मानवी शरीर आणि भारतीय संस्कृती (भाग २)

गेल्या भागात ४० वर्षांपूर्वीच्या नट्यांचे फोटो दिले होते. नंतरच्या काळात सोनाक्षी आणि विद्या आल्या तरी काही शेंबड्या पोरांना देशी कलाकृतींचे महत्त्व कळलेले नाही म्हणून आता १००-१५० वर्षे मागे जाऊ पण भारतातच राहू. (चड्डीतच राहुच्या धर्तीवर)


आजकालच्या स्त्रियांनाही आवडतील असे सहा आठ प्याकवाले आमचे चड्डीतले पुरातन जय-विरू... स्वारी! जय-विजय

भरलेल्या शरीरयष्टीच्या सुदृढ आणि बांधेसूद बायका तेव्ह फॅशनमध्ये होत्या हे आमच्या बालगंधर्वांकडे पाहून लक्षात येते. वास्तविक नाटकांमध्ये स्त्रीची गरज असतानाही नाट्य निर्मितीसाठी बालगंधर्वांनी साकारलेल्या स्त्रिया आजही आठवणीत राहतात.


एक डोळ्याचे, बैलाच्या तोंडाची पाश्चात्य खलनायकी शरीरे आणि आमच्या देशी कलाकृतीतील हँडसम दिसणारा कीचक यांची तुलना होणार नाही. चापून चोपून तेल लावून, केसांचा मधोमध भांग पाडलेल्या द्रौपदीचे तपशील बघा.


अस्सल भारतीय न्यूड. ग्रीक का फीक या न्यूडापुढे फीके पडतील असे मला वाटते.


येशू, मरीआई, त्यांचे ते ओढलेले चेहरे बघण्यापेक्षा आमच्या कलाकृतीतील (न) लंगोटधारी विश्वामित्र भरपूर भाव खाऊन जातात.


इंडियन हाफ न्यूड. ३८-२४-३८ असेल काय? सांगा कोल्हटकर! ठरवा वाचकहो!

Binodini Dasi (1862–1941), also known as Notee Binodini, was a Calcutta-based, Bengali-speaking renowned actress and thespian. She started acting at the age of 12 and ended by the time she was 23, as she later recounted in her noted autobiography, Amar Katha (The Story of My Life) published in 1913.
झिरी फिगरशी कसलेही देणेघेणे नसलेली परंतू प्रसिद्ध स्त्री अभिनेत्री नोटी बिनोदिनी.

( काही "की वर्डस" उदा. ग्रीक स्कल्प्चर्स किंवा राजा रवी वर्मा गूगलकाकांना दिले आणि नंतर इमेजेस पाहिल्या की इंटरनेटवर हव्या तेवढ्या इमेजेस मिळतात. अगदी

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

छ्या! बत्तीस लक्षणी पुरुष आणि स्त्रियांचे प्रकार वगैरे सचित्र माहिती न आल्याने घोर विरस झाला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद ननि. अतीशय उत्तम कल्पना आहे. पुढच्या भागात बत्तीस लक्षणी पुरुष आणि स्त्रीयांचे प्रकार यावर भाष्य करीन. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला उधळायला फार फार आवडतं

बाकी माहित नाही, पण श्रीमती / श्रीमान मुक्ता फळे यांना लेखाची सुरवात आणि शेवट ज्यांच्या उल्लेखांशिवाय पूर्ण करता येत नाहीत त्या शेंबड्या पोरांचे फारच महत्त्व असल्याचे त्यांच्या लेखनातून दिसते आहे Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सुरेख प्रतीसाद ऋ. जिंकलंस. तुझ्यासारख्या वाचकांसाठीच तर हा धागा आहे. ‘झीरो फिगर’चं आकर्षण कमी व्हावं, भारतीय सौंदर्य सर्वांगानं वाढावं हे या लेखमालेमागचं एक ध्येय. ‘सौंदर्य म्हणजे काहीतरी निखालस (absolute) गोष्ट नाही आणि ती शेंबड्या पोराला तर अजिबात कळत नाही' असा आंतरजालावर आणि बाहेर अनेकजण जो पेट्रनाइझिंग दावा करताना दिसतात, त्या दाव्याला शास्त्रीय, भौगोलिक, पारंपरीक इत्यादि इय आणि इक माहितीच्या आधारावर जोरकसपणे खोडुन काढणं हे दुसरं ध्येय. भारतिय इतिहासात मानवी शरीर कशा प्रकारे दर्शवलं गेलं आहे त्याचा हा एक सर्वांगीण आढावा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला उधळायला फार फार आवडतं

मस्त धागा. तुम्हाला तिरकस विनोदाची शैली छान जमलेली आहे. भारतीय संस्कृतीची चेष्टा करता करता तिला कृतक महत्त्व दिल्याचा भास निर्माण करणं केवळ तरल. त्यासाठी स्वतःला शेंबडं पोर म्हणवून घेण्याची अदाही लाजवाब.

त्यातलं कीचक द्रौपदीचं चित्र तर खूपच गमतीदार आहे. या कीचकाला बघून विष्णुपंत पागनिसांच्या तुकारामाची आठवण येते. द्रौपदीला पांडुरंग समजून तो तिला आपली भक्ती अर्पण करतो हे इंटरप्रिटेशन आगळंच. नऊवारी साडी नेसलेल्या मेनकेचं चित्र त्याखालोखाल गमतीदार. साक्षात मेनकेला जाडगेली, गुबगुबीत करून फॅट लपवण्यासाठी कोणाच्यातरी मागे उभं करायचं, आणि विश्वामित्रासारख्या काही व्यायाम न करणाऱ्या, अर्धवट खाऊन तपश्चर्या करणाऱ्या ऋषीची मसलवान बॉडी अधोरेखित करण्यामागे या चित्रकाराने वेगळाच विचार दाखवलेला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्त धागा. तुम्हाला तिरकस विनोदाची शैली छान जमलेली आहे.

धन्यवाद. मात्र तुमच्या प्रतीसादाचं गुणांकन सध्या 4 विनोदी आहे हे एक विनोदीच. कंपुतले दिसतात.

त्यासाठी स्वतःला शेंबडं पोर म्हणवून घेण्याची अदाही लाजवाब.

बकरा आणि कसाई यातला फरक तुम्हाला कळत नाही का हो कडवी. ईद मुबारक.

पाश्चिमात्यांहुन पाश्चिमात्य अशी सौंदर्यदृष्टी मला नाही. माझ्या मर्यादा मला माहित आहेत. त्यामुळे मी आपला भारतीय संस्कृतीच्या इतिहासावर भाष्य करणार.

पुढे मागे माझे दडपलेले किंवा मी न लिहिलेल प्रतीसाद असा धागा सुरु करायचा विचार आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला उधळायला फार फार आवडतं

ईद आली का जवळ? अरे वा, तुम्हालाही ईद मुबारक.

मला जसा हा लेख भावला, त्यातून मला जे जाणवलं ते मी लिहिलं. तुमचं मनापासून कौतुक केलं. ते तुम्हाला का आवडलं नाही ते कळलं नाही. ऐसीच्या उद्दिष्टे - धोरणांमध्ये 'तुमच्या लेखनावर टीका होण्याची शक्यता आहे हे लक्षात ठेवावं' अशा अर्थाची सूचना आहे. त्यात 'तुमच्या लेखनाचं कौतुक होऊ शकेल हेही याद राखा' अशी सूचना घालण्याचं व्यवस्थापनाने मनावर घ्यायला हवं.

भारतीय संस्कृतीवर इतकी जहरी टीका करू नका आणि कौतुक मोकळ्या मनाने स्वीकारायला शिका, इतकंच सांगून मी माझे चार शब्द संपवतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसीच्या उद्दिष्टे - धोरणांमध्ये 'तुमच्या लेखनावर टीका होण्याची शक्यता आहे हे लक्षात ठेवावं' अशा अर्थाची सूचना आहे. त्यात 'तुमच्या लेखनाचं कौतुक होऊ शकेल हेही याद राखा' अशी सूचना घालण्याचं व्यवस्थापनाने मनावर घ्यायला हवं.
>> त्यापेक्षा कंपुबाजी करणार्‍यांना चांगल्या श्रेणी मिळतील अशी सुचना घालण्याचं व्यवस्थापनानं मनावर घ्यायला हवं. अहो घा.क. कंपूबाजीच्या चष्म्यातून मी केलेले कौतुक तुम्हाला टिकेसारखे दिसते याचे खरेच वाईट वाटले हो. आधी तुमचा तो कंपूबाजीचा अतीजाड चष्मा काढुन तुमचा जुना निरागस चष्मा लावा बघु.

एकंदर पाश्चिमात्य, अमेरिकन, एनाराय दिठीतुन दुर्लक्ष करित किंवा पेट्रनाइझ करित भारतिय संस्कृतीला डीवॉइस करण्याचे काम काही प्रवृ्त्ती करत असतात. त्यांच्या डोळ्यांत आपल्या थोर वैभवशाली गौरवशाली समृद्ध प्राचीन पुरातन महान अप्रतीम सुंदर देशी भारतिय संस्कृतिची ट्युबलाइट पेटवण्याच्या उदात्त हेतुने ही एवढी संदर्भसंपन्न लेखमालिका एकहाती चालवली आहे. पुढे जाउन मीठ आणि सौंदर्य (लावण्य) असाही एक भाग पुढे माझ्याहातुन होइल असे वाटते आहे. भारतिय स्त्रियांत जे लावण्य आहे ते केवळ आग्रीय, कोलीय समाजाने लावलेल्या मिठाच्या शोधामुळेच हा मुद्दाही त्यात असेलच.

अवांतर: या प्रतीसादाच्या सध्याच्या गुणांकनावरुन (४ विनोदी) तुमचा हाही प्रतीसाद विनोदी आहे असे दिसते आहे. त्यामुळे हसुन घेतो. हॅहॅहॅ. पीरियड.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला उधळायला फार फार आवडतं

१. शंकराची पिंड अशी अर्धवट झाकलेली किंवा अर्धवट उघडी का आहे?
२. पुरातन काळातले सिक्स पॅकचे "जय-वीरू" आणि फार आकार-उकार नसणारे विश्वामित्र एकाच वेळेस कसे काय प्रमाण मानले जातात?
३. बालगंधर्व हा स्त्रियांच्या आकाराचा मापदंड का समजावा?
४. बिनोदिनी दासी यांच्या धूसर फोटोतून त्यांची फिगर कशी काय समजली?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

३ ते १४ एवढे कमी वय असुनही तुम्ही असे प्रश्न विचारायचे धाडस केले त्याबाबत मी तुमचे आधी अभिनंदन करतो आणि प्रश्नांचे उत्तर देतो.

१. शंकराची पिंड अशी अर्धवट झाकलेली किंवा अर्धवट उघडी का आहे?
तुमचा प्रश्न 'खोडसाळ' आहे. स्त्रिसुलभ म्हणवत नाही. टॉवेल फक्त रणवीर कपूरने पांघरावा, नाहीतर "कै च्या कै" श्रेणी मिळेल अशी व्यवस्था नाही म्हणून शंकराच्या पिंडीनेही टॉवेल पांघरला आहे.

२. पुरातन काळातले सिक्स पॅकचे "जय-वीरू" आणि फार आकार-उकार नसणारे विश्वामित्र एकाच वेळेस कसे काय प्रमाण मानले जातात?
ती मरतुकडी हवा पाणी तोळा मासा दिपिका आणि दांडगिण सोनाक्षी एका काळात नट्या म्हणून नांदू शकतात ना. ज्याप्रमाणे त्यांना "अवांतर" अशी श्रेणी मिळत नाही तसेच विश्वामित्र- जयविरुचे.

३. . बालगंधर्व हा स्त्रियांच्या आकाराचा मापदंड का समजावा?
मापदंड बाळगताना तुमच्या हाती कोणती फूटपट्टी आहे त्यावर हे अवलंबून आहे. कोल्हटकर मापदंडांवर बालगंधर्व किंचित एखाद्या टग्यासारखे दिसतात. आता टग्या म्हटले तर ट्रान्सवेस्टाइट असु शकत नाही किंवा स्त्रीपात्राची भुमिका करु शकत नाही असे म्हणता येईल का असा आणखी एक गहन सवाल ह्यातुन पुढे येतो. पण माझ्या मते माझ्या मापदंडावर असे प्रश्न "निरर्थक" आहेत.

४. बिनोदिनी दासी यांच्या धूसर फोटोतून त्यांची फिगर कशी काय समजली?
झीरो फिगरवाल्या करीनाचा फोटो घ्या. तो चोळून, मळुन किंवा फोटो शॉपमध्ये धूसर करा आणि नोटी बिनोदीनीच्या बाजूला लावून तुलना करा. अशा "भडकाऊ" गोष्टी मी करत नसतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला उधळायला फार फार आवडतं

माझे प्रश्न काहीसे अर्धवट होते हे मान्य करून प्रश्न पुन्हा विचारते.

१. सामान्यतः शंकराच्या पिंडी वस्त्रांकित नसतात. मूर्ती झाकायची असेल तर संपूर्ण झाकलेली असते, डोकं उघडं असं नसतं. गणपतीला वस्त्र वगैरे पांघरतात तेव्हा खांद्यावरून घालतात, चेहेरा दिसतो. पिंडीच्या बाबतीत चेहेराच नसल्यामुळे नक्की काय आणि का झाकलं आहे असा प्रश्न पडला.
३. बालगंधर्व शरीराने स्त्री नव्हते किंवा स्वतःला पुरूषाच्या शरीरात असणारी स्त्री असेही समजत नसत. त्या काळात स्त्रिया रंगभूमीवर काम करत नसत म्हणून बालगंधर्व फक्त ती जागा भरून काढत असत. तर बालगंधर्व स्त्री किंवा ट्रान्सव्हेस्टाईट नसल्यामुळे त्यांना स्त्रियांच्या आकाराचं मापदंड का मानायचं?

अभिनंदनाबद्दल आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.