मानवी शरीर आणि पाश्चिमात्य संस्कृती (भाग १)

‘झीरो फिगर’चं आकर्षण, वजन कमी कसं करावं ते सांगणाऱ्या पुस्तकाचा हातोहात खप, त्यावरून झालेली ही चर्चा हे या लेखमालेमागचं एक कारण. ‘सौंदर्य म्हणजे काहीतरी निखालस (absolute) गोष्ट आहे आणि ती शेंबड्या पोरालाही कळते’ असा आंतरजालावर आणि बाहेर अनेकजण जो दावा करताना दिसतात, ते या लेखामागचं दुसरं कारण. पाश्चिमात्य इतिहासात मानवी शरीर कशा प्रकारे दर्शवलं गेलं आहे त्याचा हा एक धावता आढावा आहे.

(सध्या या लेखमालेत फक्त पाश्चात्य कलेचा आढावा आहे. त्यामागचं कारण एवढंच आहे की पाश्चात्य कलेतले हवे ते नमुने जालावर सापडायला सोपे जातात. शक्य झालं तर इतर संस्कृतींतले नमुने नंतर कधीतरी देण्याचा प्रयत्न करेन.)

‘मातृदेवता’ असं ज्यांना म्हणतात अशा मूर्ती मानवी इतिहासात अगदी प्राचीन काळापासून आढळतात. उदाहरणार्थ हे पाहा :

ख्रिस्तपूर्व २४ ते २२हजार वर्षांपूर्वीची ही मूर्ती आहे. ऑस्ट्रियातल्या विलेनडॉर्फ इथे ती सापडली. जर्मनी इथे सापडलेली ३५ ते ४०हजार वर्षांपूर्वीची ही मूर्ती पाहा :

आणि ख्रिस्तपूर्व २९ ते २५हजार वर्षांपूर्वीची चेक गणराज्यात सापडलेली ही मूर्ती पाहा :

स्थूल कंबर आणि वक्ष असे काही समान घटक यांत दिसतात. शरीर प्रमाणबद्ध तर नाहीच; आणि अवास्तवसुद्धा आहे. ज्या काळात माणसं शेतीसुद्धा करत नव्हती त्या काळातल्या ह्या मूर्ती आहेत. असं मानलं जातं की स्थूल अवयव असणारी स्त्री ही अन्नधान्याची कमतरता नसलेली स्थिती (जिची या अन्नाच्या शोधात भटकणाऱ्या समाजाला आकांक्षा होती) दर्शवते आणि पुष्कळ मुलांना जन्म देण्याची क्षमता दर्शवते. त्यामुळे ही मातृदेवता पूज्य मानली गेली असावी असा अंदाज आहे. रशिया, फ्रान्स अशा अनेक भागांत अशा मूर्ती या काळात घडवल्या गेल्या. अधिक माहिती - http://en.wikipedia.org/wiki/Venus_figurines

आता ग्रीक संस्कृतीत ‘कूरॉस’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या पुतळ्यांपैकी एक पाहा -

हा पुतळा ख्रिस्तपूर्व ५३०च्या सुमाराचा आहे. उत्तम कमावलेल्या शरीराला आदर्श मानण्याची प्रवृत्ती यामागे असावी असं वाटतं. म्हणजे हा आदर्शवाद आधीच्या मातृदेवतेमागच्या आदर्शवादापेक्षा वेगळा आहे, पण तरीही आदर्शवाद आहेच.

आता ग्रीक संस्कृतीतलाच, पण थोडा नंतरचा (ख्रिस्तपूर्व सु. ४८०) ‘क्रिटीयन बॉय’ पाहा :

यात आधीचा आदर्शवाद जाऊन शरीराचं चित्रण थोडं वास्तववादी झालेलं दिसतं. तशीच ही अ‍ॅफ्रोडाईट उर्फ प्युडिक व्हीनस पाहा (ख्रिस्तपूर्व चौथं शतक) -

कलेत दाखवलं गेलेलं शरीर हे नेहमी प्रमाणबद्ध होतंच असं नाही. त्यासाठी थोडं पुढे जाऊन पॉम्पेमधल्या ‘व्हिला ऑफ द मिस्टरीज’मध्ये सापडलेल्या चित्राचा हा भाग पाहा :

इथे प्रमाणबद्ध सौंदर्यापेक्षा थोडा ओंगळवाणा म्हणता येईल असा चेहरा दिसतो. ग्रीक-रोमन संस्कृतीतली ही द्वंद्वात्मकता अपोलो आणि डायोनिसस यांच्याशी जोडली जाते. अधिक माहिती इथे मिळेल.

किंवा पॉम्पेमधलंच हे चित्र पाहा :

अधिक माहिती इथे मिळेल.

थोडक्यात, ग्रीक-रोमन कला म्हणजे निव्वळ प्रमाणबद्धता आणि आदर्शवाद होता, किंवा ‘निखळ सुंदर’ म्हणजे काय याची व्याख्या करणारी कला होती असं नाही.

(क्रमशः)

field_vote: 
4.25
Your rating: None Average: 4.3 (4 votes)

प्रतिक्रिया

वाह! उत्तम आणि नाविन्यपूर्ण विषय.
पुढील भाग वाचायसाठी उत्सूक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आश्वासक सुरूवात; पुढचे भाग वाचण्यास उत्सुक आहे.

सुरूवातीची चित्रं पाहून एक संवाद आठवला. पोस्टग्रॅज्युएशन करणारा एक मित्र त्याच्या बंगाली मित्राकडे दुर्गापूजेसाठी गेला होता. माझ्या मित्राचा आकार, त्या वयात मुला-मुलींचे साधारण आकार असतात तसाच होता. बंगाली काका काळजीत, "तू एवढा बारीक आहेस, तुझं लग्न कसं होणार?"
किंचित अवांतरः चीनी, कोरियन संस्कृतीत शेतीआधी काय आकार प्रमाण मानले जात असत याबाबत कुतूहल आहे. हे पूर्वेकडचे लोकं आजही फारच सडपातळ दिसतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

लेख आवडला. हिटाईट संस्कृतीतल्या मातृदेवतेची (किबेले/cybele) मूर्ती अंकारातल्या वस्तुसंग्रहालयात पाहिली होती.

पुढे ग्रीकांनी या देवतेला आर्टेमिस म्ह्णून अंगीकारले असं म्हणतात. (किंचित पोटभेद असला तरी). आर्टेमिसची शिल्पं अर्थात अधिक प्रमाणबद्ध आहेत.

किंचित अवांतर -
सध्या पॅरिसमध्ये ऑलिम्पिकच्या निमित्ताने युरोस्टार ट्रेन कंपनीच्या जाहिरातींची पोस्टर्स झळकत आहेत, त्यांचे काही मासले (या शब्दावर कोटी करण्याचा मोह आवरण्यात आला आहे Lol येथे पाहता येतील. फ्रेंचांनी आपल्या लठ्ठ शेजार्‍यांवर घेतलेला हा माफक सूड म्हणता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सबओल्टर्नच्या व्युपॉइंटमधुन भारतीय संस्कृतीतले काही नमुने या धाग्यावर दिले आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला उधळायला फार फार आवडतं

वा! अत्यंत रंजक आणि रोचक लेख.
पुढच्या भागाची वाट पाहात आहे.

जेव्हा जे जे नसतं त्याचं आकर्षण या शिल्पांमधून दिसतं असा काही संबंध दिसतो का हे पाहणे रोचक होईल. म्हणजे सडपातळ आदिमानवाला लठ्ठपणाचं आकर्षण आणि तसंच आजच्या वाढत्या लठ्ठपणामुळे सडपातळपणाचे आकर्षण वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज्या ज्या कालखंडात, ज्या ज्या भूभागावर, ज्या ज्या संस्कृतीमध्ये जे जे काही त्या त्या वेळी कारणीभूत घटक असतील त्यावर तेव्हा तेव्हा तसे तसे असे काहीसे घडत असते. कोणाला कशाचे तर कोणाला कसले.

अफ्रीकेतही काही जमातीत लग्न ठरवायच्या वयात आलेल्या मुलीला मुद्दाम जाडाजूड बनवले जाते, त्या त्या संस्कृतीत ती मोठी प्रथा मानली जाते. अफ्रीकेत (व बहुदा द अमेरीकेतील) काही जमातीत मुलींचे ओठ व कान कापून एक मातीची चकती देखील बसवली जाते. काही जमातीत पुरुषांचाही अंगभर टॅटू अथवा त्वचेला विशिष्ट कोनात छेद देउन नक्षीकाम केले जाते. एका आशीयायी जमातीत लहानपणापासून मुलींच्या गळ्यात रिंगा चढवून मान मोठी केली जाते. चीन मधे एका जमातीत मुलींचे पाउल मोठे होउ नये म्हणून प्रयत्न केले जातात. हे सगळे त्यांची त्यांची सौंदर्य संस्कृती, अभ्यास वगैरे वगैरे लक्षात ठेवायचे व कोणी असे म्हणले की तसे दुवे द्यायचे व कोणी तसे म्हणले की असे दुवे द्यायचे. अगदी गुप्तांगावरही बरेच काही केले जाते, त्याच्या बाजुने बोलताना सर्कम्सिशनचे फायदे म्हणायचे किंवा विरुद्ध बोलताना जेनिटल म्युटिलेशन म्हणुन ..

शेवटी ज्याची त्याची जाण जिथला तिथला खप हेच खरे नाही का?

भले कोण्या समाजात कोण्या काळी काही निकष असतील, उद्या "गोरी आकर्षक बायको/ टॉल डार्क हॅडसम नवरा पाहीजेच्या जागी लगेच लठ्ठ, ओबड्धोबड, अजागळ, जोडीदार पाहीजे अथवा चालेल अश्या जाहीराती दिसणार आहेत का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी अलीकडे-अलीकडेपर्यंत पाश्चात्य देशांत आणि आपल्याकडेहि शरीराचे सर्व अवयव योग्य प्रमाणात लहान-मोठे असणे हे सौदर्याचे लक्षण मानले जाई. हॉलिवुडच्या ६०-७० पर्यंतच्या नटया, उदा. मेरिलिन मन्रो अथवा सोफिया लॉरेन तशाच असत. गेल्या वीसतीस वर्षात पुढूनमागून अगदी पातळ - boyish - देहयष्टीचे आकर्षण (यष्टि शब्द अन्वर्थकच आहे म्हणून वापरला आहे) वाढत आहे.

ह्याचे एक कारण वाचनात आले ते असे. टीवी सारख्या माध्यमांमुळे कपडे-दागिने-सौंदर्यप्रसाधने ह्यांच्या जाहिराती सारख्या समोर दिसू लागल्या. सडपातळ मॉडेलवर कपडे चांगले बसतात म्हणून अशा मॉडेल्स सारख्या डोळ्यासमोर राहू लागल्या आणि पूर्वीचे buxom आदर्श मागे पडू लागले(ट्विगी आठवा). त्यातहि बरेचसे प्रसिद्ध डिझायनर्स समलिंगी संबंधी असत किंवा असतात - उदा. जिआनी वर्साची - आणि त्यांची मॉडेल निवड ही boyish अंगाने जाते.

ह्या जाहिरातींचा असा अतिरेक आणि त्याबरोबरच पुष्ट शरीर असण्याचे खरे वा अतिरंजित तोटे ह्यांची ह्यांची प्रसिद्धि ह्यांचा मिश्र परिणाम म्हणजे पातळ शरीर म्हणजेच glamour अशी अवास्तव समजूत तयार झाली आणि तरुण मुलींच्या बाबतीत मनुकांसारखे स्तन, पातळ पृष्ठभाग आणि हाडाच्या सापळ्याचे असावेत तसे खांदे, हात आणि मान हेच स्वप्न होऊन बसले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोल्हटकर बुवांचा व्यासंग नेहमीच नतमस्तक करणारा.

‘कोल्ह्टकरांसारखा व्यासंगी जर तिकडे (पाश्चिमात्य देशांत ) असता तर त्यानं रान पेटवलं असतं’* असं म्हणायला जागा आहे.
*श्रेयअव्हेर : भाईकाका

एक टेक्निकल दुरुस्ती: मनुका म्हणजे स्तनाग्रे, असे कॉलेजमधे म्हणायचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0