Skip to main content

छायाचित्रण पाक्षिक-आव्हान ५ : रात्र

पुढच्या पंधरवड्यासाठी विषय आहे: रात्र
कुण्या एका चित्रकाराचे उद्गार आठवतात की रात्र दिवसापेक्षा जास्त रंगीत व जिवंत भासते! तेव्हा आपल्या कल्पनाशाक्तीला भरारी द्या आणि येउद्यात फोटो.

स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत:
१. केवळ स्वतःने काढलेले छायाचित्रच स्पर्धेच्या काळात स्पर्धेसाठी प्रकाशित करावे. मात्र स्पर्धा काळ संपल्यानंतर, निकाल घोषित झाल्यावर त्याविषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही किंवा स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी धरले जाणार नाही
२. एका सदस्याला जास्तीत जास्त ३ चित्रे स्पर्धेसाठी प्रकाशित करता येतील.
३. आव्हानाच्या विजेत्यास पुढील पाक्षिकात आव्हानदाता आणि परीक्षक व्हायची संधी मिळेल. अर्थात आधीच्या आव्हानाचा विजेता पुढील पाक्षिकाचा विषय ठरवेल आणि विजेता घोषित करेल. (मग तो विजेता त्यापुढील पाक्षिकाचा आव्हानदाता व निरीक्षक असे चालू राहिल.)
४. एक स्पर्धा २ आठवडे चालेल. म्हणजे आज सुरू होणार्‍या स्पर्धेचा शेवट २६ ऑगस्ट रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल व २७ ऑगस्टच्या सोमवारी विजेता घोषित होईल व तो विजेता पुढील विषय देईल.
५. पाक्षिक आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचाराव्यात, निकोप टिपण्या करण्यावर बंदी नाही. मात्र हे आव्हान आहे हे लक्षात घेऊन जिंकण्यासाठी उगाच एखाद्याला टीकेचे लक्ष्य करू नये अशी विनंती.
६. आव्हानाचा विजेता घोषित करण्याचे पूर्ण अधिकार आव्हानदात्याचे असतील. त्यासाठी त्याने ठरविकच निकष लावावेत असे बंधन नाही. त्याने आव्हान द्यावे व त्याचे आव्हान कोणी सर्वात उत्तम पेलले आहे ते ठरवावे इतके ते सोपे आहे. शक्यतो ३ क्रमांक जाहीर केले जातील.(मात्र पुढील पाक्षिकात फक्त प्रथम क्रमांकाचा वीरच आव्हानदाता असेल).आव्हानदात्याकडून काय आवडले हे सांगण्याचे बंधन नसले तरी अपेक्षा जरूर आहे.
७. आव्हानदात्याला प्रथम क्रमांकाचा एकच आव्हानवीर घोषित करणे बंधनकारक आहे.
८. आव्हानात स्पर्धेसाठी प्रकाशित चित्रे प्रताधिकाराच्या दृष्टीने निकोप असावीत अशी अपेक्षा आहे.
९. आव्हानदाता स्वतःची चित्रे प्रकाशित करू शकतो मात्र ती स्पर्धेत धरली जाणार नाहीत.
१०. कॅमेरा व लेन्सची माहिती देणे बंधनकारक. शक्य असल्यास एफ्झिफ डेटा द्यावा.

चला तर मग! "रात्र" या विषयाला वाहिलेली छायाचित्रे येऊदेत!

नवी सूचना : 'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावर आपण काढलेले फोटो कसे प्रदर्शित करावेत याबद्दल अधिक मार्गदर्शन या धाग्यावर आहे. त्याचा लाभ घ्यावा.
फोटो अपलोड करताना, अपलोड करणार्‍यांनी जर Width आणि Height (दोन्ही) दिली नाही तर ते फोटो इंटरनेट एक्सप्लोरर (९) वर दिसत नाहीत. (पण फायरफॉक्सवर दिसतात.) यावर उपाय म्हणजे Width आणि Height दोन्ही द्यावेत किंवा त्यांचा उल्लेखच इमेज टॅगमधून डिलीट करावा. कृपया याची नोंद घ्यावी.

मागचा धागा: विषय - सावली आणि रवि यांनी टिपलेले विजेते छायाचित्र

स्पर्धा का इतर?

आतिवास Mon, 13/08/2012 - 22:03

१. रात्री चंद्राचा फोटो काढण्याची कसरत अनेकदा केली. फारशी कधी जमली नाही ती. हा त्यातलाच एक अपयशी प्रयत्न.

KODAK EASYSHARE M853 ZOOM DIGITAL CAMERA; Exposure:0.5 sec (1/2); Aperture: f/2.8; Focal Length:6.2 mm; ISO Speed: 200; Flash Used: Yes

२. कन्याकुमारीत सागरतीरावर रात्री डोकावून पाहणारे हे ग्रामीण स्त्री-पुरुष. तिथून विवेकानंद शिला स्मारक दिसत त्यावरच्या रोषणाईमुळे पण ते पाहताहेत का तिकडे?

KODAK EASYSHARE M853 ZOOM DIGITAL CAMERA; Exposure:0.5 sec (1/2); Aperture: f/2.8; Focal Length: 6.2 mm; ISO Speed: 200; Flash Used:Yes

३. मध्य प्रदेशातल्या भिंड जिल्ह्यातलं एक गाव. 'आजोबांच वय काय?" या माझ्या प्रश्नावर उत्तर मिळालं " अब तो उनकी जिंदगीकी रात हो गयी है ..."

KODAK EASYSHARE M853 ZOOM DIGITAL CAMERA; Exposure:0.009 sec (1/114); Aperture: f/4.7; Focal Length: 15.3 mm; ISO Speed:299; Flash Used: No

लंबूटांग Mon, 13/08/2012 - 22:58
From Random Snaps
Camera EASTMAN KODAK COMPANY
Model KODAK Z812 IS ZOOM DIGITAL CAMERA
ISO 64
Exposure 1.0 sec
Aperture 4.8
Focal Length 70mm
Flash Used false
From Random Snaps
Camera EASTMAN KODAK COMPANY
Model KODAK Z812 IS ZOOM DIGITAL CAMERA
ISO 64
Exposure 5.0 sec
Aperture 6.3
Focal Length 9mm
Flash Used false
From Random Snaps
Camera EASTMAN KODAK COMPANY
Model KODAK Z812 IS ZOOM DIGITAL CAMERA
ISO 64
Exposure 6.0 sec
Aperture 2.8
Focal Length 6mm
Flash Used false

ऋषिकेश Tue, 28/08/2012 - 09:20

In reply to by लंबूटांग

मला लंबुटांग यांचे तिनही फोटो अतिशय आवडले. तीन वेगळ्या आव्हानांना पेलणारी ही तीन चित्रे आहेत. मी चंद्राचे अनेक फोटो काढायचा प्रयत्न केला आहे पण हे असे (व मागे एकदा Nile ने दिले होते ते - कुठे उलथलाय तो देव जाणे - चंद्र नव्हे निळ्या!) मला आजतागायत जमलेले नाही. नुसता पांढरा पुंजका येतो. कोणता फिल्टर वापरला होतात का?

चंद्राचा प्रकाश डोळ्यांना शीतल भासत असला तरी प्रत्यक्ष फोटोत मात्र तो तुमच्या फोटोसारखा व्य्वस्थित गोलाकार न दिसता नेहमीच प्रकाशाचा पुंजका का दिसतो? :(

अनामिक Tue, 14/08/2012 - 19:18

लास वेगसमधे बलाजीओ ह्या होटेल समोरील तळ्यातील कारंज्याचं जवळ जवळ साडेपाचशे फूट उंचीवरून टिपलेला एक फोटू!

कॅमेर्‍याचे डिटेल्स
Camera: Canon EOS 60D
ISO: 1250
Exposure: 1/60 sec
Aperture: 5.6
Focal Length: 24mm
Flash Used: No

-अनामिक

फोटोची लिंक सुधारली आहे आणि इंटर्नेट एक्स्प्लोररमध्ये दिसावा म्हणून योग्य ते बदल केले आहेत. -- संपादक

भडकमकर मास्तर Tue, 14/08/2012 - 19:37

In reply to by अनामिक

मलाही दिसत नाहीये...
खूप उंचावरून असल्यामुळे असेल...
थोडया कमी उंचीवरून टाकला तर दिसेल कदाचित... ( ह.घ्या) ;)

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 20/08/2012 - 05:53

उत्तर अमेरिकेतली, शहरी भागातली* वटवाघळांची सर्वात मोठी वसाहत आमच्या शहरात आहे. ऑगस्ट महिन्यात सगळ्यात जास्त संख्येने वटवाघळं दिसतात. पिल्लं आणि त्यांच्या आया, अंधारायला लागली की बाहेर पडतात आणि आकाशात ढगच्या ढग दिसतात. हे बघायला शहरी लोकं अशी गर्दी करतात. ऑस्टीनमधला कॉग्रेस पूल, ऑस्टीन अमेरिकन स्टेट्समनच्या प्रांगणातून. सूर्यास्ताच्या दहा मिनीटं आधी, त्याच दिवशी, तिथेच किती "गर्दी" होती हे इथे पहा.

आत
एक्झिफः ISO 800, exp: 1/2 sec, aperture: 5.6, focal length: 18 mm

शब्दशः ढगात असताना काढलेला हा फोटो.

एक्झिफः ISO 3200, exp: 1/13 sec, aperture: 5.6, focal length: 55 mm

अवांतर १: रात्र म्हटल्यावर लगेच मास्टर शंकर यांचा "फादर, रात्र कुणी केली?" हा प्रश्न लगेच आठवला होता. त्याला समर्पक फोटो माझ्याकडे नाहीत.
अवांतर २: * अमेरिकेत सगळ्या गोष्टी अशाच predefined set मधे सगळ्यात मोठ्या, रुंद, लांब किंवा उंच असतात. एकोणीसाव्या शतकात उत्तर अमेरिकेत बांधलेली सर्वात रूंद इमारत किंवा पाण्याचा प्रवाह न अडवणारा, रंगरंगोटी नसणारा सर्वात लांब पूल असं काहीतरी. पण आकाराने जरा मोठी गोष्ट ह्या ना त्या प्रकारे महान असतेच.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 20/08/2012 - 09:18

In reply to by आतिवास

आत्ता थोड्या वेळापूर्वी या पुलावरून वटवाघळं बघताना आम्ही आपसांत हेच म्हटलं. वटवाघळंही एकमेकांना म्हणत असतील्, "हं. निघाले आता रस्त्यांवर गर्दी करायला. चला त्या अंधारातल्या झाडावरून बघू त्यांना."

भडकमकर मास्तर Mon, 20/08/2012 - 15:20

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

उत्तर अमेरिकेतली, शहरी भागातली* वटवाघळांची सर्वात मोठी वसाहत आमच्या शहरात आहे.

वाक्य मज्जेदार आहे... गद्य विडंबनकारांना खाद्य आहे ...

अवांतर : फोटु मस्त..

दुसरा फोटु प्रायोगिक नाटकासारखा वाटला... ती न नाट्ये असतात ना, तसे "न-फोटो" असतील तर त्यातला...

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 20/08/2012 - 22:30

In reply to by भडकमकर मास्तर

उत्तर अमेरिकेतली, शहरी भागातली* वटवाघळांची सर्वात मोठी वसाहत आमच्या शहरात आहे.
वाक्य मज्जेदार आहे... गद्य विडंबनकारांना खाद्य आहे ...

अलिकडच्या काळात याबद्दल गुर्जींशी चर्चा झाली होती तेव्हा आम्ही हाच विचार करत होतो. अमेरिकेत एवढे मराठी लोक असतील, त्यातले ५-१० टक्के तरी आपल्यासारखे छिद्रान्वेषी असतील. त्यातल्या कोणीच कधी अशा गोष्टींवर काही विनोद केल्याचं ऐकिवात नाही. असं कसं झालं!
एम्पायर स्टेट बिल्डींग, ही वटवाघळांची वस्ती, शिकागोतली कोणतीतरी इतर इमारत, कोणतीतरी गुहा, ग्रँड कॅन्यन झालाच, पण इतर अशा घळी, काय विचारू नका! शेवटी आता चान्स मिळाला वैताग प्रकट करण्याचा!

धनंजय Mon, 20/08/2012 - 22:56

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

कदाचित वाक्यातील शब्दक्रम बोजड किंवा बेढब वाटला असावा. (नाहीतर मला गद्य विडंबनकारांकरिता काय वैशिष्ट्य आहे, ते कळलेले नाही.)

उत्तर अमेरिकेतल्या शहरी भागांतील* वटवाघळांची सर्वात मोठी वसाहत आमच्या शहरात आहे.

असे वाक्य चालेल काय?

सर्वसाक्षी Sat, 25/08/2012 - 22:36

चावज्झौला गेलं की रात्री खाडीकाठी तिथल्या मंडळींबरोबर भटकायला जायचं हा माझा आवडता उद्योग. चेन. केनीस, चिंग वन सगळे उत्साहाने बरोबर यायचे. अशाच एका रात्री भटकंती करताना टिपलेलं हे दृश्य. मध्यरात्री सगळ कस शांत होतं अगदी पाणी देखिल. दिवसभर भ्रमंती करुन थकलेल्या मोटारबोटी सुद्धा शांत झोपल्या होत्या.
bridge

कॅमेरा ऑलिंपस सी ७७० युझेड, एक्सपोजर १/२, अ‍ॅपरचर २.८ आणि आय एस ओ १२५

पाच वर्षांपूर्वी राजस्थानला गेलो होतो. डिसेंबर महिना, रात्री पुष्करला तंबूत राहायची सोयसुद्धा होती, मात्र आम्ही आरक्षण केले नसल्याने मोह पडला तरी तंबू मिळणे शक्य नव्हते. आम्ही मुकाट्याने सहलीतल्या इअतर लोकांबरोबर आपल्या खोलिची किल्ली घेण्यासाठी रांगेत उभे होतो. आणि मी चार चौघाना व्यवस्थित ऐकु जाईल अशा आवाजात बायकोला म्हणालो, "बरं झालं त्या तंबूच्या भागडीत नाही पडलो. वाळूत रात्री साप निघाला मग?" बाण अचूक लागला. एका कुटुंबाने आपला तंबूचा बेत बदलला आणि आमची सोय झाली. मग ३१ डिसेंबर मस्त तंबूच्या ओसरीवर बसून समोरची जत्रा बघण्यात गेली.

tent lr

कॅमेरा ऑलिंपस सी ७७० युझेड, एक्सपोजर ०.४, अ‍ॅपरचर ३.२ आणि आय एस ओ ३२०

इजिप्तची प्रत्येक रात्र आठवणीत राहील अशी होती. अशाच एका रात्री कॉम आँबोचे मंदिर पाहताना इतके हरवून गेलो की बोटीवर परत जायची इच्छाच होत नव्हती. भव्यता आणि तिथली प्राचिन संस्कृती दाखविणारे मंदिराचे भग्नावशेष, नाईल वरुन येणारा झोंबरा गार वारा आणि आकाशात चंद्रकोर, मग तिथुन पाय कसा निघेल?
ko7

कॅमेरा निकॉन डी ६०, लेन्स निक्कॉर किट लेन्स १८-५५, एक्सपोजर १/२, अ‍ॅपरचर ५.६ आणि आय एस ओ ४००

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 26/08/2012 - 01:12

In reply to by सर्वसाक्षी

पहिल्या फोटोतला खालचा-वरचा काळा भाग कातरला तर मला अधिक आवडेल. तिन्ही फोटो आवडले. आणि तुम्हीही डांबिसपणा करता हे पण!

ऋषिकेश Tue, 28/08/2012 - 09:21

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

+१ तीनही फोटो मलाही आवडले.. चंद्रकोरीचा आकारही मस्ट टिपला गेला आहे. त्यावर माझी कशी फसगत होते ती कमेंट वर केलीच आहे

ऋषिकेश Sun, 26/08/2012 - 13:46

Camera SONY
Model DSC-W70
ISO 100
Exposure 2.0 sec
Aperture 2.8
Focal Length 6mm
Flash Used false

एल्सीडी स्क्रीनवर कुर्डुगडाचा आकार नीट दिसत नसल्यास थोडं वेगळ्या अँगलने पाहवं ;)

रवि Mon, 27/08/2012 - 15:05

खरतर आव्हान देन हेच एक आव्हान आहे याचि प्रचिति अगदि विषय काय द्यावा या प्रश्नापासून आलि.
एकुण ६ स्पर्धक व १५ छायाचित्र.
अदिती यांचा 'ढगात असताना काढलेला हा फोटो' व ऋषिकेश यांचा 'निबिड रात्री कुर्डुगड' हा प्रयत्न आवडला.

क्रमांक ३
लंबूटांग यांचा 'खोया खोया चांद'.
जर चन्द्राच्या सभोवतिचे व एकंदरच फोतोतले ढग अजुन स्पष्ट दिसते तर कदाचित अजुन बहार आलि असति.

क्रमांक २
ऋषिकेश यांचा 'निबिड रात्री कुर्डुगड'.
मला यातली minimalist शैली आवडली.

क्रमांक १
सर्वसाक्षी यांचा पुलाच्या प्रतिबिंबाचा फोटो.
हे प्रतिबिंब जनु शांत रात्रिची अनुभुती देनार प्रतिक. अशा अनुभुतीची आस ठसवुन देनारा म्हनुन कदचीत हा फोटो आवडला.

सर्व स्पर्धकांचे आभार व विजेत्यांचे अभिनंदन.

-रवि.

ऋषिकेश Tue, 28/08/2012 - 09:16

In reply to by रवि

आभार रवि!
सर्वसाक्षी यांच्याशी व्यनीतून झालेल्य संवादानुसार नव्या विषयाचे आव्हान नव्या धाग्यात दिले आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 29/08/2012 - 21:16

चंद्राचा प्रकाश डोळ्यांना शीतल भासत असला तरी प्रत्यक्ष फोटोत मात्र तो तुमच्या फोटोसारखा व्य्वस्थित गोलाकार न दिसता नेहमीच प्रकाशाचा पुंजका का दिसतो?

फोकसिंगचा प्रश्न नसेल असं गृहित धरून, चंद्राचा फोटो काढायला फार वेळ शटर उघडं ठेवावं लागत नाही. पण चंद्रप्रकाशात इतर गोष्टींवर फारसा उजेड नसतो त्यामुळे चंद्राचा दिसतो तसा आकार फोटोत हवा असेल तर इतर गोष्टींचं सिल्हूटही बहुदा दिसणार नाही. त्यावर उपाय म्हणजे HDR (high dynamic range) फोटो काढणे. त्याबद्दल अधिक माहिती विकीपिडीयावर आहे. (दुवा)

थोडक्यात कॅमेरा स्थिर ठिकाणी ठेऊन निदान तीन फोटो काढायचे. एक अतिशय अंधूक, (ज्यात चंद्र अगदी बरोब्बर दिसेल, पण इतर गोष्टी बहुदा दिसणार नाहीत.), एक मध्यम आणि एक अगदी अंधूक गोष्टी नीट दिसण्यासाठी ओव्हर-एक्सपोज्ड.
चंद्राचा फोटो काढताना अडचण अशी होते की असे तीन फोटो काढताना चंद्र आकाशात हलतो आणि तिन्ही फोटोंमधे चंद्राचे क्ष आणि य कोऑरडीनेट्स बदलतात. त्याबाबतीत माझी सूचना अशी की एकच, अंधूक फोटो चंद्र असताना काढायचा, बाकीचे चंद्राशिवाय, किंवा बाकीच्या फोटोंमधून चंद्र पुसून टाकायचा आणि मग तिन्ही फोटो एकत्र करायचे.

माझा असा एक फसलेला प्रयत्न. यात चंद्राच्या जागी प्रकाशित लोण्याचा गोळा दिसतो आहे. (फोटो फेसबुकावर आहे.) चंद्राचे सग्गळेच फोटो ओव्हरएक्सपोज झाले. (निदान चंद्राच्या खाली विमानाची शेपटी आली.)