चिल्लर पार्टी

पुण्यात मुंढवा रोडवरील ' हॉटेल रिव्हर व्ह्यू ' मध्ये झालेल्या चिल्लर पार्टीच्या सविस्तर बातम्या दोन दिवस न्यूज चॅनेल्सवर झळकत होत्या. त्यानुसार ७०० च्या वर ९ वी ते १२ वी च्या मुलामुलींचा यात समावेश होता. ह्यातली बहुतेक मुले मुली दारू पिऊन स्विमिंग पूल आणि आजूबाजूला डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजात धिंगाणा घालत होती. काही मुलेमुली तर पोलिसांनी धाड टाकली तेंव्हा बोलण्या चालण्याच्या शुद्धीत नव्हती.

फेसबुक , ब्लॅकबेरी मेसेंजर, तसेच माऊथ टू माऊथ पब्लिसिटीमुळे ही पार्टी इतकी रंगली म्हणे.
मला पडलेले काही प्रश्न –

१. बहुतांश मुले ९ वी ते १२ वी ची आहे, त्यामुळे मराठीच असावीत असे वाटते, म्हणून परप्रांतीयांनी काही केले असे म्हणता येणार नाही, पार्टीचे आयोजक ही २१ वर्षे व आतले आहेत, एक सोडता बाकीचे तिघे मराठी आहेत. मराठी संस्कृतीचे माहेरघर समजण्यात येणाऱ्या पुण्यात अशी घटना अतर्क्य वाटते. ही पहिलीच पार्टी नसल्याचे कळते. नववी दहावी च्या मुलांना अश्या पार्टीला पालकांनी सोडलेच कसे? ही पहिलीच पार्टी नसल्याने मुलांच्या तोंडाला या आधी कधी दारूचा वास वगैरे पालकांना येत नसेल का? मुलांना व्यसनाधीन करण्याचे जाणीवपूर्ण प्रयत्न काही समाजघटक करत आहेत का?

२. शाळेतल्या मुलांना मोबाईल लागतोच कशाला? आपण शाळेत होतो तेंव्हा आपल्याकडे मोबाईल नव्हता, म्हणून आपल्याला काही त्रास झाला का? सुरक्षिततेचे कारण पटत नाही.

३. रिसोर्ट व्यवस्थापकाने पार्टीला वेगळाच रंग येतो आहे हे पाहून पार्टी वेळेतच का थांबवली नाही? रिसोर्टचा परवाना अजून रद्द कसा झाला नाही?

४. पार्टीत सहभागी एकाचीही शारीरिक तपासणी झाली नाही (त्यांनी ड्रग्ज वगैरे घेतले होते या दृष्टीने), असे का?

५. अशा पार्टीत जाणे हे सध्या शाळकरी मुलांसाठी प्रेस्टीज सिम्बॉल वगैरे बनले आहे की पिअर प्रेशर आहे की अशा पार्टीत आपण गेलो नाही तर इतर मुले कमी समजतील असे काही?

६. काही पालकांनी केलेल्या तक्रारीमुळेच पोलिसांनी धाड घातली असे कळते, पालकांना कळून त्यांनी आपल्या पाल्याला न दटावता पोलिसांना सांगावे हे जरा चमत्कारिक वाटते. योग्य वेळी स्वतःच मुलांना का समज देता येऊ नये?

७. पालकांच्या अतिलाडामुळे आणि कुठेही गप्पा बसा असे न सांगण्याच्या वृत्तीमुळे मुले अशी झाली आहेत का?

८. रु १२०० आणि रु. ७०० च्या जामिनावर या मुलांना सोडल्याचे कळते. परदेशात समाजसेवा वगैरे शिक्षा अशा मुलांसाठी असतात असे ऐकले आहे अशाच शिक्षा या मुलांना द्याव्यात का?

आपल्याला या बाबतीत काय वाटते?

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रसादा, अरे मुलेच ती.त्यांनी हे नाही करायचे तर आमच्यासारख्यांनी करायचे की काय? तुम्ही दारुच्या जाहिराती क्रिकेटपटूंकडून करून घेता.फिल्मवाल्यांच्या पार्ट्या,त्यातली 'विहंगम' द्रूष्येही पेपरांत दाखवता.टी.व्ही.वर गाण्याबजाव्ण्याच्या,नाचगाण्याच्या,सौंदर्यस्पर्धांना ऊत आणता.
हे असे असल्यावर मुलांनी शाळा,कॉलेज सुटल्यावर घरी येवून शुभं करोति म्हणावे अशी अपेक्षा आहे की काय?
(परखड्)रमाबाई

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विविध ठिकाणी याविषयी आलेलं वार्तांकन आणि प्रतिक्रिया रोचक होत्या. सुरुवातीला 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये आलेल्या ह्या वृत्तांकनावरून काहींचा असा समज झाला की मुलांच्या इच्छेविरुध्द त्यांना काहीतरी करायला भाग पाडलं गेलं. विशेषतः या विधानामुळे तो झाला असावा -

मुलगा टॉयलेटला जात नाही तोपर्यंत त्याला दारू सर्व्ह करायची, असा नियम या पार्टीत ठेवण्यात आला होता.

ही पध्दत विशेषतः बीअरबाबत वापरली जाते. फुकटात किंवा विशिष्ट रकमेच्या मोबदल्यात 'हवी तेवढी बीअर' अशी जाहिरात केली जाते, पण 'जोवर निचरा होत नाही तोवर' ही त्यातली 'फाईन प्रिंट' असते. म्हणजे कमीत कमी पैशात किंवा फुकटात अधिकाधिक बीअर पिण्याच्या हव्यासातून एखादा माणूस स्वतःच्या शरीरावर असे 'अत्याचार' करून घेतो. इथे अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्यामुळे कायद्याच्या दृष्टीनं त्या प्रकाराची जबाबदारी संयोजकांवर जाईल, पण 'फ्रेशर्स पार्टी'च्या नावाखाली असे प्रकार अल्पवयीन मुलांच्या बाबतीत सर्रास होताना कित्येक वर्षांपूर्वी पाहिलेलं आहे. त्यात स्पर्धात्मकता असायची, पण बळजबरी नसे. म्हणजे जो मुलगा अधिकाधिक काळ हे करू शकेल तो विजेता मानला जायचा, पण सोसेल तेवढंच ब्लॅडर प्रेशर प्रत्येकानं सोसावं हे त्यात अभिप्रेत होतं आणि मुलं ते पाळतही असत.

>>मराठी संस्कृतीचे माहेरघर समजण्यात येणाऱ्या पुण्यात अशी घटना अतर्क्य वाटते.<<

घटना अतर्क्य किंवा धक्कादायक वाटली नाही. मुंबई-पुण्यात हे प्रकार सर्रास चालतात. संस्कृती प्रवाही असते. मराठी संस्कृती बदलली आहे (आणि त्या बदललेल्या संस्कृतीचं माहेरघर पुन्हा पुणंच ठरतंय) एवढंच फार तर म्हणता येईल.

>>नववी दहावी च्या मुलांना अश्या पार्टीला पालकांनी सोडलेच कसे?<<

या वयाच्या मुलांना चांगलीच शिंगं फुटलेली असतात आणि पालकांच्या परवानगीशिवाय ती अनेक गोष्टी करत असतात. अर्थात, काही पालकांना याचा सुगावा लागला आणि त्यांनी तक्रार केली म्हणूनच हा प्रकार उघडकीला आला असावा.

>>मुलांना व्यसनाधीन करण्याचे जाणीवपूर्ण प्रयत्न काही समाजघटक करत आहेत का?<<

'काही समाजघटक' इतकं ते सोपं नाही. दारू, तंबाखू, गुटखा अशा अनेक गोष्टींच्या व्यापारातून सरकारला प्रचंड महसूल मिळतो. असलेले कायदे पाळूनही त्या गोष्टींचं मोठ्या प्रमाणात मार्केटिंग केलं जातं. चंगळवाद ही आता एक मूल्यव्यवस्था झालेली आहे. नव्वदीच्या दशकात स्वीकारलेल्या 'खाउजा' (भांडवलवादी) धोरणांचं आणि चंगळवादाचं वेगवेगळ्या मुद्द्यांच्या संदर्भात समर्थन करत असताना अनेक मराठी लोक मराठी आंतरजालावर आणि इतर अनेक माध्यमांतून दिसत असतात. मग त्या सर्व घटकांचा हा परिपाक आहे असं म्हणणं भाग पडतं.

>>रिसोर्ट व्यवस्थापकाने पार्टीला वेगळाच रंग येतो आहे हे पाहून पार्टी वेळेतच का थांबवली नाही? <<

पार्टीला असाच रंग येणं अभिप्रेत असणार असं सकृद्दर्शनी वाटतं. पोलीस आल्यामुळे वेगळाच रंग आला असं फार तर म्हणता येईल.

>>अशा पार्टीत जाणे हे सध्या शाळकरी मुलांसाठी प्रेस्टीज सिम्बॉल वगैरे बनले आहे की पिअर प्रेशर आहे की अशा पार्टीत आपण गेलो नाही तर इतर मुले कमी समजतील असे काही?<<

>> काही पालकांनी केलेल्या तक्रारीमुळेच पोलिसांनी धाड घातली असे कळते, पालकांना कळून त्यांनी आपल्या पाल्याला न दटावता पोलिसांना सांगावे हे जरा चमत्कारिक वाटते. योग्य वेळी स्वतःच मुलांना का समज देता येऊ नये?<<

>>पालकांच्या अतिलाडामुळे आणि कुठेही गप्पा बसा असे न सांगण्याच्या वृत्तीमुळे मुले अशी झाली आहेत का?<<

अडचणी अनेक बाजूंनी आहेत. मुलांची मनं-शरीरं बदलत आहेत आणि त्याबरोबर त्यांच्या आकांक्षादेखील पूर्वीच्या काळातल्या मुलांहून वेगळ्या आहेत किंवा त्या लवकर निर्माण होत आहेत याचा विचार या संबंधात कधीतरी करायला हवा. सुजाण पालक होण्यासाठीची पुरेशी जाण पालकांमध्ये आहे असं बर्‍याचदा या बाबतीत दिसत नाही. माझ्या आसपासचे अनेक पालक या बाबतीत गोंधळलेले, चिडलेले किंवा घाबरलेले दिसतात. 'आमच्या काळी असं नव्हतं' हे आता पुरेसं नाही (खरं तर कधीच पुरेसं नव्हतं). एकीकडे चंगळवादाचा पुरस्कार करायचा आणि दुसरीकडे असं काही झालं की घाबरून जायचं हे कसं चालेल? त्यामुळे पालकांच्या या भंजाळलेल्या वागण्याचा परिणाम मुलांवर होत असेल आणि परिस्थिती याहून खूप अधिक हाताबाहेर जात असेल, अशी शक्यता मला साहजिक वाटते.

उदाहरणार्थ, आज कायद्यानं अल्पवयीन मानल्या जाणार्‍या मुलांमधल्या शारिरीक संबंधांच्या बाबतीतला हा लेख पाहा. पाश्चात्य संस्कृती वेगळी आहे आणि आपली वेगळी असं म्हणून अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करायची सवय आता आपण सोडून द्यायला हवी असं या निमित्तानं म्हणेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

पुण्यात हल्ली असे प्रकार सर्रास चालतात हे थोडं जास्तच जनरलायझेशन वाटतं (मुंबई वेगळा मुद्दा आहे), उत्तम आर्थिक परिस्थिती असलेल्या वर्गाची मुले हा प्रकार कालही करत होती, आजही करत आहेतच, फक्त ती उत्तम अर्थिक परिस्थिती आजच्या उच्च-मध्यमवर्गाची (जो कालचा मध्यमवर्गिय होता) असल्याने चर्चा अधिक होते आहे असे वाटते.

ह्याचं एक मुळ पाश्चात्य संस्कृतिचं अंधानुकरण करण्यात आहे हे उघड आहे, हा प्रोजेक्ट एक्सचा दूवा पहा, जमल्यास सिनेमा पहा, मग येत्या काही वर्षातील पार्ट्यांचा अंदाज येईल.

चिंतातूरजंतूनी दिलेल्या दुव्यावरचा लेख वाचला, हलक्या-फुलक्या भाषेत लिहिला असला तरी लेख विचार करायला लावणारा आहे, पण विचार कोण करतो? घाबरलेल्या/गोंधळलेल्या पालकांची अवस्था शॉर्ट-टर्म मेमरीसारखी असते, भरती ओसरली की परत भोपळे चौक, ओळखीतल्यांचा मुलगा दहावीला आहे, दोन्ही पालक नोकरी करतात म्हणून मुलाकडे मोबाईल आहे, पालकांनी सोय बघितली, एकदिवस मोबाईलवरचा मेसज वाचल्यावर(अश्लिल विनोद) आईचं डोकं भंजाळलं, मग समाचार/रडारड वगैरे झालं, मोबाईल मुलाकडेच राहिला, पालकं त्यांच्या कामात परत गर्क, अशा भंजाळपणाचा काय उपयोग? काहींनी मोबाईल काढून घेतला असता, काहिंनीं मुलाला तंबी दिली असती, काहिनीं दुर्लक्ष केलं असतं पण मुलाशी 'नित्य-संवाद' हा प्रकार करणारे पालक कमी असतात.

अशा प्रकाराची जबाबदारी फक्त पालकांच्या माथ्यावर किंवा फक्त सरकारच्या माथ्यावर टाकता येणार नाही, ही संपुर्ण समाजाची जबाबदारी आहे, आजचा सकाळचा अग्रलेख एकांगी वाटतो, त्यात सरकारी यंत्रणा म्हणून फक्त पोलिसांचा उल्लेख आहे, तद्वत लोकसत्ताचा परवाचा लेखपण एकांगी वाटतो, हे राजकीय व कातडीबचाव धोरणाचे लेख वाटले, पालकांची, माध्यमांची, सरकारची, शिक्षणव्यवस्थेची अशा अनेक बाजूंचा अंतर्भाव अग्रलेखाच्या विश्लेषणात असायला हवा होता असे वाटते, बहूदा ह्या रविवारच्या पुरवणीत ह्यावर अनेक लेख पडतील त्यात विचार करण्यासारखे काही आहे का हे बघता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा (आणि वर चिंजंचा देखील) अत्यंत मार्मिक प्रतिसाद!

ओळखीतल्यांचा मुलगा दहावीला आहे, दोन्ही पालक नोकरी करतात म्हणून मुलाकडे मोबाईल आहे, पालकांनी सोय बघितली

यातील अधोरेखीत वाक्य अगदी खरंय! त्यात "फक्त" शब्द राहिला Wink

पण मुलाशी 'नित्य-संवाद' हा प्रकार करणारे पालक कमी असतात.

अचुक निरिक्षण!

"मुलांना गरजेपेक्षा अधिक गॅजेट्स किंवा एकूणच गरजेपेक्षा अधिक ऐहिक सोयींचा भडिमार करणं हे मुलाला वेळ देऊ शकत नाही ही बोच शमवण्याचं किंवा त्यातून तयार झालेल्या न्यूनगंडाचं लक्षण असतं" अश्या अर्थाचं वाक्य कुठेतरी वाचलं होतं ते आठवलं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सहसा अशा विषयावर लिहिताना/बोलताना आपल्या थोर्र थोर्र म्हणून एकमेव गणल्या गेलेल्या 'संस्कृती' चा असलेला/नसलेला झेंडा फडकाविण्याची साधारणतः सर्वमान्य अशी प्रथा असते आणि मग पाश्चात्य मॉलरुपी चंगळवाद कसा इथे अतिक्रमण करून राहिला आहे याबद्दल 'शेवग्याच्या शेंगा' धर्तीचे गळे काढीत राहायचे आणि जणू काही आता जगबुडी लांब राहिली नाही याची जपमाळ ओढत बसायचे.

~ मग अशावेळी चिंतातुर जंतू यांचा रोखठोक - टु द एक्झॅक्ट पॉईन्ट अ‍ॅन्ड बॅलन्स्ड - प्रतिसाद वाचला की जे समाधान वाटते, त्याचे मूल्य खूप आहे असेच म्हणेन.

चिंजं म्हणतात "मुंबई-पुण्यात हे प्रकार सर्रास चालतात. संस्कृती प्रवाही असते. मराठी संस्कृती बदलली आहे (आणि त्या बदललेल्या संस्कृतीचं माहेरघर पुन्हा पुणंच ठरतंय) एवढंच फार तर म्हणता येईल."

~ बिलिव्ह मी सर....केवळ वरील दोन मेट्रोतच नव्हे तर अस्सल मराठा समजल्या जाणार्‍या 'कोल्हापूर' सारख्या शहरातदेखील या बदलत्या संस्कृतीने चांगले दंडभर वळे दिसू शकतील असे बाळसे धरले आहे, आणि चंद्रकलेने ते वाढत चालले आहे. पन्हाळ्या सारख्या ऐतिहासिक महत्व असलेल्या स्थळाला आज जे 'टीनएजर्स पिकनिक स्पॉट' चे रुप आले आहे त्याने तेथील स्थानिक जनताच नव्हे तर पोलिस खातेही चकरावून गेले आहे. 'मिशन इम्पॉसिबल' स्टाईलने हेवी टू व्हीलर्स कोल्हापूर ते पन्हाळा मार्गावर घुमवायच्या आणि मागे एखादी कॅटरिना कैफ वा दीपिका पदुकोन असली की मग झूर्म्म्म्म्मला सीमा नाहीच. शिवाय ती स्कार्फने चेहरा झाकून घेण्याची फॅशन आता इतकी मुरली आहे इथे की एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमासाठी अपार्टमेन्टच्या पायर्‍या चढतानादेखील या ट्वीटिंग करणार्‍या मुलींना चेहरा झाकूनच प्रवेश करताना काही औचित्यभंग करीत आहोत याची फिकीर नसते.

शेवटी पन्हाळा पोलिसांनी गेल्या आठवड्यापासून 'चेहरा उघडा टाकूनच नाक्याच्या आत मुलींनी प्रवेश केला पाहिजे' असे फर्मान काढून तेथील पोलिस बंदोबस्त टाईट केला आहे. महालक्ष्मी, टेंबलाई, कात्यायनी, हणमंतवाडी आदी 'दैवी' ठिकाणावर छापे टाकून अगदी इयत्ता ९ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या पन्नासपेक्षा जास्त 'शिरोडकर' मुली आणि त्यांचे मुकुंदराव जोशी याना पोलिसांनी अटक केली. पण त्यांच्यावर आरोप तरी काय ठेवायचे यावर पोलिस खात्यातच प्रश्नचिन्ह उभे राहिले. मग, दोन्ही पक्षांच्या पालकांना ठाण्यावर बोलावून 'योग्य ती ताकीद' दिली. पत्रकारांनी ठाण्याच्या बाहेर गर्दी केली होती....पण ३०-३५ मुलांच्या पालकांना तर आपल्या चिरंजीवांनी केलेल्या 'पराक्रमा' चा चक्क अभिमान वाटत असल्याचे स्पष्ट दिसून येत होते. मुलींच्या पालकांनाही आपल्या कन्येने काही वावगे केल्यासारखे वाटत नव्हते.

असे प्रकार कमीजास्त प्रमाणावर अन्य छोट्यामोठ्या शहरातून चालत असतात आणि त्यामुळे संस्कृती रसातळाला गेली वा जाईल असेही काही नसावे.

आलिया भोगासी असावे सादर....इतकेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेहेरा लपवून काही करण्याचं हे समर्थन नाही.
पण ऊन, धूळ, धूर, प्रदूषण, वारा यांच्यामुळे चेहेरा खराब होतो. वायझरवाल्या हेल्मेटमुळे चेहेर्‍याचं रक्षण होतं, पण त्याची सक्ती नाही. शिवाय हेल्मेट वापरणं कूल नाही. स्कार्फमुळे अपघातांपासून रक्षण झालं नाही तरी अपघात रोज होत नाहीत. सूर्य, धूळ यांचा त्रास रोजचाच. रस्त्यावरून चालतानाही तोंडावर रूमाल धरून चालणारी काही माणसं मला माहित आहेत. तरूण मुली चेहेर्‍याच्या त्वचेची अधिक काळजी घेतात हे ही खरं आहे.

शिरोडकर आणि जोशी या मुलामुलीने 'शाळा'त जे केलं त्यात काही वावगं आहे असं मला तरी वाटत नाही. त्या वयात असणार्‍या कुतूहलापोटी एकमेकांशी थोड्या अधिक गप्पा मारणे, आणि एकमेकांना भेटणे यात काय नवल किंवा वाईट? जोश्या त्यापुढे जाऊन पोटापाण्याचीही चिंता करावी लागेल याचा विचार करतो.

मुलांशी संवाद नसणे आणि संस्कृती बुडण्याचं दु:ख याबाबतीत प्रतिसादांत व्यक्त झालेल्या मतांशी सहमती आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

संस्कृती रसातळाला, दुराचार फोफावला इ.इ. गळे तुमच्यासारखे चाकोरीबद्ध मानसिकतेचे लोक काढत राहतात आणि राहतील. तुम्ही जुनाट, बूर्ज्वा आणि दांभिक आहात. म्हणजे रात्री लागला चान्स की ओ म्हणस्तोवर ढोसणार आणि दिवसा मात्र 'अहो, कहर झाला. परवा अमक्याढमक्यांचा बारावीतला मुलगा चक्क झिंगून आला आणि आपल्या बापावर त्याने हातच टाकला' वगैरे गफ्फा मारत राहणार.

'थर्ड क्लासमधील माझ्या मुलाला त्याच्याच वयाच्या दोन-दोन गर्लफ्रेंड्स आहेत', 'मी माझ्या एट्थ स्टँडर्डमधल्या मुलाला ड्रिंकिंग मॅनर्स शिकवले आहेत ','माझी फॉट्टीन ईयर्सची मुलगी फक्त ब्रीझर्स घेते, हो' असे आम्ही चारचौघात मोठ्या अभिमानाने सांगू शकतो कारण आम्ही ओपन माईंडेड आहोत. तुम्हाला तसे म्हणता येत नाही म्हणून तुमची कीव वाटते.

आम्ही कसे नेहमी उत्साहाने फसफसते, आनंदी आणि हसतमुख असतो. जीवन असं मजेत जगता आलं पाहिजे. तुम्ही मात्र नेहमी काळजीग्रस्त, गंभीर आणि कंटाळवाणे असता. तुम्हाला नाहीच जगता येत तसं मजेत. अर्थात तुम्ही अल्पसंख्य होत जाणार याची खात्री आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धाग्यावरील प्रतिसाद हे दोन्ही टोकाचे वाटतात. त्यांत जे झाले ते गैर आहे, असेही वाटत नसणारे प्रतिसाद आहेत. संस्कृती बदलत जाते हे मान्य आहे. पण प्रत्येक वेळी पालकांनाच दोष देणे हे कितपत योग्य ? काही मुले ही, कितीही समजावले, लक्ष ठेवले तरी, ऐकण्याच्या पलिकडे गेलेली असतात. त्यांचे पालक ती सुधारावीत म्हणून प्रयत्नही करतात. अशा वेळी त्या पालकांनी काय करावे ? ऐकत नसेल तर घराबाहेर काढणे, हा काही उपाय होऊ शकत नाही. घरांत कुठल्याही प्रकारची व्यसने न करणारे, साधे नाकासमोर जगणारे पालक आणि तरीही त्यांची वाया गेलेली मुले, अशी उदाहरणे मी पाहिली आहेत. त्यामुळे सरसकट पालकांना दोष देणे मला योग्य वाटत नाही. तसेच, 'हे आता वाढतच जाणार, आपणच मनाची तयारी केली पाहिजे' असले विचारही दुसर्‍या टोकाचे वाटतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही मुले ही, कितीही समजावले, लक्ष ठेवले तरी, ऐकण्याच्या पलिकडे गेलेली असतात.
भयंकर सहमत. "समजावून सांगा, त्याच्या कलाने घ्या" वगैरे वगैरे सर्व काउन्सिलिंगछाप प्रकर करुन पाहिल्यावरही काही कार्टी वांडच राहतात. समजावूनही साम्गितले तरी ऐकेना म्हणून हातापायपडून सांगितले, भावनिक आवाहन केले तरी समजण्याच्या स्थितीत नसतात.बरे, बदडून काढावे तर अजूनच बंडखोर होतात ही भीती आहेच. त्यास इलाज नाही. आई बापांची एकूण प्रतिमा चांगली, भली माणसे अशीच(म्हणजे अनुकरणाने वाईट गोष्टी शिकला, असे म्हणायची सोय नाही.)त्याच कार्ट्याची इतर भावंडे सालस , सज्जन क्याटेगरीत येणारी पण अशा ठिकाणीही कुठून तरी एकदम कमालीचे औद्धत्य्,बेमुर्वतपणा आणि स्वनाशाचा मार्ग चोखाळणारा कुणी तरी उपजतोच. (वाईट पहिल्या दोन गोष्टींबद्दल तितकसं वाटत नाही, पण तिसर्‍या गोष्टीबद्दल नक्कीच वाटतं.)
निसर्गाची किमया म्हणा, लॉ ऑफ प्रोबाब्लिटी म्हणा. काहीतरी आहे खास.
.
शहाणपणाची गोळी बाजारात पैसे देउनही मिळत नाही. ती उपजत घेउन यावी लागते समजूतदारपणासारखी किंवा चार थपडा खाउनच ती मिळते; थपडा खाउन जगला-वाचलात तर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आपले सामाजिक आदर्श आणि व्यक्तिगत आदर्श यात फार तफावत आहे. भ्रष्टाचार असू नये हा आपला सामाजिक आदर्श आहे पण 'मी कसा/कशी कामं करुन घेण्यात वाकबगार आहे' अशी वल्गना करणा-यांना आपण थोर मानतो. मुलं आणि मार्केट हे दोघेही ही दांभिक तफावत बरोबर पकडतात. या घटनेतही असेच घडले आहे. अशा घटना घडतात तेव्हा मोठमोठ्या पातळ्यांवर चर्चा होतात, काही लोक हळहळतात .., काही काळ सावध होतात लोक .. मग सारे काही पुन्हा मूळपदावर येते.

शाळेत मुलां-मुलींनी मोबाईल वापरु नये अशा प्रकारचे नियम एखाद्या शाळेने केले तर बहुसंख्य पालकांच्या प्रतिक्रिया काय असतात हे पाहणे रोचक ठरावे.

थोडे अवांतरः दिल्लीत एकदा एका बसस्टॉपवर दुपारी दोनच्या सुमारास एक मुलगी आणि तिचे तीन मित्र उभे होते. त्या भागात एक मल्टिप्लेक्स आहे - ते बहुधा सिनेमा पाहून आले असावेत. त्यांचे जे काही चाळे चालले होते, त्यावरुन ते शुद्धीत नव्हते हे उघड होते. मला त्या मुलीची (आणि मुलांचीही, ते सगळेच वयाने लहान होते - १५-१६ वर्षांचे असावेत) काळजी वाटली. पण त्यांना काही बोलायची माझी हिंमत झाली नाही. दिल्ली पोलिसांची एक गाडी तिथून दोन-तीन फे-या मारुन गेली. बस मिळाली नाही म्हणून मी मेट्रो स्टेशनकडे चालत निघाले. बसस्टॉपपासून थोड्या अंतरावर मला पोलिसांची ती गाडी पुन्हा दिसली. मी थांबून त्यांच्याशी त्या मुलीबाबत बोलले. त्यावर पोलिसाचा प्रतिसाद मार्मिक होता: "यांच्या आई वडिलांना नाही काळजी. काही घडलं की मात्र पोलिसांच्या नावाने सगळे ओरडायला तयार. आम्ही या पोरांना काही ओरडलो तर लगेच त्यांचे आई बाप येतील तक्रार करत - तेवढे मात्र जागरुक असतात ते! जबाबदारी सगळी आमची कशी असेल? आम्हालाही काळजी वाटते म्हणून तर आम्ही इथं थांबलो आहोत, पण आमचेही हात बांधलेले असतात अनेकदा .." त्याचं म्हणणं मला विचारात पाडणारं होतं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"....जबाबदारी सगळी आमची कशी असेल?..."

धिस इज समथिंग टु थिंक अबाऊट.
त्या दिल्ली पोलिस प्रवक्त्याचे काहीच चुकीचे नाही, सविताताई. त्या चाळे चौकडीतील किमान एक तरी 'हाय प्रोफाईल' वाल्या बापाचे अपत्य असते आणि समजा जरी त्याना पोलिस स्टेशनवर आणले तर ते बेगुमानपणे चक्क ठाणे अंमलदारासमोरच 'डॅडी, डॅडी....कम इमेजिअटली' असा मोबाईलवरून टाहो फोडतात, मग ते श्रीयुत बाप स्टेशन इन्चार्जला आपली ओळख करून तर देतोच, शिवाय 'गरीब कोकरू' पोरांना तिथून आणण्याकरीता होंडा सिटी कारही पाठवितो. हे चित्र दिल्लीच काय पण अन्य राज्यातही सर्रास दिसू लागले आहे. ठाणे अंमलदार त्यानंतर आपल्याच पोलिसांच्या अंगावर खेकसतो...'साल्यांनो, तुम्हाला काही अक्कल ? कुणी सांगितले तुम्हाला या पोरांना घेऊन यायला ?" त्यामुळे आता अशा फिरत्या व्हॅन्सही फक्त 'रक्तपात' दिसून आला तरच तिकडे लक्ष देत असतात, अन्यथा....'मरो सालो !"

अशोक पाटील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक प्रतिसाद आहेत. चिँजं नी दिलेल्या लिँक वरुन काही महीन्यांपूर्वी TOI मधे वाचलेली बातमी आठवली.
'१२+ वय असेल आणि वयातला फरक २ वर्ष असेल तर तो बलात्कार मानु नये असा बील/कायदा त बदल करावा' अशी शिफारस NCW करणार आहे अशी ती बातमी होती .त्याचं पुढे काय झालं माहीत नाही. आता लिँक मिळत नाहीय.
अवांतर: Lolita वाचलं आहे. पण टिन-अडल्ट मधलं सेक्शुअल रिलेशन मला ठीक वाटलं नाही. अशा केस मधल्या अडल्ट्स ना मी सहानुभुती देउ शकणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संस्कृती वगैरे बुडल्याचं दु:ख आहे का?
मुलं - मुली मोकळेपणाने वागताहेत ह्याचा त्रास आहे का ?
की अल्पवयीन मुलांनी मद्यसेवन करणे बेकायदेशीर आहे इतकीच तक्रार आहे?
स्वतः जे पितात त्यांना " आपल्या पाल्यांनी कधीही पिउ नये" असं वाटतं की "निदान लहानपणी पिउ नये " असं वाटतं?
ह्यापेकी पहिल्या क्याटेगरीतील काही लोक परिचित आहेत. बहुतांश व्यसनाधीन असल्याने त्यांना तसं वाटतं. जालावरती भेटणारे दुसर्‍या क्याटेगरीतले अधिक दिसतात.
अशा गप्पांमध्ये आणि चर्चांमध्ये आमच्यासारखे न पिणार्‍यांची अवस्था a kid wandering in topless bar अशी असते.(खास गोंधळलेले लोक. ना धड जुने, ना धड पुढारलेले.) ही तिसरी क्याटेगरी.
अदितीची प्रतिक्रिया स्पष्ट असल्यानं आवडली. "बाप रे अमुक अमुक असं काही होतय...." असं म्हटलं की सर्वसाधारण जनता बावचळल्यासारखी करते.
ज्यांचे विचार स्पष्ट आहेत त्यांतल्या काहींना "अच्छा , असं का? पण त्यात काय एवढं" असे प्रश्न पडतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

>>उत्तम आर्थिक परिस्थिती असलेल्या वर्गाची मुले हा प्रकार कालही करत होती, आजही करत आहेतच, फक्त ती उत्तम अर्थिक परिस्थिती आजच्या उच्च-मध्यमवर्गाची (जो कालचा मध्यमवर्गिय होता) असल्याने चर्चा अधिक होते आहे असे वाटते.<<

इथे हेदेखील लक्षात घ्यायला हवं की निम्न आर्थिक स्तरातल्या मुलांनासुद्धा छानछोकीची किंवा रेव्ह पार्टीची आवड असते. ते ती आपल्याला जमेल तितकी भागवतात. गणेशोत्सव, नवरात्र अशा निमित्तानं गल्लीबोळांमध्ये रात्री उशीरापर्यंत चिमुकल्या रेव्ह पार्टी होत असतात. त्यामुळे हे समाजाच्या विशिष्ट स्तरापर्यंत मर्यादित नाही.

>>काही मुले ही, कितीही समजावले, लक्ष ठेवले तरी, ऐकण्याच्या पलिकडे गेलेली असतात. <<

हे कोणत्याही काळात खरं असतं. इथे मात्र मुद्दा केवळ अशा काही मुलांपुरता आहे असं वाटत नाही. 'साधी राहणी, उच्च विचारसरणी' वगैरे पूर्वी ऐकू येणार्‍या गोष्टी आता फारशा ऐकू येत नाहीत; अन् आताची छानछोकीची आवड ही फक्त काही मुलांपुरती मर्यादित आहे असं वाटत नाही. त्यामुळे 'हाताबाहेर गेलेली ही काही मुलं आहेत झालं' इतकंही ते सोपं राहिलेलं आहे असं वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अल्पवयीन मुलामुलींनी एकत्र येणं : ठीक. मात्र त्यांनी गर्भनिरोधके वापरावीत, त्याबाबत किमान प्रबोधन झालेलं असावं. मुलामुलींच्या ग्रुपबाहेरच्या सेक्शुअल प्रिडेटर्स पासून ते सुरक्षित असावेत. त्यांच्या पालकांची सहमती असेल तर प्रश्नच नाही. नाहीतर कुणाला आवडो न आवडो , पालकांच्या नकळत असे प्रकार होतात. ते निदान "सुरक्षित" रीत्या झाले म्हणजे पत्करले.

अल्पवयीन मुलामुलींनी दारू पिणं : गंभीर. हे बेकायदेशीर आहे. त्यांना दारू पुरवणारे कायद्याने गुन्हेगार आहेत. यात काही वैद्यकीय दृष्टीकोनातून अल्पवयीन मुलांना इजा होईल अशी भीतीही (प्रथमदर्शनी) जाणवते. इथे पुन्हा एकदा, पालकांची संमती असणे बहुदा कठीण आहे. तशी असली तर काय प्रश्नच मिटला. पण पुन्हा, असे प्रकार लपूनछ्पून होतात. आपल्यापैकी अनेकांनी अल्पवयीन अवस्थेत सिगारेट्/दारू यांची चव घेतलेली असणे मला शक्य वाटते. याबाबत "होलिअर दॅन दाऊ" असणं भोळसटपणाचं आणि कोंबडे झाकून ठेवलेल्या म्हातारीसारखं आहे.

शहरीकरणाच्या प्रक्रियेतून आपला समाज अधिकाधिक परमिसिव्ह बनत चाललेला आहे. या अशा परमिसिव्ह कल्चरच्या कक्षेत दररोज प्रचंड संख्येने नवे लोक येत आहेत. फटीफटीतून पुराचे पाणी घरात शिरावे तसं हे आहे. आपला दृष्टीकोन अधिक खुला ठेवणे आणि मुलांच्या वर्तनाकडे नैतिकतेच्या अंगाने पहायच्या ऐवजी त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पाहणे , त्या दिशेने त्यांच्याशी संवाद साधणे हाच मला तार्किक मार्ग दिसतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

ज्या सुबत्तेचे आणि जीवनशैलीचे आपल्या सगळ्या समाजाला आकर्षण आहे त्यातली एक एक पायरी चढताना काहींनी संस्कृतीच्या नावाने गळे काढणे विसंगत वाटते.
उक्ती आणि कृतीतला भेद कमी करून या गोष्टींकडे वस्तुनिष्ठपणे पाहिल्यास यात तितके काही वाईट वाटणार नाही.
मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पाहणे आणि त्यांच्याशी संवाद साधणे हा सैद्धांतिक मार्ग झाला. प्रॅक्टिकली ते ज्याच्या-त्याच्या घरातल्या वातावरणावर आणि मुलांशी असलेल्या मोकळ्या संबंधांवर अवलंबून आहे.
पालक-मुलांचा संवाद नसल्याने असे होते असा एकंदरीत सूर दिसतो. जणू काही मुलांशी बसून बोललं म्हणजे मुलं लगेच आपल्याला हवी तशी वागतील. माझ्या लहानपणी लोकांना भरपूर वेळ असूनही असं बसून कोणी संवाद साधल्याचं आठवत नाही. मुलांची समज आणि इच्छा-आकांक्षा कुटुंबातल्या आणि आजूबाजूच्या वातावरणातून येते आणि मुलं अनुकरणातून शिकतात. चिंतातूरजंतू यांच्या प्रतिसादात हे बरोबर मांडले आहे.

अवांतरः मुलांच्या सुरक्षिततेसाठी आणि संपर्कात राहण्यासाठी मोबाईल फोन्स घेऊन दिलेले असतात त्याचा काही उपयोग झाला नाहीसे दिसते. कदाचित व्हिडिओ फोन्स आल्यावर हा 'प्रश्न' सुटेल. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथे हेदेखील लक्षात घ्यायला हवं की निम्न आर्थिक स्तरातल्या मुलांनासुद्धा छानछोकीची किंवा रेव्ह पार्टीची आवड असते. ते ती आपल्याला जमेल तितकी भागवतात. गणेशोत्सव, नवरात्र अशा निमित्तानं गल्लीबोळांमध्ये रात्री उशीरापर्यंत चिमुकल्या रेव्ह पार्टी होत असतात. त्यामुळे हे समाजाच्या विशिष्ट स्तरापर्यंत मर्यादित नाही.

सहमत, पण निम्न स्तरातल्या मुलांचे पार्ट्यांबद्दलचे आकर्षणाचे मुळ मिडियामुळे उघड झालेल्या उच्च-मध्यम-वर्गाच्या सामाजिक आचारात आहे असे वाटते, त्यांच्याकडून ह्या मुद्द्यावर चिंतन अपेक्षित नसल्याने तो स्तर ग्राह्य धरला नव्हता.

फटीफटीतून पुराचे पाणी घरात शिरावे तसं हे आहे. आपला दृष्टीकोन अधिक खुला ठेवणे आणि मुलांच्या वर्तनाकडे नैतिकतेच्या अंगाने पहायच्या ऐवजी त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पाहणे , त्या दिशेने त्यांच्याशी संवाद साधणे हाच मला तार्किक मार्ग दिसतो.

प्रतिसाद थोडा टोकाचा वाटला, नैतिकतेच्या कल्पना पिढी-दर-पिढी बदलत असल्याने दृष्टीकोन किती खुला ठेवावा हाच मुद्दा कळीचा आहे, पाणी पुराचे आहे तर फक्त सुरक्षितता हा मुद्दा अप्लमुदतीसाठी योग्य वाटतो, अन्यथा हे म्हणजे समजेच्या वयापर्यंत अनामत रक्कम जपून ठेवण्यासारखे वाटते.

पालक-मुलांचा संवाद नसल्याने असे होते असा एकंदरीत सूर दिसतो. जणू काही मुलांशी बसून बोललं म्हणजे मुलं लगेच आपल्याला हवी तशी वागतील. माझ्या लहानपणी लोकांना भरपूर वेळ असूनही असं बसून कोणी संवाद साधल्याचं आठवत नाही. मुलांची समज आणि इच्छा-आकांक्षा कुटुंबातल्या आणि आजूबाजूच्या वातावरणातून येते आणि मुलं अनुकरणातून शिकतात.

संवाद साधल्याने फारसे काही होत नाही, त्यामुळे संवाद वगैरे साधू नये असे काहिसे प्रतिसाद वाचून वाटते, हे मात्र संवाद-स्थळावर सांगणे रोचक वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संवाद साधल्याने फारसे काही होत नाही, त्यामुळे संवाद वगैरे साधू नये असे काहिसे प्रतिसाद वाचून वाटते

संवाद साधू नये असे म्हणायचे नसून एकाच घरात राहणार्‍या लोकांनी संवाद साधावा हे सांगावे लागते हे विचित्र वाटते असे म्हणायचे होते. संवाद म्हणजे काहीतरी ठरवून बोलणे असं थोडीच असतं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निदान पुण्या-मुंबईत नोकरी करणारे पालक 'सहज' संवाद साधण्यासाठी वेळेवर उपलब्ध नसतात, त्यामुळे वेळ काढून संवाद साधणे गरजेचे दिसते, जिथे वेळ उपलब्ध आहे तिथे पाल्याचे वर्तन नियमितपणे गैर वाटत असल्यास संवाद साधला जात नाही हे लक्षात येते, तेथे देखिल संवाद साधणे गरजेचेच दिसते, वर्तन गैर वाटो अथवा न वाटो सहज किंवा मुद्दाम संवाद साधणे गरजेचेच वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

द म्हणजे काहीतरी ठरवून बोलणे असं थोडीच असतं?

काही वेळा होय. सगळेच विषय नेहमीच्या सहजच्या बोलण्यात येतीलच असे नाही.
किंवा काही विषयांवर पालकांशी बोलल्यावर कशी रिअ‍ॅक्शन येईल हे मुले इतरांच्या पालकांच्या रिअ‍ॅक्सन वरून आधीच अ‍ॅझ्युम करतात आणि त्या विषयांवर बोलायचे टाळतात. अश्या वेळी विविध मुद्द्यांवर आपण आपल्या पालकांशी बोललो तर ते दरवेळी सकारात्मक चर्चा करतात हा विश्वास मुलांच्यात तयार होईपर्यंट खास ठरवून बोलावे लागते असे वाटते (पालक म्हणून स्वानुभव नाही - पाल्य म्हणून अश्या ठरवून बोलण्याच्या फायद्याचा स्वानुभव आहे Smile )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

संवाद म्हणजे काहीतरी ठरवून बोलणे असं थोडीच असतं?

वयात येणार्‍या मुलींशी त्यांच्या आई, बहिणी, काकू, मावश्या निश्चितच अशा प्रकारे ठरवून बोलत असाव्यात. माझ्या परिसरातल्या ज्या मुली/स्त्रियांना विचारलेलं आहे त्यांच्याशी घरी त्यांच्या आईने मुद्दाम बसून संवाद साधल्याचं, ठरवून बोलल्याचं उत्तर मिळालं. माझाही अनुभव असाच आहे. आधी येताजाता बोलणं होत असेल तरीही पहिल्या मासिक पाळीच्या वेळेस अगदी ठरवून, समोर बसवून बोलणं झालेलं आहे. अशा बोलण्याला dialogue म्हणावं का monologue असा प्रश्न विचारता येऊ शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

गैरसमज होतोय. मोठ्या (आणि उघड न दिसणार्‍या) बदलांच्यावेळी असा ठरवून केलेला संवाद वेगळा आणि पार्टी, व्यसनं किंवा जनरल सवयी यांच्या बाबतीतला संवाद वेगळा. पार्टी ही काही इतकी मोठी घटना नाही की त्यासाठी मुद्दाम वेगळे बसून बोलावे लागेल. घरात आई-बाप मुलांसमोर पीत असतील, घरात व्हिस्की-वाईनच्या बाटल्या असतील तर मुलांना पीणं ही खूप वाईट गोष्ट अर्थातच वाटणार नाही आणि त्याबद्दल अगदी ठरवून आत्ताच तू प्यायची नाही, मोठा झाल्यावर पी असे सांगितले (ते वाईट आहे हे सांगू शकत नाहीत) तरी मुलांना त्या गोष्टी नेहमीच्या वाटत असल्याने आणि टीनेजर मुले स्वत:ला लगेच मोठं झालो असं समजत असल्याने त्या संवादाचा फारसा फरक पडत नसेल असं मला म्हणायचं आहे. हेच ज्या घरात प्यार्ट्या होत नाहीत, दारूचे नाव निघाले तरी, टीव्हीवर दारूच्या जाहिराती दिसल्या तरी आई-वडील वाईट प्रतिक्रिया देतात अशा घरातल्या मुलांना अशा ठरवून केलेल्या संवादाची गरज पडणार नाही असे मला म्हणायचे आहे (अर्थात अशी मुलेही पीअर प्रेशरने वाहवत जाऊ शकतातच म्हणा, पण स्वत:हून असं काही करण्याची शक्यता कमी).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

<< आलिया भोगासी असावे सादर....इतकेच. >>
आपल्या हातात फक्त हेच उरलंय अशोक मामा.

मुळात दारू पिणे हेच चूक आहे. त्यात संस्कृती वगैरे न आणणेच उत्तम.

पाश्चात्य संस्कृतीच्या अनुचित प्रभावाबाबत म्हणायचं, तर सोप्पं आणि आरामात घेता येईल अशा गोष्टी आपण (किंवा कोणीही) घेतो. दूरदर्शनवर केतकी माटेगावकरने उत्तम सांगितलं. आपण पाश्चात्यांचे कष्ट, १६व्या वर्षापासून घराबाहेर राहून हॉटेल वगैरे मधे काम करुन स्वतःचं शिक्षण करणे, जाज्वल्य देशाभिमान, इत्यादी गोष्टी आपण घेत नाही. पण दारू पिणे, शनि-रवि सुट्टी, डेटिंग, वगैरे उचलायला आपण लगेच तयार.

वर जाणकारांनी उपाय सुचवले आहेतच, त्यात एक भर टाकू इच्छितो. - दारू प्यायल्यावर शरीरात काय बदल/प्रक्रिया होतात, हे स्पष्टपणे मुलांना पुराव्यासहित सांगितले तर उपयोग होईल असे वाटते. मुलांशी संवादात याची भर पडावी.

आपल्या शरीराला काय उपयोगी आहे आणि काय नाही याची जाणीव झाली तर असले प्रकार कमी होऊ शकतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दारू या संदर्भात एकच मत पटतं आणि ते कसोशीनं पाळतोही..

"एखाद्याला वाटलं तर त्यानं सकाळी वाटीभर डांबर उकळून प्यावं, फक्त त्याचं तत्त्वज्ञान करू नये"

हे मूळ पुलंच वाक्य.. माझी जोड.

"एखाद्याला वाटलं तर त्यानं सकाळी वाटीभर डांबर उकळून प्यावं, फक्त त्याचं तत्त्वज्ञान करू नये" - आणि न पिण्याचंही.

लहान मुलांबद्दल बोलायचं तर, वैद्यकीय शास्त्रानुसार घातक ठरलेले पदार्थ सेवन करण्यास कायद्यानंच बंदी असावी. सज्ञान झाल्यावर सर्व परिणाम समजून घेउन हवं ते करायला आपल्या जबाबदारीवर आपण मोकळे असतोच.
(सज्ञान होईपर्यंत सर्व परिणाम समजून घ्यायला आपल्याला सक्षम केलं जात नाही हेच काय ते छोटंसं दु:ख आहे. )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0