Skip to main content

मंगळावर 'क्युरिओसिटी' रोव्हर ने नेमके काय पाहिले?

माहितीचे काही दुवे:
महाराष्ट्र टाईम्स : मंगळावर दिसल्या उडत्या तबकड्या?
नासाच्या फोटोचे झालेले विश्लेषण (या दुव्यातील "The strange shimmering lights seen by Curiosity:" हा व्हिडिओ नक्की पहा. त्यात एक पांढरा ठिपका स्पष्टपणे एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी गेलेला अगदी स्पष्टपणे दिसतोय

नासा : क्युरिओसिटी

पार्श्वभूमी:

कविता आणि स्तोत्रांची आवड

कवितेचे पुस्तक किंवा कवितेचा एखादा ब्लॉग वाचणे हा माझ्याकरता नितांतसुंदर अनुभव असतो. लहानपणी केव्हा या आनंदाची गोडी लागली ते आठवत नाही पण एक पक्के लक्षात आहे - गणितातील प्रमेय सोडविल्यावर झालेल्या शब्दातीत आनंदाची तुलना आतापर्यंत फक्त एकाच आनंदाने झाली आणि ती म्हणजे "कवितेतील सौंदर्यस्थळ" अचानक गवसणे.

अंगाई - गाई गाई

ऐसी अक्षरे वर लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न, त्यामुळे सुरवातीलाच एक विनंती, काही चुकले असल्यास जरुर निदर्शनास आणा पण त्या बरोबर उत्तेजना-पर सुचनाहि द्या :) (इथले साहित्य खूप दर्जेदार असते त्यामुळे जरा काचरतच हा धागा टाकतोय!)

संस्कार

Taxonomy upgrade extras

परवा घडलेल्या एका प्रसंगानं डोक्यात ठाण मांडून ठेवलंय. त्यानंतर दररोज तो प्रसंग डोळ्यापुढे येऊन काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय म्हणून तुमच्यासमोर मांडतोय.

कातरवेळ..

प्राचीला गच्ची जोडण्याचा आमचाही एक प्रयत्नः

आठवांचे सूर,
अश्रूंचे पूर,
लागे हूरहूर,
जीवालागी..

नि:शब्द बोलणे,
हळूच ते स्मरणे,
अव्यक्त भावना,
हृदयात...

मनात तू,
स्पंदनात तू,
जीवघेण्या श्वासात तू,
ध्यानीमनी...

दिशा सांजावल्या,
गोकुळे बहरली,
परि एकलेपण,
कातरवेळी...!!

- सुधीर बागुल, मस्त कलंदर

जुलूस

सहावी संज्ञा, Intuition किंवा आतला आवाज या प्रकाराला काही शास्त्रीय आधार आहे की नाही, कोण जाणे? आजकाल तंत्रज्ञानाने इतकी मोठी झेप घेतलेली आहे आणि ते इतक्या प्रकारे, इतक्या वेळा मनावर आदळले जाते की कधीकधी स्वत:चा आतला आवाज खोटा वाटायला लागतो. इतकी भरभराट होत असतानाही चुकचुकणारी माणसं नैराश्याची बळी वाटायला लागतात, काहीतरी जुन्याच्या आठवणींनी उसासणार्‍यांना सरसकट वायफळ नॉस्टॅल्जियाचे रोगी समजले जाते आणि इतक्या मोठमोठ्या गोष्टी बोलणार्‍यांसमोर साध्या-साध्या शंका विचारण्याची लाज वाटू लागते.

जर वाघ्या कुत्रा, तर सिंहगडाचा कोसळलेला कल्याण दरवाजा आणि प्रतापगडाचे कोसळलेले बांधकाम का नाही

Taxonomy upgrade extras

संभाजी ब्रिगेड ने वाघ्या कुत्रा फोडल्याचे वृत्त समजले. वाघ्याचा उल्लेख तत्कालीन अथवा उत्तरकालीन कागदपत्रे- अथव बखरिंमध्ये आढळत नाही म्हणुन वाघ्याचा पुतळा फोडण्यात आला . आणि या बातमीचे कोल्हापुरचे इंद्रजीत सावंत यांनी समर्थन केले. याठिकाणी आधीच स्पष्ट करतो की वाघ्याचा उल्लेख तत्कालीन अथवा उत्तरकालीनही कोणत्याही बघर अथवा पुस्तकामध्ये नाही हे मलाही माहीत आहे आणि याठिकाणी विषय वाघ्या अस्तित्वात होता की नव्हता हा इथे नाहीच आहे मूळी . या ठिकाणी संभाजी ब्रिगेड ने वाघ्याचा पुतळा फोडला .. हा विषय आहे.

समाजसुधारणा व पक्षपात

सामन्यत: एका नाण्याच्या दोन बाजु असतात ,चांगली व वाईट आणि इथे ही नाण्याला दोनच बाजुच नाहीत तर त्या बाजु दोन्ही चांगल्या असुनही एक चांगली बाजु स्वत:च्या स्वार्थासाठी समोर आणली जाते आणि दुसरी चांगली बाजु जाणिवपुर्वक दुर्लक्षीत केली जाते . आणि महत्वाचे म्हणजे या ठिकाणि या नाण्याला दोन बाजु ’जात’ ही संकल्पना समोर ठेवून जाणिवपुर्वक तयार केल्या गेल्या आहेत.

बिन जातीचे व्हा!

काळ बदलला की ताळ (ताल) बदलतो. काँग्रेसच्या बाबतीत ही म्हण उत्तर प्रदेशात खरी ठरू पाहत आहे. जातीनिरपेक्षता हा काँग्रेसचा आणि काँग्रेस नेतृत्वाचा खरा चेहरा आहे. हा चेहरा एकेकाळी काँग्रेसची खरी शक्ती होती (आजही आहे.). उत्तर प्रदेशात मात्र जातीनिरपेक्षा चेहरा काँग्रेसला जाचक ठरू लागला आहे, असे दिसते. २०१२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतील यशापयशाचा आढावा घेण्याचे काम काँग्रेसमध्ये सुरू आहे. काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी अर्थात ‘आरजी' यांच्या नेतृत्वाखाली एक आढावा बैठक नुकतीच घेण्यात आली.