पक्षी, प्राणी यांचे रंग, कुंचल्यातुन साकारलेले रंग, कृत्रिम रंग. ज्याला जसा वाटेल त्याने तसा साकारावा असा हा विषय. म्हटलं तर सोपा म्हटलं तर महाकठिण विषय!
स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत:
स्पर्धा का इतर?
- Read more about छायाचित्रण पाक्षिक-आव्हान ९ : रंग
- 57 comments
- Log in or register to post comments
- 79696 views
स्वातंत्र्य म्हणजे ....
काही काही व्यक्तींच्या आयुष्यात डोकावण्याचा मोह अनावर होतो तो त्यांच्याविषयीच्या ऐकीव माहितीतून, बातम्यांतून. आणि जर का त्यांचं आत्मचरित्र हाती आलं तर मग अगदी थेटच डोकावता येतं त्यांच्या आयुष्यात!आठेक वर्षांपूर्वी जेव्हा मी नव्याने वाचू लागले, तेव्हा प्रोतिमा बेदीविषयी, तिच्या ‘टाईमपास’विषयी खूप उत्सुकता वाटत होती. तिचं व्यक्तिमत्त्वच मुळी ‘वादळी’! हे पुस्तक वाचल्यानंतर कुतूहल शमलं. प्रोतिमा नावाचं वादळ नेमकं कसं घडलं-बिघडलं ते सविस्तर समजलं. आणि आजवर तिच्याविषयी वाटणार्या अचंब्याची जागा घेतली अनुकंपेनं!
- Read more about स्वातंत्र्य म्हणजे ....
- 6 comments
- Log in or register to post comments
- 12635 views
आपले लाडके किशोर कुमार उर्फ आभासकुमार गांगुली यांना श्रद्धांजली
.
- Read more about आपले लाडके किशोर कुमार उर्फ आभासकुमार गांगुली यांना श्रद्धांजली
- 13 comments
- Log in or register to post comments
- 7683 views
‘रण-दुर्ग’ : मिलिंद बोकील
‘रण-दुर्ग’
(मिलिंद बोकील - मौज प्रकाशन- १ जानेवारी २०११ - रु.१६०/- पृष्ठे:१७२)
स्वत:चा शोध घेण्यास सुरुवात झाली की माणसाला मध्येच थांबता येतं का? की शोधाची प्रक्रिया अव्याहतपणे सुरुच राहते? वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर अनुभवास येणारा ‘मी’, बदलत गेलेला ‘मी’, विखुरलेला ‘मी’... ह्यातला नक्की कोणता ‘मी’ खरा?
- Read more about ‘रण-दुर्ग’ : मिलिंद बोकील
- 5 comments
- Log in or register to post comments
- 9172 views
वासेपूर
आत्ता पहायला मिळाला.
- Read more about वासेपूर
- 30 comments
- Log in or register to post comments
- 19395 views
शंभर वर्षांपूर्वीच्या वृत्तांकनाचे नमुने हवे आहेत
वृत्तपत्रांतून मराठी बातम्या वाचता येऊ लागल्या त्याला आता कित्येक वर्षं झाली. या काळात वृत्तांकनाच्या शैलीत चांगलाच फरक पडला. सुमारे शंभर वर्षांपूर्वी मराठी वृत्तपत्रांत ज्या बातम्या दिल्या जात असत ती भाषा आणि आजची भाषा यांत काय फरक आहे ते दाखवण्यासाठी जुन्या बातम्यांच्या मजकुराचे नमुने हवे आहेत. आंतरजालावर कुठे असे नमुने उपलब्ध असले तर कृपया इथे दुवे द्यावेत. टंकलेला मजकूर किंवा स्कॅन केलेली पानं यांपैकी काहीही चालेल. स्कॅन असेल तर मजकूर वाचता येईल इतपत दर्जा चांगला हवा.
- Read more about शंभर वर्षांपूर्वीच्या वृत्तांकनाचे नमुने हवे आहेत
- 7 comments
- Log in or register to post comments
- 5836 views
"मी बोलत नाही..." लेखकाला २०१२ चे नोबेल प्राईझ
पाच-सहा वर्षापूर्वी [ज्यावेळी चीनमध्ये बिजिंग ऑलिम्पिक्सचे वारे वाहण्यास सुरुवात झाली होती] याहू-क्वेशन्सअन्सर्स प्लॅटफॉर्मवर माझी एका चिनी शिक्षकाशी ओळख झाली, वाढलीही आणि त्या ओळखीचे रुपांतर मग ई-मेलिंगमधून दोन्ही देशाच्या सांस्कृतिक-साहित्य-क्रीडा यासारख्या विषयावरील घडामोडीवर आम्ही सविस्तर पत्रे लिहिण्यात झाले [राजकारण विषय आम्ही वर्ज्य मानला होता]. सदरमजकूर शिक्षक हे चीनच्या शॉनडॉन्ग Shandong - प्रांतातील एका हायस्कूलमध्ये इंग्रजी विषय शिकवित...आजही आहेत.
- Read more about "मी बोलत नाही..." लेखकाला २०१२ चे नोबेल प्राईझ
- 9 comments
- Log in or register to post comments
- 7045 views
शाब्बास रे पट्ठे!
डीएलएफ-रॉबर्ट वाढ्रा (वधेरा?) आणि आयओसी-अरविंद केजरीवाल यांच्यात चाललेल्या घमासान लढाईमुळे इतका धुरळा डोळ्यांत गेला आहे की इतर बर्याच बातम्या वाचनात येत नाहीत.
उदाहरणार्थ, ही बातमी पहा : "PMO orders probe into Wal-Mart investment in Bharti group"
- Read more about शाब्बास रे पट्ठे!
- 5 comments
- Log in or register to post comments
- 5699 views