माहिती अधिकार आणि खोडसाळपणा

आज महाराष्ट्र टाईम्समध्ये ही बातमी वाचनात आली.

त्याच बातमीत पहिल्या परिच्छेदात गांधींबद्दलही असाच प्रश्न विचारला गेल्यावर असेच उत्तर मिळाल्याचा उल्लेख आहे.

ज्या गोष्टींचे सरकारी रेकॉर्ड असण्याची जराही शक्यता नाही अशी माहिती माहितीच्या अधिकारात विचारून त्याचे अपेक्षित उत्तर येताच त्यावर "फुले, शाहू, आंबेडकरांच्या नावाने केवळ मतांचा जोगवा मागणाऱ्या एकाही लोकप्रतिनिधीला याबाबत कधी पुढाकार घ्यावासा वाटला नाही," वगैरे छातीपिटू लेखन करण्यासाठीच (कदाचित फेसबुकवर शेअर करण्यासाठी) हे प्रकार केले जात आहेत हे उघड आहे.

माहितीचा अधिकार हा सरकारी निर्णय प्रक्रियेतील व्यवहारांची माहिती मिळवण्यासाठी अस्तित्वात आला आहे. अश्या प्रकारच्या खोडसाळ प्रश्नांना उत्तर देण्यास सरकार बांधील असते का?

सदस्यांचे मत जाणून घ्यायला आवडेल.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

अश्या प्रकारच्या खोडसाळ प्रश्नांना उत्तर देण्यास सरकार बांधील असते का?

कायदेशीरदृष्ट्या होय. म्हणजे उत्तर शोधणे (शोध घेणे - Discover या अर्थी) बंधनकारक नसते तर सत्य प्रतिसाद देणे बंधनकारक असते.

बाकी, कोणते प्रश्न विचारावे वगैरेबद्द्ल ज्याची त्याची जाण समज वगैरे वगैरे आहेच Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हा प्रकार अश्लाघ्य असून तो बंद केला जाणे आवश्यक आहे.
माहिती अधिकाराच्या कायद्यात तरतूद आहे की नाही माहित नाही पण नसेल तर माहितीचा उपयोग माहिती मागणारा कशासाठी करू इछितो हे सांगणे बंधनकारक केले पाहिजे असे मला वाटते.
शिवाय पदव्या सरकारने दिल्या नसतील तर सरकारने त्याची नोंद ठेवण्याची काहीही गरज नाही असेही वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आरटीआय बिल संसदेत पास झाले म्हणजे आपल्याला 'व्हिसलब्लोअर' चाच मान मिळाला असे समजून वरील उदाहरणातील कृत्ये करण्यात धन्यता मानणारी बिनकामाची जनता सांप्रत महाराष्ट्र देशी ढिगाने आहे असाच तो रान उठविण्याचा प्रकार. गांधी, टिळक, आंबेडकर, सावरकर, फुले शिंदे शाहू अशी काही नावे राज्याच्या पटलावर सातत्याने आणायचे की त्यासंदर्भात वाचणार्‍याला/ऐकणार्‍याला असे वाटावे ही सरकार दरबारी दार ठोठावून आपल्याला 'न्याय' मिळवून देणारे हेच गब्रू. [उगा नाही, सार्‍या देशात महाराष्ट्राचा 'आरटीआय' अर्जाच्याबाबतीत प्रथम क्रमांक लागतो].

काय मिळणार 'महात्मा...राजर्षि....वीर....लोकमान्य....महर्षि' या विशेषनामामागील बहुमोल समजली जाणारी माहिती अगदी लेखी स्वरूपात जरी शासनाकडून मिळाली तरी ? मिळाली, तर त्याविरूद्ध आणखीन् दुसर्‍या गल्लीतील तिसरा बाब्या कोर्टात जाणार (तशी तरतूद आहे या कायद्यात)....मग म.टा. लोकसत्ता, लोकमतचा परत 'उद्या पुन्हा हाच खेळ' स्लाईड शो सुरू.

झाले आहे असे की आरटीआयच्या अर्जासाठी (जो छापीलच असतो) फी भरावी लागते रुपये १०/- दहा.....आणि तुम्ही त्यासोबत बीपीएल सर्टिफिकेटची नक्कल जोडली तर फी शून्य रुपये. असा 'सार्वजनिक' उपद्व्याप करणारी मंडळी सर्रास बीपीएल पुरावा जोडूनच अर्जाचे पोती तयार करीत असतात. कलेक्टर ऑफिस परिसरातच या सेक्शनच्या अधिकार्‍याचे (त्याला पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर असा क्लास-१ चा दर्जा असतो) कार्यालय असते आणि आलेल्या अर्जावर ३० दिवसाच्या आत निर्णय घेणे त्याच्यावर बंधन असल्याने, जी माहिती (उदा. 'महात्मा' सदृश्य) उपलब्ध होऊ शकत नाही, त्याबद्दल तो जबाबदार असत नाही. त्याने फक्त 'आपल्या अर्जाचा विचार झाला. आपल्याला अपेक्षित असलेली माहिती सरकार दरबारी उपलब्ध नाही...'. इतके उत्तर दिले की तो अर्ज 'फाईल' होतो. मग त्या नकार-पत्राच्या आधारे अर्जदार बिंदू चौकात सरकारच्या हलगर्जीपणाबद्दल सायंकाळी कोकलत बसला तरी सरकारला त्याबद्दल कसलेही सूतक पाळायची गरज नाही.

एक लक्षात ठेवले पाहिजे या 'माहिती हक्क' संदर्भात की, कायद्यातील तरतुदीनुसार तुम्ही माहितीसाठी 'विनंती....रीक्वेस्ट' करायची असते....'मागणी...डीमांड' म्हणता येत नाही. मग असे असल्याने 'विनंती' अमान्य करण्याचा अधिकार पीआयओ कडे आहेच. [मात्र काहीतरी उत्तर देणे 'त्या' अधिकार्‍यावर बंधनकारक असल्याने, दोन ओळीचे का होईना उत्तर हे येतेच येते....मग विचारपूसचे स्वरूप वरीलप्रमाणे कितीही बालीश असले तरी.]

अशोक पाटील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अवांतरः
माहिती अधिकाराचे नकोसे परिणाम (दुष्परीणाम म्हणवत नाही)या दृष्टीने टिपणी मागे (बहुदा शरद पवार यांनी) केली होती. या कायद्यामुळे फाईल्सवर निर्णय घेणे, त्यावर लिखित टिपणी करणे धोक्याचे वाटू लागल्याने निर्णय हळू होत आहेत अथवा आदेश तोंडी दिले जात आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

असली प्रकरण पुन्हा नव्याने उकरून काढण्याची गरजच काय?

या सर्वांचे कार्य महान आहे त्यातच त्यांचे महात्म्यपद आहे.

अवांतर: कोणत्याही अधिकाराचा दुरुपयोग करण्यात भारतीय लोक पटाईत असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...............................................................
माणूस जगात शोभून दिसतो तो मोत्यांच्या हारांनी नव्हे तर घामाच्या धारांनी

कायद्याची निर्मिती करताना त्याचा गैरवापर होईल का याचा विचार केला जात नाही, असं माझं व्यक्तीगत मत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उगीच कालहरण आणि प्रसिद्धीसाठी असले बाष्कळ आरटीआय प्रश्न विचारले जातात. भारत हे आपल्या देशाचं नाव नक्की कोणत्या पौराणिक व्यक्तीवरुन आलंय.. तो भरतच का ? की आणखी कोणी? राजा होता की कोणी शत्रू.. याचातरी "लेखी पुरावा" किंवा फोटोबिटो फाईलमधे रेकॉर्ड केलेला सरकारदप्तरी आहे का? देशाच्या नावाविषयी इतकं अज्ञान आणि उदासीनता? हे नाव अवैधच आहे असं म्हणायला हवं इत्यादि कीस काढता येईल..

अशा बर्‍याच गोष्टी विचारत बसता आणि सर्वत्र त्याबाबतीत कसं औदासिन्य आहे हे दाखवत बसता येईल.. उगं बाभूळकाडी चावत बसण्याचे उद्योग..

धागाकर्त्याशी सहमत..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुठच्याही स्वातंत्र्याबरोबरच त्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेणारे असतात. तुम्ही चर्चेत दिलेले प्रश्न खोडसाळ आहेत याबद्दल मला शंका नाही. त्यापायी काही लोक उगाच या व्यवस्थेचा दुरुपयोग करत आहेत. थोडक्यात हा कायदा राबवण्यासाठी जो खर्च केला जातो त्यात कदाचित भर पाडत आहेत. दुर्दैवाने असा खर्च अनावश्यक वाटला तरी अपरिहार्य असतो. एकंदरीत आरटीआयमुळे होणाऱ्या फायद्याच्या तुलनेत हा तोटा नगण्य आहे का? माझ्या मते आहे. फोन असण्याच्या सुविधेसाठी आपण जसे रॉंग नंबर किंवा सेल्समनचे कॉल सहन करतो तसंच सहन करावं झालं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घासकडवीँशी सहमत

आपल्याकडील लोकं स्वातंत्राचा गैरवापर करण्यात हूशार आहेत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

सहमत, सोयीत थोडी गैरसोय दडलेलीच असते, त्याचा अतिरेक झाला की बदल होईलच, किंबहूना होतही आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तर्क पटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अगदी खरं आहे हो. या रिकामटेकड्या 'अधिकार' वाल्यांनी 'माहिती' वाल्यांना अक्षरशः पिडले आहे. कुणीही यावे अन 'माहिती' मागून जावे, अशी काही सरकारी कचेर्‍यांची गत झाली आहे. कोणती माहिती मागावी याचे तारतम्य अन भान बाळगणारे आमच्या देशात किती लोक आहेत ? बाकी कोणत्याही चांगल्या कायद्याचे धिंडवडे कसे काढावे, हे आम्हा भारतीयांकडून शिकावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धागाप्रवर्तकाच्या मताशी सहमत आहे, बातमी वाचून हा खोडसाळपणाच वाटतो आहे.

१. या निमित्ताने महात्मा फुल्यांसंदर्भातल्या इतिहासाचा अधिक अभ्यास होण्यास चालना मिळेल काय?
२. स्वातंत्र्यापूर्वी झालेल्या गोष्टींची माहिती नक्की कोणाकडे मागावी?
२अ. महाराष्ट्र राज्य स्थापनेपूर्वी झालेल्या गोष्टींची माहिती आता कोणाकडे मागायची?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

घासकडवींच्या मताशी सहमत आहे.

वरील घटनेत जंगम या व्यक्तीने खोडसाळपणा केला आहे हे उघड आहे. तसे काही लोक खोडसाळपणा करणार हे गृहीत आहे. पण माध्यमांनी अशा प्रकारच्या बातम्यांना कितपत महत्त्व द्यावे हे ठरवायला हवे हे एक. आणि सदर जंगम यांचे जे म्हणणे आहे ते योग्य (Valid) आहे का* याचा थोडातरी विचार ती बातमी म्हणून छापताना करायला नको का?

*योग्य आहे का याचा अर्थ सदर माहिती सरकारकडे असणे अपेक्षित आहे का? वगैरे पाहणे.

अवांतर : आपल्या देशाचे नक्की नाव काय आहे अशी माहिती गृहमंत्रालयाला विचारली गेल्याचेही नुकतेच वाचले होते.
अतिअवांतर : दत्तक गेलेल्या मुलाचे मूळ आईबाप कोण आहेत अशी विचारणा माहितीच्या अधिकारात केली गेल्याचीही उदाहरणे आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

काही महाभागांनी मँरेज ब्यूरो संबंधित चौकशी माहितीच्या अधिकारात केल्याचे वाचनात आले होते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

वरील घटनेत जंगम या व्यक्तीने खोडसाळपणा केला आहे हे उघड आहे.

सर्वप्रथम, "Never attribute to malice that which can be adequately explained by stupidity" हे तत्त्व लक्षात घ्यावे.

प्रश्नकर्त्याच्या प्रश्नामागील मूळ उद्देश निव्वळ ज्ञानलालसा हा असू शकतो, असा संशयाचा फायदा मूळ प्रश्नकर्त्यास या ठिकाणी देता यावा. (पक्षी, मूळ उद्देश हा खोडसाळपणाचाच आहे, असा ठाम आरोप करता येण्याकरिता पुरेसे कारण नाही.) मात्र, प्रश्नाचे उत्तर 'माहिती उपलब्ध नाही' असे मिळाल्यावर त्यावरील प्रतिक्रिया ही तर्कास धरून नाही, अवाजवी आहे, असे म्हणावयास निश्चितच जागा आहे.

प्रतिक्रियेस अवाजवी म्हणता येईल, परंतु अनपेक्षित किंवा असाधारण खचितच म्हणता येणार नाही. "सरकार यूसलेस आहे / असते" हे गृहीतक भारतातच नव्हे, तर जगात अनेक ठिकाणी अनेक गटांत प्रचलित आहे. सबब, अशा प्रकारचे उत्तर सरकारकडून मिळाल्यावर (सरकारच्या या उत्तरात काही अवाजवी आहे, असा दावा नाही.) या गृहीतकाची ती प्रचीतीच आली, यात नवल ते काय, अशी (तद्दन चुकीची, परंतु नैसर्गिक) धारणा अशा प्रकारच्या एखाद्या गृहस्थाच्या ठायी जर का निर्माण झाली, तर त्यात नावीन्यपूर्ण अथवा अप्रूप असे काहीही नाही.

मात्र, 'सदर गृहीतकाची प्रचीती आणणे / सिद्धता' हा प्रश्न विचारण्यामागील मूळ उद्देश होता, असे सिद्ध करणारे काही या घटनेत मला सकृद्दर्शनी तरी दिसत नाही, सदर सद्गृहस्थाची घटनोत्तर प्रतिक्रिया नॉटविथष्ट्यांडिंग. सबब, सदर व्यक्तीने खोडसाळपणा केला आहे, हे मला तरी उघड नाही, आणि त्यामुळे तसा ठाम आरोप करण्याची अथवा या कायद्याच्या होणार्‍या दुरुपयोगाबद्दल चिंता व्यक्त करण्याची घाई तूर्तास मी तरी करणार नाही.

अतिअवांतर : दत्तक गेलेल्या मुलाचे मूळ आईबाप कोण आहेत अशी विचारणा माहितीच्या अधिकारात केली गेल्याचीही उदाहरणे आहेत.

प्रश्न विचारणार्‍या पक्षाच्या प्रश्न विचारण्यामागील हेतूबद्दल अथवा कारणांबद्दल मला काहीच कल्पना नसल्याकारणाने यात खोडसाळपणाचे किंवा अन्य कशाचेही जजमेंट मी पास करणार नाही. तसाही तो मुद्दा गौण आहे. 'या बाबतीत कोणतीही माहिती आम्हाजवळ नाही' किंवा (तशी परिस्थिती आणि तरतूद असल्यास) 'संबंधित व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यसंबंधी गोपनीयतेच्या (प्रायवसीच्या) कक्षेत ही बाब येत असल्याकारणाने याबाबत कोणतेही उत्तर आम्ही देऊ शकत नाही' असे किंवा अशा प्रकारचे काही उत्तर देण्याची मुभा सरकारजवळ असावीच. (प्रायवसीच्या हक्कासंबंधी तरतुदी भारतीय कायद्यात उपलब्ध नसल्यास त्या करून घेणे अशक्य नसावे. पण तो वेगळा मुद्दा आहे.) मात्र, सरकारने मुळात प्रश्न विचारणार्‍याच्या हेतूसंबंधी प्रश्न उपस्थित करणे अथवा त्याबद्दल तर्ककुतर्क करणे हा बाकी काही नाही तरी एक वाईट पायंडा ठरेल. प्रश्न विचारणे हे विचारणार्‍याचे प्रिविलेज असावे; कायद्याच्या आणि शक्यतेच्या परिघात राहून त्यास उत्तर कशा प्रकारे द्यावयाचे, हे सरकारचे.

बाकी, 'लोक काहीही माहिती विचारतात' ही माहितीच्या अधिकाराच्या कायद्याच्या कक्षा मर्यादित करण्यासाठी सबब न बनो, अशी आशा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>मात्र, सरकारने मुळात प्रश्न विचारणार्‍याच्या हेतूसंबंधी प्रश्न उपस्थित करणे अथवा त्याबद्दल तर्ककुतर्क करणे हा बाकी काही नाही तरी एक वाईट पायंडा ठरेल. प्रश्न विचारणे हे विचारणार्‍याचे प्रिविलेज असावे; कायद्याच्या आणि शक्यतेच्या परिघात राहून त्यास उत्तर कशा प्रकारे द्यावयाचे, हे सरकारचे.

याच्याशी सहमत आहे. बातमी देणार्‍या माध्यमाने हा तर्क करावा किंवा कसे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

बातमी देणार्‍या माध्यमाने हा तर्क करावा किंवा कसे?

हा संबंधित माध्यमाने परिस्थितीस अनुसरून स्वतःच्या मगदुराप्रमाणे आणि स्वतःच्या जबाबदारीवर घ्यावयाचा निर्णय आहे.

अन्यथा, माध्यमांस असे करण्यापासून घाऊक आणि आगाऊ ('बिफोर-दि-फ्याक्ट') तत्त्वावर वंचित कोणी आणि का करावे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारतीय माणूस कष्ट न करता पैसे कमविण्यासाठी नवनवीन युक्त्या काढत असतो.
आपल्याला मिळालेला कोणताही अधिकार हा कष्ट न करता पैसे कमविण्यासाठीच वापरायचा असतो हे त्यातील मूळ गृहितक आहे.

माहितीचा अधिकार प्राप्त झाल्यानंतर अनेक 'समाजसेवकांनी' त्याचा वापर नवा व्यवसाय म्हणून केल्याचे व त्यातून भरपूर कष्ट न करता कमाई केल्याचे मला माहित आहे. तेव्हा चर्चाप्रस्तावात दिल्यासारखी उदाहरणे म्हणजे हे इतके सुंदर पैसे कमाउ अस्त्र व्यर्थच वापरण्यासारखे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

माहितीचा अधिकार प्राप्त झाल्यानंतर अनेक 'समाजसेवकांनी' त्याचा वापर नवा व्यवसाय म्हणून केल्याचे व त्यातून भरपूर कष्ट न करता कमाई केल्याचे मला माहित आहे.

याचं वर्णन करणारा एक लेख लिहावा ही विनंती. नावं घेण्याची अर्थातच गरज नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0