जर वाघ्या कुत्रा, तर सिंहगडाचा कोसळलेला कल्याण दरवाजा आणि प्रतापगडाचे कोसळलेले बांधकाम का नाही

संभाजी ब्रिगेड ने वाघ्या कुत्रा फोडल्याचे वृत्त समजले. वाघ्याचा उल्लेख तत्कालीन अथवा उत्तरकालीन कागदपत्रे- अथव बखरिंमध्ये आढळत नाही म्हणुन वाघ्याचा पुतळा फोडण्यात आला . आणि या बातमीचे कोल्हापुरचे इंद्रजीत सावंत यांनी समर्थन केले. याठिकाणी आधीच स्पष्ट करतो की वाघ्याचा उल्लेख तत्कालीन अथवा उत्तरकालीनही कोणत्याही बघर अथवा पुस्तकामध्ये नाही हे मलाही माहीत आहे आणि याठिकाणी विषय वाघ्या अस्तित्वात होता की नव्हता हा इथे नाहीच आहे मूळी . या ठिकाणी संभाजी ब्रिगेड ने वाघ्याचा पुतळा फोडला .. हा विषय आहे. आणि या संभाजी ब्रिगेड च्या कारवाईला वाघ्या कुत्रा अस्तित्वातच नव्हता म्हणुन तो खनुन काढला असे समर्थन केले जाते. असे असेल तर अशांना माझा एक प्रश्न आहे. ..ज्याप्रकारे वनखात्याच्या जमिनिवर त्या मराठ्यांवरील आक्रमकाचे उदात्तिकरण झाले आहे ते तुझ्या डोळ्यात खुपत नाही का ? ज्या महाराष्ट्रात शिवा काशीदांच्या समाधीला साधे छत नाही त्याच महाराष्ट्रार त्या हरामखोर अफजलखानाची समाधी आत्तराने पुसली जाते हे पाहुन तुला काहीच वाटत नाही ? याचा साधा अर्थ संभाजी ब्रिगेड च्या लोकांना अफजलखाना पेक्षा वाघ्या कुत्रा जास्त धोकादायक वाटतो हे विषेश . आणि आता जर वाघ्या फोडलाच असेल तर पुढे अफजल खान समाधीचे अतिक्रमण कधी खणायचा संभाजी ब्रिगेड चा मानस आहे किंवा आहे पण कि नाही आणि नसेल तर का नाही ?? तसेच सिंहगडाचा कोसळलेला कल्याण दरवाजा आणि प्रतापगडाचे कोसळलेले बांधकाम करायची तयारी आहे का ??? या प्रश्नांची उत्तरे इंद्रजीत सावंत किंवा वाघ्या फोडणारे देतील का ??
वाघ्या कुत्र्याचा पुतळा फोडायची अक्कल आहे मग सिंहगडाचा कोसळलेला कल्याण दरवाजा आणि प्रतापगडाचे कोसळलेले बांधकाम स्वखर्चाने आणि स्वतःच्या हाताने बांधण्याची अक्कल नाही का आली? शिवराज्यअभिषेक दिनाच्या दिवशी पुतळा फोडणार होतात तेव्हा का नाही फोडला? कारण माहित होते की जमलेली सगळी गर्दी तुमच्या विचारांची न्हवतीच मुळात, आता जेव्हा कुणीच न्हवते तेव्हा फोडलात पुतळा? एवढीच धमक होती तर बांधायचा होता कल्याण दरवाजा, प्रतापगडाचे ढासळलेले बांधकाम. शिवाजी महाराजांना एका विशिष्ट जातीच्या चौकटीत अडकवत त्यांचे पुरेपुर अपहरण करण्याचा हा कट आहे. त्यासाठी जो मार्ग वापरला जात आहे तो सांस्क्रुतिक दहशतवादाचाच एक भाग आहे. तमाम महाराष्ट्रीयांनी या प्रव्रुत्तीपासुन सावध राहण्याची गरज आहे.जर वाघ्या तर सिंहगडाचा कोसळलेला कल्याण दरवाजा आणि प्रतापगडाचे कोसळलेले बांधकाम का नाही ?? आहे उत्तर वाघ्या फोडणार्‍यांकडे ??
अफजलखानचे अनधिकृत बांधकाम , शिवरायांच्या जवळ-जवळ सर्वज किल्ल्य्यांची होत चाललेली दुर्दशा सिंहगडाचा कोसळलेला कल्याण दरवाजा आणि प्रतापगडाचे आणि सिंधुदुर्गाचे कोसळलेले बांधकाम असे विषय जाणीवपुर्वक बाजुला सारुन वाघ्या कुत्र्याला टार्गेट करण्यामागे शिवरायांप्रती प्रेम अथवा भक्ती असणे शक्यच नाही.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

अहो साहेब सिंहगडाचा कोसळलेला कल्याण दरवाजा आणि प्रतापगडाचे कोसळलेले बांधकाम दुरुस्त केले तर फुकट प्रसिद्धी मिळते का जेवढी वाघ्याला फोडल्यावर मिळाली?

मला एक असाही प्रश्न आहे की अशा दुरुस्त्या करण्यासाठी पुरातत्व खाते परवानगी देते का? माहित नाही म्हणून विचारतो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखाची भाषा आक्रमक व भडकाऊ वाटली. कृपया अधिक संयत भाषेत मांडणी करावी ही विनंती. उदाहरणार्थ बिपिन कार्यकर्ते यांनी लिहिलेले वांग मराठवाडीच्या आंदोलनाविषयीचे लेख पहा. खऱ्याखुऱ्या माणसांच्या जीवनमरणाचा प्रश्न असलेल्या विषयावर लिहितानादेखील त्यांनी अतिशय सरळसाध्या पद्धतीने लेखन केलेलं आहे. त्या सरळपणामध्येच त्या लेखनाचं सामर्थ्य आहे. वाघ्याच्या पुतळ्याचा विषय निव्वळ राजकीय दृष्टिकोनातून पुढे आलेला आहे हे तुम्हीदेखील मान्य कराल. मग अशा विषयावर आक्रस्ताळेपणा करून व्यर्थ भडकलेल्या आगीत तेल घालण्याचं काम का करावं?

एकंदरीत सांस्कृतिक दहशतवाद वाढलेला आहे हे आसपास दिसतं आहे. जेम्स लेन प्रकरण, आंबेडकरांचं कार्टून काढून टाकण्याची मागणी... एकंदरीत अत्यंत क्षुद्र गोष्टींनी लोकांच्या भावना चटकन दुखावतात. अफझलखानाने तुळजापूरची मू्र्ती फोडली तरी खुद्द शिवाजी महाराजांनी भावना भडकू दिल्या नाहीत, हे अनेक लोक विसरतात. आंबेडकरांनीही भावना बाजूला ठेवून गांधींशी तह केला. खरे थोर पुरुष आणि त्यांच्या नखाचीही सर नसलेले पाठिराखे यांच्यातला फरक स्पष्ट दिसून येतो.

एकंदरीत लेखन जात्याधिष्ठित संघटनांच्या राजकारणी मारामाऱ्या भडकवणारं आहे. असं लेखन ऐसी अक्षरेच्या धोरणात बसत नाही. मुद्द्यांपेक्षा गुद्द्यांवर भर द्यायचा असेल तर जिथे अशा मारामाऱ्यांची आवड आहे अशी अन्य व्यासपीठं उपलब्ध असतीलच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्री.घासकडवी यांच्या मताशी पूर्णपणे सहमत.

श्री.महाजन यांचे वय मला माहीत नाही, पण भाषेच्या लेहज्यावरून [जी प्रत्यक्ष ब्रिगेड परंपरेतीलच वाटते] ते पंचविशीतील युवक असावेत असा काहीसा अंदाज करता येतो, तर त्या अनुरोधाने [वयाच्या ज्येष्ठतेच्या आधार घेऊन] म्हणतो की अशा लिखाणाने एकूण समाजमनावर कसलाही ओरखडा उमटत नाही. अशा घटना म्हणजे केवळ पोलिटिकल स्टंट असतो आणि त्या छायेतच राहू इच्छिणारे किडे त्यात उगवणार्‍या वेलीनाच कवटाळून घेऊन तेच द्वेषाचे पीक कसे तरारून उठेल हे पाहात असतात.

इंद्रजीत सावंत नावाच्या ब्रिगेड समर्थकाने तसा भडखाऊ पाठिंबा व्यक्त केला असेल.....अन् ब्रिगेडची ती परंपरा आहेच....पण म्हणून ते 'कोल्हापूर' चे असा फ्लॅग त्यांच्या नावासमवेत इथे जोडण्यात काय हशील ? मी कोल्हापूरचा आहे आणि ब्रिगेडच्या विरोधात इथे निघालेल्या दोन हजारांच्या मोर्चात सामील होतो, म्हणजेच कोल्हापूरसारख्या ऐतिहासिक महत्व असलेल्या गावातही ब्रिगेडच्या कृत्याचा धिक्कार करणारे लोक आहेत. त्यामुळे मुद्दा असा की, एखादी व्यक्ती एखाद्या घटनेबद्दल बाजूने वा विरोधात बोलते/लिहिते म्हणजे त्याचे मत ते समस्त त्या गावाचे असेल असे मानू नये.

[मुळात असे डोकेदुखीचे विषय सातत्याने संस्थळांच्या पटलावर येणे हीच अत्यंत अनुचित बाब असल्याने आता प्रशासकांनीच त्याना कितपत स्थान द्यावे याचा विचार करणे अगत्याचे झाले आहे.]

अशोक पाटील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ब्रिगेडविरोधात कोल्हापूरमधे असं काही झालं होतं याची कल्पना नव्हती. ही बातमी फारच आशादायक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सुरेश, अरे ती सगळी शरद पवारची पिलावळ आहे.स्कॉर्पिओ,आंगठ्या,पांढरे झबले,सोन्याचे घड्याळ ही ह्या पिलावळीची ओळख आहे.जास्त लक्ष देवू नकोस.
आपण आपला सुसंस्कृत चेहरा ठेवावा.
रमाबाई

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अंगावरचे किलो दीड किलो सोने पवारांच्या पिलावळीचे निदर्शक होती?

(सुसंस्क्रूत चेहरा पाहून भेलकांडलेला) आडकित्ता

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

मित्रांनो,
प्रतिसाधाबद्दल खुप खुप धन्यवाद , मि ऐसी अक्षरे वर नविन आहे. यापुढे आपल्या सुचना ध्यानात ठेवीन.
धन्यवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0