स्वातंत्र्यदिन(एक लघुकथा)
चौथी पाचवीत असलेला मनोबा स्वातंत्र्याच्या पन्नासाव्या वाढदिवसाचा झेंडावंदनाचा कार्यक्रम आटोपून मस्त मजेत, झेंडावंदनाची गाणी गुणगुणत रस्त्यानं चालला होता. उत्साहानं भरलेला गोबरा चेहरा, डाव्या हातानं फ्रेश इस्त्री केलेली चड्डी सावरत आणि उजव्या हातानं आपलं सदोदित गळणारं नाक पुसत स्वारी मजेत चालली होती.
आपल्या इवल्याशा जगात खुश होती.
वातावरण नेहमीचं ऑगस्टचं... चिंब श्रावण महिना आणि पावसाची चिन्ह.
वातावरणात संचारलेला पन्नासाव्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह. जागोजागी दिसणारे लहान-मोठे, डौलानं फडकणारे तिरंगी ध्वज.
- Read more about स्वातंत्र्यदिन(एक लघुकथा)
- 14 comments
- Log in or register to post comments
- 20790 views
छायाचित्रण पाक्षिक-आव्हान ५ : रात्र
पुढच्या पंधरवड्यासाठी विषय आहे: रात्र
कुण्या एका चित्रकाराचे उद्गार आठवतात की रात्र दिवसापेक्षा जास्त रंगीत व जिवंत भासते! तेव्हा आपल्या कल्पनाशाक्तीला भरारी द्या आणि येउद्यात फोटो.
स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत:
१. केवळ स्वतःने काढलेले छायाचित्रच स्पर्धेच्या काळात स्पर्धेसाठी प्रकाशित करावे. मात्र स्पर्धा काळ संपल्यानंतर, निकाल घोषित झाल्यावर त्याविषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही किंवा स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी धरले जाणार नाही
स्पर्धा का इतर?
- Read more about छायाचित्रण पाक्षिक-आव्हान ५ : रात्र
- 25 comments
- Log in or register to post comments
- 22876 views
एकाकीपणाचे बळी!
इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानातील अभूतपूर्व प्रगतीमुळे एकविसाव्या शतकातील - इतर व्यवस्थापनेप्रमाणे - कार्यालयीन व्यवस्थापनेत आमूलाग्र बदल झालेले आहेत. प्रत्येक गोष्टीला ऑनलाइनची जोड दिली जात आहे. प्रगत तंत्रज्ञानावर आधारलेल्या अत्याधुनिक सोई - सुविधांच्या किंमती कोसळत असल्यामुळे व सामान्यांनासुद्धा परवडतील अशा किंमतीत मिळू लागल्यामुळे ई-मेल, व्हाइस मेल, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, इंटरनेट, मोबाइल फोन, स्मार्ट फोन, सॅटलाइट फोन, टॅब्लेट पीसी, आयपॅड, इत्यादी सुविधा अनेक छोट्या मोठ्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात पोचत आहेत. या सुविधामुळे कार्यालयांचे स्वरूपच पूर्णपणे बदलत आहे.
- Read more about एकाकीपणाचे बळी!
- 6 comments
- Log in or register to post comments
- 5203 views
भारताची प्रगती ५: अवघाची संसार
सरकार, मैने आपका अंडा खाया है सरकार...
कुक्कुटसमाजाचे मानवी जीवनावर जेवढे उपकार मानावे तेवढे कमीच. अंड्यांचा शोध लावण्याचं श्रेय या समाजाकडे जातं. या समाजाला इतिहास काही दशलक्ष वर्षे मागे जातो. आज जगभर सर्वत्र उत्खननातून डायनोसॉरची म्हणून जी अंडी बाहेर काढली जातात ती खरे तर कुक्कुट समाजाने निर्माण केली आहेत. मात्र कुक्कुट समाजाचा नंतर जो र्हास होत गेला (घडवून आणला गेला, कसे ते पुढे येईलच) त्यात अंड्यांचा शोध लावण्याचे श्रेयही कुक्कुट समाजाकडून हिरावून डायनोसॉर समाजाला परस्पर देण्यात आले. मात्र ही थिअरी खरी नसून उबवलेली आहे हे मी यापूर्वीच सिद्ध करून दाखवले आहे, तरी वाचकांच्या सोयीसाठी त्यातला प्रमुख मुद्दा पुन्हा मांडतो.
- Read more about सरकार, मैने आपका अंडा खाया है सरकार...
- 31 comments
- Log in or register to post comments
- 19705 views
ज्यां दूधकि नदियां बाहे...
१९७६ साली, म्हणजे माझ्या जन्माच्या जवळपास प्रदर्शित झालेला "मंथन" मी आजवर पाहिला नव्हता. मला आता राहून राहून याचे आश्चर्य वाटतेय. म्हणजे गाजलेला प्रत्येक सिनेमा मी पाहिलेलाच आहे, किंवा पाहिलेला असायला हवा वगैरे काही मनात नाही; पण माझ्याच डोक्यात घोळत असलेल्या "प्रांतांच्या गोष्टीं" च्या अनेक बीजांपैकी एक जणू साकार होऊन चित्रपटरुपात आपल्या समोर येतंय असं वाटत राहिलं. म्हणून आश्चर्य.
ही समीक्षा नाही. चित्रपट समजणे आणि तो समजाऊन सांगणे एवढी प्रगल्भता माझ्याकडे नाही. हे एक शेअरिंग आहे.
- Read more about ज्यां दूधकि नदियां बाहे...
- 33 comments
- Log in or register to post comments
- 32092 views
सबूर
-(अष्टाक्षरी छंद)-
अवचित वाटेवर जुडलेले साथीदार--
काय त्यांच्या गाठोड्यांत?
काय खपल्यांच्या आड, कोण घाव काळजात
चिघळले काळ फार?
.
चिंधी जखमेची सोडू, सोडू पोतडीची गाठ
सारे उघड उघड…
तरी लपलेले जणू गोंधळात गडबड!
शोधू काळजीने वाट...
.
आशा-भीती एकसाथ, निरखून बघू आत
भांबावून खूप वेळ...
बोचू, खोचू, कधी क्लांत, कधी शांत, लावू मेळ,
सबूरीची आहे बात.
---
---
Slow Going
---
What all is crammed in sailors' chests
Of bunkmates met by chance?
- Read more about सबूर
- 12 comments
- Log in or register to post comments
- 8465 views
देवपूजा
Taxonomy upgrade extras
देवपूजा ही करावी की करु नये, हा चर्चेचा विषय होऊच शकत नाही. तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण त्याला कोणी वैज्ञानिक आधार देऊ लागले तर त्याचा प्रतिवाद करण्याची प्रत्येक विज्ञानप्रेमीला मुभा असावी. त्यातही कोणाच्याही श्रद्धेला धक्का न लावता ही चर्चा नक्कीच करता येईल, असे वाटल्याने मी हे आपणासमोर मांडत आहे. मला खालील मेल आल्याबरोबर, सहजपणे जे मनांत आले ते लिहिले आहे. ते अर्थातच मूळ परिच्छेदाच्या खाली आहे.
देवपूजेमागचं शास्त्र
- Read more about देवपूजा
- 28 comments
- Log in or register to post comments
- 20655 views
लबाड कान्हा .. खट्याळ कान्हा ...
.
खोड्या करुनी
दंगा करुनी
गोपगड्यांना
खेळवतो -
लबाड कान्हा
खट्याळ कान्हा
यशोदामाईला
पळवतो -
क्षण शिक्षेचा
गोळा लोण्याचा
डोळ्यासमोर
वितळतो !
हसणे विसरता
रुसून बसता
आनंद माईचा
मावळतो -
मुख उघडोनी
विश्व दावूनी
यशोदामायेला
'माया'ळतो ,
यशोदामाता
जवळी घेता
पदरामध्ये
विरघळतो !
.
- Read more about लबाड कान्हा .. खट्याळ कान्हा ...
- 4 comments
- Log in or register to post comments
- 2751 views
संसदेचे मान्सून सत्र २०१२
काल संसदेचे २०१२चे मान्सून सत्र सुरू झाले. त्या सत्रासंबंधी माहिती देण्यासाठी, चर्चा करण्यासाठी हा धागा सुरू करत आहे.
यात शक्य तितके दररोज काल काय झाले आणि आज संसदेपुढे कोणता कार्यक्रम प्रस्तावित आहे याची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे.
दररोज शक्य होईलच असे नाही मात्र प्रयत्न जरूर करणार आहे. सत्र संपल्यानंतर एकूण सत्राचा आढावा घेण्याचा प्रयत्न देखील वेगळ्या धाग्याद्वारे करण्याचा मानस आहे.
त्यातील महत्त्वाच्या प्रस्तावांवर ऐसीअक्षरेच्या सदस्यांकडून साधक-बाधक चर्चेची अपेक्षा आहे.
- Read more about संसदेचे मान्सून सत्र २०१२
- 57 comments
- Log in or register to post comments
- 75910 views