सामाजिक
ICMR, लस, विज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन, वगैरे
ICMR उर्फ Indian Council of Medical Research ही नामांकित भारतीय संस्था कोव्हिडसाठी पूर्णपणे भारतीय बनावटीची लस दि. १५ ऑगस्ट रोजी उपलब्ध करून देणार अशी बातमी नुकतीच प्रसिध्द होताच अनेक भारतीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला. म्हणजे एक तर व्हायरसपासून मुक्ती मिळणार, तीही पूर्णपणे भारतीय बनावटीच्या लशीने आणि तेदेखील स्वातंत्र्यदिनी! मात्र काही लोकांनी या जलदगतीविषयी शंका उपस्थित केल्या खऱ्या, पण त्याकडे फारसं कुणाचं लक्ष नव्हतं.
पण लवकरच या आनंदाला तडा जाऊ लागला.
लस विकसित करण्याच्या प्रकल्पात सहभागी असलेल्यांना दि. २ जुलै रोजी ICMRने पाठवलेलं एक पत्र लवकरच लीक झालं -
- Read more about ICMR, लस, विज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन, वगैरे
- 10 comments
- Log in or register to post comments
- 5097 views
टांझानियाच्या डायरीतून .......
टांझानिया हा दोन भूभांगाचा देश आहे.त्याची लोकसंख्या ६ करोड म्हणजे महाराष्ट्राच्या निम्मी तर क्षेत्रफळ मात्र महाराष्ट्राच्या तिप्पट आहे. हा एक शेती प्रधान देश आहे. टोमॅटो,अननस,फणस,आणि काजू ही इथली प्रमुख पिके .शेतीवर आधारित उद्योगांना इथे खूप वाव आहे.विशेष म्हणजे फक्त ३०% जमिनीवरच शेती होते.७०% जमिनीला अजूनही फाळ लागलेला नाही.जुलै २०१६ मध्ये पंतप्रधान मोदींनी टांझानियाला भेट दिली ,त्यानंतर पहिली मोठी गुंतवणूक श्री.सतीश पुरंदरे या मराठी माणसानी केली.ते साखर कारखाना उभारत आहेत."मराठी पाऊल पडते पुढे......"
- Read more about टांझानियाच्या डायरीतून .......
- 5 comments
- Log in or register to post comments
- 4685 views
कोकणची करोना कैफियत
मुंबईहून येणारे माणसांचे लोंढे, वाढत्या स्थलांतराबरोबर कोकणातल्या कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा आणि या सगळ्याला हाताळण्यात सपशेल अपयशी ठरलेली सरकारी यंत्रणा यांचा एक दुर्दैवी ग्रहयोग कोकणच्या पत्रिकेत डोकावतोय. त्यामुळे कोकणाचं भविष्य वर्तमानापेक्षा जास्त भयानक होईल की काय अशी शंका मनात डोकावत्ये.
- Read more about कोकणची करोना कैफियत
- 7 comments
- Log in or register to post comments
- 4071 views
डीकोडिंग स्पॅनिश फ्लू (भाग ३)
‘स्पॅनिश फ्लू’. १९१८ साली उद्भवलेल्या या विषाणूने जगात ५ कोटी लोकांचा, तर भारतात १.८० कोटी लोकांचा बळी घेतला. १९५१ नंतर हा विषाणू ‘डीकोड’ करण्याचे प्रयत्न झाले. गाडलेले मृतदेह उकरून त्यातून काही नमुने घेण्यात आले आणि या विषाणूच्या जनुकांचा क्रम शोधता आला. त्यासाठी ८० वर्षं जावी लागली. आता त्याच्याही पुढचा थरारक आणि अतिशय धोकादायक प्रयत्न होणार होता. काय होता हा प्रयोग? लिहिताहेत, राष्ट्रीय पेशीविज्ञान संस्थेतील (NCCS) वरिष्ठ संशोधक डॉ. योगेश शौचे
- Read more about डीकोडिंग स्पॅनिश फ्लू (भाग ३)
- 4 comments
- Log in or register to post comments
- 2561 views
बखर....कोरोनाची (भाग ५)
इतिहास घडतोय, आपल्यासमोर... वेगाने, इतक्या की गेल्या महिन्यात काय होते हे आपण आज कदाचित विसरणार आहोत. म्हणून या आज घडणारा इतिहास, आपल्याला दिसेल तसा इथे नोंदवत जाऊयात का? बखर वगैरे म्हणजे काय असतं? हेच ना? चला, लिहुयात बखर कोरोनाची!
- Read more about बखर....कोरोनाची (भाग ५)
- 111 comments
- Log in or register to post comments
- 43851 views
१०० वर्षांपूर्वीच्या 'स्पॅनिश फ्लू'च्या आठवणी
कोरोनाच्या साथीमुळे आपण हतबल आहोत, मग शंभर वर्षांपूर्वीच्या त्या साथीमध्ये आपण काय केलं असतं? कारण त्या साथीमध्ये जगभर ५ कोटी लोक मरण पावले. एकट्या भारतात १ कोटी ८० लाख. ना औषध, ना लस, ना कम्युनिकेशन, ना आरोग्याच्या सुविधा. वर्ष होतं, १९१८ आणि साथ होती, 'स्पॅनिश फ्लू'ची. ही साथ बरंच काही शिकवून जाते. लिहिताहेत, राष्ट्रीय पेशीविज्ञान संस्थेचे (NCCS) वरिष्ठ संशोधक डॉ. योगेश शौचे.
- Read more about १०० वर्षांपूर्वीच्या 'स्पॅनिश फ्लू'च्या आठवणी
- 4 comments
- Log in or register to post comments
- 3269 views
आकाशवाणीत राष्ट्रीय साक्षरता मिशन
आकाशवाणीत काम करताना, अमूक योजनेवर कार्यक्रम करा, तमूक विषयाला प्रसिद्धी द्या - असे आदेश दिल्लीहून आले की, संबंधित क्षेत्रातल्या व्यक्तींना शोधून बोलवायचं आणि त्यांचं भाषण, मुलाखत प्रसारित करायचं, हे ठरलेलं. सरकारच्या आदेशाबरहुकूम असं काम करताना, त्यात सहसा यांत्रिकपणा येत जातो.
आकाशवाणीतल्या माझ्या काळात याला अपवाद ठरले, पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळातल्या योजना, निर्णय यावर केलेले कार्यक्रम. मतदानाचं वय २१ वरून १८ वर आणणं, आपल्याकडच्या शिक्षणपद्धतीला आधुनिक करणारं, ग्रामीण मुलामुलींना अधिक शिक्षणसुविधा देऊ करणारं त्यांचं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि राष्ट्रीय साक्षरता मिशन. आकाशवाणीत, मी शिक्षणविषयक कार्यक्रम करत असल्याने या तीन्हींशी माझा संबंध आला
- Read more about आकाशवाणीत राष्ट्रीय साक्षरता मिशन
- 4 comments
- Log in or register to post comments
- 2842 views
बखर....कोरोनाची (भाग २)
आज आपण सर्व एका महत्त्वाच्या 'ट्रान्झिशन टाइम' मध्ये आहोत.
म्हणजे असं, की आत्ता जे घडत आहे ते आपल्या सगळ्यांकरिता एका प्रकारचं 'once in a lifetime' घटना आहेत.
माझ्या वडिलांच्या पिढीने कदाचित दुसऱ्या महायुद्धाच्या परिणाम वाचले, बघितले आणि क्वचित भोगले असतील.
आजोबांच्या पिढीने कदाचित प्लेग बघितला असेल त्याचे परिणाम भोगले असतील.
पण अर्थातच हे सर्व जागतिकीकरणपूर्व काळातील आहे.
आणि त्यामुळे मर्यादित भागात परिणाम करणारं.
पण आज जे घडताना दिसतंय ते सर्वदूर आणि दूरगामी परिणाम करणारं आहे असं वाटतंय.
- Read more about बखर....कोरोनाची (भाग २)
- 104 comments
- Log in or register to post comments
- 45527 views
बखर....कोरोनाची
आज आपण सर्व एका महत्त्वाच्या 'ट्रान्झिशन टाइम' मध्ये आहोत.
म्हणजे असं, की आत्ता जे घडत आहे ते आपल्या सगळ्यांकरिता एका प्रकारचं 'once in a lifetime' घटना आहेत.
माझ्या वडिलांच्या पिढीने कदाचित दुसऱ्या महायुद्धाच्या परिणाम वाचले, बघितले आणि क्वचित भोगले असतील.
आजोबांच्या पिढीने कदाचित प्लेग बघितला असेल त्याचे परिणाम भोगले असतील.
पण अर्थातच हे सर्व जागतिकीकरणपूर्व काळातील आहे.
आणि त्यामुळे मर्यादित भागात परिणाम करणारं.
पण आज जे घडताना दिसतंय ते सर्वदूर आणि दूरगामी परिणाम करणारं आहे असं वाटतंय.
- Read more about बखर....कोरोनाची
- 118 comments
- Log in or register to post comments
- 54518 views