(पुन्हा) स्मृतिचित्रांच्या निमित्ताने

विकांताला सहज म्हणून स्मृतिचित्रे हातात घेतले. आणि कितव्यांदातरी वाचु लागलो. नेहमीप्रमाणे याहीवेळी जरावेळ वाचु म्हणून हातात घेतलेलं हे पुस्तक संपवल्याशिवाय खाली ठेवलं नाही. आणि दरवेळी नव्याने काहितरी शिकवणार्‍या या पुस्तकातून नवे प्रश्न समोर उभे रहातात. यावर याधी पुस्तकविश्व वर इथे लिहिलं होतंच. तेच पुन्हा उधृतही करतो आणि त्यात पुनर्वाचनानंतर काही वाढीव प्रश्न त्यात वाढवतो आहे.

इथेही त्यावर साधकबाधक चर्चा होईल अशी आशा आहेच
=======

कराचीला एक जहाज निघते.. त्यात अनेक प्रवाशांपैकी एक असतात 'श्रीमती' लक्ष्मीबाई टिळक.. लक्ष्मीबाई लिहितात की त्यांच्यापुढे मुंबई छोटी होऊ लागते आणि बोट कराचीकडे निघते.. टिळकांची स्वतंत्रता कविता त्यांना आठवते आणि लक्ष्मीबाईंनी लिहिलेले आत्मचरित्र संपते! पण खरं तर इथे फक्त पुस्तक केवळ लौकिकार्थाने संपते.. वाचकाच्या मनात अनेक तास, दिवस, आठवडे ते वेगवेगळ्या प्रसंगांत रूंझी घालत असते. काहींची आत्मचरित्रे स्फूर्ती देतात, काहि आत्मचरित्रे हुरूप देतात, काही आशा देतात तर काहि आत्मचरित्रांतून जिद्दीला सलाम करावासा वाटतो. मात्र स्मृतिचित्रे वाचले आणि ह्या आत्मचरित्राने मला आत्मपरिक्षण करायला भाग पाडले!

केवळ स्वतःचे आयुष्यच नव्हे तर एक अख्खा काळ लक्ष्मीबाई आपल्यापूढे उभ्या करतात. त्या काळातील समाज, राहणीमान, पुरूषप्रधानता, स्त्रीदाक्षिण्य, खोलवर रूजलेला जातीभेद, भंगिणींपासून ते ब्राह्मणांपर्यंतच्या रिती, आचार, विचार ह्या अश्या सगळ्या गोष्टी सहज म्हणून टिपल्या आहेत. आणि ह्या सहज झालेल्या टिप्पणीतून चित्रपट बघावा तसा काळाचा तुकडा आपण बघतो. केवळ बघत नाहि तर स्तिमीत होतो.

सभोवतालच्या वर्णनाइतकेच लक्षणीय आहे त्यांची भाषा. जुन्या वळणाची असली तरी इतकी गोड व चित्रदर्शी भाषा क्वचितच वाचायला मिळते. छोटी परंतू नेमक्या शब्दांतली ती वाक्ये म्हणजे निव्वळ आनंद! नानांना, म्हणजे माझ्या वडिलांना "सोवळे" झाले होते. ह्या पहिल्या पानावरील वाक्याने जे लक्ष वेधून घेतले ते शेवटपर्यंत अनेक वाक्यांनी-शब्दांनी मनात घर केले.

ह्या पुस्तकात काय आहे, काय नाहि हे ज्याने त्याने ठरवावे, तेवढी माझी कुवत नाही. मात्र हा प्रपंच करतो आहे ते पुस्तक वाचून माझ्या मनात उठलेल्या तरंगांना शमवण्यासाठी. सध्या आपण कित्येक छोट्या छोट्या गोष्टींवरून केवढे काळजीत पडतो. कित्येक गोष्टींवरून वाद घालतो. साधी सर्दी झाली तरी केवढा उपचाराचा मारा करतो, किंवा अभ्यास/कामे म्हणजे जगात आपल्यालाच आहेत असे अनेकदा वागतो. लक्ष्मीबाईंचे हे आत्मचरित्र वाचून मला माझ्याच काहि वागण्याची गंमत, लाज, आश्चर्य वगैरे वगैरे सारे काही वाटते आहे. जगात एका व्यक्तीरोबर जे जे काही पिडादायक होऊ शकते ते ते लक्ष्मीबाईंनी सोसूनही त्या कधीही नियतीच्या नावाने, झालेल्या कष्टाच्या नावाने बोटे मोडताना दिसत नाहीत ही केवढी मोठी शिकवण आहे. स्वतःच्या आयुष्यात सारे काही आलबेल असूनही त्यांच्या लेखनातून जाणवणारी अर्धी शांतताही माझ्या मनाला का मिळू नये ही टोचणी म्हणा हा प्रश्न म्हणा, मनाला सतत भेडसावतो आहे.

- हल्लीच्या 'इस्टंट लाईफ' मुळे, त्या वेगामुळे ही अस्वस्थता आली आहे असे वाटते का?
- सारी गणिते विपरीत असूनही विचारांत - आचारांत 'पॉसिटिव्हनेस' दाखवणारी माणसे अजूनही आपल्या भोवती क्वचित का होईना पण दिसतात. त्यांना ही उर्जा कशी मिळत असेल? का सध्याच्या 'घाऊक' आनंद शोधण्याच्या काळात आपण आनंद देणार्‍या छोट्या गोष्टींचे मोल आणि त्या वेचण्यासाठी करायच्या कष्टांची तयारी विसरत चालले आहोत?
- की त्या काळी स्त्रिया इतका विचार करत नसत? त्यांना दिलेली वागणूक 'हे असेच असते-असायचे' असा त्यांचा समज-विश्वास असल्याने (करून घेतल्याने-तत्कालिन समाजाने करवल्याने) त्यांना ह्या गोष्टी सोसताना त्या काही सोसताहेत हे त्यांना कधी जाणवलंच नाही?
- लक्ष्मीबाईंनी सामना केलेल्या तमाम प्रसंगांतील एखादा जरी माझ्यावर गुदरला तरी तितक्या शांतपणे -प्रसंगी इतक्या समंजसपणे- मी त्याचा मुकाबला करू शकेन का हा प्रश्न मलातरी अस्वस्थ करतो. विचित्र वडील, विक्षिप्त सासरे आणि सर्वांवर कडी म्हणजे लहरी व अव्यवहारी नवरा असूनही त्या कधीच इतरांनी काय करावे असा उपदेश करताना दिसत नाहीत. स्वतः करता येईल तितके करावे ही वृत्ती अनुकरणीय का पारतंत्र्याचे लक्षण म्हणून दुर्लक्षणिय?
- सध्या एकूणच आत्मप्रियता, स्वातंत्र्यप्रियतेचा कधीतरी अतिरेक होतो असे वाटते का?

डोक्यात असंख्य विचार आहेत त्याची उलट सुलट उत्तरेही आहेत.. थोडक्यात काय तर हे नितांतसुंदर पुस्तक पचायला बरेच जड आहे.. बराच विचार-रवंथ करावा लागेलसे दिसते!

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

ऊत्तम!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

ऋ,

स्मृतीचित्रे ही मुळात एका वाचनाने सहजपणे आकळत नाही. अनेक वाचनानंतर त्यातील गोडी अधिकच वाढत जाते.
त्यातील समृद्ध भाषा, उत्कट भाव, चाकोरीबाहेरच्या गोष्टी, तत्कालीन समाजमनाला हादरे देणारे घटनाक्रम आणि महत्त्वाचे म्हणजे परिस्थितीच्या हातातले खेळणे न होता परिस्थिती व प्रसंगाला सामोरे जाण्याचे धैर्य अशा कित्येक गोष्टी वाचनानंद तर देतातच पण आपल्या स्मृतीतही ही स्मृतीचित्रे तरळत राहतात यातच सगळे येते. स्मृतीचित्रे बद्दल तू जे लिहिले आहेस ते उत्तम लिहिले आहेस ऋ. मला तुझ्यासारखे सोपे व सहज समजू शकेल असे या अगम्य पुस्तकावर लिहिणे जमले नसते.

अशोक काका,

तुमच्याकडून या अमूल्य पुस्तकाबद्दल वाचायला आवडेल. कारण स्मृतीचित्रे वर तुम्ही बरेच सांगू शकाल याची खात्री आहे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'स्मृतिचित्रे' अलिकडेच वाचलं. त्यातली एकंदर वर्णनं वाचताना भारतीय समाजाने किती प्रगती केली आहे हा विचार वारंवार डोकावत होता. सात महिन्यांचा गर्भ पोटात असताना बायकोला जिन्यावरून ढकलून देण्याचे प्रकार आता कोणी करत असेल (आणि करत असेल तर बाकीचे लोक त्याला डॉक्टरकडे नेल्याशिवाय रहातील) असं वाटत नाही.

लक्ष्मीबाईंएवढ्या खेळकरपणे अशा गोष्टी सांगता येणार नाहीतच. त्याचं कारण "पदरी पडले पवित्र झाले" ही बायकांना मिळणारी शिकवण आणि लक्ष्मीबाईंचा मूळ पॉझिटीव्ह स्वभाव असं वाटत रहातं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>> सात महिन्यांचा गर्भ पोटात असताना बायकोला जिन्यावरून ढकलून देण्याचे प्रकार आता कोणी करत असेल (आणि करत असेल तर बाकीचे लोक त्याला डॉक्टरकडे नेल्याशिवाय रहातील) असं वाटत नाही. <<

डॉक्टर, पोलीस वगैरे नंतर येतात. तोवर व्हायचं ते होऊन जातं -
कांदा चिरण्याच्या वादातून पत्नीचा भोसकून खून

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

वायसीएम पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष हा रंगकाम करतो. त्याला दारूचे व्यसन आहे.

रे. टिळकांचा (अगदी त्या काळातला) व्यवसाय आणि विशेषतः व्यसनाधीन नसणं या पार्श्वभूमीवर अशा प्रकारची हिंसा अधिक टोचते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नीतू खुराना ही दिल्लीतीत डॉक्टर बाई, नवरा ऑर्थोपेडिक सर्जन, सासू-सासरे डॉक्टर. तिची कहाणी ऐकलेली दिसत नाही तुम्ही. 'सत्यमेव जयते'चा हा भाग (२३ मि. पासून) पाहावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तर मग पहिल्या प्रतिसादातल्या वाक्याचा पुढचा भाग... अशा नवर्‍यांबरोबर बायका रहात नाहीत, पोलिस केस होते, घटस्फोट होतात, इ.इ. "ठेविले अनंते" म्हणून हे सगळं सोडून दिलं जात नाही.

'स्मृतिचित्रे'चा सुरूवातीचा भाग वाचताना त्यातला विनोद जाणवला तरीही त्यातला काळेपणा नाकारता येत नाही. लक्ष्मीबाईंनी हे भोगलं, त्या काळापर्यंत अनेकींनी सहन केलं, ते आता होऊ नये यासाठी बरीच यंत्रणा तयार झालेली आहे, असंही दिसतं. या यंत्रणेत शिक्षण, टीव्ही, कायदे, असं बरंच काय काय येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

भारतातील बर्‍यापैकी शहरी व काहि मोजक्या ग्रामिण स्त्रियांना होणारा त्रास कमी झाला आहे हे नक्की.. परंतु अजूनहि कित्येक लक्ष्मीबाई भारतभर झगडताहेत असा विचार अस्वस्थ करून जातो! Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

काल कोणताही असो, सामाजिक अन्याय स्त्री आणि पुरुषांवर समान होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.