कथा
बस्स तुझं असणं..........
तु कोण, काय, तुझं गावं कोणतं, तुझं येणं कुठलं हे काहीच माझ्यासाठी महत्त्वाचं नव्हतं... नाहियेय...तुझं माझ्या आयुष्यात असणचं माझ्यासाठी बहारदार होतं वसंतातल्या लालट गुलमोहरासारखं......मला टवटवीत करणार.....तसं म्हटलं तर आपली ओळख दोन वर्षांपूर्वीची आणि म्हटलं तर जन्माजन्माची म्हणूनच तर हा अनुरागी बंध जुळला ना ! जो आजच्या क्षणापर्यंत कायम आहे....मनाच्या कप्प्यात.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about बस्स तुझं असणं..........
- 2 comments
- Log in or register to post comments
- 1888 views
माजी पईली बायकु - भाग २
सकालच्याला जाग आली तवा उन कासराभर वर आलेलं. मी पांघरून बाजुला फेकला आन हुटलो. आज घरात कुनीच नव्हतं. चंदी चा बनवत आसल म्हून मी कीचान मदी ग्येलो त कुटं काय. त्वालेतला बसली आसल आसा इचार क्येला आन मंग मी ग्यास पेटीवला आन चाचं आदन ठिवलं. बायकुला सर्पराइज दावू मंजी येकाद मुका घेती का देती त्ये पघु असा इचार केला आन गरम पान्यात साकर आन चाची पौडर टाकली. अवं सर्प-राइज म्हंजी साप हुबा रातो आसं नव्हं, उगा गेर समजुत करून घिऊ नगा. चा उकल्ला तवा त्यामदी दुद वतलं आन मग दोन कपात गाललं. टेबलावं ठीउन चंदीची वाट पाऊ लाग्लो. माजा चा पिऊन जाला तरी बी चंदी येयना.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about माजी पईली बायकु - भाग २
- 22 comments
- Log in or register to post comments
- 5417 views
माजी पईली बायकु-१
कदी कागुद कमी पडला त कदी पेनातली श्याई वालून ग्येली माज्या जिंदगानीची इष्टोरी लिवताना. या इष्टोरी मदलं "माजी पईली बायकु" नाव असल्यालं पर्करन हाये ते लिवतो. मनापर्मान बायकु भेटाय लई बाग्य लागतं राजे हो. गावाकड येक जोतीस व्हता त्याला माजा जनम कागुद दावला न इचारलं की बाबा रे मला बायकु कशी भेटल? त्यो म्हनला तू लई नसीब काडनार हायेस. येक सोडून दोन मिळत्याल पन येकीची बी ग्यारंती नाय. मी त्येला बोल्लो तुज्या थोतरीत देवू का येक? त्यो म्हनला माज्या थोतरीत मारसील पन नसीबाच्या थोतरीत? कसं जगायचं आसा प्रस्न हुबा राईल तवा कोनला माराया जासील?
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about माजी पईली बायकु-१
- 9 comments
- Log in or register to post comments
- 4561 views
नाही म्हणजे नाही.
"मी निघते गं मावशी, रेश्मा आली की तिला तो कॅटलॉग आठवणीने दे.. मग ती तो तिच्या मैत्रिणींना दाखवेल."
सोफ्यावरून उठत वसुधा म्हणाली.
"अगं थांब की जरा, इतकी उन्हाची कुठे जातेस? थोडा चहा घेऊन जा, छान आले घालून करते .. माझी चहाची वेळ झालीच आहे." मावशी स्वयंपाकघराकडे जाताना म्हणाल्या.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about नाही म्हणजे नाही.
- Log in or register to post comments
- 1543 views
मेकअप
ब्लँक. Removed for personal reasons.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about मेकअप
- Log in or register to post comments
- 1848 views
धचामा
धचामा"
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about धचामा
- 5 comments
- Log in or register to post comments
- 3413 views
पीएनामा : झाडाची फांदी आणि एसीआर
(पीएनामा: केंद्र सरकारच्या सीएसएसएस केडर मध्ये ग्रुप सी पासून ते ग्रुप ए पर्यन्त प्रवासच्या दरम्यान अनेक वरिष्ठ आयएएस, आयपीएस इत्यादींच्या दरबारात कार्य करताना मला आणि माझ्या बांधवांना आलेले अनुभव, ऐकलेले किस्से आणि थोडी कल्पना, पीएनामाच्या रूपाने सादरीकरण करण्याचा प्रयत्न) किस्से सांगण्यासाठी काही टोपण नावे मी अर्थात पटाईत, सुनील, सुशील आणि श्याम सुंदर ही ठेवली आहे)
(ऐकलेल्या किस्याचा आधारावर काल्पनिक कथा)
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about पीएनामा : झाडाची फांदी आणि एसीआर
- Log in or register to post comments
- 1268 views
१४ मे.--२
१४ मे.
१४ मे रात्र
रात्री त्याला स्वप्न पडले होते. कोणतरी दरवाजा ठोठावत होते. कुलकर्णी स्वप्नात जागा झाला. साले झोपूनसुद्धा देत नाहीत नीट. कोण असणार ह्यावेळी. शिव्या देत देत त्यांनी दार उघडले. बघतो तर शेजारचे डोईफोडे.
“अहो, केव्हढ्याने दार वाजवता.”
डोईफोड्याने त्याकडे साफ दुर्लक्ष केले, “खिडकीतून जरा बाहेर डोकवा.”
“काय बाहेर काय आहे?”
पण स्वप्न तिथेच थांबले. कुलकर्णी स्वप्नातून सत्यतेत जागे झाले.
१४ मे
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about १४ मे.--२
- Log in or register to post comments
- 1376 views
१४ मे --१
१४ मे.
सब तीरथ एक बार. लेकीन १४ मे बार बार!
आज काय तारीख आहे? १६ जुलै. कशावरून? कारण काल १५ जुलै होती. हा तुमचा निव्वळ भ्रम आहे. मी तुम्हाला सांगतो आज १४ मे आहे. काही दिवसांनी लोक म्हणतील आज १८ सप्टेंबर आहे. मग म्हणतील आज २० डिसेंबर आहे. तुम्ही कुणा कुणावर विश्वास ठेवणार? ही मिस्टर कुलकर्णीची कथा वाचा. मग मी काय सांगतो आहे त्याच्यावर तुमचा विश्वास बसेल.
संध्याकाळचे सात वाजण्याची वेळ असावी. कुलकर्णी हॉटेलमध्ये आला तेव्हा फक्त एकजण शेवटच्या टेबलापाशी बसला होता. हे सद् गृहस्थ नेहमीच्यातले नव्हते. त्याच्याच वयाचे असावेत.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about १४ मे --१
- Log in or register to post comments
- 1558 views
वैशालीतला "कार्यक्रम."
वैशालीतली भेट!
मी टिंबक्टूला कंपनीच्या कामासाठी गेलो होतो. टिंबक्टूच्या सुलतानाला त्याच्या झनानखान्याचा डेटा बेस बनवून पाहिजे होता. वयोमानपरत्वे सुलतानाची स्मरणशक्ति त्याला दगा द्यायला लागली होती. कुठल्या दिवशी कुठल्या बेगमकडे वार आहे हे समजेना. एकूण किती मुलं आहेत? आज कुणाचे डोके उडवायचे आहे? इत्यादि. तर ते काम आमच्या स्वस्त आणि मस्त कंपनीकडे आले होते.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about वैशालीतला "कार्यक्रम."
- 5 comments
- Log in or register to post comments
- 2796 views