नाटक केवळ 'प्रौढ पुरुषांसाठी' - हा लैंगिक भेदभाव योग्य का?

झूरिकमध्ये "काकस्पर्श" या धाग्यातली अवांतर चर्चा वेगळी केली आहे.

नुकत्याच वयात आलेल्या स्त्रीला मखरात बसवणे आणि हे प्रकरण एकूणच साजरे करणे , हे मला अप्रशस्त आणि एम्बरॆसिंग वाटते ...

व्यक्तिगत आयुष्यातल्या अटळ गोष्टींवर चर्चा करणं अप्रशस्त वाटल्याचं म्हणत आहात. ही बातमी पहा, लैंगिक भेदाभेद केल्यामुळे नाटकाचे प्रयोग मुंबईत करता येणार नाही. (दुवा)
पाटोळ्यांनी दाखवलेलं आहे यापेक्षा अधिक condescension (मराठी शब्द?) दाखवणं शक्य आहे का?

या बातमीखाली 'अनामिक' नावाने लिहीलेले प्रतिसाद वाचण्यालायक आहेत; अगदी टोपणनाव वापरण्यासंदर्भातही.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

स्वतंत्र बातमी म्हणून रोचक आहे... पण इथे संदर्भ लावून घेणे कठीण आहे...
प्रतिसाद सापडले नाहीत .. कदाचित उडवले असावेत...

बातमीबद्दल : नाटक सेन्सॉरने मन्जूर केले असेल तर ते निर्मात्याने कोणाला दाखवावे, कोणाला दाखवू नये, याचे अधिकार त्याला असावेत असे वाटते...
कायद्याबद्दल कल्पना नाही...

तक्रारीचे कारण कळत नाही...कोणी चावट जोक सांगत आहे तर तो मलाही सांगा, ही उत्सुकता दिसते पण निर्माता लिंगभेद करतो आहे, असे वाटत नाही...

बायकांनी आपापले चावट विनोदांचे नाटक निर्माण करावे आणि त्याला फक्त बायकांना प्रवेश द्यावा, प्रश्न मिटला...

आणि सामनाने तर या नाटकाच्या कौतुकाचे रसग्रहणही छापलेले आहे...
पण आजतरी एखाद्या चावट संध्याकाळी ‘दर्दी’ प्रौढ पुरुषांसाठी हा दीर्घांक एक हक्काची संध्याकाळ वाटत आहे. याला मिळणारा प्रतिसाद आणि दिग्गजांची उपस्थिती नोंद घेण्याजोगी आहे. या पाटोळ्यांच्या ‘चावट’ पाचोळ्याच. एक बिनधास्त जाहीर चावटपणा घडविते!
एक चावट संध्याकाळ
निर्मिती : इंटरनॅशनल थिएटर ग्रुप इंडिया अनलिमिटेड
लेखक-दिग्दर्शन : अशोक पाटोळे,
ध्वनी : नंदलाल रेळे
भूमिका : अशोक पाटोळे, अजित केळकर

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'काकस्पर्श'च्या संदर्भात अवांतरः
"तक्रारीचे कारण कळत नाही...कोणी चावट जोक सांगत आहे तर तो मलाही सांगा, ही उत्सुकता दिसते पण निर्माता लिंगभेद करतो आहे, असे वाटत नाही...
बायकांनी आपापले चावट विनोदांचे नाटक निर्माण करावे आणि त्याला फक्त बायकांना प्रवेश द्यावा, प्रश्न मिटला..."

पण सार्वजनिक कार्यक्रमाला बायकांना प्रवेश नाही, हे बेकायदेशीर नाही? नाटक कितीही चावट, आचरट, भिकार, मूर्ख, अनावश्यक.... काहीही असलं, तरी असा लिंगभेदावर आधारित भेद करून वेचक प्रेक्षक मिळवणं कायदेशीर आहे?
बरोबर की चूक हे आपण थोडा वेळ बाजूला ठेवू. पण कायदा काय म्हणतो?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

संदर्भ असा की 'चावट संध्याकाळी' नामक नाटक स्त्रियांना दाखवू नये याची लाज वाटावी इतपत चावट आहे. ते बनवलंही जातं. (दाखवावं का लपवावं हा स्वतंत्र प्रश्न.)

बंदी अशासाठी की जनतेच्या कराच्या पैशांतून उभ्या केलेल्या नाट्यगृहांमधे अशी लिंगाधारित (किंवा जात्याधारित इ. इ.) बंदी घालण्यावर महानगरपालिकेने आक्षेप घेतला आहे. पाटोळ्यांनी नाटक फक्त पुरूषांपर्यंत मर्यादित ठेवायचं असेल तर खासगी जागेत करावं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हो, बातमी वाचली मी.
या बंदीचं मी स्वागतच करीन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

नाटक सेन्सॉरने मन्जूर केले असेल तर ते निर्मात्याने कोणाला दाखवावे, कोणाला दाखवू नये, याचे अधिकार त्याला असावेत असे वाटते...

हे स्वातंत्र्य कोणत्याही कायद्याचा भंग होत नसेल अश्या बेताचे -इतपतच- असावे असे वाटते.
स्त्रियांना प्रवेश नाकारणे मंजूर झाल्यास उद्या ठराविक जातीच्या, धर्माच्या, रंगाच्या, पक्षाच्या लोकांनाही बंदी का घालु नये असे प्रश्न उठतील.

तेव्हा अशी लिंगसापेक्ष बंदी चुकीची वाटते. (तशी मला ती फक्त महिलांसाठी असणार्‍या कार्यक्रमाच्या बाबतीतही वाटते)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सह्मत आहे. मलाही लिंगनिरपेक्ष बंदीच अधिक आवडते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्या बातमीतला खुलासा फारच हास्यास्पद वाटला.

प्रयोग फक्त पुरूषांसाठी ठेवण्यात कसलं आलंय नैतिक भान? पुरूषांना बायकांबरोबर नाटक बघण्याची लाज वाटत आहे तर मग एकही प्रयोग बायकांसाठी ठेवू नये? बरं, २५ प्रयोगांनंतर काय होणार होतं, कोण कल्की येऊन समाज उलटापालटा करणार होता/होती की पंचवीस प्रयोगांनंतर स्त्रियांसोबत हे नाटक पहाताना पुरूषांना संकोच वाटू नये? २५ प्रयोग वगैरे स्पष्टीकरण म्हणजे स्वतःचं हसं करून घेणं वाटलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अदिती.....

१. बातमीदाराने विचारले तर नाटककाराला काहीतरी खुलासा हा द्यावाच लागतो, अन्यथा आजकालची 'चीप' पत्रकारिता पाहता त्याच बातमीदाराने "....जनताक्षोभ टाळण्यासाठी आम्ही वारंवार खुलाशाबद्दल लेखकाला, दिग्दर्शकाला विचारले पण त्यानी कसलाच प्रतिसाद दिला नाही. असले अक्षम्य वर्तन कलाकारांकडून अपेक्षित नव्हते...." असे गणपतीछाप राळ उठविणारे रीपोर्टिंग होत जाते. असो. श्री.पाटोळे यानी '२५ प्रयोगानंतर....' चे प्रयोजन केले आहे, ती म्हटली तर सारवासारव असू शकेल. जर त्याना वाटत असलेले 'नैतिक'तेचे भय सत्यच असेल तर त्याबाबत स्मीता तळवलकर आणि त्यांच्यासोबत ते नाटक पाहायला जाणार्‍या महिला पाटोळ्यांची चिंता योग्य की अयोग्य याचा खुलासा करतील. तोपर्यंत तर आता लेखक म्हणतात ती भूमिका स्वीकारली जाणे अपरिहार्य आहे.

२. नाटकाविषयी प्रतिनिधीने जो वृत्तांत देणे आवश्यक होते, तो दिला, पण त्याच लेखाचे शीर्षक बटबटीत रूपात देऊन त्यानी (पक्षी : लोकसत्ता) जो थिल्लरपणा दाखविला आहे तोही अक्षम्यच म्हणावा लागेल....[पण हल्ली पेपरवाल्यांचे बौद्धिक कोण आणि कसे घेणार हाही कळीचा मुद्दा आहेच]

३. Condescension = "विनम्रता" [किंवा एखाद्या घटनेबाबत खुलासा देताना/करताना त्याबाबत स्वतःकडे कमीपणी घेऊन वर्तन करणे]

अशोक पाटील

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

३. Condescension = "विनम्रता" [किंवा एखाद्या घटनेबाबत खुलासा देताना/करताना त्याबाबत स्वतःकडे कमीपणी घेऊन वर्तन करणे]

Condescensionकरिता "स्वतःकडे कमीपणा घेऊन वर्तन करणे" (voluntary descent from one's rank or dignity in relations with an inferior) अशा काहीशा आशयाचा (मला अगोदर माहीत नसलेला) एक अर्थही शब्दकोशात सापडला खरा - यास "विनम्रता" असे कितपत म्हणता येईल याबाबत साशंक आहे - परंतु लेखिकेस बहुधा हा अर्थ अभिप्रेत नसावा, असे वाटते.

Condescensionकरिता patronizing attitude or behavior (पक्षी, पर्यायाने, दुसर्‍यास कमीपणा देऊन वर्तन करणे?) असाही एक अर्थ शब्दकोशात सापडला, तो लेखिकेस अभिप्रेत असावा, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)

(त्याचप्रमाणे,

condescend (intransitive verb):

1 a : to descend to a less formal or dignified level : unbend b : to waive the privileges of rank
2: to assume an air of superiority.)

"...असले अक्षम्य वर्तन कलाकारांकडून अपेक्षित नव्हते...." असे गणपतीछाप राळ उठविणारे रीपोर्टिंग होत जाते.

"गणपतीछाप राळ"??? बोले तो?

(अवांतर:)

...स्मीता तळवलकर आणि त्यांच्यासोबत ते नाटक पाहायला जाणार्‍या महिला...

स्मीता नव्हे हो, पाटिलसाहेब... स्मिता!

(अतिअवांतर: वरील अवांतरास condescending म्हणता येईल काय?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नवी बाजू...

Condescension ~ माझ्याकडे शासकीय व्यवहार कोश आहे [ज्याच्या संपादन मंडळात अगदी डॉ.रा.ना.दांडेकर, ग,बा.सरदार, दुर्गा भागवत आदी दिग्गज मंडळी होती] त्यात मराठीत अर्थ दिला आहे [स्वतःकडे कमीपणा घेऊन वर्तन करणे]. 'विनम्रता' चे प्रयोजन त्या वाक्यासाठी मी केले कारण दुसरा [पटदिशी अर्थबोध होईल असा] शब्द प्रतिसाद देताना मला आठवला नाही. He bowed out condescendingly and left the meeting despite he knew his survey report was faultless असे एकदा वाचनात आले होते (आता नेमके त्या पुस्तकाचे नाव आठवत नाही). वाचताना condescendingly ठिकाणी मी थांबलो होतो आणि मग तो अर्थही शोधला. बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या मीटिंगमधून 'विनम्रतेने' नायक बाहेर पडला असा मी अर्थ घेतला....त्या despite वरून हेही उमजले होते की त्याचा सर्व्हे रीपोर्ट अगदी अचूक असूनही (being a junior fellow) प्रसंगी स्वत:कडे कमीपणा घेऊन त्याने ते बोर्डरूममधून बाहेर जाण्याचे वर्तन केले.

"...असले अक्षम्य वर्तन कलाकारांकडून अपेक्षित नव्हते...." असे गणपतीछाप राळ उठविणारे रीपोर्टिंग होत जाते. /b>
"गणपतीछाप राळ"??? बोले तो?

~ बोले तो....कोल्हापूरातील रस्त्यांची वाईट अवस्था, अपुरा पाणीपुरवठा, विजेचा ठणाणा, टोलनाके आदी दंग्याबाबत कुणीही काही ठराविक खुलासे केले की, लोक म्हणतात, 'काय पण आहे साहेब, नुस्ता गणपतीछाप उत्तरे देतो..". कुंभार जसा सीझनमध्ये एकाच छापाचे गणपती तयार करून ठेवतो, त्यावरून. आता 'राळ = धुरळा', म्हणून ते मराठी वर्तमानपत्रांच्या आवारात भरती झालेले सहा महिन्यांचे डिप्लोमा घेऊन पत्रकारितेच्या क्षेत्रात आलेले सो-कॉल्ड कुलदीप नय्यर आणि अरुण शौरी ज्या बेछूट बातम्या देतात त्याना 'राळ उठविणे' असे म्हटले जाते.

स्मीता नव्हे हो, पाटिलसाहेब... स्मिता!

ग्रेट....येस्स...'स्मिता'....स्मीता नव्हे.....[त्याच तालावर मग मीही म्हणतो 'न'वी...."पाटिल" नव्हे...."पाटील"......~ आणि 'साहेब' तर नव्हेच नव्हे...नकोच नको....ब्याडा !!

अशोक पाटील

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१. Condescendingच्या आपण दिलेल्या शब्दार्थाबद्दल संदेह नाही; तो पुराव्याने शाबीत आहे. आणि आपण दिलेल्या उदाहरणाच्या संदर्भात उचितही आहे. फक्त, याव्यतिरिक्त त्यास किंचित वेगळा असा दुसराही एक अर्थ आहे, आणि प्रस्तुत लेखातील वापराच्या संदर्भात आपण दिलेला अर्थ लागू नसून हा दुसरा अर्थ लागू आहे, एवढेच सुचवायचे होते.

२. "राळ"च्या अर्थाबद्दल कल्पना होती. "गणपती"चा संदर्भ समजला नव्हता. आता चांगला समजला. धन्यवाद.

३. "पाटील"मधला "टी" दीर्घ, हे बरोबरच. त्याबद्दल कधीही संदेह नव्हता. फक्त, आपलाच (अनवधानाने झालेला का होईना, पण) प्रयोग आपल्यावरच उलटवण्याचा एक माफक प्रयोग करून पाहिला, इतकेच. शिवाय, त्या निमित्ताने condescendingचा प्रस्तुत संदर्भातील अर्थ सोदाहरण स्पष्ट करण्याची संधीही साधता आली, हा बोनस फायदा.

बाकी, "साहेब" ब्याडा, तर मग "सरकार" बेकु? की "महाराज" चालेल? Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"..."साहेब" ब्याडा, तर मग "सरकार" बेकु? की "महाराज" चालेल....?"

~ नोप...त्या सार्‍या सफिक्सेस ना घाला काकती वेशीच्या अलिकडे असलेल्या बारा गडगड्याच्या भावीत.
जस्ट बी सिम्पल...आयदर 'अशोक पाटील' ऑर ओन्ली 'पाटील....' इनफ

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Condescending - तुच्छतादर्शक वागणूक देणे (In a verbal or non-verbal manner)
Condescended to - आपली पातळी सोडून खालच्या पातळीवर उतरणे. इथे विनम्र होणे हा अर्थ अभिप्रेत नाही.
'विनम्र होणे' व 'कमीपणा घेणे' यात समोरच्यापेक्षाही खालचे स्थान घेणे असा सूक्ष्म अर्थ दिसतो आहे, तो तुम्हाला अभिप्रेत नसावा.

http://www.thefreedictionary.com/condescend

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ओर व्हाट अबाउट ओन्ली अशोक?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्या सार्‍या सफिक्सेस ना घाला काकती वेशीच्या अलिकडे असलेल्या बारा गडगड्याच्या भावीत.

-भावीत की बावीत? मला 'आड', 'विहीर' या ढोबळ अर्थाने 'बाव' असा शब्द माहित आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दोन्ही बरोबर. बाव हे पुन्हा 'शुद्ध' रूप. उच्चारी मात्र भावीत, भाव हेही बरोबर. पण तो उच्चार थोडा ब्हाव, ब्हावीत असा होतो बहुदा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

येप्प....साहिबरी....

"बाव" शुद्ध रूप हौद्री ! आपण जी 'विहीरीत गाडला तुला' अशी शापवाणी उच्चारतो ती शुद्ध झाली, पण उच्चारी...."हिरीत गाडला तुला" असेही होऊ शकते.

बेळगावी कन्नड मराठी भाषा मिश्रणात ~ हाळभावी = कोरडी विहीर.
तसेच बारा गड्गड्याच्या = बारा मोट क्षमतेची.

शुद्ध कन्नडमध्ये हीच घरगुती म्हटली जाणारी शिवी = "हाळभावी बिद्द साय !" = "कोरड्या विहिरीत जाऊन उलथ, आणि मर तिथंच"

~ जी.ए.नी वारंवार अशा सीमाभागातील उच्चारांचा आपल्या कथांतून वापर केल्याचे आढळून येईल.....'पाप' हे आणखीन् एक उदाहरण.

अशोक पाटील

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"फक्त स्त्रियांसाठी" असे अनेकानेक कार्यक्रम माझ्या कंपनीत व्हाय्चे.
त्याला मी कधीच आक्षेप वगैरे घेतल नाही.
एक मध्यममार्ग सुचतो, निर्मात्याने वैधानिक इशाराछाप काहीतरी नाट्यगृहाबाहेर लिहून ठेवावं; बंदी घालू नये.
उदा:- "महिलांना किळस येइल असे चावट विनोद नाआकात ठासून भरले आहेत." हे मोठ्या ठळक अक्षरात फलक लावून लिहून ठेवावं.
इतकं वाचून येतील त्या महिलांना होणार्‍या वैतागाची जिम्मेदारी निर्मात्याची राहणार नाही.
शिवाय कुणालाही "बंदी" न केल्यानं स्त्री मुक्तीवाल्यांना अधिक चमकोगिरी करायची संधी शोधता येइल.
बादवे, लावणी कार्यक्रमात महिला किती जातात? फारशा जात नसाव्यात . पण मधे एकदा मुद्दाम सुरेखा पुणेकर ह्यांनी "महिला स्पेशल" लावणी कार्यक्रम ठेवला होता.
त्याला तुफान प्रतिसादही मिळाला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

कॉलेजमध्ये असताना काही विशिष्ट चित्रपटगृहांमध्ये जाऊन काही इरॉटिक चित्रपट पाहिले होते. त्या चित्रपटगृहांमध्ये बंदी नसूनही एकही महिला चित्रपट पाहायला का येत नसायची हे न उमगलेले कोडे आहे. कदाचित या धाग्याच्या निमित्ताने त्याचे निराकरण होईल ही आशा आहे.
एकही 'हॉट' नाटक पाहिलेले नाही, पण त्या नाटकाला स्त्रीप्रेक्षकवर्ग किती असतो याचा अंदाज लावू शकतो.
हे सगळं पाहता हा एक 'पब्लिसिटी स्टंट' असून स्त्रियांना चावट नाटक पाहायला भाग पाडण्याचा डाव असू शकतो. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"कॉलेजमध्ये असताना काही विशिष्ट चित्रपटगृहांमध्ये जाऊन काही इरॉटिक चित्रपट पाहिले होते. त्या चित्रपटगृहांमध्ये बंदी नसूनही एकही महिला चित्रपट पाहायला का येत नसायची हे न उमगलेले कोडे आहे. कदाचित या धाग्याच्या निमित्ताने त्याचे निराकरण होईल ही आशा आहे."

या जागांवर सुरक्षेचा प्रश्न असतो. त्या जागा महिलांसाठी सुरक्षित झाल्या तर पुरुषांइतकीच महिलांची गर्दि होईल असा अंदाज आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या जागांवर सुरक्षेचा प्रश्न असतो. त्या जागा महिलांसाठी सुरक्षित झाल्या तर पुरुषांइतकीच महिलांची गर्दि होईल असा अंदाज आहे.

कोणत्याही गर्दीने भरलेल्या बस अथवा ट्रेनपेक्षा ही चित्रपटगृहे नक्कीच जास्त सुरक्षित असतात. शिवाय "छोटा चेतन" सारखे चित्रपट पाहायलाही महिला एकट्या जाताना सर्रास दिसत नाहीत त्यामुळे कामुक चित्रपट पाहायला त्या एकेकट्या जातील अशी अपेक्षाही नाही. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न बाद आहे.
असो.
"फक्त प्रौढ पुरुषांसाठी" हे अन्यायकारक असेल तर "फक्त प्रौढांसाठी" हे अन्यायकारक नाही हे कोणी ठरवले?
स्वगतः आजकाल डाव्या विचारसरणीच्या लोकांचा खूपच जास्त सुळसुळाट झाला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुरक्षितता याचा अर्थ इथे बलात्कार, विनयभंग यांच्यापासून रक्षण असा लावू नये. असे चित्रपट बघायला येणारी बाई ही चवचालच असणार अशी समाजाची बर्‍याच मोठ्या प्रमाणावर मानसिकता असणे हा आहे. चित्रपट बघणंच वाईट, 'आनंद'नंतर अमिताभने फाल्तू चित्रपटांत काम केलं अशा अर्थाची शिकवणी मला माझ्या लहानपणी मिळालेली आहे.
मी काही वेळा एकटीच हॉटेलमधे जाऊन खात/जेवत असे तेव्हाही लोकं माझ्याकडे विचित्र नजरांनी बघत हे जाणवत असे. विचित्र म्हणजे असुरक्षितता वाटावी असं नव्हे, पण आश्चर्य, काही प्रमाणात तुच्छतादर्शक भाव. गेंड्याची कातडी असेल तर अर्थातच फरक पडत नाही, पण बहुतांश स्त्रिया अशा नसतात. सतत कोणीतरी आपलं रक्षण करतो अशी भावना मुली लहान असल्यापासून त्यांच्यावर बिंबवली जाते. अशा परिस्थितीत ७०-८० सालांमधे एकट्या स्त्रीने चवचाल चित्रपट बघितला असता तर काय झालं असतं याचा विचार रोचक वाटतो.

नाटकाच्या बाबतीतही ज्या स्त्रीला प्रवेश नाकारला ती स्त्री नवर्‍याबरोबर आलेली होती.

माझ्या अनुभवात सोबत/कंपनी मिळणं सहजशक्य असेल तर अनेक ठिकाणी पुरूषही एकटे जात नाहीत. अगदी चहा पिण्यासारखी सामान्य गोष्ट करण्यासाठीही माझे पुरूष मित्र अनेकदा मला सोबत म्हणून घेऊन जात असत; अजूनही बोलावतील. अगदी मला सिग्रेटचा वास सहन होत नाही तरीही मला घेऊन जात असत ... सिग्रेटचा धूर माझ्या नाकापर्यंत येण्याची काळजी घेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अनुक्रमे.....
Blow Hot Blow Cold.....
Indecent Proposal.....
Fatal Attraction.....
Basic Instinct....

हे चित्रपट म्हटले तर हाय लेव्हल इरॉटिक लाईन मानले जातील असे होते, पण ज्यावेळी थिएटरमध्ये प्रदर्शित झाले, त्यावेळी स्त्रियांनीही तिकीट विंडोजवर लक्षणीय संख्येने हजेरी लावली होती. त्याला कारण म्हणजे [कदाचित] त्या त्या चित्रपटातील असणार्‍या स्टार्सजवळ असलेली मार्केट व्हॅल्यू.

Ghost बद्दलही तसेच म्हणता येईल.

अशोक पाटील

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यामागे "म्हातारी मेल्याचं दु:ख नाही पण काळ सोकावतो' ही सावधगिरी असेल तर मी समजू शकते.
लैंगिक भेदभाव दूर करायला अद्यापही बराच वाव आहे आपल्या समाजात विविध क्षेत्रांत याबाबतही दुमत नाही.
पण असं नाटक पाहण्याची सोय स्त्रियांना झाल्याने जे काही बदल होणार आहेत त्यातून स्त्री-पुरुष समता प्रस्थापित होण्याला किंवा ती अधिक सशक्त होण्याला कितपत चालना मिळेल याबाबत माझ्या मनात शंका आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लैंगिक भेदभाव दूर करायला अद्यापही बराच वाव आहे आपल्या समाजात विविध क्षेत्रांत याबाबतही दुमत नाही.

दुमत तर नाहीच. याला उपाय शोधून काढणे एवढेच काय ते बाकी आहे.

थोड्या विचाराअंती, एका समांतर समस्येकरिता रामबाण म्हणून टौटिला जाणारा एक उपाय लक्षात घेऊन, तशीच काही समांतर योजना कदाचित येथे राबवून पाहता येईल काय, असा एक विचार या निमित्ताने मनास चाटून जातो.

जातीय भेदभाव ही "आपल्या" समाजाला भेडसावणारी अशीच एक मोठी समस्या आहे, आणि ती दूर करण्यासाठी "आपल्या" समाजात तितकाच मोठा वाव अद्यापही आहे, याबाबतही कोणाचे दुमत असू नये. मात्र, या समस्येबाबत सकारात्मक बाजू ही, की या समस्येच्या निवारणाकरिता उपाययोजनांचा विचार होताना दिसतो, आणि त्या दृष्टीने प्रस्तावही मांडले जातात.

चालू विचारधारेनुसार, या उपाययोजनांमध्ये आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहनाचा प्रस्ताव हा अधिकतर लोकप्रिय असून, यामुळे जातिव्यवस्थेस धक्का पोहोचून समाजातील जातीय भेदभावास मूठमाती मिळण्यास हा उपाय कारणीभूत ठरेल, असा दुर्दम्य आशावादही मांडला जाताना दिसतो, आणि जोरावर दिसतो. समाजातील इतर समस्यांच्या निवारणाकरिता उपाय शोधतानाही यातून प्रेरणा घेण्यासारखे बरेच आहे.

किंबहुना, अशीच प्रेरणा घेऊन, समाजातील लैंगिक भेदभाव दूर करण्याच्या दृष्टीने एक प्रस्ताव अत्यंत गंभीरपणे मांडू इच्छितो. तो म्हणजे, आंतरलैंगिक विवाहांना प्रोत्साहन. जसजसे समाजातील आंतरलैंगिक विवाहांचे प्रमाण वाढत जाईल, तसतसा समाजातील लैंगिक भेदभाव कमीकमी होत जाऊन हा प्रश्न चुटकीसरशी सुटेल, असा आमचा दुर्दम्य आशावाद आहे. किंबहुना, असे प्रोत्साहन देण्यासाठी, आंतरलैंगिक विवाह करणारांना सरकारी तिजोरीतून काही पारितोषिक, अनुदान, झालेच तर श्रीफल-महावस्त्रासहित जाहीर सत्कार, अशाही योजनांचा विचार करता येईल. व्यक्तीच्या निवडीत ढवळाढवळ न करतासुद्धा आंतरलैंगिक विवाहांची टक्केवारी कमी-अधिक करण्याबाबत समाजाला - विशेषतः समाजातील लैंगिक भेदभावाचे निर्मूलन करण्यासारख्या यासारख्या इतक्या उदात्त उद्दिष्टांतून - देणेघेणे असू शकते, याबाबत विद्वानांचे तसेही दुमत असू नये, त्यामुळे हा प्रस्ताव विद्वज्जनसंमत व्हावयासही प्रत्यवाय नसावा.

अर्थात, आंतरलैंगिक विवाहांना प्रोत्साहन हे आपल्या समाजात टैम इम्मेमोरियलापासून चालू आहे, मात्र समाजातील लैंगिक भेदभावांवर त्याने फरक पडल्याचे जाणवलेले नाही, असा एक आक्षेपवजा प्रतिवाद यावर केला जाईलच. तर असा प्रतिवाद करू पाहणार्‍या अभागी (आणि दुष्ट) जीवांस आम्ही "पेशन्स!" एवढेच उत्तर देऊ इच्छितो. आणि काही प्रतिसवालही करू इच्छितो: की बायांनो/बाबांनो, "पूर्वीच्या काळी" (म्हणजे इतिहासात वाटेल तेव्हा) किती लैंगिक भेदभाव असे, याची तुम्हांस काही कल्पना आहे काय? त्यामानाने आज लैंगिक भेदभाव कमी आहे, हे प्रगतीचेच - आणि पर्यायाने आंतरलैंगिक विवाहांच्या लैंगिक भेदभाव कमी करण्यातील योगदानाचेच - द्योतक नाही काय? भारतीय विवाहसंस्थेच्या उभ्या इतिहासाचा कालखंड (हा नेमका किती, याबद्दल आम्हांस कल्पना नाही. इतिहासाचे होतकरू अभ्यासक याचा पत्ता लावतीलच.) लक्षात घेता ही प्रगती नेत्रदीपक म्हटली पाहिजे. तेव्हा, आणखी काही काळ (म्हणजे किती, कोण जाणे!) जाऊ द्या, आंतरलैंगिक विवाहांना असेच सामाजिक प्रोत्साहन राहू द्या. पहा लैंगिक भेदभावाचा प्रश्न कसा चुटकीसरशी सुटतो की नाही ते!

काय म्हणता? आंतरलैंगिक विवाह आणि लैंगिक भेदभाव कमी होणे यांच्यातील कार्यकारणभाव अजूनही दिसत नाही? (१) तुमचे डोळेच फुटके! (२) नसेनाका! आमची थियरी टौटावयास आम्हांस तरीही काय जाते? तुम्ही नाही तरी कोणीतरी टेकर्स भेटतीलच. आणि आमच्यापुरतेच बोलायचे झाले, तर आम्ही स्वतः आंतरलैंगिक विवाह करून या समस्येच्या निराकरणास आमच्या परीने हातभार लावलेला आहे. त्यामुळे आम्ही ग्रेटच. इतरांबद्दल आम्ही काय (आणि काय म्हणून) बोलावे? जिचीतिची/ज्याचीत्याची समज, जाण इ.इ. सर्वथा लागू आहेच.


तळटीप:

टौटणे: (मेरियम-वेब्स्टर शब्दकोशातून साभार. काय आहे, आमचा यावरून फुका कोणी फ़रीद झकेरिया करायला नको.)

1tout: verb \ˈtau̇t, in sense 4 also ˈtüt\

transitive verb

:
:
:
4: to make much of : promote, talk up

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'रोचक' चर्चा वाचते आहे.
(आत्ताच जेवण आटपून इंटरनेटवर आलेली) रमाबाई

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बातमीचा मथळा चुकीचाच आहे. आणि लैँगिक भेदभाव ला आक्षेप घेउन महानगर पलिकेच्या नाट्यगृहातील खेळां वर आणलेली बंदी योग्यच वाटतेय.
नैतिक भानपेक्षा मॉरल/संस्कृति रक्षकांना घाबरुन 'फक्त पुरुषांसाठी' केले असेल का? कारण 'फक्त पुरुषांसाठी' असलेल्या गोष्टीँवर खुर्चाँची तोडफोड करुन बंदी आणलीय असं काही आतातरी आठवत नाही...
मन म्हणतायत त्याप्रमाणे डिस्क्लेमर देउ शकले असते.
नाटक नविनच असल्याने फक्त स्त्रियांसाठीचे खेळ कमी तिकीटविक्रीमुळे रद्द करावे लागतील अशी व्यवहारीक भीतीही असु शकेल...
काही सिनेमे नाटक घरच्यांसोबत (आई वडील भाऊ बहीण) बघताना ऑड वाटु शकतात (वाटावेत की नाही हा मुद्दा वेगळा). Bandit Queen चे फक्त स्त्रियांसाठीचे खेळ चांगले चालले किंवा भावाने बहीणाला 'मैत्रिणीँबरोबर जाऊन चांदनी बार पहा' असे सांगणे पाहण्यात आहे...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दादा कोम्डाके ह्यांचे थिएअटारमध्ये मध्ये चित्रपट पाहणे कधी झाले नाही.
त्यांचा ऑड्यन्स काय होता? फक्त प्रौढ पुरुष होता का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

दादा कोम्डाके ह्यांचे थिएअटारमध्ये मध्ये चित्रपट पाहणे कधी झाले नाही.
त्यांचा ऑड्यन्स काय होता? फक्त प्रौढ पुरुष होता का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मनोबा...

दादांचे चित्रपट थिएटरमध्ये जाऊनच पाहावे लागत असत आमच्या वेळेला....टीव्हीने नंतर समाजातील जवळपास सर्वांच्या घरी मुक्काम केला तरी काही तांत्रिक तू-तू-मै-मै मुळे दादांच्या चित्रपटांना दूरदर्शनची पुंगी लाभलीच नाही. असो.

पण मी स्वतः पाहिले होते की, केवळ 'सोंगाड्या, पांडू हवालदार, एकटा जीव सदाशिव' यानाच नव्हे तर पुढे जी काहीशी एक्सेसिव्ह अश्लिलतेकडे झुकणारी दादानिर्मिती झाली त्यानाही पुरुषांच्यासमवेत स्त्रियांनीही गर्दी केली होती. पतीसमवेत पत्नी येत असेच, पण गल्लीतील स्त्रियाही एकत्रितरित्या दादांच्या चित्रपटांना हजेरी लावीत. द्व्यर्थी संवाद समजणे हे देखील काही वेळा अवघड असते, ते थिएटरमधील सार्‍यानाच [यात शालेय विद्यार्थीही असत] समजत असत असेही नसल्याने, मायबाप प्रेक्षक फक्त 'दादा प्रेमापोटी.....गाण्यापोटी...दिलखुलास हसून घेण्यासाठी...' तिकीटबारीवर हाऊस फुल्लचा बोर्ड लावीत असत.

पाटोळे यांच्या नाटकात 'सेक्स' विषय 'ग्राफिक' पातळीवर वाटावा अशारितीने संवादबद्ध केला असल्याचे दिसते.....म्हणजे 'लोकसत्ता' च्या वार्तांकनावरून. असे रफ अ‍ॅण्ड टफ टु अ‍ॅक्सेप्ट संवाद निदान स्त्रियांनी 'ऐकू' नयेत एवढ्यासाठी जर त्या टीमने ती अट घातली असेल, तर मग एकादृष्टीने ती नाटकाची जाहीरात आहे असे न समजता त्यानी योग्य ती दक्षता घेतली आहे असे वाटते. अर्थात सेकंड ऑप्शन ठेवला आहेच....म्हणजे स्मीता तळवलकर आणि अन्य महिलांनी एक प्रयोग पाहून, वाटल्यास, तो दोन्ही गटांसाठी खुला करावा.

अशोक पाटील

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दादांचे चित्रपट थेटरात पाहिले आहेत.

अडीच तासाच्या चित्रपटात (अंगविक्षेप धरून) ८-१० चावट विनोद असत.

प्रौढ म्हणजे काय हा प्रश्न आहे. १२-१३ व्या वर्षी आम्हाला ते विनोद कळत असत .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

१२-१३ व्या वर्षी आम्हाला ते विनोद कळत असत

हं... तरीच... यातला एक आकडा तर एकदम बोलका आहे, दुसरा आकडा काही बोलू नये असा आहे. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अडीच तासाच्या चित्रपटात (अंगविक्षेप धरून) ८-१० चावट विनोद असत......१२-१३ व्या वर्षी आम्हाला ते विनोद कळत असत

याचा अर्थ त्या वयात तुम्हाला ८-१० विनोदच कळत. न कळलेले किती होते ते कसे कळणार ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्र का टा आ

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इंटरनेट मुळे हवे तेव्हा, हवे तितके, हवे तसे direct मटेरीअल मिळत असताना indirect चावट नाटक सिनेमा पहाण्यात किती जणांना रुची असेल शंका आहे.
एका प्रतिक्रियेत अनामिक यांनी म्हणल्याप्रमाणे 'स्त्री समोर आली की पुरुष कसा विचार करतात व बाहेरच्या जगात (किँवा घरातही) त्यांच्यासोबत वावरताना काय सावधगिरी बाळगायची, कसली अपेक्षा ठेवायची वा ठेवायची नाही' हे माहीत करुन घ्यायचे असेल तर ठीक...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'फक्त प्रौढ पुरुषांसाठी' यावरचे आक्षेप पटले. आणि या प्रयोगांवर बंदी आली असेल तर तेही योग्य वाटत आहे.
'फक्त प्रौढांसाठी' असे केल्यास प्रयोग व्हायला हरकत नाही. नाहीतरी जे दाखवले जाईल ते आपापल्या जबाबदारीवर पहावे हे असतेच. सेन्सॉर बोर्ड नी नाटकाला पास केलं पण..प्रयोगा दरम्यान जर काही आक्षेपार्ह संवाद उस्फूर्तपणे कोणी म्हटला तर काय होतं?
हे पहिले काही प्रयोग स्त्री-टीकाकारांना वगळण्यासाठी होते का?

आणि इथे काहीनी जे 'फक्त स्त्रीयांसाठी' अशा कार्यक्रमातून पुरुषांना वगळतात/ असे कार्यक्रम होतातच.. असं काही म्हटलं आहे..त्याबद्द्ल मला असं म्हणायचय की तसे कार्यक्रम 'पुरुषां बद्द्ल चावट काही../ एक चावट संध्याकाळ' अशा स्वरूपाचे नक्कीच नसणार.माझ्या पहाण्यात तरी असे काही जहिर कार्यक्रम झालेले नहीत. तेव्हा या चर्चेत 'फक्त स्त्रीयांसाठी' च्या कार्यक्रमांबद्द्ल्चे आक्षेप त्याच ओघात पुढे करणे योग्य वाटत नाही.

(बातमीचा दुवा उघडत नाहीये..त्यामुळे इथे जे वाचलं त्यावरून लिहीत आहे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फक्त चावट कार्यक्रमच वेगळे ठेवावेत का?
किंवा जे वेगळे ठेवायचे आहेत त्यात चावट कार्यक्रमाचा समावेश नको आहे?
म्हणजेच चावट कार्यक्रम हे सामायिकच असले पाहिजेत असा तर्क आहे का?

किंवा मुळात वेगळे,स्वतंत्र कार्यक्रम असावेत, त्या स्पेसमध्ये ज्याला जे करायचे ते त्यानी करावे हे आर्ग्युमेंट असण्यात काही चूक आहे?

"आम्ही आमचे स्वतंत्र कार्यक्रम करतो, पणं त्यात चावट बोलत नाही" असं आर्ग्युमेंट स्त्रियांचे स्वतंत्र कार्यक्रम ठेवणार्‍या आ़णि हे नाटाक "पुरुष ओन्ली" ठेवणं मान्य नसणार्‍यांचं आहे? असेल तर उत्तर असं दिलं जाउ शकेलं:- "नसाल तुम्ही बोलत. आम्हाला फक्त पुरुषांसाठी म्हणून कार्यक्रम स्वतंत्र करायचे आहेत. त्यात आम्ही चावट बोलू. काय तक्रार आहे?"
हळदीकुंकू हा स्त्रियांचा स्वतंत्र,एक्स्लुसिव्ह असा कार्यक्रम आहे. काही पुरुष एकत्रित येउन गटारी साजरी करत असतील तर प्रॉब्ल्मे काय? (सरकारी जागा वापरणं इतकाच प्रॉब्लेम आहे का? ती भाड्याने घ्यायचे काय नियम आहेत? भाड्याने घेतल्यावर मी माझ्या खाजगी, मी निवडालेल्या, निवडक ऑड्यन्ससाठी कार्यक्रम करु शकत नाही का? जर भाड्याने घेणार्‍यास हे स्वातंत्र्य नसेल तर माझा संपूर्ण प्रतिसाद बाद. धाग्यातील बहुतांश मुद्द्यांचाही मग निकाल लागेल.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

थोडक्यात मुद्दे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करते.
"'एक चावट संध्याकाळ' (फक्त प्रौढ पुरुषांसाठी) " यातून मला तरी सरळ - यात महिलांनां अपमानास्पद वाटेल असं काही असणार अस वाटतय. मग महिलांचा अपमान होईल अस काही रंगमंचावरून पुरुषांसमोर सादर व्हावं हे मला तरी..कितीही अगदी स्वातंत्र्य सर्वांना आहे वगैरे वाटल तरी..पटत नाही.
तुम्हाला अस रंगमंचावरून सादर व्हावं हे बरोबर आहे अस वाटतं का?
(उत्तर "हो, बरोबर आहे महिलांचा अपमान होईल असं सादर झालं तरी" असेल तर मला पुढे चर्चा करण्यास काही उरतं अस वाटत नाही.)
"योग शिबीर- फक्त प्रौढ पुरुषांसाठी" यावर कोणी आक्षेप घेईल असं वाटत नाही.
एक्स्क्लुसिव कार्यक्रम करण्याचं स्वातंत्र्य आणि या स्वातंत्र्याचा दुरूपयोग यात तर तुम्ही फरक कराल ना?
आणि स्वातंत्र्य आहे सादर करण्याचं हे मान्यच आहे..म्हणूनच हा प्रयोग खुला करा...बंद करा किंवा नाही हे खुला केल्यावरच म्हणता येईल.

खासगीत कोणी काहीही करायला मोकळे आहेतच.
हळदीकुंकु आणि अन्य बर्याच "फक्त स्त्रियांच्या" म्हणवलेल्या कार्यक्रमात पुरुषांचा सक्रीय सहभाग नसतो एवढच. त्यांना घरातून घालवून देवून हे कार्यक्रम होत नाहीत(कंटाळा येतो म्हणून पुरूष हे कार्यक्रम असतात तेव्हा स्वखुशीने (अपमान झाल्यामुळे नाही) बाहेर/मित्रांकडे जातात). हे सगळ खासगीच म्हणता येईल त्यामुळे तसाही काही आक्षेप नाही...गटारी करा किंवा आणि काही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

थांब थोडं ऋता तै. विचार करतोय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

(कोणास ठाऊक, कदाचित थोडे अवांतर होईल, पण...)

हळदीकुंकु आणि अन्य बर्याच "फक्त स्त्रियांच्या" म्हणवलेल्या कार्यक्रमात पुरुषांचा सक्रीय सहभाग नसतो एवढच. त्यांना घरातून घालवून देवून हे कार्यक्रम होत नाहीत(कंटाळा येतो म्हणून पुरूष हे कार्यक्रम असतात तेव्हा स्वखुशीने (अपमान झाल्यामुळे नाही) बाहेर/मित्रांकडे जातात).

अगदी!

हळदीकुंकू आणि अन्य बर्‍याच "फक्त स्त्रियांच्या" म्हणवलेल्या कार्यक्रमांत विधवांचाही सक्रिय सहभाग नसतो, एवढेच. अन्यथा, त्यांनाही बहुधा घरातून घालवून देऊन हे कार्यक्रम होत नसावेतच. (अशा वेळी त्या बाहेर जात असतीलच - कल्पना नाही - तर बहुधा स्वखुशीनेच जात असाव्यात, अपमान झाल्यामुळे खचितच जात नसाव्यात.)

असो. तर मग, आपला मुद्दा नेमका काय होता म्हणालात?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाटकात बायकांविषयी चावटपणा असणार.
मग समलिंगी बायकांना जाता यायलाच हवं.
नाहीतर त्या आनंदाला मुकतील.
पाटोळे हे पुरुषकेंद्री व्यवस्थेचे मठ्ठ पाईक दिसतात.
समलिंगी बायकांनी त्यांच्यावर मोर्चा नेला पाहिजे.
असे उपाय लोकांना का सुचत नाहीत?
हीच आपल्या हजारो वर्षाच्या महान संस्कृतीची गोची आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी एक काळा मठ्ठ बैल. मला अंधार आवडतो. तेव्हा फार उजेड पाडू नका.

१. 'फक्त स्त्रियांसाठी' किंवा 'फक्त पुरूषांसाठी' चालवल्या जाणार्‍या आस्थापना आजही सर्व प्रकारच्या समाजात दिसतात; अनुक्रमे ब्यूटी पार्लरे* आणि सलून अशा प्रकारचे शब्द भारतात प्रचलित आहेत. आजकाल जिमही फक्त स्त्रियांसाठी या प्रकारचे असतात. या सर्व आस्थापना खासगी असल्यामुळे तिथे काय नियम असावेत याचा निर्णय व्यवस्थापनाकडे असतो.
१अ. जनतेच्या पैशाने चालवली जाणारी नाट्यगृह पाटोळे वापरत असतील तर तिथे अशी सेक्सिस्ट भूमिका घेण्याचा त्यांना अधिकार नाही (किंवा नसावा); पाटोळेच काय इतरही लोकं आपापल्या खासगी जागांमधे (समाजविघातक गोष्टी, उदाहरणार्थ बॉंबस्फोटांचं प्लॅनिंग इ. वगळता) काय करतात याच्याशी इतरांना काही घेणंदेणं नसावं. अशा एखाद्या ठिकाणी पाटोळ्यांनी हे नाटक फक्त प्रौढ पुरूषांसाठी केल्यास त्यावर हरकत घेण्याचा अन्य कोणाला हक्क नाही.
२. दादा कोंडके आणि तत्सम छाप चित्रपट स्त्रियांसाठीही असून स्त्रिया तिथे जात नाहीत याचं एक कारण ऋताने मांडलेलं आहेच. दुसरं कारण बहिष्कार हे ही असू शकतं (विचार मान्य नाहीत, निषेध नोंदवण्यासाठी व्यक्तिगत पातळीवर का होईना, बहिष्कार). तिसरं कारण किळस हे ही असू शकतं (झुरळ, पाल वगैरे प्राण्यांबद्दल बहुतेकांना किळस वाटते; असे प्राणी समोर आले तरी टाळण्याकडे कल असतो.)
३. स्त्रियांनी अशा प्रकारचं नाटक करून फक्त स्त्रियांसाठी प्रवेश ठेवावा हे याला योग्य उत्तर नाही. मी हे नाटक पाहिलेलं नाही, पण शंका अशी आहे की या नाटकात स्त्रियांना स्त्रीद्वेष्टी वाटणारी विधानं असू शकतात. तुम्ही आमचा द्वेष करा, बदला म्हणून आम्ही तुमचा द्वेष करतो यात काय मतलब आहे? समानता हवी आहे तरी अशा प्रकारची नको. जगातली सगळी युद्ध पुरूषी वर्चस्ववादातून झाली म्हणून बायकांनीही समानता म्हणून युद्ध करावीत असं नव्हे.
४. पाटोळे मला हास्यास्पद वाटले कारण एकदा केलेली चूक सुधरण्यची आपसूक मिळालेली संधीही त्यांनी वाया घालवली. सुरूवातीला नाटक फक्त प्रौढ पुरूषांसाठी ठेवलं ही चूक झाली, अशा प्रकारचं विधान या बंदीनंतर केलं असतं तर त्यांच्यावर टीका करण्याचा प्रश्न उद्भवला नसता.
एक प्रकारे त्यांनी आपल्याला स्त्रियांची फार काळजी आहे (पक्षी: आपण पुरूष स्त्रियांचे पालक आहोत) अशा प्रकारची मागास भूमिका घेऊन तिचं वर समर्थन केलं. नाटकाच्या विषयात स्त्रीला स्थान आहे पण नाटक बघण्यात नाही याबद्दल पाटोळ्यांना हास्यास्पद म्हणावं का केविलवाणं?
५. नाटकाचा विषय अशा प्रकारचा चावट आहे असं जाहीर करावं; ज्यांना यायचं आहे ते येतील ही भूमिका मलाही मान्य आहे. अगदी फारच टोकाला जायचं तर काही रांगा स्त्रिया आणि पुरूषांसाठी वेगवेगळ्या (स्वामिनारायण स्कीम) ठेवाव्या.

पुरूष आपसांत चावट गप्पा मारतात यात नवल नसावं. स्त्रियाही आपसांत पुरेपूर चावट गप्पा मारतात. अन्यथा प्रेमळ, मायाळू, शांत दिसणार्‍या काकू, माम्या, आज्याही प्रसंगी तरूण मुलींना लाज वाटेल इतपत चावट बोलतात. चावट गप्पा मारणं ही मनुष्यप्राण्यांची गरज असावी. फक्त पुरूष स्त्रियांसमोर आणि स्त्रिया पुरूषांसमोर अशा प्रकारची वक्तव्य सहसा करत नाहीत.

ऋता, तुझ्या खरडवहीत बातमीचा मजकूर चिकटवला आहे.

*अवांतरः आमचं ठाण्याचं घर एका गल्लीत, आतल्या बाजूला होतं. ही गल्ली कोणती हे सांगण्यासाठी बरेच लोकं एका ब्यूटी पार्लरची ओळख वापरतात. तरूण वयात तिथे घुटमळलेले, घुटमळणारे अनेक पुरूष त्यावरून एखादी माफक विनोदी प्रतिक्रिया देतात असं सर्वसाधारण निरीक्षण आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

३. स्त्रियांनी अशा प्रकारचं नाटक करून फक्त स्त्रियांसाठी प्रवेश ठेवावा हे याला योग्य उत्तर नाही. मी हे नाटक पाहिलेलं नाही, पण शंका अशी आहे की या नाटकात स्त्रियांना स्त्रीद्वेष्टी वाटणारी विधानं असू शकतात. तुम्ही आमचा द्वेष करा, बदला म्हणून आम्ही तुमचा द्वेष करतो यात काय मतलब आहे? समानता हवी आहे तरी अशा प्रकारची नको.

इथवर ठीक आहे. मात्र, वरील ठळक केलेल्या मुद्द्यांच्या स्पष्टीकरणवजा समर्थनार्थ, वानगीदाखल म्हणून,

जगातली सगळी युद्ध पुरूषी वर्चस्ववादातून झाली म्हणून बायकांनीही समानता म्हणून युद्ध करावीत असं नव्हे.

हे जे काही विधान केलेले आहे, ते पटण्यासारखे नाही, आणि चुकीच्या गृहीतकांवर उभारलेले आहे, असे वाटते.

युद्धे ही वर्चस्ववादातून झाली अथवा होतात, हे विधान जरी कदाचित फारशा तपशीलवार चिकित्सेत न शिरता दर्शनीमूल्यावर घेण्याजोगे असले, तरी हा वर्चस्ववाद हा मानवी स्वभावाचा एक मूलभूत आणि अविभाज्य भाग असावा, त्यात "पुरुषी" अथवा "स्त्रैण" असे काहीही नसावे. इतिहासात अथवा परंपरेत जर तो प्रकर्षाने पुरुषांचे ठायी (आणि म्हणूनच "पुरुषी") आणि अभावाने अथवा अपवादानेच स्त्रियांचे ठायी असल्याचे वरकरणी आढळत असेल, तर त्याचे कारण हे बहुधा आजवरच्या जागतिक पारंपरिक समाजव्यवस्था या प्रामुख्याने पुरुषप्रधान असण्यात दडलेले सापडावे, असे अटकळवजा प्रतिपादन आहे. थोडक्यात, स्त्रियांच्या ठायीच्या नैसर्गिक वर्चस्ववादाचे पारंपरिक दमन, त्याचबरोबर पुरुषांच्या ठायीच्या नैसर्गिक वर्चस्ववादाची पारंपरिक भलावण आणि स्त्रियांसाठी या नैसर्गिक गुणाच्या वाढीकरिता संधीचा पारंपरिक अभाव, ही कारणत्रयी या गुणाच्या स्त्रियांच्या ठायीच्या आभासी अभावास जबाबदार असावीत; अन्यथा या गुणात "पुरुषी" अथवा "न-स्त्रैण" असे काहीही नसावे, असा अंदाज आहे.

तेव्हा, स्त्री-पुरुषांमध्ये खरोखरची सामाजिक समता जर प्रस्थापित झाली, तर बायकांना "समानता" म्हणून युद्धे मुद्दाम करण्याची गरज उत्पन्न होणार नाही; युद्धे ही आपोआपच, नैसर्गिकरीत्याच होतील (नि होत राहतील), वर्चस्ववादाकरिताच होतील (नि होत राहतील), फक्त या वेळी त्यात स्त्रियांचाही सहभाग असेल इतकाच काय तो फरक राहील, असे भाकीत वर्तवण्याच्या मोहाचे या निमित्ताने शमन करून घेतो.

तूर्तास इत्यलम्|

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नोंद घेतली आहे. थोड्या वेळाने सविस्तर लिहीते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बातमीचा मजकूर वाचला. शेवटचं "नैतिक भान" फक्त या चर्चेतून तसं कळलं नव्हतं..
या 'नैतिक भाना'मुळे पुढारलेपण मागे पडलं.

बाकी तुझं म्हणणं पटलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या 'नैतिक भाना'मुळे पुढारलेपण मागे पडलं.

अगदी! उगाच आपण स्त्रियांचे पालक वगैरे असल्याची मध्ययुगीन नाहीतर मनुकालीन भूमिका का घ्यावी?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

घालेनात का धिंगाणा .... नंतर खाजगीत आपापल्या नवर्‍यांना विचारा ते विनोद. ROFLROFL
माझा शून्य आक्षेप आहे या भेदभावाला.
______

On serious note -

“Choose your battles wisely. After all, life isn't measured by how many times you stood up to fight. It's not winning battles that makes you happy, but it's how many times you turned away and chose to look into a better direction. Life is too short to spend it on warring. Fight only the most, most, most important ones, let the rest go.”
― C. JoyBell C.

दर वेळेला ढाल मारलीच पाहीजे असे नाही. क्षुल्लक गोष्टींवर उर्जा आणि वेळ खर्च करु नये असे माझे मत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दर वेळेला ढाल मारलीच पाहीजे असे नाही.

ढाल, की तलवार?

ढाल ही केवळ बचावात्मक असते ना?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खेळात वगैरे जिंकल्यावर ढाल मिळते, तलवार नाही. हॅरीस शील्ड वगैरे...
'असा मी असामी'त भजन स्पर्धेत जिंकल्यावरही ढाल मिळणार असल्याचा उल्लेख आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

...तेथे ढाल मिळते, मारली जात नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खेळांच्या स्पर्धांसंदर्भात ढाल मारणे असा शब्दप्रयोगही टोचत नाही. विशेषतः कबड्डीत "मारणे" असा शब्दप्रयोग अनेकवेळा वापरतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

...(दुसर्‍याची) ढाल (आपल्या) तलवारीने मारणे, असा काही अर्थ असेल, तर गोष्ट वेगळी!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सारीका, कोणी न्यायालयात दाद मागितली असती तर नामुष्की मुंबई महानगरपालिकेची झाली असती. खाजगी जागांमधे भेदभाव करण्याला विरोध नसून सार्वजनिक पैसा वापरून भेदभाव करण्याला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सार्वजनिक पैसा वापरून चालवण्यात येणार्‍या लेडिज स्पेशल बसेस आणि ट्रेन्स कशा चालतात हो तुम्हाला?
दुटप्पी कुठले... Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इतर बस आणि ट्रेन्समधे पुरूषांना प्रवेशच नसता तर त्याही चालल्या नसत्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्रतिसाद 'भडकाऊ' Wink आहे. पण तसं म्हटलं असतं तर निगेटीव्ह मार्कांत गेला असता म्हणून विनोदी म्हटलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डोळा मारून खवचट आणि श्रावण दोघांनीही विनोदाची सोय करून टाकली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

१. खाजगी पार्टी, समारंभ, उत्सव - हे विशिष्ट वर्गाच्या सभासदांसाठीच ठेवणं योग्य आहे का? अर्थातच. माझ्या घरात, किंवा पार्टीच्या ठिकाणी कोणाला बोलवायचं हे मी ठरवतो. 'मी बोलावलेले' असा एक वर्ग त्यावेळपुरता आपोआपच तयार होतो. त्यामुळे कोणी आगंतुक आल्यास, 'तुम्ही त्या वर्गात मोडत नाही, तेव्हा तुम्हाला इथे प्रवेश नाही'
२. समाजात केवळ पुरुषांसाठी किंवा स्त्रियांसाठी असे कार्यक्रम असतात का? यालाही हो असंच उत्तर आहे. अगदी टोकाचं उदाहरण घ्यायचं झालं तर सार्वजनिक ठिकाणी स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या नैसर्गिक विधींसाठीच्या जागांमध्ये भेदभाव केला जातो. त्यात एकमेकांच्या बाथरुमांत जाऊ नये असा नियम असतो, आणि अत्यंत पर्व्हर्ट लोक सोडले तर सर्व जण तो नियम पाळतात.

या दोन गोष्टी मान्य केल्यावर सकृतदर्शनी असं वाटेल की एखाद्या नाटकालाही 'प्रौढ पुरुषांसाठी' असं स्वनिर्देशित सर्टिफिकेट देता यावं, आणि त्याची अंमलबजावणी करता यावी. मात्र त्यात काही अडचणी आहेत.

पहिली म्हणजे खाजगी आणि सामाजिक यांच्यातला फरक. तो मुख्यत्वे त्या पार्टीमागच्या उद्देशांना लागू होतो. 'मी बोलावलेले' हा निकष अत्यंत वैयक्तिक असतो. त्यामागची कारणंही बहुतेक वेळा अत्यंत वैयक्तिक असतात. माझा वाढदिवस साजरा करणं हा काही संपूर्ण समाजाचा हक्क नव्हे. याउलट माझ्या वाढदिवसाला कोण यावं ही माझी वैयक्तिक बाब झाली.

मात्र 'मी बोलावलेले' हे जितकं अधिक जनरलाइज केलं जातं तितकं अधिक काळजीपूर्वक वागावं लागतं. देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मणांचं संमेलन भरवणं न्याय्य आहे. कारण त्या विशिष्ट जातीच्या सभासदांनी एकमेकांचं भलं करणं हा त्यामागचा उद्देश असतो. मात्र सार्वजनिक ठिकाणी मंदिर बांधून त्यात 'फक्त विशिष्ट जातींसाठीच' किंवा 'विशिष्ट जातीयांना प्रवेश नाही' असं म्हणणं अयोग्य ठरतं. कारण इथे देवाची पूजा करण्याचा हक्क हा सामाजिक पातळीवरचा आहे. कलास्वादाच्या आनंदाबाबतही असंच म्हणता येईल, म्हणून या नाटकाला स्त्रियांना मज्जाव करणं अयोग्य आहे.

याचा दुसरा कंगोरा असा की अशा प्रकारच्या भेदभावाच्या मागे भाव काय आहे? हे महत्त्वाचं ठऱतं. अमेरिकन वर्णद्वेषातूनच 'सेपरेट बट इक्वल' ही तडजोड निर्माण झाली होती. 'कायद्याने समान वागणूक देण्याची जबरदस्ती केली आहे, पण समाज म्हणून आम्ही तुम्हाला वाळीतच, आमच्यापासून दूर ठेवणार. कारण तुम्ही हीन दर्जाचे आहात.' हे अनुच्चारित विधान त्यामागे होतं. यातून दिसणारी मानसिकता ही सुधारावी लागते. खऱ्या समानतेसाठी सेपरेट बट इक्वल हे पुरेसं नाही हे अमेरिकन सुप्रीम कोर्टाने सांगितलं आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने सुधारणा सुरू झाली.

चर्चेच्या उदाहरणातूनही 'स्त्रिया नाजूक असतात, कोमल हृदयाच्या असतात. पुरुष त्यांचं रक्षण करण्यासाठी असतात. त्यामुळे (सर्व) पुरुषांना जमणाऱ्या गोष्टी (सर्व) स्त्रियांना जमणार नाहीत.' हे अनुच्चारित विधान आहे. त्यात 'नैतिक जबाबदारी पाळणं' वगैरे तर अतिशयच कॉंडेस्सेंडिंग आहे.

अशा प्रकारचा भेद करायचा झाला तर तो पुरुष-स्त्रिया अशी रेषा आखून करण्याऐवजी 'अतिरेकी चावटपणा खपवून घेणारे - व न घेणारे' अशा गुणात्मक पद्धतीवर करावा. कदाचित पहिल्या गटात नव्वद टक्के पुरुष आणि दुसऱ्या गटात नव्वद टक्के स्त्रिया असतील. पण सरसकटीकरण होऊ नये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मात्र सार्वजनिक ठिकाणी मंदिर बांधून त्यात 'फक्त विशिष्ट जातींसाठीच' किंवा 'विशिष्ट जातीयांना प्रवेश नाही' असं म्हणणं अयोग्य ठरतं. कारण इथे देवाची पूजा करण्याचा हक्क हा सामाजिक पातळीवरचा आहे.

भारतापुरते बोलायचे तर भारतात पारशांच्या अग्यारीत इतरांना प्रवेश नाही. (इतरत्र पारशांच्या अग्यारीत इतरांना प्रवेश आहे किंवा नाही, याबद्दल मला कल्पना नाही.) त्याहून थोड्या व्यापक, उपखंडीय पातळीवर बोलायचे, तर नेपाळातील हिंदू मंदिरांत हिंदवेतरांना प्रवेश नाही. (या नियमास बौद्धांचा अलिखित अपवाद असल्यास कल्पना नाही.) त्याहूनही व्यापक, अखिल आशियाई अथवा जागतिक पातळीवर बोलायचे झाल्यास, सौदी अरेबियातील मक्का आणि मदिना या शहरांत मुसलमानेतरांना प्रवेश नाही.

हे आपण मांडलेल्या चौकटीत नेमके कसे बसते?

अमेरिकन वर्णद्वेषातूनच 'सेपरेट बट इक्वल' ही तडजोड निर्माण झाली होती.

'सेपरेट बट इक्वल'वरून आठवले. स्वामिनारायण मंदिरांत पुरुष अथवा स्त्रिया, दोघांनाही प्रवेश आहे. मात्र रांगा, बसायची ठिकाणे निराळी. कडेवरच्या लहान मुलांबद्दलही अपवाद नाही. म्हणजे, कडेवर पुरुष मूल असलेली स्त्री फक्त मुलासमवेत मंदिरात आली, तर तिची काही सोय नाही, कारण मुलाला पुरुषांच्या रांगेत पाठवणे भाग आहे, आणि हिला स्त्रियांच्या रांगेत जाणे. मुलास एकटे वेगळे पाठवण्याची सोय नसल्याने इफेक्टिवली तिच्या प्रवेशावर बंधने आली. (हेच एखादा पुरुष आपल्या कडेवरच्या मुलीस घेऊन पण कोणाही विश्वासू प्रौढ स्त्रीस बरोबर न आणता आला, तरी त्याच्याही बाबतीत व्हावे, असा अंदाज आहे. बरे, हे सेग्रगेशन 'तुमच्या सोयीसाठीच, गर्दीच्या वेळी तुम्हास त्रास होऊ नये म्हणून आहे - पहा तुम्हाला कशी वेगळी रांग करून दिलेली आहे!' असाही आव आणला गेलेला पाहिलेला आहे. आता बोला!)

याबद्दल काय म्हणणे आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

देवस्थानाच्या बाबतीत:
निरनिराळ्या जातीतले लोकं एकाच धर्माचे असू शकतात, त्यांची श्रद्धास्थानं समान असतात. निरनिराळ्या धर्माच्या लोकांची श्रद्धास्थानं निरनिराळी असतात. हिंदूंच्या देवळात ख्रिश्चनांना प्रवेश नाही (किंवा कसेही) यात ख्रिश्चनांचा देवच मुळात हिंदू देवळात नसेल तर त्यांचा उपासनेचा हक्क नाकारला जात नाही. असं काहीसं.
नाटकाबद्दल बोलायचं तर मराठी न समजणार्‍यांची, अंध किंवा कर्णबधीर लोकांचीही तशी कुचंबणा होतेच.

स्वामीनारायणाच्या या प्रकारावरून आठवलं ते म्हणजे कोल्हापुरच्या महालक्ष्मीच्या, देवीच्या देवळाच्या गाभार्‍यात अगदी अलिकडर्यंत स्त्रियांना प्रवेश नव्हता. गाभार्‍यात दगडाची स्त्री चालते पण हाडामासाची नाही!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नाटकाबद्दल बोलायचं तर मराठी न समजणार्‍यांची, अंध किंवा कर्णबधीर लोकांचीही तशी कुचंबणा होतेच.

मराठी न समजणारांना अथवा अंध किंवा कर्णबधिर लोकांना थेटरात जाऊन मराठी नाटक पहायला बंदी नाही - असूही नये. त्यांना तेथे जाऊन कदाचित काही उपयोग होणार नाही, हा भाग वेगळा.

(फॉर द्याट म्याटर, मी स्वतः थेटरात जाऊन, भाषा कळत नसताना, तमिळ नि तेलुगु चित्रपट पाहिलेले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्यातून - भाषा कळत नसल्यामुळे - माझी फारशी काही कुचंबणा झाल्यासारखे वाटले नाही - सबटायटले नसतानासुद्धा! उपखंडीय चित्रपटांची हीच तर खासियत आहे - कथानकात साधारण काय चालू आहे, नि पुढे काय होणार आहे, याचा पत्ता लागतोच लागतो - अगदी पिच्चर म्यूट केला तरी!)

प्रार्थनास्थळांचेही तसेच आहे. मी स्वतः हिंदू असलो, तरी माझी श्रद्धा कोठे आणि कशी असू शकेल हा सर्वस्वी माझा प्रश्न आहे, आणि याचे उत्तर मीच ठरवू शकतो. तर मग जोपर्यंत मी शत्रुत्वभावनेने येत नाही, तोपर्यंत कोणत्याही धर्माच्या प्रार्थनास्थळात मला उपासनेचा - किंवा गेला बाजार प्रवेशाचा - हक्क का नसावा? त्याचा उपयोग मला होईल की नाही, त्यातून मला अभिप्रेत असलेला ईश्वर मला भेटेल की नाही, ही सर्वस्वी माझी डोकेदुखी आहे, त्या इतर-धर्म-प्रार्थनास्थळ-चालकाची नव्हे. जोपर्यंत माझी वैयक्तिक श्रद्धा काहीही असो, त्या इतरधर्मीयांच्या श्रद्धेचा आदर राखून मी तेथे वावरू शकतो, तोपर्यंत अडचण नेमकी काय आहे? समजा नाही झाला मला उपयोग, तर पुढच्या वेळेस तेथे मीच जाणार नाही. पण माझ्या प्रवेशास बंदी कशापायी?

शेवटी माझा देव कोणता, हे मी ठरवायचे, की इतरांनी? समजा मला तुमच्या देवात काही अडचण नाही, तुमच्या देवाशी जर माझे काही वाकडे नाही, तर तुम्ही मला त्यापासून वंचित का करावे? किंवा, माझे सोडा. त्याला तुम्ही माझ्यापासून वंचित का करावे? तो आणि मी, दोघेही प्रौढ आहोत, नि सज्ञान आहोत. बघून घेऊ आम्ही आपसात आमचे काय ते. आपसात बघून घ्यायला दोघेही समर्थ आहोत - इतरांच्या लुडबुडीची आवश्यकता नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अशा प्रकारची बंदी मुळात मला पटणारी नसल्यामुळे त्याचं आणखी समर्थन देऊ शकत नाही. Smile

या विशिष्ट नाटकात भाषिक विनोदच चिक्कार असतील आणि भाषा समजत नसल्यास आणि/किंवा कर्णबधीर असल्यास नाटकाचा आस्वाद घेता येणार नाही अशी (फक्त) कल्पना आहे.

पुन्हा, सक्तीने पैसा गोळा करून बंदी केल्यास (कराच्या पैशांतून) बंदी न्यायालयातही टिकणार नाही. खासगी देऊळ, प्रार्थनास्थळ असल्यास निर्बंधांचं काय याची कल्पना नाही. कोल्हापूरची महालक्ष्मी किंवा इतर कोणत्या देवळात जिथे स्त्रियांना प्रवेश नाही तिथे सरकारी अनुदान असतं का याची कल्पना नाही. धर्मदाय संस्था वगैरेंना लागू असणार्‍या कायदा-नियमांचीही मला कल्पना नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हे आपण मांडलेल्या चौकटीत नेमके कसे बसते?

विशिष्ट धर्माच्या प्रार्थनास्थळी इतर धर्मियांना मज्जाव असणं हे योग्य नाहीच असं माझं मत आहे. आता माझ्या मताला या बाबतीतली धोरणं ठरवणारे किती भीक घालतात हा मुद्दा वेगळा. त्यामुळे असल्या भेदभावांबाबत सुजाण लोकांची धारणा 'धर्म पाळण्यातलं नेसेसरी इव्हल' अशी असावी. ज्यांना धर्म पाळायचा आहे त्यांना हे मज्जाव पसंत असावेत. ज्यांना धर्म पाळायचाच नाही त्यांना काहीच फरक पडत नाही. मधले ऐशीएक टक्के देखल्या देवा दंडवत घालणारे असतात, त्यांनाही विशेष फरक पडत नाही. एखाददोन टक्के 'सर्व धर्मांनी कसं एक व्हावं, आणि मानवतेचं भलं करावं' असे विचार बाळगणारे असतील त्यांची पंचाइत होत असेल हे मान्य...

स्वामिनारायण मंदिराचं उदाहरण हे सेग्रेगेशन गॉन वाईल्ड स्टाइलचं वाटलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कायद्याप्रमाणे कोणाच्याही स्वातंत्र्यावर गदा येऊ नये, पाटोळेंनी मुद्दाम किंवा चुकीने असे केले असण्याची शक्यता असू शकते. चुनौती धारावाहिकचे लेखक हेच ते पाटोळे ही माहिती मिळाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता तर हे नाटक बघायलाच हवं
एवढं काय आहे त्यात Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

भेदाभेद करण्याची कदाचित गरज नाही.

काही पाच़कळ विनोद तद्दन पुरुषी आहेत असे मला वाटे*. म्हणजे स्त्रियांना ते सांगितले तर ते त्यांना विनोद म्हणून अ‍ॅप्रिशिएट करता येणार नाहीत अशी अटकळ होती. परंतु नंतर ओळखीतल्या स्त्रियांना ते विनोद** सांगितले असता त्यांना ते आवडले होते (कळण्या न कळण्याचा प्रश्नच नव्हता).

*मला जे वाटत असे तसेच पाटोळे यांनाही वाटत असल्याची शक्यता आहे.
** कॉलेजातील मुलांच्या पार्टीत गायली जाणारी (काही) प्रसिद्ध गाण्यांची विडंबने मात्र आवडणार नाहीत असे अजून वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

याविषयी काल आलेल्या बातमीत कुणी वर्षा देशपांडे नामक महिलाविषयक चळवळीतील कार्यकर्त्या म्हणतात -

अशा प्रकारची नाटकं येणं हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं विकृतीकरण आहे. तसेच अशा मानसिकतेतून आलेली नाटकं म्हणजे आपल्या मनातली भडास काढण्यासारखं आहे. हे म्हणजे एखाद्या बलात्कारापेक्षा किंवा हिंसेपेक्षाही अधिक भयानक आहे.

ठळक वाक्याशी तीव्र असहमती. नाटक कदाचित हीन अभिरुचीचं असेल, पण म्हणून अशा हिंसक कृत्यांशी त्याची तुलना करणं अप्रगल्भ वाटतं. अशा प्रकारचे कार्यकर्ते महिला चळवळीला हानिकारकच आहेत असं म्हणेन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

"अशा प्रकारचे कार्यकर्ते महिला चळवळीला हानिकारकच आहेत असं म्हणेन....."

एखाद्या कार्यकर्त्यावर वा कार्यकर्तीवर कुठल्यातरी प्रतिकूल प्रतिक्रियेच्या उदाहरणावरून त्याचा/तिचा चळवळीतील सहभाग म्हणजे हानिकारक असल्याचा बोल ठेवणे काहीसे अन्यायकारक आहे.

अ‍ॅड.वर्षा देशपांडे यांच्या 'लेक लाडकी अभियान' या चळवळीचा सन २००५ पासून तुम्ही एक अभ्यासक म्हणून आढावा घेतलात तर तुम्ही जाणू शकाल की साताराच नव्हे तर थेट मुंबई पुणे येथील सोनोग्राफी केन्द्रावर त्यानी त्या अभियानांतर्गत केलेल्या स्टिंग ऑपरेशन्स आणि त्यानंतरच्या पोलिस कारवाईचे पुरावे सापडतील. 'लेक लाडकी' अभियानामुळे त्याना संबंधिताकडून कशा तर्‍हेने मानसिक व्यावसायिक त्रास होत गेला याचेही सत्य किस्से आहेत. आज आमीर खानच्या 'सत्यमेव जयते' मुळे 'स्त्री भ्रुण हत्या' विरोधात रान उठविले गेल्याचे दिसते [जे योग्यही ठरेल], पण तब्बल ७ वर्षापूर्वीपासून अ‍ॅड.वर्षा देशपांडे प्रसंगी पदरी खार लावून ते कार्य करीत आहेत.

१५० कोटी रुपयांची 'सोनो-माया' मिळविणार्‍या बीडच्या डॉ.सुदाम मुंडे दांपत्याला अटक करण्यामध्ये पुढाकार याच अ‍ॅड.वर्षा देशपांडे यानी त्या मोहिमेद्वारे घेतला होता.

इतके सांगण्याचे कारण म्हणजे जरी वर्षाताईनी पाटोळे नाटकावर टीका केली असली तरी तो एक अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आपण मानायला हवा. समजा त्यांचे त्या संदर्भातील मत पटले नाही म्हणून मानले नाही... तरीही म्हणून त्या एका घटनेवरील टीकेमुळे त्या एकूणच 'महिला चळवळीला हानीकारक' आहेत असे म्हणू नये.

बाकी चालू द्या.

अशोक पाटील

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अ‍ॅड.वर्षा देशपांडे यांच्या 'लेक लाडकी अभियान' या चळवळीचा सन २००५ पासून तुम्ही एक अभ्यासक म्हणून आढावा घेतलात तर तुम्ही जाणू शकाल की साताराच नव्हे तर थेट मुंबई पुणे येथील सोनोग्राफी केन्द्रावर त्यानी त्या अभियानांतर्गत केलेल्या स्टिंग ऑपरेशन्स आणि त्यानंतरच्या पोलिस कारवाईचे पुरावे सापडतील.

समाजातील स्त्री-भ्रूणहत्येच्या अनिष्ट प्रथेवर नियंत्रण आणण्याची गरज मान्य करूनसुद्धा, सोनोग्राफीवर निर्बंध हा उपाय अतिरेकी, अयोग्य, 'उपायासाठी उपाय' नि 'डोकेदुखी होत आहे, तर शिरच्छेद करा' स्वरूपाचा अत एव अघोरी या कारणास्तव अमान्य असल्यामुळे, तसेच 'स्टिंग ऑपरेशन्स' वगैरे प्रकार हे केवळ सनसनाटी आणि वैयक्तिक प्रसिद्धीजनक अत एव केवळ पूर्णपणे निरुपयोगीच नव्हे, तर अंतिमतः उपद्रवी आणि घातक असण्याबद्दल धारणा असल्याकारणाने, सदर कार्यकर्त्रीचे सदर खाती कथित 'कर्तृत्वा'चे कोठलेही कौतुक वाटत नाही; क्षमस्व.

किंबहुना, सदर नाटकाबाबतीतील (ते नाटक एरवी कसेही आणि कोणत्याही निकषाने कितीही वाईट असले, तरी) त्यांची अभिव्यक्ती ही त्यांच्या उपरकथित 'कर्तृत्वा'शी सुसंगत असल्यास, केवळ या नाटकाबद्दलच्या अभिव्यक्तीमुळेच नव्हे, तर एकंदरीतच सदर मोहतरमा या महिला चळवळीस हानिकारक असण्याबाबत निश्चित कल्पना नाही, परंतु अंतिमतः समाजाने घेण्याच्या दिशेच्या दृष्टीने व्यापक समाजास हानिकारक असाव्यात, असे कोठेतरी वाटून जाते, इतकेच.

- ('सिविल लिबर्टीज़'वाला) 'न'वी बाजू.

इतके सांगण्याचे कारण म्हणजे जरी वर्षाताईनी पाटोळे नाटकावर टीका केली असली तरी तो एक अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आपण मानायला हवा. समजा त्यांचे त्या संदर्भातील मत पटले नाही म्हणून मानले नाही... तरीही म्हणून त्या एका घटनेवरील टीकेमुळे त्या एकूणच 'महिला चळवळीला हानीकारक' आहेत असे म्हणू नये.

वर्षाताईंचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य अर्थातच मान्य आहे. त्याचबरोबर, त्या 'महिला चळवळीस हानिकारक' आहेत असे (योग्यतः अथवा अयोग्यतः) मानणार्‍यांचेही अभिव्यक्तिस्वातंत्र्य मान्य आहे.

काय म्हणता?

- ('प्रत्येक गोष्टीस 'न' बाजू असू शकतात', हे मानणारा) 'न'वी बाजू.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"त्या 'महिला चळवळीस हानिकारक' आहेत असे (योग्यतः अथवा अयोग्यतः) मानणार्‍यांचेही अभिव्यक्तिस्वातंत्र्य मान्य आहे."

~ जरूर आहे. पण माझ्याकडून तशी एक संतुलीत अपेक्षा व्यक्त झाली होती, ती अशासाठी की वर्षाताई केवळ 'सोनोग्राफी स्टिंग ऑपरेशन' कार्यक्रमाशी संबंधित नसून अगदी १९९३ पासून त्या घटस्फोटीत महिला, सासूसासरानवरानणंद यांच्या छळांना त्रासून घर सोडलेल्या परित्यक्तांसाठी, त्याना सुसह्य स्वतंत्र जीवन जगण्याच्या संधी उपलब्ध व्हाव्यात तसेच त्यासाठी आवश्यक ते कायदेशीर सहाय्य उपलब्ध करून देतात (तेही मोफत), आणि त्यासाठी त्याना कित्येक समविचारी वकिल सहकारी मित्रांचे सक्रीय सहकार्यही मिळालेले आहे.

थोडक्यात त्या केवळ ए.सी.रूममध्ये बसून आपल्या स्त्रीविषयक कळकळीच्या भावना बोलून दाखवित नाहीत, तर खर्‍या अर्थाने फिल्ड वर्कर आहेत....अगदी मेधाताईंसारख्या. अशा कार्यकर्तीला एका ओळीत मोडीत काढू नये, असे वाटले म्हणून तितके सविस्तर लिहिले होते. बाकी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा मान्य आहेच.

अशोक पाटील

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सोनोग्राफी यंत्रांवर असणारा आक्षेप १००% मान्य आहे.
पण स्टिंग ऑपरेशन्स उपद्रवी का हे समजलं नाही. असे प्रकार सनसनाटी असतील तर ते निव्वळ निरूपयोगी ठरतील, उपद्रवमूल्य असण्याइतपतही गंभीर नसतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पण स्टिंग ऑपरेशन्स उपद्रवी का हे समजलं नाही. असे प्रकार सनसनाटी असतील तर ते निव्वळ निरूपयोगी ठरतील, उपद्रवमूल्य असण्याइतपतही गंभीर नसतील.

स्पष्टीकरणार्थ, अ‍ॅक्टनसाहेबाच्या नियमाचा निव्वळ उल्लेख येथे पुरेसा ठरावा काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे नाटक हीन अभिरूचीचं असेल हे पटण्यासारखं आहे. मुळात असे विनोद करणं ही स्त्री-पुरूषांची नैसर्गिक गरजच असेल, स्वभाव असेल तर तो दाबण्यात काय अर्थ आहे? वयाप्रमाणे असलेल्या पाचपोचानुसार हीन अभिरूची असणारे विनोद सर्व वयोगटातले लोक करतात.

डॉ देशपांडे यांच्याबद्दल फार तपशीलात बाकी माहिती नव्हती. किंबहुना त्यांच्या या इतर कामांमुळेच त्यांनी सार्वजनिक ठिकाणी अधिक जबाबदारीने विधानं करावीत असं वाटलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>

हे जरा चुकीचं वाटतंय. 'हीन अभिरूची' ही 'सौम्य विकृती' ह्या सदरात टाकता येईल. त्याल नैसर्गिक गरज असं काही म्हणता येणार नाही आणि समजा तसं असलं तरी पुढं "तर दाबण्यात काय अर्थ आहे"? असं म्हणता येत नाही.कोणतीही हीन अभिरूची आपल्या समोर आली "तर दाबण्यात काय अर्थ आहे"? असं म्हणून सोडून द्यावी काय?दिली जात असेल तर ते योग्य आहे काय?जालावरच्या हीन अभिरुचीच्या किंवा तश्या वाटणार्‍या प्रतिसादांबाबत प्रतिक्षिप्त कृती मग काय असावी?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'हीन अभिरूची' आणि सर्व वयाचे लोक हे म्हणताना माझ्या डोळ्यासमोर ह.पा.* वर विनोद करणारी लहान मुलंही होती. अशा प्रकारचे विनोद करणे ही काही प्रमाणात सर्व (किंवा बहुतांशी) लोकांची नैसर्गिक गरज असल्यास तिचे दमन अजिबात होऊ नये. (अन्यथा प्रेमळ, शांत, तुपाळ आज्याही अतिशय अश्लील प्रकारचे, पक्षी: हीन अभिरूचीचे, विनोद खासगीत सांगतात असे अनुभव अलिकडच्या काळात ओळखीतल्या काही स्त्रियांनी सांगितले.) थोड्या काळात अशा अभिव्यक्तीचा निचरा होऊन गेला तर इत:पर याचा त्रास होणार नाही. लैंगिक दमन झालेले लोक, विशेषतः पुरूष, त्याच समाजातल्या स्त्रियांना फार त्रासदायक वाटतात. या अनुभवावरून शिकलेलं शहाणपण म्हणा हवंतर.

जालावरही एखाद्याने, एखादीने किंवा काहींनी हीन अभिरूचीचे लिखाण केल्यास त्या लिखाणाचा निषेध करण्याचं, फटकवण्याचं, इ.इ. स्वातंत्र्य इतरांना असलं म्हणजे झालं.

*सार्वजनिक शिष्टपणाला अनुसरून लघुरूपं वापरली आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अशा प्रकारचे कार्यकर्ते महिला चळवळीला हानिकारकच आहेत असं म्हणेन.

वरचं त्यांच्या कार्याविषयीचं वर्णन वाचलं. ते प्रशंसनीय आहेच. मात्र त्यांच्या कर्तृत्त्वाचा पाया कुठच्या वैचारिक अधिष्ठानावर उभा आहे असा प्रश्न आहे. 'चावट' नाटकं तयार करणं हे बलात्कारापेक्षा भयंकर आहे असं म्हणणारी व्यक्ती बलात्काराचं क्षुद्रीकरण करते. त्याहीपुढे जाऊन लैंगिकतेकडे निकोपपणे पहाण्याचा मुक्त दृष्टिकोन नसेल अशी व्यक्ती लैंगिक भेदभावाच्या क्षेत्रातली पुरोगामी समजावी लागणं हे दुर्दैव आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राजेश जी.....स्टील आय फील वुई आर मिक्सिंग टू ईश्श्यूज इन वन डिश.

~ एखाद्या ललित कलाकृतीवर अनुकूल वा प्रतिकूल प्रतिसाद देणारी व्यक्ती आणि तिचे जर त्याच क्षेत्रात काही योगदान असेल तर तिच्या कलाकृतीवरील मताविषयी काहीतरी गांभीर्याने घेतले जावे, असे मी व्यक्तीशः मानतो.

चिं.त्र्यं.खानोलकरांच्या 'अवध्य' वर जो गदारोळ उठला होता तो इथल्या बर्‍याच सदस्यांना ज्ञात आहे असे समजतो. या नाटकाची बाजू घेणार्‍यामध्ये माधव मनोहर अग्रगणी होते तर त्याच्या चिंध्या करणार्‍यामध्ये ज्ञानेश्वर नाडकर्णी.....विद्याधर पुंडलिकांच्या 'सती' कथेबद्दल ना.सी.फडक्यानी रान उठविले तर ती कशी 'क्लासिक' आहे हे सिद्ध करण्यासाठी ग.वा.बेहरे पुढे सरसावले होते. [अशी अनेक उदाहरणे आहेत, पण विस्तारभयास्तव एवढी दोनच घेतो, इथल्या चर्चेच्या अनुरोधाने] ही दोन्ही उदाहरणे सांगतात की लिहिणारे साहित्यात जेवढे नामवंत, तितकेच त्यांच्या लिखाणाची बाजू घेणारे, विरोध करणारेही साहित्यक्षेत्रातीलच. त्यामुळे त्यांच्या मतांना {आपल्याला पटो वा ना पटो} महत्व येणारच.

'चावट संध्याकाळ' चे साहित्यमूल्य काय आहे याबाबत अगदी पाध्ये, रा.भा., द.भि. यांच्यासारख्यांनी मत मांडले तर त्यावर जरूर विचार केला जावा. पण अ‍ॅड.वर्षा देशपांडे यांचे 'लेखकाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य' यावरचे भाष्य ते साहित्याच्या संदर्भात नसून एकूणच समाजमनावर होणार्‍या परिणामावर आहे. त्यामुळे तसा काही परिणाम होणार नाही हे तुम्ही आम्ही मान्य केले तर मग वर्षाताईंच्या विधानाला तसा काहीच अर्थ उरत नाही [मी म्हणेनही की, "अ‍ॅड.वर्षा देशपांडे यांचे मत आत्यंतिक आहे"]. 'प्रत्यक्ष बलात्कारापेक्षा चावट नाटकातील शाब्दिक बलात्कार भयंकर होय' असे त्या म्हणाल्या याचा अर्थ लागलीच त्याना 'प्रत्यक्ष बलात्कार' कधी "भयंकर" वाटणार नाही असे फलीत कसे काय निघू शकते ? लोकसत्ताच्या वार्ताहराने जसा कविता महाजन याना प्रतिक्रिया विचारली, तशीच वर्षाताईना....आणि दोघी विदुषीनी त्या दिल्या, संपले......

मग केवळ त्या एका वाक्याने आपण अ‍ॅड.वर्षा देशपांडे यांचे १९९३ पासूनच्या त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील कार्याचे लागलीच मूल्यमापन करून त्यांचे कार्य त्या चळवळीला हानीकारक आहे असा निष्कर्ष काढण्यात घाई करीत नाही ?

अशोक पाटील

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ते वाक्य माझं नाही, त्यावरची टिप्पणी माझी आहे. एखादी व्यक्ती एकतर हानीकारक नाहीतर हितकारक असा काळा किंवा पांढरा युक्तिवाद मला करायचा नाहीये. मला म्हणायचं आहे की चळवळीसाठी कर्तृत्ववान आणि धडाडीचे कार्यकर्ते, व त्याचबरोबर योग्य विचार करून चळवळीला दिशा देणारं प्रखर बुद्धीवादी विचारसरणीचे नेते या दोन्हीची आवश्यकता असते. कार्यशीलतेपायी नेतृत्व आपोआपच मिळतं. त्यामुळे प्रवक्तेपणही येतं. पण अशा प्रवक्त्यांच्या वक्तव्यातून जर पुरोगामीत्व दिसून येत असेल तर ते चळवळीचं दुर्दैव आहे. वैचारिक अधिष्ठान योग्य नाही इतपतच टिप्पणी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण अशा प्रवक्त्यांच्या वक्तव्यातून जर पुरोगामीत्व दिसून येत असेल तर ते चळवळीचं दुर्दैव आहे.

वाक्यात काही गडबड झाली का? पुरोगामित्व-प्रतिगामित्वचा गोंधळ वगैरे? अर्थबोध होत तरी नाही आहे, किंवा काही विपरित, अनपेक्षित अर्थबोध होत आहे. (चूभूद्याघ्या.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रतिगामित्वच म्हणायचं होतं. चूक दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अशा प्रकारचे कार्यकर्ते महिला चळवळीला हानिकारकच आहेत असं म्हणेन.

सदर कार्यकर्त्रीच्या उपरोल्लेखित विधानाशी अर्थातच असहमत आहे, परंतु आपल्या या विधानाने एक शंका निर्माण झाली.

'महिला चळवळीस हानिकारक' म्हणजे काय? तर महिला चळवळीची जी काही उद्दिष्टे, जी काही तात्कालिक किंवा दीर्घकालीन साध्ये असतील, त्यांप्रति पोहोचण्याच्या प्रक्रियेस हानिकारक.

आता, महिला चळवळीची उद्दिष्टे आणि/किंवा तात्कालिक अथवा दीर्घकालीन साध्ये काय असावीत, हे कोणी ठरवायचे? (ज्यांच्याकरिता म्हणून ही चळवळ आहे, त्या) महिलांनी, की (त्यातही, या चळवळीचे प्रत्यक्ष चालन ज्यांच्या हाती आहे, अशा) कार्यकर्त्या महिलांनी, की (ज्यांच्याकरिता ही चळवळ अजिबात नाही, अशा, अजिबात चळवळबाह्य) पुरुषांनी?

नाही म्हणजे, आपण पुरुष आहात, अशा प्रामाणिक समजुतीखाली मी वावरत आहे, म्हणून विचारले. तसे नसल्यास मनापासून दिलगीर आहे.

अर्थात, या संदर्भात आपल्याला मत असण्याचा आणि आपण ते व्यक्त करण्याचा आपला अधिकार मान्य आहेच. पण तरीही, ते मत ग्राह्य धरण्याच्या दृष्टीने आपला 'लोकस स्टॅण्डाय' नेमका काय, असा प्रश्न मनास चाटून जातो, इतकेच.

(यावरून एक उपप्रश्नः महिला चळवळ ही फक्त महिलांसाठी असावी का? असा लैंगिक भेदभाव (असल्यास) तो योग्य ठरावा का?)

इत्यलम्|

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही प्रतिक्रीया अर्थातच वर्षा देशपांडेंनी हे नाटक न बघता दिलेली आहे (बघूच दिलं नाहिये ना कोणा बाईला हे नाटक). मग त्यांनी, 'स्त्रीयांना हे नाटक बघायला बंदी केलेली आहे म्हणजे यात अति महाभयंकर (बलात्कार किंवा काशाही पेक्षा) काही आहे' अस गृहित धरून तुम्ही म्हणताय ती प्रतिक्रीया दिली, तर काय चुकलं ?
नाटक पाहू दिलं असतं तर आपल्या कल्पनाशक्तिवर न अवलंबून राहता प्रतिक्रिया दिली असती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>त्या एका घटनेवरील टीकेमुळे त्या एकूणच 'महिला चळवळीला हानीकारक' आहेत असे म्हणू नये.

कुणाच्या चांगल्या कामाचा अनादर करायचा नाही, पण एक गोष्ट मात्र नक्की जाणवते; आणि हे फक्त महिला चळवळीपुरतंच नव्हे, तर अशा अनेक सामाजिक चळवळींत जाणवणारा हा एक समान धागा आहे : तळागाळात काम करणार्‍या प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्याचा सैद्धांतिक पाया मजबूत असेलच असं नाही, पण चळवळीचं नेतृत्व करणार्‍यांचा सैद्धांतिक पाया मात्र मजबूत असायला लागतो. सैद्धांतिक पाया खिळखिळा असणार्‍यांकडे नेतृत्व किंवा प्रवक्तेपण गेलं की व्यापक चळवळीची हानी होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अशोक पाटील म्हणतात त्याच या वर्षा देशपांडे असतील (त्याच असाव्यात असा अंदाज आहे) तर त्यांचा एकूण अनुभव पाहता त्या असे म्हणाल्या असाव्यात असे वाटत नाही. याचाच अर्थ प्रस्तुत दुव्यातील लेखनात गडबड आहे, ही शक्यता दाट आहे. तसे नसेल तर, वर्षा देशपांडे यांची ती चूक आहे. त्यापोटी त्यांचे बाकीचे योगदान एका फटकाऱ्यासरशी निकालात काढण्याची गरज नाही. वर्षा देशपांडे यांच्याकडे सैद्धांतीक बैठकीचा अभाव असावा, असे काहीसे चिंतातूर जंतू यांचा हा प्रतिसाद मूळ संदर्भातील प्रतिसादासोबत वाचला असता सूचीत होते. ते बहुदा त्यांच्या या विषयीच्या माहितीच्या अभावाचा किंवा मग अज्ञानाचा परिपाक असावा. अशा अज्ञानातूनच जर वर्षा देशपांडे यांचे बाकी योगदान त्या एका संभाव्य चुकीपोटी निकालात काढले जात असेल तर त्याला पोकळ बौद्धीक गंड म्हणावे लागेल. चिंतातूर जंतू यांच्यात असा गंड (अद्याप तरी दिसला) नसल्याने या दुरूस्तीची गरज व्यक्त होते, हे मात्र निश्चित.
वर्षा देशपांडे यांच्या स्टिंग ऑपरेशन्सबाबत वर 'न'वी बाजू यांनी स्टिंग ऑपरेशन्स केवळ सनसनाटीसाठी असतात अशा सुराचे लिहिले आहे. तोही या विषयातील माहितीच्या अभावाचा किंवा अज्ञानाचा परिपाक असावा.
आता हे अज्ञान किंवा माहितीचा अभाव म्हणजे काय हे सांगा, अशी मागणी करू नका. तुम्ही मंडळी निश्चितपणे तेवढी रिसोर्सफुल आहात हे दिसते आहे एकूण पवित्र्यावरून. तेव्हा ते रिसोर्सेस वापरावेत ही विनंती.
बाकी चालू द्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा (किंवा अशा प्रकारचा) प्रतिसाद माहितीपूर्ण असण्याची अपेक्षा होती, असते.

तुमची तुम्ही माहिती मिळवा आणि शहाणे व्हा, अशा प्रकारचा प्रतिसाद सार्वजनिक व्यासपीठावर देण्यामागचा कार्यकारणभाव काय? 'न'वी बाजू ज्याला बाजू म्हणतात तो प्रत्येक वेळीस पवित्रा असेलच असं काही नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्रमेय सांगणाऱ्यांना पाढे शिकवू नयेत, असे म्हणतात गावाकडे. तेवढेच!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रमेय (पाढे नव्हे!) चूक ठरवायचं असेल तर "हे चूक आहे" एवढंच म्हणून उपयोग होत नाही.
गावाकडचं किंवा पिढीजात शहाणपण प्रत्येक ठिकाणी उपयुक्त असतंच असं काही नाही. गणित (आकडेमोड नव्हे!) शिकताना सुरूवात ०

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्रमेय (पाढे नव्हे!) चूक ठरवायचं असेल तर "हे चूक आहे" एवढंच म्हणून उपयोग होत नाही.

छे... काहीही ठरवायचं नाही. आपलं मत मांडलं आणि, म्हणूनच, बाकी चालू द्या, असं लिहिलं आहे मूळ प्रतिसादात.

गावाकडचं किंवा पिढीजात शहाणपण प्रत्येक ठिकाणी उपयुक्त असतंच असं काही नाही.

असं मी म्हटलेलं नाही. तेव्हा तुमचं हे अतिरिक्त मत ठरतं.

गणित (आकडेमोड नव्हे!) शिकताना सुरूवात ०>१ हे सिद्ध करण्यापासून होते.

असेल बॉ...

तिथे "असं म्हणतात", "वडलांनी शिकवलंय" हे कामाचं ठरत नाही.

तुम्ही म्हणताय म्हणजे तसंच असावं.

इथे आकडेमोड नाही, गणिताचा विचार सुरू आहे. असो.

मग, माझं चुकलं. मला वाटलं, माणसं कशी बरोबर किंवा चूक याची इथं काही चर्चा सुरू आहे. त्यात दिसत असलेल्या शहाणपणाची श्रेणी दाखवण्यासाठी मी प्रमेय आणि पाढे ही वानगी दिली होती. चुकलं ते. असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

( वर्तमानपत्रातल्या जाहिराती इतक्या महाग झालेल्या असताना ) या विषयावरच्या नाटकाला इतकी प्रचंड प्रसिद्धी मिळाल्याने पाटोळे निश्चित खुश होत असणार....
मस्त... चालूद्या

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

+१
पाटोळ्यांचा हेतू साध्य झाला असावा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

मास्तर कसं मुद्द्याचं बोल्लात. परवा एबीपी माझावर या विषयावर अशीच चर्चा चाल्ली होती. तव्हा मनात मी हेच म्हनालो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

मग नाटक बायकांनी बघण्यासाठी चालु करायचं का नाही?
बाकी या नव्या बाजुवाल्यांचे प्रतिसाद कैच्या कैच असतात बॉ!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0