Skip to main content

ह्या कन्नडीगांना आलाय माज

ह्या कन्नडीगांना आलाय माज

ह्या कन्नडीगांना आलाय माज
तो माज आता काढू मोडून
अर्रे 'देत नाही देत नाही' म्हणता कशाला
चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||धृ||

लई तुरूंगवास करवला रे तुम्ही
काय सहन नाही केलं आम्ही
मराठीसाठी किती रक्त वाहवलं
ह्या कन्नडीगांना आम्हां डिवचलं
लई झालं आता
उठला मराठी माणूस पेटून
चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||१||

अरे गल्या-बोळांना नावं आमची
सार्‍या दुकानांना नावं आमची
सार्‍या शाळा रे आमच्या आमच्या
सारी आडनावं आमची आमची
बेळगाव महानगरपालीका आमची
एका ठरावानं होईल का तुमची?

‘पुस्तक परिचय आणि पुस्तक परीक्षण’

Taxonomy upgrade extras

रंगमुद्रा - माधव वझे... ह्या पुस्तकाचा परिचय वाचून माझ्या एका मित्राने ‘पुस्तक परिचय आणि पुस्तक परीक्षण’ ह्यातील फरक स्पष्ट करण्यास सांगितले. त्याला जे सांगितले ते इथेही चर्चाविषयात द्यावेसे वाटले. मी एक वाचक आहे, साहित्याची रूढ अर्थाने अभ्यासक नाही.
मी लिहिले ते असे ---
"परिचय म्हणजे एक तोंडओळख... ह्या पुस्तकात काय आहे, बस्स! आणि परीक्षण म्हणजे त्या पुस्तकात जे आहे त्याविषयी मला काय वाटते? परिचयाने एक वाचक म्हणून माझे मनोरंजन झाले, मला नवीन माहिती मिळाली. परीक्षण करताना आपल्यातील अभ्यासक जागा असणे....

सात पाउले आकाशी

‘फूलघर’ ही झाडांनी वेढलेली एक सुंदर जागा. संध्याकाळच्या वेळी तिथं बसून सगळेजण चहा पीत आहेत निवांत. एक तेजस्वी आवाज विचारतो, “मनुष्याला ज्या पद्धतीने जगावसं वाटतं, त्या पद्धतीने तो जगू शकेल? विशेषकरून स्त्री? ” तो प्रश्न असतो वसुधाचा.

अ‍ॅना, आलोपा, विनोद, मित्रा . . त्यांच मत मांडतात.

“करू शकेल. पण नंतर तो दु: खी होईल. स्त्री असेल तर विशेषत्वाने.” एक स्पष्ट उत्तर येतं.

“स्त्रीसुखाची तुमची व्याख्या काय?” वसुधाचा त्यावर आणखी एक धारदार प्रश्न.

फॉर्म आणि क्लास

'फॉर्म इज टेम्पररी, बट क्लास इज पर्मनन्ट' असे बहुतेक वेळा क्रिकेटच्या संदर्भात म्हटले जाते. 'आता आपण निवृत्त झालेले बरे, आपला गावस्कर होऊ देऊ नका....' असे सल्ले मिळालेला आणि मुष्किलीने संघात पुन्हा जागा मिळालेला एखादा डावखुरा फलंदाज खेळायला येतो, त्याला ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकण्याची चूक गोलंदाज करतो आणि ऑफ साईडच्या सहा क्षेत्ररक्षकांना जागेवरुन हलण्याचीही उसंत मिळत नाही. एखाद्या बाणासारखा चेंडू सीमारेषेबाहेर जातो. "ऑन दी ऑफ साईड, फर्स्ट देअर इज गॉड, अ‍ॅन्ड देन देअर इज ही' हे त्याच्याच तोलामोलाच्या भिंतीसारख्या मजबूत खेळाडूने त्याच्याविषयी म्हटलेले वाक्य आठवते.

धागे उभे आडवे..

मनुष्य अनुभवाच्या साठ्यातून वेचून लिहितो म्हणतात. 'म. ला. व्यं. ' (महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व अर्थात पुलं ) च्या लिहिण्यावर इतकं लिहिलं गेलंय की आणखी लिहिणं म्हणजे पांढऱ्यावर (आणखी) काळं करणं.....पण तरीही पुलंचे वाङ्मय वाचलेल्या वाचकास त्यांच्या लिहिण्यात अटळ पुनरावृत्ती आढळते. तसे पुलं म्हणजे त्यांच्याच शब्दांत 'उत्कट, भव्य त्या सगळ्यासमोर झुकणारे' - गुण गाईन आवडी, व्यक्ती आणि वल्ली, गणगोत या सगळ्या पुस्तकांतून हा गुण दिसून येतो.
हे सारं साहित्य पुन्हा पुन्हा वाचताना त्यांचे एकमेकांत गुंतलेले धागे मिळाले, त्यांची गाथा -

खबरदारी -

तुला असे मुळूमुळू रडतांना पाहून,
मी थोडातरी विरघळेन,
असे वाटले असेल तुला -

माझ्या य:कश्चित जिवासाठी
तू तुझे हे अनमोल अश्रू ढाळतेस...

माझ्या रुक्ष चेहऱ्यावर जाऊ नकोस
माझ्या कठोर काळजातही
ते अश्रू जपून साठवताना -

माझी किती तारांबळ होत आहे
हे तुला न दिसण्याची मी
खबरदारी घेत आहे !
.

सखे ये लवकरि परतून

सखे ये लवकरि परतून |
अशी कशी गेलीस,
मनाला चटका लावुन|
सखे ये लवकरि परतून ||

हा दुरावा नको मज आता |
घालमेल होते तु दुर जाता |
वाट पाहूनी डोळे जाती थकून|
सखे ये लवकरि परतून ||

जिवनाचे कोडे ना मज कळले|
प्रेमाचे तर त्याहून निराळे |
आठवन येता हळ्वे होई मन|
सखे ये लवकरि परतून ||

नकळत एकमेकी गूंतलो |
जन्मजन्माचे सोबती जाहलो|
ताटातूट ही नाही होत सहन |
सखे ये लवकरि परतून ||

सुखदुखाच्या या वाटेवरती |
प्रवास करू धरुनी हात हाती |
साथ न सोडण्याची घेऊया आण |
सखे ये लवकरि परतून ||

कोलंबस डे

आजचा दिवस अमेरिकेत कोलंबस डे म्हणून साजरा होतो आहे. अमेरिकेच्या काही राज्यांमध्ये आणि अमेरिकेच्या केंद्रसरकारला आज सुटी आहे.
कोलंबसाचा इतिहास , "कोलंबसाचे गर्वगीत" या सार्‍या गोष्टी आपण लहानपणी ऐकतो आणि शिकतोच. या न्यायाने हा विषय आपल्या परिचयाचा आहे.