मानवी शरीर आणि पाश्चिमात्य संस्कृती (भाग ३)

याआधीच्या लेखांचे दुवे : भाग १, भाग २

(टीप - अधिक माहितीसाठी म्हणून खाली दिलेल्या अनेक दुव्यांमध्ये हीच चित्रं अधिक बारकाव्यांनिशी पाहता येतील.)

पंधरावं शतक हे युरोपात फार मोठी उलथापालथ करणारं ठरलं. त्यामुळे या भागात त्या एका शतकाचाच विचार केलेला आहे.
या काळात घडलेला एक मोठा फरक म्हणजे अनेक क्षेत्रांमध्ये समूहाकडून व्यक्तिकेंद्री असा झालेला प्रवास. आतापर्यंत ज्या कलाकृती आपण पाहिल्या त्यात त्यांना घडवणारा कलाकार केंद्रस्थानी नसून शैली केंद्रस्थानी होती. आणि बहुतेक वेळा ही शैली म्हणजे विशिष्ट काळात विशिष्ट भूभागात विकसित झालेली शैली होती. म्हणजे त्या शैलीत अनेक कलाकृती बनत आणि विविध कलाकार त्या बनवत होते. आता मात्र शैली ही व्यक्तिगत बनली. विविध गोष्टींनी प्रभावित झाले, तरी जे कलाकार आपल्या कलाकृतींमध्ये काहीतरी अन्योन्य असं दाखवत होते असे कलाकार या काळात प्रकाशात आले. त्यांचे स्टुडिओ असत आणि त्यांच्या हाताखाली अनेक विद्यार्थी घडत. पण ते आपल्या गुरुच्या शैलीखालीच झाकोळले तर त्यांचा उदरनिर्वाह फार तर होऊ शके, पण त्यांना फार प्रसिद्धी मिळत नसे. त्यामुळे या भागात आपण ज्या कलाकृती पाहणार आहोत त्या त्यांच्या निर्मिकांच्या नावासकट पाहणार आहोत.

अशा निर्मिकांपैकी एक प्रमुख नाव म्हणजे यान व्हान आईक. तैलरंग हे माध्यम त्यानं फार सुरेख रीतीनं वापरलं. घेंटच्या चर्चमध्ये त्यानं काढलेले अॅडम आणि इव्ह (डावा आणि उजवा कोपरा) :


The Ghent Altarpiece or Adoration of the Mystic Lamb (१४३२)
अधिक माहिती - http://en.wikipedia.org/wiki/Ghent_altarpiece

दोनातेल्लो हा त्या काळातला आणखी एक प्रभावशाली कलाकार होता. ब्राँझमध्ये घडवलेल्या ह्या नाट्यमय प्रसंगात संत जॉनचं शीर धडापासून वेगळं करून सादर केलं जातं असं दाखवलं आहे. शरीरांच्या रचनेद्वारे दोनातेल्लो ही नाट्यमयता विलक्षण ताकदीनं दाखवतो.


The Feast of Herod (सुमारे १४२७)

याउलट दोनातेल्लोचं अतिशय कोवळ्या डेव्हिडचं हे शिल्प त्यातल्या नजाकतीमुळे नजरेत भरतं.


(१४२८-३२)

हा निव्वळ वास्तवदर्शी पुतळा नाही, तर त्याला दिलखेचक बनवण्यात यश मिळालेलं आहे. त्या काळात कोवळे, वयात येणारे पोरगे पुरुषांची प्रेमपात्रं असत. त्यामुळे तसं काही इथे असू शकेल, पण त्याविषयी मतभेद आहेत.
अधिक माहिती - http://en.wikipedia.org/wiki/David_%28Donatello%29

मासाकिओ हा चित्रकार त्याच्या वास्तवदर्शी नैसर्गिक शैलीमुळे प्रसिद्ध झाला. फ्लॉरेन्सच्या चर्चमध्ये त्यानं काढलेले अॅडम आणि इव्ह –


(१४२६-२८)
(मूळ चित्रातले लैंगिक अवयव नंतरच्या काळात झाकले गेले आणि आधुनिक काळात पुन्हा पूर्ववत केले गेले त्यांची तुलना इथे दिसते.)

मानवी शरीर चितारताना ते खऱ्या माणसासारखं वाटेल आणि पाहणाऱ्याला स्वर्गातून हाकलल्या जाणाऱ्या या मर्त्य माणसांबद्दल अनुकंपा वाटेल हा विचार त्यामागे असावा.

युक्लिडीयन भूमितीत पारंगत असणारा पिएरो देल्ला फ्रान्चेस्का हा आणखी एक इटालियन कलाकार अतिशय प्रसिद्ध होता. ख्रिस्त पुनरुज्जीवित होतो याविषयीचं त्याचं हे चित्र पाहा –


Resurrection (१४६३-६५)
एखाद्या मॉडेलसारखा प्रमाणबद्ध येशू आणि झोपलेल्या सैनिकाचे स्नायू वगैरेंमधून मानवी शरीराचा अभ्यास दिसतो.
अधिक माहिती - http://en.wikipedia.org/wiki/Resurrection_%28Piero_della_Francesca%29

धार्मिक कलेव्यतिरिक्त धनिकांनी आपली व्यक्तिचित्रं वगैरे कमिशन करून घेण्याची पद्धत याच काळात रुळली. त्यामुळे अर्थात दोष झाकणं आणि सौंदर्य वाढवणंदेखील रुळलं. उदाहरणार्थ रॉजिएर व्हान डर वेडेन या डच चित्रकाराचं हे चित्र पाहा –


(सु. १४६०)
अधिक माहिती - http://en.wikipedia.org/wiki/Portrait_of_a_Lady_%28van_der_Weyden%29

सुंदर युरोपियन चित्र असं म्हटल्यावर बऱ्याच जणांना आजही जशी चित्रं आठवतात तशी चित्रं काढण्यात या शतकातले चित्रकार वाकबगार झाले. उदाहरणार्थ जोव्हान्नी बेलिनीचं हे चित्र पाहा -


Madonna degli Alberetti (1487)

सांद्रो बोतिचेल्लीशिवाय हे शतक पूर्ण होऊ शकत नाही. त्याची व्हीनस खूप प्रसिद्ध आहे, पण त्याच्या आकर्षक शरीरचित्रणाच्या हातोटीचा अंदाज येण्यासाठी हे चित्र पाहा -


वसंत (1477)

झिरझिरीत वस्त्रांआडून योग्य ते बारकावे दिसत राहतील आणि पाहणारा मंत्रमुग्ध होईल याची पुरेपूर दक्षता घेतली आहे.

छपाईतंत्राचा शोध ही पंधराव्या शतकातली एक महत्त्वाची घडामोड होती. पुस्तकांच्या निर्मितीत त्यामुळे क्रांती झाली हे तर अनेकांना माहीत असतं. पण छपाईची अनेक तंत्रं आत्मसात करून या काळी चित्रकारदेखील खूप अनोखं काम करू लागले. अल्ब्रेख्ट ड्यूरर हे त्यातलं एक महत्त्वाचं नाव. त्यानं केलेली ही दोन वूडकट छपाईतली चित्रं पाहा :


Men’s bath


Women’s bath (1496)

आकर्षक शरीरं दाखवण्यापेक्षा 'असतं तसं' दाखवण्यातली त्याची हातोटी विलक्षण होती. त्यानंच केलेलं हे आत्मचित्र पाहा -


Nude self-portrait (सुमारे 1503-5)

आदर्शवादापासून पुष्कळ दूर आलेली युरोपियन चित्रकला इथे दिसते.

आशयाचा विचार करून त्या अनुषंगानं शरीरचित्रण करण्यातलं वाखाणण्यासारखं कसब असलेला आन्द्रेआ मान्तेन्या दारू पीत मौजमस्ती करणारे लोक कसे दाखवतो ते पाहा -


Bacchanal with a wine vat, engraving by Mantegna (सुमारे 1475)

इतक्या विविध प्रकारे मानवी शरीरचित्रण करत पंधरावं शतक असं भासवू लागलं की याहून पुढे जाताच येणार नाही. पण कलाकार नव्या वाटा शोधत राहिले. त्या कोणत्या होत्या ते पुढच्या भागात पाहू.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

प्रतिक्रिया

रोचक.

(लिंका वाचून इतर काही प्रश्न पडल्यास लिहेनच.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बर्‍याच लिंका आहेत. वाचुन मग प्रतिसाद देतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हा भाग अधिक आवडला. बदलत्या काळानुसार शैलींत होणारे बदल आणि माध्यमांच्या वापरातले बदल याबद्दल आणखी जाणून घ्यावेसे वाटले. रिनेसांबद्दलही माहिती द्यायला हवी होती. अर्थात ज्याला जाणून घ्यायचे आहे तो गुगलून माहिती काढू शकतोच.

अवांतर: माझा भाऊराया मुक्त्या ऊर्फ मुक्ता फळे प्रतिबंधित असला म्हणून काय झाले ऐसीवरील लोकशाही आणि मोकळे वातावरण चित्रांच्या निवडीवरून दिसते आहे. या प्रतिसादाला मिळणाऱ्या किंवा न मिळणाऱ्या श्रेणीवरून इथे कंपूशाही नाही हेही सुस्पष्ट होईल. निर्मिक म्हटल्यावर आपले महात्मा जोतिबा फुले आठवले. छान शब्द आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझे नाव मुक्ताबाई. आमच्यात अशीच नावे घेतात. माझ्या भावाचे नाव मुक्त्यानंदन आहे.

माझा भाऊराया मुक्त्या ऊर्फ मुक्ता फळे प्रतिबंधित असला म्हणून काय झाले ...

गैरसमज. मुक्ता फळे हा सदस्य प्रतिबंधित नाही.
http://www.aisiakshare.com/user/560

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुम्ही दिलेल्या धाग्यावरुन तो उडवलेला नाही हे समजले पण काहीही लिखाण करण्यासाठी प्रतिबंधित नाही हे कसे समजेल? मला मुक्ता फळे चे विनोद आवडले होते, इथल्या प्रशासकांना विनोदाचे वावडे नसावे असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यांचं सदस्य खातं सुरू आहे, व्यक्तिगत संपर्कासाठी व्यनि आहेत, खरडवही आहे. बोला त्यांच्याशी! मुक्ता फळे हे सदस्य हा प्रतिसाद लिहीतेक्षणी मला ऑनलाईन दिसत आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुम्ही इथल्या अ‍ॅडमीन आहात का? तुम्हाला कसे काय माहित बॅन केलेले नाही? माझ्य भावला लॉगीन करता येत असले तरी साइटवर वावरण्यास आणि लिहिण्यास प्रतिबंध घातले आहेत. एक तर तुम्हाला ह्यातली तांत्रिक माहिती फारशी नसावी किंवा कुणीतरी तुम्हाला उल्लू बनवते आहे. तुमच्या अ‍ॅडमिन दादांना हे विचारुन पाहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काव्याचे पान आता बघता येते आहे. काही वेळापूर्वी प्रतिबंध होते. आता प्रतिबंध हटविण्यात आले आहेत. (स्क्रीनशॉटचे दुवे आहेत.) असो. लोकशाहीचा विजय झाला आहे. लोकशाहीचा विजय होऊ दिल्याबद्दल मी इथल्या प्रशासनाचा अत्यंत आभारी आहे.

त्यांचं सदस्य खातं सुरू आहे, व्यक्तिगत संपर्कासाठी व्यनि आहेत, खरडवही आहे. बोला त्यांच्याशी!

विक्षिप्त आहात तशा निरागसही. तुमच्या वरील निष्पाप प्रतिसादावरून तुमच्याकडे ऍडमिनचे काम नाही हे सपष्ट होते. असो.

अवांतर: जंतू यांनी आणखी एक चांगला भाग टाकला आहे. या धाग्याला माझ्या भारतीय भूमिकेतून प्रत्युत्तर द्यायचे म्हणजे थोडा वेळ हवा. मोगलांच्या काळात जाऊन तेव्हाच्या चित्रांचा थोडासा अभ्यास करायला हवा. मुघले आझमची डीव्हीडी आजच आणतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला उधळायला फार फार आवडतं

रोचक मालिका. सध्या माझा भाचा ह्याच विषयावर शाळेत प्रोजेक्ट करतो आहे त्यानेही विकिपिडियावरुन अशीच चित्रे जमवली आहेत. वेळ मिळाल्यावर ती इथे देइनच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या भावाला का प्रतिबंधित केले आहे? त्याने मला स्क्रिनशॉट पाठवला आहे, लॉगिन केल्यावर 'प्रवेश प्रतिबंधित' असा संदेश येतो आहे. ऐअवरच्या दडपशाहीच निषेध!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसीअक्षरेकरांनो इथल्या हुकुमशाहीला असलेले विनोदाचे वावडे मान्य नसेल तर श्री.मुक्ता फळे ह्यांना मुक्त करण्यासाठी इथल्या प्रशासनाला विनंती करा. ह्याच ऐतिहासिक मालिकेतला मुक्ता फळे ह्यांचा तिसरा भागही आलाच पाहिजे!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्री = श्रीमान की श्रीमती?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

श्रीमान की श्रीमती?

काहीही असो पण ऋ नक्कीच नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अवांतर होणार नाही बहुतेक.

ही मजेशीर बातमी आजच वाचली;
Stressed men drawn to heavy women

प्रतिक्रियाही मजे-मजेशीर आहेत.

(लिंक द्यायची आणि रंग द्यायची खिडकी नीट दिसत नाही. ब्राउजर - फा.फॉ. १४.०.१)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कलेचा इतिहास

असं एक पुस्तक ८वी वा ९वी मधे आम्हाल ऐच्छिक विषय म्हणून होतं.

त्यात, अंधारयुगात युरोपात धर्मसत्तेमुळे कसे मानवी शरीराचे चित्रण प्रतिबंधीत होते, कसे फक्त प्रतिकात्मकरित्याच परमेशवराचेही वर्णन/चित्रण करता येत होते. याच विचारचे पुढे जाऊन कलेवरील बंधने इतकी घट्ट झाली की कोणतीही कला इश्वरविरोधीच अशी इस्लामची (पक्षी पुरोहितांची) धारणा होऊन त्यातूनही कसे कलाकारांनी सर्जनशीलता जपली, अन कला 'एक्स्प्रेस' केली इ. वर्णने होती.

त्या काळी असलेल्या अकलेप्रमाणे आकलन झाले होते. या लेखाने ते आठवले. अन मुख्य म्हणजे आमचे कला शिक्षक आठवले.
याचप्रकारची विचारसरणी आपल्याकडेही होती. असावी. मध्यंतरी नृत्य, गायन, शिल्प इ. कला फक्त इश्वराचे वर्णन, गुणगान इ. साठी वापरायची फ्याशन आपल्याही देशी होती, हा बहुधा पोस्ट-खजुराहो पिरियड असावा.

चिंजं अभ्यास करून लिहित आहेत.

जगाची कंपॅरिटिव्ह हिस्टरी वाचायला आवडेल. शोधून वाचणे फार कष्टाचे काम!

अवांतरः
कंपॅरिटिव्ह हिस्टरी म्हणजे, एकाचवेळी तिकडे अन इकडे काय सुरु होते?
उदा, इकडे १६३० मध्ये थोरले महाराज जन्मले! अन 'तिकडे' १६४२ मध्ये आयझॅक न्यूटन.. १६४२ मधेच गॅलिलिओ 'गेला'.. इ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-