डांग जिल्ह्यात आणि आसपासच्या परिसरात समाजसेवा करणारे स्वामी असीमानंद हे हिंदूंच्या दृष्टीने एक थोर व्यक्तीमत्व. त्यांनी डांग जिल्ह्यात केलेल्या कामामुळे आज तिथल्या आदिवासी समाजात समृद्ध भारतीय संस्कृतीविषयी बर्यापैकी जागृती निर्माण झाली आहे. स्वामी असीमानंद हे मुळात अभियांत्रिकी चे पदवीधर. उच्चशिक्षित असूनही नोकरी-व्यवसाय करण्यात समाधान न मानता इथे येऊन त्यांनी हे अवघड कार्य हाती घेतले आणि तडीसही नेले.
यात उल्लेखिलेले स्वामी असीमानंद हे हेच का? एक दोन तीन चार
आता थांबतो...
बाकीचा लेख माहितीपूर्ण. :-)
श्रावण, ती लिंक इथे देण्याचं प्रयोजन समजलं नाही :(
हे तेच असावेत बहुतेक. नाहीतरी देशप्रेमी हिंदूंना पकडून त्यांना अतिरेकी असं लेबल लावायला हिंदूद्वेष्टे काँग्रेससरकार तत्पर आहेच. देशप्रेमी आणि देशद्रोही अतिरेकी यात फरक त्यांना समजत नाही. असो.
असीमानंद हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. ती स्वतंत्रपणेच करू. लिंक दिली, कारण 'हे तेच का' असा प्रश्न आला म्हणून. तुमच्या लेखनात "हिंदूंच्या दृष्टीने एक थोर व्यक्तीमत्व..." असे उल्लेख असल्याने हा प्रश्न आला. त्यांना थोर ठरवणारी काही माहिती मला आंतरजालावर मिळाली नाही; नाही तर, तीही लिंक दिली असती. तशी लिंक असेल तर जरूर द्या. माणसं समजून घ्यायला मदतच होते. तरी मी फक्त वेबसर्च केला, न्यूज सर्चमध्ये केवळ विरोधातील माहितीच पुढे येते आहे.
त्यांना थोर ठरवणारी काही माहिती मला आंतरजालावर मिळाली नाही;>>>
तरी मी फक्त वेबसर्च केला, न्यूज सर्चमध्ये केवळ विरोधातील माहितीच पुढे येते आहे.>>
हिंदूंमधल्या कडव्या विचारांच्या लोकांना थोर ठरवणारी माहिती अशी आंतरजालावर सापडत नाहीच. हल्लीच्या काळात तर नाहीच नाही. शबरीधामाचं निर्माण केलं हाच थोरपणा :) शिवाय हिंदूंसाठी काही चांगलं काम केलं तर त्याला प्रसिद्धी मिळणं दुरापास्तच. बाकी अनेक गोष्टी उघड बोलायची सोय नसल्यामुळे इथेच थांबतो. चर्चा स्थळावरच होऊ दे.
श्रामो, लिंक्सबद्दल धन्यवाद. लेख वाचून "देऊळ" सिनेमा आठवला. कंधमाळ मधील हिंसाचारी थैमानाचीही आठवण झाली. सेम टू सेम.
असो.
दण्डकारण्य हा प्रकार फार मोठा आहे. पार गुजरातपासून तिकडे ओरीसाच्या मध्यभागापर्यंतच्या प्रदेशाला कुठेही दण्डकारण्य म्हणू शकता. आणि वाटेल त्या ठिकाणी रामाची पावले इथेच पडली होती असे ठासून सांगणारी श्रद्धाळू मंडळी भेटतील. ज्या दगडांवर बसून रामाने शबरीची बोरे खाल्ली तो दगडही बर्याच ठिकाणी सापडेल असे मला वाटते. शबरी भिल्ल जमातीची आदिवासी होती असे गुजरातातील श्रद्धाळू म्हणतील, तर ओरीसात "शबर" (सबर, सौर, सअर) अशीच आदिवासी जमात सापडेल. छत्तीसगढमध्ये शबरी नावाची नदी बस्तर जिल्ह्यात वाहते. बस्तर शेजारच्या कोरापूट जिल्ह्यात साबेरी नावाची नदी वाहते - साबेरी हे शबरीचे स्थानीक बोलीतील रुप. कोरापूटमधील जगन्नाथ मंदीराला तर साबर श्रीक्षेत्र असेच म्हणतात. पंडीत नेहरुंनी "दंडकारण्य प्रोजेक्ट" सुरु केला होता - तो बस्तर आणि कोरापूट जिल्ह्यांमध्ये. श्रद्धेला आव्हान देण्यात अर्थ नाही, आणि जिथे श्रद्धा आहे, तिथेच शबरी आहे, त्यामुळे मला काही म्हणायचे नाही. ही माहिती या निमित्ताने आठवली एवढेच.
बाकी शबरी स्वतःला हीन जातीतील वगैरे समजत असेल असे मला तरी वाटत नाही. कारण - १. जर कथेतच सांगितल्याप्रमाणे तिने रूढी परंपरांना आक्षेप घेऊन बंड पुकारुन घर सोडले असेल, तर ती उच्च आत्मसन्मान असणारी स्त्री असणार. २. आदिवासी हे हिंदु वर्णाश्रम किंवा जातींच्या उतरंडीत कुठेच बसत नाहीत. त्यामुळे ते ("हिंदु" धर्मातील) कुणाहीपेक्षा उच्च किंवा नीच असण्याचा प्रश्नच येत नाही. आजही येत नाही; तर (ज्या काळात राम झाला असे आपण मानू) त्या काळातही हा प्रश्न येणार नाही.
आजच्या पर्यटकांची किंवा भक्तांची केलेली क्रूर चेष्टा अशी की ज्या शबरीने साधकांच्या मार्गातले काटे दूर केले, त्याच शबरीच्या मंदिराकडे जाताना मात्र काट्याकुट्यासम असलेल्या वाईट रस्त्यांमधून जावे लागते.
तरी बरे, गुजरातमध्ये हिंदुद्वेष्टे काँग्रेस सरकार नाही. नाहीतर त्यांनी प्रॉपर काटेच प्लँट केले असते रस्त्यांमध्ये!
आळश्यांचा राजा व आडकित्ता - अपेक्षित प्रतिसाद. धन्यवाद ;)
रच्याकने, विकीपीडियाच्या लिंक्स अनेकदा विनोदी असतात. अशाच लिंका मीही देऊ शकतो. पण वाद वाढवण्याची इच्छा नाही. कारण कंधमाल असो की गोधरा दोन्ही बाजू जाणून घेण्याची गरज कुणालाही वाटत नाही असेच दिसते. काहीही हिंदू दिसले की आधी कुशंका काढायला जायचं ही वृत्ती बरी नव्हे.
तसेच हा विषय इथे आणण्याची गरज नव्हती. विषयाला धरून बोललात तर बरे होईल.
पंपा सरोवर!
फोटू लै भारी काढले आहात आपण. त्या बंधार्याला पंपा सरोवर म्हटलेत अन तिथे आंघोळी करणारे मद्यधुंद थवे पाहिलेत तर इतके देवभक्तीचे आवरण आणून इथे लिहिणे कठिण आहे..
शबरीच्या फोटोखाली लिहिलेले पूर्ण वाक्य काय आहे हो? ;)
रस्ता पण चांगला डांबरी आहे. नंदूरबारकडून गेलात तरीही रस्ते चांगलेच आहेत..
स्वामी असीमानंद यांच्यासंदर्भातील मजकूर मूळ लेखनातून काढून टाकलेला दिसतो. त्यामुळे, खाली मी आणि लेखक यांच्यात झालेला संवाद असंदर्भ ठरतो आहे. एक तर तोही संवाद उडवावा, किंवा मूळ लेखातील मजकूर ठेवावा.
माझ्या मते मूळ लेखातील मजकूर तसाच ठेवावा. असीमानंद थोर आहेत, वगैरे लेखकाची मते आहेत. ती तशीच राहू द्यावीत. त्यावर चर्चा झाल्याने धाग्याला वेगळे वळण लागते असे ज्यांना वाटत असेल ती त्यांची मते आहेत. धाग्यात तसा मजकूर आला असेल तर त्या अनुषंगाने चर्चा होणारच. वाटल्यास ती चर्चा स्वतंत्रपणे बाहेर काढता येऊ शकते.
श्रावण, मला इथे चर्चेत कुठलाही वादग्रस्त मुद्दा यायला नको आहे. कारण एकाला थोर म्हटलं की दुसरा तो कसा थोर नाही हे सांगत पुढे येतोच येतो. त्यामुळे तो मुद्दा काढला आहे. तो बाहेरच राहिलेला बरा.
त्या अनुषंगाने झालेला संवाद उडवण्यास हरकत नाही. :)
मंदार जोशी यांच्या रुपाने ऐसी अक्षरे वर एका उत्साही आणि तितक्याच अभ्यासू सदस्याचे आगमन झाले आहे ही बाब अतिशय समाधानाची वाटते. भटकंतीची आवड तर स्पष्टच दिसत्ये, पण त्या निमित्ताने त्या त्या ठिकाणाच्या वैशिष्ठ्यांचा इतिहासाचा मागोवा घेण्याची त्यांची चिकाटी कौतुकास्पद मानावी लागेल.
शबरी आणि बोरे....बस्स....आतापर्यंत इतकीच मामुली माहिती...तीही रामाचे गुणगान गाणारी कहानी.... पण मंदार यानी लिहिलेले "शबरीने आश्रमाची व तिथल्या रहिवाशांची लहान-मोठी कामे करण्याबरोबरच ज्ञानार्जनही सुरु केलं." हा तपशील अनोखाच तसॅच आनंददायीच मानावा.
छान वाटले लेख वाचून आणि प्रकाशचित्रे पाहून.
[काहीसे अवांतर : शेवटी लेखात.....प्रकाशचित्रे सुरू होण्यापूर्वी "करवीरपीठाच्या शंकराचार्यांनी....' असे टंकले गेले आहे...ते कृपया 'शंकराचार्यांनी' असे करावे.]
खरेतर (निकोप) चर्चेसाठी अनेक उत्तम मुद्दे या लेखात आहेत. स्वामी असीमानंद वजा केले तरीही. पर्यटन - एका बाजूला पर्यटनाविषयी सरकारची अनास्था - पर्यटकांची क्रूर चेष्टा इत्यादि, त्याचवेळी पर्यटकांनीही केलेला "पराक्रम"; काट्या-कुट्यांतून वाट काढत जाऊन तिथे कचरा करणारे भक्त; गुजराती साडी नेसून बोरे चाखत असलेली शबरी; समृद्ध भारतीय संस्कृतीविषयी आदिवासी लोकांमध्ये जागॄती निर्माण करणे, इत्यादि. पण लेखकाचा काही प्रतिकूल ग्रह झालेला दिसतो, त्यामुळे चर्चा होणार नाही असे वाटते. असो.
भक्ती, श्रद्धा याविषयी मला केवळ आणि केवळ आदरच आहे, हे आवर्जून नमूद करतो. पण त्या आदराचा माझ्या बाकी निरीक्षणाशी आणि मतांशी काही संबंध नाही.
लेख वाचल्यापासून 'विचारतो,विचारतो' म्हणत होतो पण धैर्य होत नव्हते. इतर कोणालाच ही शंका आलेली नाही, आपल्याला आली असे दाखवले तर आपणच अडाणी ठरू ह्यामुळे धैर्य होत नव्हते पण अखेरीस ठरविले की विचारूनच टाकू.
धाग्याचे मूळ लिखाण ही हिंदूंच्या आंधळ्या श्रद्धाळूपणावर आणि पुराणातली वांगी खरीच आहेत असे मानून चालण्याच्या प्रवृत्तीवर केलेली understated, tongue-in-cheek अशी टिप्पणी आहे असे मला प्रारंभी वाटत होते. लेखातील काही वर्णने विश्वासार्हतेच्या पलीकडची आहे, जसे की 'अमक्याच दगडावर बसून राम आणि लक्ष्मणांनी शबरीची बोरे खाल्ली' हे वर्णन,'अमक्याच पर्वतावर ते शबरीला भेटले' हे वर्णन, किंवा गीतरामायणातील भावनाच शबरी बोलून दाखविते, इ.इ. ह्याला पुरावाहि नाही आणि परंपराहि त्याच्या मागे नाही तरीहि लेखांमध्ये हे सर्व संपूर्ण शक्य आहे आणि सिद्धहि झालेले आहे असे मानूनच सर्व लिखाण केले दिसते. थोडेफार आधुनिक शिक्षण असलेला कोणी २१व्या शतकात हे सगळेच तितक्याच गंभीरपणे लिहीत असेल हे दुरापास्त वाटले आणि म्हणून असा ग्रह झाला की हे लिखाण औपरोधिक प्रकारचे आहे.
चर्चेने घेतलेले पुढचे वळण मात्र ह्याच्या संपूर्ण उलटे आहे. प्रस्तावक आणि प्रतिसाद देणारे हे दोनहि पक्ष पूर्ण गंभीरपणाने आपापले विचार मांडत आहेत असे जाणवते. म्हणून वर उल्लेखिलेला गोंधळ माझ्या मनात उत्पन्न झाला आहे.
गीतेतल्या अर्जुनाप्रमाणे मी 'सम्मूढचेतस्' झालो असून 'यच्छ्रेयः स्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे' अशी प्रार्थना करत आहे.
(धाग्यामधील लेखन विनोदी असले काय अथवा गंभीर असले काय, मला त्यावर येथे त्याच्या बाजूने वा विरोधात काहीच म्हणावयाचे नाही. मला त्याचे स्वरूप काय आहे तेव्हढेच सांगा अशी विनंति आहे.)
~ ॐ ~ ॐ ~ ॐ ~ ॐ ~ ॐ ~ ॐ ~ जय श्री राम ~ ॐ ~ ॐ ~ ॐ ~ ॐ ~ ॐ ~ ॐ ~
इतक्या आधी घडलेल्या गोष्टींचा काय डोंबल सबळ पुरावा असणार? तरीही वरील लेखनात मी 'दंतकथा आहे' असा उल्लेख केलाच आहे. असो.
त्याचं काय आहे ब्वॉ, की मी एक अत्यंत सामान्य भक्त आहे. उगाच जsssरा शिक्षण अधिक झाले म्हणून जुन्या गोष्टीत शंका काढत बसत नाही. आणि शाळेत किंवा कॉलेजात DNA बद्दल समजले की लगेच घरच्यांकडे मी त्यांचा रक्ताचा नातेवाईक असल्याचा पुरावा मागत नाही. ;)
जरी आधुनिक शिक्षण घेतलेला असलो आणि वैज्ञानिक दृष्टी असलेला असलो तरी काही गोष्टी पुराव्याशिवाय गृहित धरायची सवय आहे. राम पितॄभक्त होता असे वाचले की त्यातून मी चांगल्या गोष्टी शिकता येतील का हे पहातो, तो पितृभक्त होता का अशी कुशंका काढत बसत नाही. याचे कारण असे की तशा गृहित धरल्या तरी माझे काही नुकसान होणारे नसते. आणि एखादी खटकणारी गोष्ट असेल तर ती सोडून पुढे जातो.
DNA बद्दल समजल्यावर आपण घरी पुरावा मागत नाही हे बरेच झाले.
पण मला एक समजत नाही, की मग भक्तीभावाने तुम्ही डीएनए वर धागे लिहिता का हो? की त्याला डोंबलाचा पुरावा नसेल, तरच धागा काढता?
(वरील प्रतिसाद तुमचा हा प्रतिसाद वाचून मग लिहिलेला आहे.)
फोटो व कथा आवडली. मिपावर प्राजु यांनी शबरीची अत्यंत रसाळ गोष्ट लिहीली आहे तिचा दुवा - http://www.misalpav.com/node/16308
कथेचे एकूण ५ भाग आहेत.
सारीका, माझ्या ब्लॉगवर माझा हा लेख वाचूनच प्राजू यांनी त्यावर कथा लिहायचे सुचले व माझ्याशी त्यासंबंधी बोलल्या व कथा लिहिली. बघा, लेख वाचल्यावर लोकांना किती रचनात्मक आणि उपयोगी (creative/constructiv) गोष्टी सुचतात. :)
"तरीही वरील लेखनात मी 'दंतकथा आहे' असा उल्लेख केलाच आहे. असो." इति मंदार जोशी.
आता माझ्या ध्यानात आले. ह्यालाच म्हणतात Plausible deniability!
म्हणजे आपल्या स्वनिर्मित कल्पना आधी पुढे मांडून त्या लोकांना पटल्या तर ठीकच आहे, पण कोणी पुरावाच मागितला 'मी त्यांना दंतकथा असे म्हटलेलेच आहे' असे म्हणायला तुम्ही मोकळे.
आणि मला विचाराल तर ह्या 'दंतकथा'हि आहेत हेहि मला मान्य नाही.
"तिने एक धक्कादायक निर्णय घेतला आणि तो म्हणजे विवाहाला नकार देऊन घर सोडण्याचा. घर सोडल्यावर अर्थातच तिला तिची भिल्लांची वस्ती देखील सोडायला लागली असणार.
तर अशा प्रकारे गृहत्याग केल्यावर ती पूर्णा (पुष्करणी) नदीच्या तीरावर असलेल्या निबीड अरण्यात एकांत स्थळी राहू लागली. जवळच असणार्या पम्पा सरोवराच्या काठावर स्नान, पूजा, होम इत्यादी धर्मकार्यार्थ अनेक ऋषीगण नियमित येजा करत असत. शेवटी जंगलच ते, मार्ग असा कितीसा चांगला असणार? सरोवराकडे जाणार्या रस्त्यावरचे बारीक बारीक दगड, काटे, आणि पायांना इजा होऊ शकेल अशा इतर अनेक गोष्टींचे त्या रस्त्यावरून निर्मूलन करून ऋषींच्या मार्गातले अडथळे शबरी दूर करत असे. तिने घर आणि ज्ञातीचे वसतीस्थान सोडले असले तरी तिला आपण हलक्या जातीचे आहोत हा न्युनगंड होता. म्हणून ही सगळी कामे ती लपूनछपून करत असे. शबरी याबाबतीत इतकी काळजी घेत असे की झाडू वापरला तर त्या आवाजाने आपल्याकडे लक्ष वेधलं जाईल म्हणून ती हातानेच ही कामे करी. ही सगळी कामे कुणी केली हे उघड झालं तर आपल्यावर नसता प्रसंग ओढवेल अशी तिला भीती होती."
ही 'दंतकथा' तुम्हाला कोठे मिळाली?
आमच्या वाचनात तरी आजतागायत ह्यातले एकहि विधान 'दंतकथा' किंवा 'मिथक' अशा स्वरूपातहि कधी आलेले नाही. ह्या अश्रुतपूर्व 'दंतकथां'चा स्रोत तुम्ही सांगितल्यास तो तपासून पाहता येईल.
हे केवळ एक उदाहरण झाले. अन्यहि तथाकथित 'दंतकथां'विषयी हाच प्रश्न विचारता येईल पण इतके पुरेसे आहे.
न सांगता आल्यास आम्हाला असे सकारण वाटेल की 'प्राचीन हिंदुधर्म अतिउदात्त आहे', 'सर्व आदिवासी, अन्त्यज हे हृदयातून हिंदूच आहेत', 'रामाला आदर्श माना', अशा 'संतमहंत' ज्यांचा प्रवचनांतून प्रचार करतात त्याच विचारांना पाठिंबा देण्याचा हा यत्न दिसतो.
गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाहीतर 'दंतकथा' म्हणून तिला सोडून द्यायला आणि हात झटकायला तुम्ही मोकळे!
तुमचा अजेंडा समजला. लेख चांगला/टुकार आहे, लिखाण चांगले नाही वगैरे प्रतिसाद मला समजू शकतात. पण हा शुद्ध खोडसाळपणा झाला. धार्मिक श्रद्धा व भावनांना दुखावणार्या लेखनाला मी उत्तर देऊन त्याचे गौरवीकरण करु इच्छित नाही. त्यामुळे इतःपर तुमच्या खोडसाळ लिखाणाला उत्तर द्यायला मी बांधील नाही आणि देणारही नाही. आपण काही constructive लिखाण केलेत तर बरे होईल. असल्या नकारात्मक लिखाणाचा काही उपयोग नसतो.
हे शेवटचे उत्तर: ही दंतकथा मला शबरीधाम यात्र महात्म्य व इतर एक (नाव लक्षात नाही) या हिंदी पुस्तकातून मिळाली. लेखक राजीव दिक्षित आहेत.
माझ्या आधीचा प्रतिसाद वाचला नसावा तो कृपया वाचावा तसे केल्यास फायदा होऊ शकतो. आपले वाचन वाढवल्यासही उपयोग होईल, म्हणजे मग अशा दंतकथा कुठे सापडल्या असा प्रश्न येणार नाही. मी सुद्धा ही कथा वाचण्याआधी ते पुस्तक तो स्त्रोत माहित नव्हतेच.
तुम्ही जो प्रतिसाद लिहीला आहे तसल्या भडकाऊ लिखाणामुळे धार्मिक भावना दुखावल्या जातात व धार्मिक भावना दुखावल्या या कारणाला कायद्याचा सुद्धा पाठिंबा आहे.
>>तुम्ही जो प्रतिसाद लिहीला आहे तसल्या भडकाऊ लिखाणामुळे धार्मिक भावना दुखावल्या जातात व धार्मिक भावना दुखावल्या या कारणाला कायद्याचा सुद्धा पाठिंबा आहे.
कोल्हटकरांनी जे प्रश्न उपस्थित केले आहेत ते प्रश्न वाजवी वाटले; खोडसाळ नाही. असो. हे माझं मत झालं आणि तुमच्या मताशी मी सहमत नसलो तरीही त्याचा आदर करता येईलही कदाचित, पण त्यात सध्या एक अडचण दिसते आहे. ती थोडक्यात अशी :
तुम्हाला त्या प्रश्नांना भिडायचं नसेल तर तो तुमचा प्रश्न आहे. पण ते भडकाऊ आहेत आणि त्यामुळे आपल्या भावना दुखावल्या गेल्या असा तुमचा दावा असेल, तर एवढंच सांगू इच्छिन की आंतरजालावर आपलं लिखाण टाकताना स्वतःला याहून अधिक कणखर बनवावं लागतं. ज्यांच्या भावना इतक्या सहज भडकू शकतात त्यांना त्रास होणार यात काही शंका नाही. आणि याला काही इलाज आहे असं वाटत नाही. धन्यवाद.
चिंतातुर जंतूंशी एकंदरीत सहमत. कोल्हटकरांनी मांडलेला मुद्दा थोडक्यात असा 'दंतकथेचा स्रोत सांगितला नाहीत, तर तुम्ही ती स्वतःच तयार करून दंतकथा म्हणून खपवून देत आहात असं वाटेल.' यात फारतर तुमच्या वैचारिक भावना दुखवू शकतील, पण धार्मिक भावना कशा दुखवतात हे मला कळलेलं नाही.
या आयडीचा मागोवा घेताना हा धागा लक्षात आला. दंतकथा या विषयावरची रोचक चर्चा वाचली. दंतकथेला पुरावा देणे कसे शक्य होईल असा प्रतिसाद द्यायचा मोह झाला होता. पण श्री. कोल्हटका यांच्या अभ्यासपूर्ण प्रतिसादामुळे हे लक्षात आले कि अशा प्रकारे खोडसाळ दंतकथा रचून त्या पसरवणे सहज शक्य आहे. असे प्रकार होत नाहीत असं म्हणण्यास धजावत नाही. मात्र, तरीदेखील सरसकट सर्वच दंतकथांना हा नियम लागू करता येणार नाही. काही दंतकथा विशिष्ट प्रदेशात पचलित असतात ज्या केल्याने देशाटन माहीत होतात. कुणी आधीच पुस्तक लिहून ठेवलेले असल्यास त्याचा संदर्भ देता येऊ शकतो. पण जर असा लेखनप्रपंच झालेला नसेल तर मात्र तारतम्यभावाने त्याकडे पहावे लागेल.
एकदा दुस-या एका संस्थळावर भारतात अस्पृश्यता होती हे खोटं आहे असा पवित्रा एकाने घेतला होता. खरं म्हणजे याचा चटका भोगलेली पिढी अजूनही अस्तित्वात असताना नेटवरच्या चर्चेत पुरावा कसा द्यायचा म्हणून मी गडबडलो होतो. अर्थात भारतात अस्पृश्यता होती हे खोटं आहे असा प्रचार शिस्तबद्ध रितीने करण्यात येतो आहे हे मागाहून कळाल्याने लिखीत पुराव्याचं महत्व देखील ध्यानात आलं.
धागाकर्त्याची मी सर्वप्रथम क्षमा मागतो ती दोन गोष्टींसाठी. पहिली म्हणजे त्यांच्या धार्मिक भावना माझ्या (साध्या) चौकशीने दुखावल्या गेल्या म्हणून. दुसरी म्हणजे त्यांची अधिक चर्चा करण्याची इच्छा नसतांनाहि मी अगोचरपणे हा विषय चालूच ठेवत आहे म्हणून.
दुसर्या गोष्टीबद्दल इतकेच म्हणेन की येथे चर्चा करण्याचा विषय निवडणे आणि आणि तो येथे सर्वांपुढे आणणे हे स्वातन्त्र्य धागाकर्त्याचेच असते पण तो एकदा सुरू झाला म्हणजे it gets a life of its own. ती चर्चा थांबवण्याचे धागाकर्त्याच्या हातात नसते.
धार्मिक भावनांचा प्रश्न असेल तर मी प्रारंभी इतकीच विनन्ति केली होती की 'धाग्यामधील लेखन विनोदी असले काय अथवा गंभीर असले काय, मला त्यावर येथे त्याच्या बाजूने वा विरोधात काहीच म्हणावयाचे नाही. मला त्याचे स्वरूप काय आहे तेव्हढेच सांगा अशी विनंति आहे.' ह्यावर 'हा माझ्या श्रद्धेचा भाग आहे आणि हे लिखाण मी विनोदी म्हणून केलेले नाही' हे साधे उत्तर धागाकर्त्याकडून मिळाले असते तर माझ्याकडून चर्चा येथेच थांबली असती कारण कोणी कशावर, किती आणि का श्रद्धा ठेवावी ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे हे मी मानतो.
पण हे साधेसरळ उत्तर न देता त्याच्याऐवजी 'मी काही constructive लिखाण करावे. वाचन वाढवावे' असले आपल्या अधिकाराबाहेरचे जावई उपदेश मला देऊन धागाकर्त्याने 'माझ्याकडून प्रत्युत्तर मिळणार ह्याची खात्रीच करून ठेवली आहे. So here goes...
राजेश दिक्षितलिखित 'शबरीधाम यात्रा महात्म्य' नामक ग्रंथावरून हे लिखाण धागाकर्त्याने केले आहे असे ते कळवतात. जालावर शोध घेता धागाकर्त्याचाच http://mandarvichar.blogspot.ca/2010/11/blog-post_12.html हा ब्लॉग सोडला तर मला ह्या ग्रंथाचा एकहि उल्लेख कोठे सापडला नाही - डिजिटल प्रत तर नाहीच पण पुस्तकविक्रेत्यांच्या संस्थळावर कमीतकमी पुस्तकाचे नाव तरी सापडते पण तेहि ह्या ग्रंथाच्या बाबतीत झाले नाही.
पुस्तकाच्या नावावरूनच कळते की यात्रांच्या ठिकाणी आणि देवळांच्या बाहेर टपर्यांवर जी पुस्तके मिळतात त्या दर्जाचेच हे पुस्तक असावे. ही पुस्तके preaching to the converted असल्याने त्यांच्यात फार अभ्यास वा विद्वत्तेची अपेक्षा करण्यात अर्थ नसतो. केवळ ह्या पुस्तकावर आधारून जर धागा लिहिला असला तर आनंदच आहे. मी तरी ह्या चोपड्याला - कारण हे तेच आहे असे दिसते - अधिकृत आधार म्हणून काडीचेहि महत्त्व द्यायला तयार नाही. माझी खात्री आहे आहे की पुढेमागे अन्य कोणी शबरीभक्त अजून कोठेतरी शबरीमाहात्म्याचे वर्णन करेल आणि आधार विचारला तर ह्या चालू धाग्याचा आधार देईल. Here we go round the mulberry bush...
धागाकर्त्याच्या ब्लॉगवर संदर्भनामावलीत दोन नावे आहेत, एक राजेश दीक्षित ह्यांचे उपरिनिर्दिष्ट पुस्तक आणि दुसरे गीतरामायण. पैकी गीतरामायणाचा उल्लेख प्रस्तुत धाग्यातहि संदर्भ म्हणून केला आहे, कारण त्यात लपविण्याजोगे काही नाही. मात्र राजेशमहोदयांचे पुस्तक संदर्भातून वगळण्यात आले आहे. असे धागाकर्त्याने बुद्ध्याच का केले असाबे हे एक रहस्य आहे. पुस्तकाचे नाव दिले असते तर येथील चौकस आणि भिंतीला तुंबडया लावणार्या उद्योगी लोकांना त्या पुस्तकाच्या अंतरंगाचा पत्ता लागून धाग्याच्या लेखनाचे सगळे पितळ प्रारंभालाच उघडे पडले असते अशी धागाकर्त्याला धास्ती वाटली असावी आणि म्हणून धाग्यात मात्र स्रोत लपविण्याची चलाखी केली आहे अशी चिकित्साखोर लोकांना शंका आली तर त्यात चुकीचे काय?
राजेश दीक्षित ह्या नावाचाहि शोध घेतला, देवनागरी आणि इंग्रजी, दोन्हीमधून. हे नाव तसे सर्वसामान्य असल्याने डझनावारी राजेश दीक्षित बाहेर पडले पण एकूण पाहता समाजवादी पक्षाचे सचिव राजेश दीक्षित हे शबरीमाहात्म्याचे लेखक असावेत असा तर्क संभवतो. ते उत्तर प्रदेशातील ब्राह्मण मतांचा गठ्ठा वगैरे राजकीय कारस्थानामध्ये खोल बुडलेले दिसतात. त्यांच्याबद्दल पुढील माहिती येथे मिळाली.
"करीब ढाई तीन हजार ब्राह्मणों के इस सम्मेलन को सम्बोधित करते हुए राजेश दीक्षित ने कहा कि "पिछली सरकार के एक ब्राह्मण नेता ने ब्राह्मणों से वादा किया था कि वे प्रदेश में ब्राह्मणों का हक दिलाएंगे लेकिन उन्होंने और उनकी सरकार ने हरिजन बनाम सवर्ण के मुकदमों तक को रोकने में कोई कामयाबी नहीं पाई." दीक्षित ने दावा किया कि समाजवादी पार्टी प्रदेश में "ब्राह्मणों को उसका हक दिलाएगी और उनके सामाजिक और आर्थिक विकास की तरफ ध्यान देगी."
हे राजकीय पुढारीच आपल्याला हवे असलेले राजेश असले काय वा कोणी अन्य असले काय, त्यांच्या नावाने आणखी तीन पुस्तके येथे दिसली: 'अमर रहेंगे ये बलिदानी' - एकूण पाने ३२(!), 'सत श्री अकाल' एकूण पाने (अर्थात् ३२च) आणि सरल हिन्दी पर्यायवाची शब्दकोश - एकूण पाने ७२ (अबब!) अन्य काही लिखाण विद्वान लेखक राजेश दीक्षित ह्यांच्या नावाचे दिसले नाही.
एवंच काय, राजेश दीक्षित हे ३२ पानी चोपडया लिहिणारे कोणी hack दिसतात. (Hack writer, a writer who is paid to write low-quality, quickly put-together articles or books इति विकिपीडिया.) ह्याहून अधिक वजनदार कोणी स्रोत असला तर धागाकर्त्याने दाखवावा अशी पुनः विनंति करतो.
माफ करा. लेखकाचे नाव चुकले. त्यांचे नावः राजेश सुरेश दिक्षित असे आहे.
हे पुस्तक फक्त हिंदीत उपलब्ध आहे. त्याची एक प्रत माझ्या एका नातेवाईकांकडे उपलब्ध आहे. कुणीतरी शंका काढली यासाठी ती मागवण्याइतका मोकळा वेळ कमीतकमी माझ्याकडे तरी नाही. असो.
बाकी हा निश्चितच माझ्या श्रद्धेचा भाग आहे व यावर चर्चा अपेक्षित नाही. वर लेखकाचे नाव दुरुस्त केलेच आहे. याउप्पर या कथेचा स्त्रोत हवा असल्यास स्वतः शबरीधामास भेट देणे (किंवा न देणे, मला काही फरक पडत नाही). तुम्ही तुम्हाला ज्या गोष्टीबद्दल द्वेष वाटतो त्याबद्दल बोलणे सुरु केलेच आहे. चालू ठेवा. तुम्हाला इथे किंवा कुठेही धार्मिक बाबतीत मी उत्तर द्यायला बांधील नाही आणि देणारही नाही. तेव्हा टाटा.
टीपः वर जी शबरीची गोष्ट मी दिली आहे ती खचितच माझ्या कल्पनेचे वारू उधळून लिहीलेली नाही.
-------------------------------------------------
दंतकथेला पुरावा? =)) असो.

तुमचा प्रश्नही तिरकाच आहे, तरी पण उत्तर देतो. DNA बद्दल माहिती सगळीकडे उपलब्ध आहे. त्यामुळे मला काय कुणालाच लिहायची गरज नाही. शिवाय यासारख्या गोष्टींवर लिहीणारे पंडित ढीगाने आहेत, त्यात मज पामराची काय गरज? शिवाय, मला रस असलेल्या गोष्टींबद्दलच मी लिहीणार आणि ते लिहीणारच. त्यात चुकीचे काहीही नाही.
वर पुस्तकाचे नाव शबरीधाम यात्रा महात्म्य आणि लेखक राजेश सुरेश दिक्षित असे दिले आहेत की. आणखी संदर्भ कसला हवा आहे? हवा असेल तर तो शबरीधाम स्थळी उपलब्ध असेलच तिथे जाऊन चौकशी करावी. दुर्दैवाने आपल्याकडे documentation ची सवय नसल्याने एका घटनेची अनेक रूपं (versions) उपलब्ध असतात. ते असो. पण गतकाळात घडलेल्या अनेक गोष्टी अशा असतात की त्या जशाच्यातशा स्वीकारल्या तर कुणाचेच नुकसान नसते. पण मुद्दामून अशा गोष्टी दिसल्या की गुगलसम्राट (कु)शंका काढतात आणि इकडच्या तिकडच्या लिंका देऊन वाचनातली गोडी घालवण्याचा प्रयत्न करतात. हे निषेधार्ह आहे.
शिवाय पहिल्या कुशंकायुक्त प्रतिसादापासून हेतूविषयी शंका घ्यायला जागा असल्याने ते निषेधार्हच.
तेव्हा तुम्हा तीन-चार जणांचा अजेंडा लक्षात आल्याने एकांना टाटा केलाच आहे. पण याबद्द्ल माझा तुम्हाला सुद्धा आणि अशा प्रकारचे प्रतिसाद देणार्यांना सर्वांनाच टाटा.
>>दुर्दैवाने आपल्याकडे documentation ची सवय नसल्याने एका घटनेची अनेक रूपं (versions) उपलब्ध असतात.
>>दंतकथेला पुरावा? (लोळून हसत) असो.
यात विनोदी काहीही नाही. इतिहास ह्या ज्ञानशाखेत असं करतात. एखादी गोष्ट प्रत्यक्ष घडली असं म्हणायला इतिहासात काही आधार नाही हे तपासल्यानंतर तिला दंतकथा म्हणून अभ्यासता येतंच. त्या अभ्यासात एखादी दंतकथा नक्की कधी अस्तित्वात आली आणि कशी विकसित झाली हे तपासलं जातं. उदाहरणार्थ : मी वर म्हटल्याप्रमाणे शबरीच्या बोरांना वाल्मिकी रामायणात अस्तित्व नाही असं दिसतं. किंवा शकुंतलेची अंगठी हरवल्याची गोष्ट ही बहुधा कालिदासाची देणगी आहे. त्याआधीच्या कथांत असा काही उल्लेख नव्हता. एका घटनेची अनेक रूपं इतिहासात दिसतात तशीच एका दंतकथेचीही दिसतात. पण आपल्याकडे डॉक्युमेंटेशन नाही एवढ्याच कारणापोटी दंतकथा सत्य मानता येत नाहीत.
>>गतकाळात घडलेल्या अनेक गोष्टी अशा असतात की त्या जशाच्यातशा स्वीकारल्या तर कुणाचेच नुकसान नसते.
एखादी गोष्ट घडली होती हे असं सहज स्वीकारणं इतिहास ह्या ज्ञानशाखेला अमान्य आहे. पुराव्यांनिशी कोणतीही गोष्ट जशीच्यातशी किंवा स्वीकारणं हे वैज्ञानिक दृष्टिकोनाला मूलतः अमान्य आहे.
याचा अर्थ प्रस्तुत दंतकथेचा उगम हा श्री अमुक अमुक यांच्या एखाद्या छोटेखानी पुस्तिकेत सापडला असे आपण समजू. म्हणजे, आपण अशी चर्चा करु शकतो, की "हजारो वर्षांपासून चालत आलेल्या एखाद्या कथेमध्ये/ आख्यायिकेमध्ये आत्ता भर घालावी असे एखाद्याला वाटण्याचे काय कारण असू शकते". यावरुन अभ्यासाच्या कोणकोणत्या दिशा उघडू शकतात?
तुमचा प्रश्नाच्या उत्तरासाठी "महाभारत" हा सर्वांत उत्तम केसस्टडी आहे असे नाही का वाटत आ.रा. साहेब? आधी जय, मग भारत आणि त्याचे महाभारत? शिवाय हे असे झाले हेदेखील प्राचीन मतच आहे. त्या विषयातल्या तुम्ही उल्लेखिलेल्या पैलूंवर कितीतरी जणांनी लिहिलेले आहे. अरविंद कोल्हटकरांना विचारले तर बर्याच लिंका मिळतील.
>>याचा अर्थ प्रस्तुत दंतकथेचा उगम हा श्री अमुक अमुक यांच्या एखाद्या छोटेखानी पुस्तिकेत सापडला असे आपण समजू. म्हणजे, आपण अशी चर्चा करु शकतो, की "हजारो वर्षांपासून चालत आलेल्या एखाद्या कथेमध्ये/ आख्यायिकेमध्ये आत्ता भर घालावी असे एखाद्याला वाटण्याचे काय कारण असू शकते". यावरुन अभ्यासाच्या कोणकोणत्या दिशा उघडू शकतात?
हो. उदाहरणार्थ, कालिदासाच्या आधीची शकुंतलेची गोष्ट ही तशी स्त्रीवादी होती असं एक विश्लेषण रोमिला थापर यांनी केल्याचं* स्मरतंय - म्हणजे आधीच्या गोष्टीत 'ह्या मुलाचा स्वीकार कर' म्हणून शकुंतला दुष्यंतासमोर लाचार होत नाही; पण कालिदास अंगठी हरवून वगैरे तिला दुष्यंतासमोर लाचार करतो.
>>एखादी गोष्ट घडली होती हे असं सहज स्वीकारणं इतिहास ह्या ज्ञानशाखेला अमान्य आहे. पुराव्यांनिशी कोणतीही गोष्ट जशीच्यातशी किंवा स्वीकारणं हे वैज्ञानिक दृष्टिकोनाला मूलतः अमान्य आहे.
शबरीच्या गोष्टीवर असलेला आक्षेप ह्या लेखाच्या माध्यमातून घेण्याचे प्रयोजन कळत नाही, लेखकाने श्रद्धेपोटी माहिती दिली आहे, ती स्विकारावी हा आग्रह चूकिचा असला तरी वरिल बर्याच प्रतिसादात केवळ विरोधासाठी विरोध होताना दिसत आहे, हे इथे अवांतर वाटते.
इतिहास आणि वैज्ञानिक दृष्टीकोन ह्यावर वेगळी चर्चा व्हावी, पण अशा प्रकारचे धर्माशी निगडित लेखन परत संस्थाळावर येऊ नये ह्यासाठी वरिल काही प्रतिसादांत प्रयत्न केला जातो आहे काय अशी शंका येते.
शबरी हे ( सत्य / काल्पनिक वगैरे वगैरे जे काय असेल ते ) पात्र अत्यंत निरुपद्रवी असेल असा आमचा समज झाला होता पण त्यावरून जालावर इतकी रणधुमाळी माजेल, धार्मिक भावना वगैरे दुखावतील असे साक्षात शबरीलाही वाटले नसते ...
शबरीची रामायणातील कथा माहित
शबरीची रामायणातील कथा माहित नव्हती (म्हणजे रामाला भेटण्याआधीची तिची कथा).
तुम्ही काढलेल्या फोटोत रामाच्या आणि लक्ष्मणाच्या मूर्ती सुंदर आहेत.
छान
शबरीची ही कथा माहीत नव्हती. मला माहीत असलेली शबरी ही फक्त रामायणातल्या तेवढ्या एका प्रसंगापुरती येते. त्यामागची कथा सांगितल्याबद्दल धन्यवाद.
ही कथा त्या मंदिराच्या प्रवासाच्या आजच्या कथेबरोबर व फोटोंबरोबर आल्यामुळे आणखीनच छान वाटलं.
शबरीची पूर्वकथा कुठे वाचली
शबरीची पूर्वकथा कुठे वाचली नव्हती. ती दिल्याबद्दल धन्यवाद.
वर्णन व फोटो छान.
हे तेच का?
यात उल्लेखिलेले स्वामी असीमानंद हे हेच का?
एक
दोन
तीन
चार
आता थांबतो...
बाकीचा लेख माहितीपूर्ण. :-)
अवघड आहे...
अवघड आहे.
तेच बहुतेक
श्रावण, ती लिंक इथे देण्याचं प्रयोजन समजलं नाही :(
हे तेच असावेत बहुतेक. नाहीतरी देशप्रेमी हिंदूंना पकडून त्यांना अतिरेकी असं लेबल लावायला हिंदूद्वेष्टे काँग्रेससरकार तत्पर आहेच. देशप्रेमी आणि देशद्रोही अतिरेकी यात फरक त्यांना समजत नाही. असो.
स्वतंत्र
असीमानंद हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. ती स्वतंत्रपणेच करू. लिंक दिली, कारण 'हे तेच का' असा प्रश्न आला म्हणून. तुमच्या लेखनात "हिंदूंच्या दृष्टीने एक थोर व्यक्तीमत्व..." असे उल्लेख असल्याने हा प्रश्न आला. त्यांना थोर ठरवणारी काही माहिती मला आंतरजालावर मिळाली नाही; नाही तर, तीही लिंक दिली असती. तशी लिंक असेल तर जरूर द्या. माणसं समजून घ्यायला मदतच होते. तरी मी फक्त वेबसर्च केला, न्यूज सर्चमध्ये केवळ विरोधातील माहितीच पुढे येते आहे.
<< त्यांना थोर ठरवणारी काही
हिंदूंमधल्या कडव्या विचारांच्या लोकांना थोर ठरवणारी माहिती अशी आंतरजालावर सापडत नाहीच. हल्लीच्या काळात तर नाहीच नाही. शबरीधामाचं निर्माण केलं हाच थोरपणा :) शिवाय हिंदूंसाठी काही चांगलं काम केलं तर त्याला प्रसिद्धी मिळणं दुरापास्तच. बाकी अनेक गोष्टी उघड बोलायची सोय नसल्यामुळे इथेच थांबतो. चर्चा स्थळावरच होऊ दे.
ही लिंक रोचक आहे.
Is Swami Aseemanand being framed on blast cases?
बरं!
'तिकडे' दिसत नाही आजकाल आपण? पुन्हा काही विचार तिकडे येण्याचा?
छान लेख. ठिकाण मस्त आहे.
छान लेख. ठिकाण मस्त आहे. जायला पाहिजे एकदा :)
लेख आणि माहिती आवडली
लेख आणि माहिती आवडली
नवी माहिती
लेखाच्या निमित्तानं नवी माहिती मिळाली.
लेखाल अमिलत असलेलं वळण उचित वाटलं नाही.
देऊळ
श्रामो, लिंक्सबद्दल धन्यवाद. लेख वाचून "देऊळ" सिनेमा आठवला.
कंधमाळ मधील हिंसाचारी थैमानाचीही आठवण झाली. सेम टू सेम.
असो.
दण्डकारण्य हा प्रकार फार मोठा आहे. पार गुजरातपासून तिकडे ओरीसाच्या मध्यभागापर्यंतच्या प्रदेशाला कुठेही दण्डकारण्य म्हणू शकता. आणि वाटेल त्या ठिकाणी रामाची पावले इथेच पडली होती असे ठासून सांगणारी श्रद्धाळू मंडळी भेटतील. ज्या दगडांवर बसून रामाने शबरीची बोरे खाल्ली तो दगडही बर्याच ठिकाणी सापडेल असे मला वाटते. शबरी भिल्ल जमातीची आदिवासी होती असे गुजरातातील श्रद्धाळू म्हणतील, तर ओरीसात "शबर" (सबर, सौर, सअर) अशीच आदिवासी जमात सापडेल. छत्तीसगढमध्ये शबरी नावाची नदी बस्तर जिल्ह्यात वाहते. बस्तर शेजारच्या कोरापूट जिल्ह्यात साबेरी नावाची नदी वाहते - साबेरी हे शबरीचे स्थानीक बोलीतील रुप. कोरापूटमधील जगन्नाथ मंदीराला तर साबर श्रीक्षेत्र असेच म्हणतात. पंडीत नेहरुंनी "दंडकारण्य प्रोजेक्ट" सुरु केला होता - तो बस्तर आणि कोरापूट जिल्ह्यांमध्ये. श्रद्धेला आव्हान देण्यात अर्थ नाही, आणि जिथे श्रद्धा आहे, तिथेच शबरी आहे, त्यामुळे मला काही म्हणायचे नाही. ही माहिती या निमित्ताने आठवली एवढेच.
बाकी शबरी स्वतःला हीन जातीतील वगैरे समजत असेल असे मला तरी वाटत नाही. कारण - १. जर कथेतच सांगितल्याप्रमाणे तिने रूढी परंपरांना आक्षेप घेऊन बंड पुकारुन घर सोडले असेल, तर ती उच्च आत्मसन्मान असणारी स्त्री असणार. २. आदिवासी हे हिंदु वर्णाश्रम किंवा जातींच्या उतरंडीत कुठेच बसत नाहीत. त्यामुळे ते ("हिंदु" धर्मातील) कुणाहीपेक्षा उच्च किंवा नीच असण्याचा प्रश्नच येत नाही. आजही येत नाही; तर (ज्या काळात राम झाला असे आपण मानू) त्या काळातही हा प्रश्न येणार नाही.
तरी बरे, गुजरातमध्ये हिंदुद्वेष्टे काँग्रेस सरकार नाही. नाहीतर त्यांनी प्रॉपर काटेच प्लँट केले असते रस्त्यांमध्ये!
आळश्यांचा राजा व आडकित्ता -अपेक्षित प्रतिसाद
आळश्यांचा राजा व आडकित्ता - अपेक्षित प्रतिसाद. धन्यवाद ;)
रच्याकने, विकीपीडियाच्या लिंक्स अनेकदा विनोदी असतात. अशाच लिंका मीही देऊ शकतो. पण वाद वाढवण्याची इच्छा नाही. कारण कंधमाल असो की गोधरा दोन्ही बाजू जाणून घेण्याची गरज कुणालाही वाटत नाही असेच दिसते. काहीही हिंदू दिसले की आधी कुशंका काढायला जायचं ही वृत्ती बरी नव्हे.
तसेच हा विषय इथे आणण्याची गरज नव्हती. विषयाला धरून बोललात तर बरे होईल.
पंपा सरोवर!फोटू लै भारी
पंपा सरोवर!
फोटू लै भारी काढले आहात आपण. त्या बंधार्याला पंपा सरोवर म्हटलेत अन तिथे आंघोळी करणारे मद्यधुंद थवे पाहिलेत तर इतके देवभक्तीचे आवरण आणून इथे लिहिणे कठिण आहे..
शबरीच्या फोटोखाली लिहिलेले पूर्ण वाक्य काय आहे हो? ;)
रस्ता पण चांगला डांबरी आहे. नंदूरबारकडून गेलात तरीही रस्ते चांगलेच आहेत..
कृपया
स्वामी असीमानंद यांच्यासंदर्भातील मजकूर मूळ लेखनातून काढून टाकलेला दिसतो. त्यामुळे, खाली मी आणि लेखक यांच्यात झालेला संवाद असंदर्भ ठरतो आहे. एक तर तोही संवाद उडवावा, किंवा मूळ लेखातील मजकूर ठेवावा.
माझ्या मते मूळ लेखातील मजकूर तसाच ठेवावा. असीमानंद थोर आहेत, वगैरे लेखकाची मते आहेत. ती तशीच राहू द्यावीत. त्यावर चर्चा झाल्याने धाग्याला वेगळे वळण लागते असे ज्यांना वाटत असेल ती त्यांची मते आहेत. धाग्यात तसा मजकूर आला असेल तर त्या अनुषंगाने चर्चा होणारच. वाटल्यास ती चर्चा स्वतंत्रपणे बाहेर काढता येऊ शकते.
मजकूर काढल्याचे कारण
श्रावण, मला इथे चर्चेत कुठलाही वादग्रस्त मुद्दा यायला नको आहे. कारण एकाला थोर म्हटलं की दुसरा तो कसा थोर नाही हे सांगत पुढे येतोच येतो. त्यामुळे तो मुद्दा काढला आहे. तो बाहेरच राहिलेला बरा.
त्या अनुषंगाने झालेला संवाद उडवण्यास हरकत नाही. :)
वादग्रस्त मुद्द्यांपेक्षा
वादग्रस्त मुद्द्यांपेक्षा कुठच्याही व्यक्तीने, कुठच्यातरी वादाने ग्रस्त आणि त्रस्त होणं हे टाळणं महत्त्वाचं आहे.
वाल्मिकी रामायण
इथे दिलेल्या माहितीनुसार शबरीच्या बोरांची कथा वाल्मिकी रामायणात नाही. त्याउलट रामाला भेटल्यावर तिनं अग्निदिव्य केलं वगैरे काहीतरी आहे.
शबरीची जादाची माहिती
मंदार जोशी यांच्या रुपाने ऐसी अक्षरे वर एका उत्साही आणि तितक्याच अभ्यासू सदस्याचे आगमन झाले आहे ही बाब अतिशय समाधानाची वाटते. भटकंतीची आवड तर स्पष्टच दिसत्ये, पण त्या निमित्ताने त्या त्या ठिकाणाच्या वैशिष्ठ्यांचा इतिहासाचा मागोवा घेण्याची त्यांची चिकाटी कौतुकास्पद मानावी लागेल.
शबरी आणि बोरे....बस्स....आतापर्यंत इतकीच मामुली माहिती...तीही रामाचे गुणगान गाणारी कहानी.... पण मंदार यानी लिहिलेले "शबरीने आश्रमाची व तिथल्या रहिवाशांची लहान-मोठी कामे करण्याबरोबरच ज्ञानार्जनही सुरु केलं." हा तपशील अनोखाच तसॅच आनंददायीच मानावा.
छान वाटले लेख वाचून आणि प्रकाशचित्रे पाहून.
[काहीसे अवांतर : शेवटी लेखात.....प्रकाशचित्रे सुरू होण्यापूर्वी "करवीरपीठाच्या शंकराचार्यांनी....' असे टंकले गेले आहे...ते कृपया 'शंकराचार्यांनी' असे करावे.]
चर्चा
खरेतर (निकोप) चर्चेसाठी अनेक उत्तम मुद्दे या लेखात आहेत. स्वामी असीमानंद वजा केले तरीही. पर्यटन - एका बाजूला पर्यटनाविषयी सरकारची अनास्था - पर्यटकांची क्रूर चेष्टा इत्यादि, त्याचवेळी पर्यटकांनीही केलेला "पराक्रम"; काट्या-कुट्यांतून वाट काढत जाऊन तिथे कचरा करणारे भक्त; गुजराती साडी नेसून बोरे चाखत असलेली शबरी; समृद्ध भारतीय संस्कृतीविषयी आदिवासी लोकांमध्ये जागॄती निर्माण करणे, इत्यादि. पण लेखकाचा काही प्रतिकूल ग्रह झालेला दिसतो, त्यामुळे चर्चा होणार नाही असे वाटते. असो.
भक्ती, श्रद्धा याविषयी मला केवळ आणि केवळ आदरच आहे, हे आवर्जून नमूद करतो. पण त्या आदराचा माझ्या बाकी निरीक्षणाशी आणि मतांशी काही संबंध नाही.
फोटो व कथा आवडली. मिपावर
फोटो व कथा आवडली. मिपावर प्राजु यांनी शबरीची अत्यंत रसाळ गोष्ट लिहीली आहे तिचा दुवा -
http://www.misalpav.com/node/16308
कथेचे एकूण ५ भाग आहेत.
अखेर विचारतोच...
लेख वाचल्यापासून 'विचारतो,विचारतो' म्हणत होतो पण धैर्य होत नव्हते. इतर कोणालाच ही शंका आलेली नाही, आपल्याला आली असे दाखवले तर आपणच अडाणी ठरू ह्यामुळे धैर्य होत नव्हते पण अखेरीस ठरविले की विचारूनच टाकू.
धाग्याचे मूळ लिखाण ही हिंदूंच्या आंधळ्या श्रद्धाळूपणावर आणि पुराणातली वांगी खरीच आहेत असे मानून चालण्याच्या प्रवृत्तीवर केलेली understated, tongue-in-cheek अशी टिप्पणी आहे असे मला प्रारंभी वाटत होते. लेखातील काही वर्णने विश्वासार्हतेच्या पलीकडची आहे, जसे की 'अमक्याच दगडावर बसून राम आणि लक्ष्मणांनी शबरीची बोरे खाल्ली' हे वर्णन,'अमक्याच पर्वतावर ते शबरीला भेटले' हे वर्णन, किंवा गीतरामायणातील भावनाच शबरी बोलून दाखविते, इ.इ. ह्याला पुरावाहि नाही आणि परंपराहि त्याच्या मागे नाही तरीहि लेखांमध्ये हे सर्व संपूर्ण शक्य आहे आणि सिद्धहि झालेले आहे असे मानूनच सर्व लिखाण केले दिसते. थोडेफार आधुनिक शिक्षण असलेला कोणी २१व्या शतकात हे सगळेच तितक्याच गंभीरपणे लिहीत असेल हे दुरापास्त वाटले आणि म्हणून असा ग्रह झाला की हे लिखाण औपरोधिक प्रकारचे आहे.
चर्चेने घेतलेले पुढचे वळण मात्र ह्याच्या संपूर्ण उलटे आहे. प्रस्तावक आणि प्रतिसाद देणारे हे दोनहि पक्ष पूर्ण गंभीरपणाने आपापले विचार मांडत आहेत असे जाणवते. म्हणून वर उल्लेखिलेला गोंधळ माझ्या मनात उत्पन्न झाला आहे.
गीतेतल्या अर्जुनाप्रमाणे मी 'सम्मूढचेतस्' झालो असून 'यच्छ्रेयः स्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे' अशी प्रार्थना करत आहे.
(धाग्यामधील लेखन विनोदी असले काय अथवा गंभीर असले काय, मला त्यावर येथे त्याच्या बाजूने वा विरोधात काहीच म्हणावयाचे नाही. मला त्याचे स्वरूप काय आहे तेव्हढेच सांगा अशी विनंति आहे.)
~ ॐ ~ ॐ ~ ॐ ~ ॐ ~ ॐ ~ ॐ ~ जय श्री राम ~ ॐ ~ ॐ ~ ॐ ~ ॐ ~ ॐ ~ ॐ ~
अखेर विचारलेत ते बरे केलेत
इतक्या आधी घडलेल्या गोष्टींचा काय डोंबल सबळ पुरावा असणार? तरीही वरील लेखनात मी 'दंतकथा आहे' असा उल्लेख केलाच आहे. असो.
त्याचं काय आहे ब्वॉ, की मी एक अत्यंत सामान्य भक्त आहे. उगाच जsssरा शिक्षण अधिक झाले म्हणून जुन्या गोष्टीत शंका काढत बसत नाही. आणि शाळेत किंवा कॉलेजात DNA बद्दल समजले की लगेच घरच्यांकडे मी त्यांचा रक्ताचा नातेवाईक असल्याचा पुरावा मागत नाही. ;)
जरी आधुनिक शिक्षण घेतलेला असलो आणि वैज्ञानिक दृष्टी असलेला असलो तरी काही गोष्टी पुराव्याशिवाय गृहित धरायची सवय आहे. राम पितॄभक्त होता असे वाचले की त्यातून मी चांगल्या गोष्टी शिकता येतील का हे पहातो, तो पितृभक्त होता का अशी कुशंका काढत बसत नाही. याचे कारण असे की तशा गृहित धरल्या तरी माझे काही नुकसान होणारे नसते. आणि एखादी खटकणारी गोष्ट असेल तर ती सोडून पुढे जातो.
डोंबल, पुरावा इ.
DNA बद्दल समजल्यावर आपण घरी पुरावा मागत नाही हे बरेच झाले.
पण मला एक समजत नाही, की मग भक्तीभावाने तुम्ही डीएनए वर धागे लिहिता का हो? की त्याला डोंबलाचा पुरावा नसेल, तरच धागा काढता?
(वरील प्रतिसाद तुमचा हा प्रतिसाद वाचून मग लिहिलेला आहे.)
सारीका, कथा मस्त आहे
कथेचे एकूण ५ भाग आहेत.
सारीका, माझ्या ब्लॉगवर माझा हा लेख वाचूनच प्राजू यांनी त्यावर कथा लिहायचे सुचले व माझ्याशी त्यासंबंधी बोलल्या व कथा लिहिली. बघा, लेख वाचल्यावर लोकांना किती रचनात्मक आणि उपयोगी (creative/constructiv) गोष्टी सुचतात. :)
Plausible deniability?
"तरीही वरील लेखनात मी 'दंतकथा आहे' असा उल्लेख केलाच आहे. असो." इति मंदार जोशी.
आता माझ्या ध्यानात आले. ह्यालाच म्हणतात Plausible deniability!
म्हणजे आपल्या स्वनिर्मित कल्पना आधी पुढे मांडून त्या लोकांना पटल्या तर ठीकच आहे, पण कोणी पुरावाच मागितला 'मी त्यांना दंतकथा असे म्हटलेलेच आहे' असे म्हणायला तुम्ही मोकळे.
आणि मला विचाराल तर ह्या 'दंतकथा'हि आहेत हेहि मला मान्य नाही.
"तिने एक धक्कादायक निर्णय घेतला आणि तो म्हणजे विवाहाला नकार देऊन घर सोडण्याचा. घर सोडल्यावर अर्थातच तिला तिची भिल्लांची वस्ती देखील सोडायला लागली असणार.
तर अशा प्रकारे गृहत्याग केल्यावर ती पूर्णा (पुष्करणी) नदीच्या तीरावर असलेल्या निबीड अरण्यात एकांत स्थळी राहू लागली. जवळच असणार्या पम्पा सरोवराच्या काठावर स्नान, पूजा, होम इत्यादी धर्मकार्यार्थ अनेक ऋषीगण नियमित येजा करत असत. शेवटी जंगलच ते, मार्ग असा कितीसा चांगला असणार? सरोवराकडे जाणार्या रस्त्यावरचे बारीक बारीक दगड, काटे, आणि पायांना इजा होऊ शकेल अशा इतर अनेक गोष्टींचे त्या रस्त्यावरून निर्मूलन करून ऋषींच्या मार्गातले अडथळे शबरी दूर करत असे. तिने घर आणि ज्ञातीचे वसतीस्थान सोडले असले तरी तिला आपण हलक्या जातीचे आहोत हा न्युनगंड होता. म्हणून ही सगळी कामे ती लपूनछपून करत असे. शबरी याबाबतीत इतकी काळजी घेत असे की झाडू वापरला तर त्या आवाजाने आपल्याकडे लक्ष वेधलं जाईल म्हणून ती हातानेच ही कामे करी. ही सगळी कामे कुणी केली हे उघड झालं तर आपल्यावर नसता प्रसंग ओढवेल अशी तिला भीती होती."
ही 'दंतकथा' तुम्हाला कोठे मिळाली?
आमच्या वाचनात तरी आजतागायत ह्यातले एकहि विधान 'दंतकथा' किंवा 'मिथक' अशा स्वरूपातहि कधी आलेले नाही. ह्या अश्रुतपूर्व 'दंतकथां'चा स्रोत तुम्ही सांगितल्यास तो तपासून पाहता येईल.
हे केवळ एक उदाहरण झाले. अन्यहि तथाकथित 'दंतकथां'विषयी हाच प्रश्न विचारता येईल पण इतके पुरेसे आहे.
न सांगता आल्यास आम्हाला असे सकारण वाटेल की 'प्राचीन हिंदुधर्म अतिउदात्त आहे', 'सर्व आदिवासी, अन्त्यज हे हृदयातून हिंदूच आहेत', 'रामाला आदर्श माना', अशा 'संतमहंत' ज्यांचा प्रवचनांतून प्रचार करतात त्याच विचारांना पाठिंबा देण्याचा हा यत्न दिसतो.
गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाहीतर 'दंतकथा' म्हणून तिला सोडून द्यायला आणि हात झटकायला तुम्ही मोकळे!
डोंबलाची डिनायेब्लिटी
तुमचा अजेंडा समजला. लेख चांगला/टुकार आहे, लिखाण चांगले नाही वगैरे प्रतिसाद मला समजू शकतात. पण हा शुद्ध खोडसाळपणा झाला. धार्मिक श्रद्धा व भावनांना दुखावणार्या लेखनाला मी उत्तर देऊन त्याचे गौरवीकरण करु इच्छित नाही. त्यामुळे इतःपर तुमच्या खोडसाळ लिखाणाला उत्तर द्यायला मी बांधील नाही आणि देणारही नाही. आपण काही constructive लिखाण केलेत तर बरे होईल. असल्या नकारात्मक लिखाणाचा काही उपयोग नसतो.
हे शेवटचे उत्तर: ही दंतकथा मला शबरीधाम यात्र महात्म्य व इतर एक (नाव लक्षात नाही) या हिंदी पुस्तकातून मिळाली. लेखक राजीव दिक्षित आहेत.
माझ्या आधीचा प्रतिसाद वाचला नसावा तो कृपया वाचावा तसे केल्यास फायदा होऊ शकतो. आपले वाचन वाढवल्यासही उपयोग होईल, म्हणजे मग अशा दंतकथा कुठे सापडल्या असा प्रश्न येणार नाही. मी सुद्धा ही कथा वाचण्याआधी ते पुस्तक तो स्त्रोत माहित नव्हतेच.
तुम्ही जो प्रतिसाद लिहीला आहे तसल्या भडकाऊ लिखाणामुळे धार्मिक भावना दुखावल्या जातात व धार्मिक भावना दुखावल्या या कारणाला कायद्याचा सुद्धा पाठिंबा आहे.
धार्मिक भावना दुखावल्या?
कोल्हटकरांनी जे प्रश्न उपस्थित केले आहेत ते प्रश्न वाजवी वाटले; खोडसाळ नाही. असो. हे माझं मत झालं आणि तुमच्या मताशी मी सहमत नसलो तरीही त्याचा आदर करता येईलही कदाचित, पण त्यात सध्या एक अडचण दिसते आहे. ती थोडक्यात अशी :
तुम्हाला त्या प्रश्नांना भिडायचं नसेल तर तो तुमचा प्रश्न आहे. पण ते भडकाऊ आहेत आणि त्यामुळे आपल्या भावना दुखावल्या गेल्या असा तुमचा दावा असेल, तर एवढंच सांगू इच्छिन की आंतरजालावर आपलं लिखाण टाकताना स्वतःला याहून अधिक कणखर बनवावं लागतं. ज्यांच्या भावना इतक्या सहज भडकू शकतात त्यांना त्रास होणार यात काही शंका नाही. आणि याला काही इलाज आहे असं वाटत नाही. धन्यवाद.
चिंतातुर जंतूंशी एकंदरीत
चिंतातुर जंतूंशी एकंदरीत सहमत. कोल्हटकरांनी मांडलेला मुद्दा थोडक्यात असा 'दंतकथेचा स्रोत सांगितला नाहीत, तर तुम्ही ती स्वतःच तयार करून दंतकथा म्हणून खपवून देत आहात असं वाटेल.' यात फारतर तुमच्या वैचारिक भावना दुखवू शकतील, पण धार्मिक भावना कशा दुखवतात हे मला कळलेलं नाही.
"वैचारिक भावना" हा शब्दप्रयोग
"वैचारिक भावना" हा शब्दप्रयोग रोचक आहे. विरोधाभासी आहे; पण चपखल आहे. आवडला.
एनी वे. हा लेख आणि त्यावरचे प्रतिसाद हा एक उत्तम केस स्टडी आहे.
या आयडीचा मागोवा घेताना हा
या आयडीचा मागोवा घेताना हा धागा लक्षात आला. दंतकथा या विषयावरची रोचक चर्चा वाचली. दंतकथेला पुरावा देणे कसे शक्य होईल असा प्रतिसाद द्यायचा मोह झाला होता. पण श्री. कोल्हटका यांच्या अभ्यासपूर्ण प्रतिसादामुळे हे लक्षात आले कि अशा प्रकारे खोडसाळ दंतकथा रचून त्या पसरवणे सहज शक्य आहे. असे प्रकार होत नाहीत असं म्हणण्यास धजावत नाही. मात्र, तरीदेखील सरसकट सर्वच दंतकथांना हा नियम लागू करता येणार नाही. काही दंतकथा विशिष्ट प्रदेशात पचलित असतात ज्या केल्याने देशाटन माहीत होतात. कुणी आधीच पुस्तक लिहून ठेवलेले असल्यास त्याचा संदर्भ देता येऊ शकतो. पण जर असा लेखनप्रपंच झालेला नसेल तर मात्र तारतम्यभावाने त्याकडे पहावे लागेल.
एकदा दुस-या एका संस्थळावर भारतात अस्पृश्यता होती हे खोटं आहे असा पवित्रा एकाने घेतला होता. खरं म्हणजे याचा चटका भोगलेली पिढी अजूनही अस्तित्वात असताना नेटवरच्या चर्चेत पुरावा कसा द्यायचा म्हणून मी गडबडलो होतो. अर्थात भारतात अस्पृश्यता होती हे खोटं आहे असा प्रचार शिस्तबद्ध रितीने करण्यात येतो आहे हे मागाहून कळाल्याने लिखीत पुराव्याचं महत्व देखील ध्यानात आलं.
प्राजु यांनी आपला लेख वाचून
प्राजु यांनी आपला लेख वाचून ती गोष्ट लिहीली हे माहीत नव्हते. आपला पर्यटन अनुभव आवडला.
क्षमा मागतो पण...
धागाकर्त्याची मी सर्वप्रथम क्षमा मागतो ती दोन गोष्टींसाठी. पहिली म्हणजे त्यांच्या धार्मिक भावना माझ्या (साध्या) चौकशीने दुखावल्या गेल्या म्हणून. दुसरी म्हणजे त्यांची अधिक चर्चा करण्याची इच्छा नसतांनाहि मी अगोचरपणे हा विषय चालूच ठेवत आहे म्हणून.
दुसर्या गोष्टीबद्दल इतकेच म्हणेन की येथे चर्चा करण्याचा विषय निवडणे आणि आणि तो येथे सर्वांपुढे आणणे हे स्वातन्त्र्य धागाकर्त्याचेच असते पण तो एकदा सुरू झाला म्हणजे it gets a life of its own. ती चर्चा थांबवण्याचे धागाकर्त्याच्या हातात नसते.
धार्मिक भावनांचा प्रश्न असेल तर मी प्रारंभी इतकीच विनन्ति केली होती की 'धाग्यामधील लेखन विनोदी असले काय अथवा गंभीर असले काय, मला त्यावर येथे त्याच्या बाजूने वा विरोधात काहीच म्हणावयाचे नाही. मला त्याचे स्वरूप काय आहे तेव्हढेच सांगा अशी विनंति आहे.' ह्यावर 'हा माझ्या श्रद्धेचा भाग आहे आणि हे लिखाण मी विनोदी म्हणून केलेले नाही' हे साधे उत्तर धागाकर्त्याकडून मिळाले असते तर माझ्याकडून चर्चा येथेच थांबली असती कारण कोणी कशावर, किती आणि का श्रद्धा ठेवावी ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे हे मी मानतो.
पण हे साधेसरळ उत्तर न देता त्याच्याऐवजी 'मी काही constructive लिखाण करावे. वाचन वाढवावे' असले आपल्या अधिकाराबाहेरचे जावई उपदेश मला देऊन धागाकर्त्याने 'माझ्याकडून प्रत्युत्तर मिळणार ह्याची खात्रीच करून ठेवली आहे. So here goes...
राजेश दिक्षितलिखित 'शबरीधाम यात्रा महात्म्य' नामक ग्रंथावरून हे लिखाण धागाकर्त्याने केले आहे असे ते कळवतात. जालावर शोध घेता धागाकर्त्याचाच http://mandarvichar.blogspot.ca/2010/11/blog-post_12.html हा ब्लॉग सोडला तर मला ह्या ग्रंथाचा एकहि उल्लेख कोठे सापडला नाही - डिजिटल प्रत तर नाहीच पण पुस्तकविक्रेत्यांच्या संस्थळावर कमीतकमी पुस्तकाचे नाव तरी सापडते पण तेहि ह्या ग्रंथाच्या बाबतीत झाले नाही.
पुस्तकाच्या नावावरूनच कळते की यात्रांच्या ठिकाणी आणि देवळांच्या बाहेर टपर्यांवर जी पुस्तके मिळतात त्या दर्जाचेच हे पुस्तक असावे. ही पुस्तके preaching to the converted असल्याने त्यांच्यात फार अभ्यास वा विद्वत्तेची अपेक्षा करण्यात अर्थ नसतो. केवळ ह्या पुस्तकावर आधारून जर धागा लिहिला असला तर आनंदच आहे. मी तरी ह्या चोपड्याला - कारण हे तेच आहे असे दिसते - अधिकृत आधार म्हणून काडीचेहि महत्त्व द्यायला तयार नाही. माझी खात्री आहे आहे की पुढेमागे अन्य कोणी शबरीभक्त अजून कोठेतरी शबरीमाहात्म्याचे वर्णन करेल आणि आधार विचारला तर ह्या चालू धाग्याचा आधार देईल. Here we go round the mulberry bush...
धागाकर्त्याच्या ब्लॉगवर संदर्भनामावलीत दोन नावे आहेत, एक राजेश दीक्षित ह्यांचे उपरिनिर्दिष्ट पुस्तक आणि दुसरे गीतरामायण. पैकी गीतरामायणाचा उल्लेख प्रस्तुत धाग्यातहि संदर्भ म्हणून केला आहे, कारण त्यात लपविण्याजोगे काही नाही. मात्र राजेशमहोदयांचे पुस्तक संदर्भातून वगळण्यात आले आहे. असे धागाकर्त्याने बुद्ध्याच का केले असाबे हे एक रहस्य आहे. पुस्तकाचे नाव दिले असते तर येथील चौकस आणि भिंतीला तुंबडया लावणार्या उद्योगी लोकांना त्या पुस्तकाच्या अंतरंगाचा पत्ता लागून धाग्याच्या लेखनाचे सगळे पितळ प्रारंभालाच उघडे पडले असते अशी धागाकर्त्याला धास्ती वाटली असावी आणि म्हणून धाग्यात मात्र स्रोत लपविण्याची चलाखी केली आहे अशी चिकित्साखोर लोकांना शंका आली तर त्यात चुकीचे काय?
राजेश दीक्षित ह्या नावाचाहि शोध घेतला, देवनागरी आणि इंग्रजी, दोन्हीमधून. हे नाव तसे सर्वसामान्य असल्याने डझनावारी राजेश दीक्षित बाहेर पडले पण एकूण पाहता समाजवादी पक्षाचे सचिव राजेश दीक्षित हे शबरीमाहात्म्याचे लेखक असावेत असा तर्क संभवतो. ते उत्तर प्रदेशातील ब्राह्मण मतांचा गठ्ठा वगैरे राजकीय कारस्थानामध्ये खोल बुडलेले दिसतात. त्यांच्याबद्दल पुढील माहिती येथे मिळाली.
"करीब ढाई तीन हजार ब्राह्मणों के इस सम्मेलन को सम्बोधित करते हुए राजेश दीक्षित ने कहा कि "पिछली सरकार के एक ब्राह्मण नेता ने ब्राह्मणों से वादा किया था कि वे प्रदेश में ब्राह्मणों का हक दिलाएंगे लेकिन उन्होंने और उनकी सरकार ने हरिजन बनाम सवर्ण के मुकदमों तक को रोकने में कोई कामयाबी नहीं पाई." दीक्षित ने दावा किया कि समाजवादी पार्टी प्रदेश में "ब्राह्मणों को उसका हक दिलाएगी और उनके सामाजिक और आर्थिक विकास की तरफ ध्यान देगी."
हे राजकीय पुढारीच आपल्याला हवे असलेले राजेश असले काय वा कोणी अन्य असले काय, त्यांच्या नावाने आणखी तीन पुस्तके येथे दिसली: 'अमर रहेंगे ये बलिदानी' - एकूण पाने ३२(!), 'सत श्री अकाल' एकूण पाने (अर्थात् ३२च) आणि सरल हिन्दी पर्यायवाची शब्दकोश - एकूण पाने ७२ (अबब!) अन्य काही लिखाण विद्वान लेखक राजेश दीक्षित ह्यांच्या नावाचे दिसले नाही.
एवंच काय, राजेश दीक्षित हे ३२ पानी चोपडया लिहिणारे कोणी hack दिसतात. (Hack writer, a writer who is paid to write low-quality, quickly put-together articles or books इति विकिपीडिया.) ह्याहून अधिक वजनदार कोणी स्रोत असला तर धागाकर्त्याने दाखवावा अशी पुनः विनंति करतो.
मी तुम्हाला उत्तर द्यायला बांधील नाही
माफ करा. लेखकाचे नाव चुकले. त्यांचे नावः राजेश सुरेश दिक्षित असे आहे.
हे पुस्तक फक्त हिंदीत उपलब्ध आहे. त्याची एक प्रत माझ्या एका नातेवाईकांकडे उपलब्ध आहे. कुणीतरी शंका काढली यासाठी ती मागवण्याइतका मोकळा वेळ कमीतकमी माझ्याकडे तरी नाही. असो.
बाकी हा निश्चितच माझ्या श्रद्धेचा भाग आहे व यावर चर्चा अपेक्षित नाही. वर लेखकाचे नाव दुरुस्त केलेच आहे. याउप्पर या कथेचा स्त्रोत हवा असल्यास स्वतः शबरीधामास भेट देणे (किंवा न देणे, मला काही फरक पडत नाही). तुम्ही तुम्हाला ज्या गोष्टीबद्दल द्वेष वाटतो त्याबद्दल बोलणे सुरु केलेच आहे. चालू ठेवा. तुम्हाला इथे किंवा कुठेही धार्मिक बाबतीत मी उत्तर द्यायला बांधील नाही आणि देणारही नाही. तेव्हा टाटा.
दंतकथा
टीपः वर जी शबरीची गोष्ट मी दिली आहे ती खचितच माझ्या कल्पनेचे वारू उधळून लिहीलेली नाही.
-------------------------------------------------
दंतकथेला पुरावा? =)) असो.
-------------------------------------------------
तुमचा प्रश्नही तिरकाच आहे, तरी पण उत्तर देतो. DNA बद्दल माहिती सगळीकडे उपलब्ध आहे. त्यामुळे मला काय कुणालाच लिहायची गरज नाही. शिवाय यासारख्या गोष्टींवर लिहीणारे पंडित ढीगाने आहेत, त्यात मज पामराची काय गरज? शिवाय, मला रस असलेल्या गोष्टींबद्दलच मी लिहीणार आणि ते लिहीणारच. त्यात चुकीचे काहीही नाही.
वर पुस्तकाचे नाव शबरीधाम यात्रा महात्म्य आणि लेखक राजेश सुरेश दिक्षित असे दिले आहेत की. आणखी संदर्भ कसला हवा आहे? हवा असेल तर तो शबरीधाम स्थळी उपलब्ध असेलच तिथे जाऊन चौकशी करावी. दुर्दैवाने आपल्याकडे documentation ची सवय नसल्याने एका घटनेची अनेक रूपं (versions) उपलब्ध असतात. ते असो. पण गतकाळात घडलेल्या अनेक गोष्टी अशा असतात की त्या जशाच्यातशा स्वीकारल्या तर कुणाचेच नुकसान नसते. पण मुद्दामून अशा गोष्टी दिसल्या की गुगलसम्राट (कु)शंका काढतात आणि इकडच्या तिकडच्या लिंका देऊन वाचनातली गोडी घालवण्याचा प्रयत्न करतात. हे निषेधार्ह आहे.
शिवाय पहिल्या कुशंकायुक्त प्रतिसादापासून हेतूविषयी शंका घ्यायला जागा असल्याने ते निषेधार्हच.
तेव्हा तुम्हा तीन-चार जणांचा अजेंडा लक्षात आल्याने एकांना टाटा केलाच आहे. पण याबद्द्ल माझा तुम्हाला सुद्धा आणि अशा प्रकारचे प्रतिसाद देणार्यांना सर्वांनाच टाटा.
दंतकथेला पुरावा?
यात विनोदी काहीही नाही. इतिहास ह्या ज्ञानशाखेत असं करतात. एखादी गोष्ट प्रत्यक्ष घडली असं म्हणायला इतिहासात काही आधार नाही हे तपासल्यानंतर तिला दंतकथा म्हणून अभ्यासता येतंच. त्या अभ्यासात एखादी दंतकथा नक्की कधी अस्तित्वात आली आणि कशी विकसित झाली हे तपासलं जातं. उदाहरणार्थ : मी वर म्हटल्याप्रमाणे शबरीच्या बोरांना वाल्मिकी रामायणात अस्तित्व नाही असं दिसतं. किंवा शकुंतलेची अंगठी हरवल्याची गोष्ट ही बहुधा कालिदासाची देणगी आहे. त्याआधीच्या कथांत असा काही उल्लेख नव्हता. एका घटनेची अनेक रूपं इतिहासात दिसतात तशीच एका दंतकथेचीही दिसतात. पण आपल्याकडे डॉक्युमेंटेशन नाही एवढ्याच कारणापोटी दंतकथा सत्य मानता येत नाहीत.
एखादी गोष्ट घडली होती हे असं सहज स्वीकारणं इतिहास ह्या ज्ञानशाखेला अमान्य आहे. पुराव्यांनिशी कोणतीही गोष्ट जशीच्यातशी किंवा स्वीकारणं हे वैज्ञानिक दृष्टिकोनाला मूलतः अमान्य आहे.
श्री जंतू यांना - याचा अर्थ
श्री जंतू यांना -
याचा अर्थ प्रस्तुत दंतकथेचा उगम हा श्री अमुक अमुक यांच्या एखाद्या छोटेखानी पुस्तिकेत सापडला असे आपण समजू. म्हणजे, आपण अशी चर्चा करु शकतो, की "हजारो वर्षांपासून चालत आलेल्या एखाद्या कथेमध्ये/ आख्यायिकेमध्ये आत्ता भर घालावी असे एखाद्याला वाटण्याचे काय कारण असू शकते". यावरुन अभ्यासाच्या कोणकोणत्या दिशा उघडू शकतात?
तुमचा प्रश्नाच्या उत्तरासाठी
तुमचा प्रश्नाच्या उत्तरासाठी "महाभारत" हा सर्वांत उत्तम केसस्टडी आहे असे नाही का वाटत आ.रा. साहेब? आधी जय, मग भारत आणि त्याचे महाभारत? शिवाय हे असे झाले हेदेखील प्राचीन मतच आहे. त्या विषयातल्या तुम्ही उल्लेखिलेल्या पैलूंवर कितीतरी जणांनी लिहिलेले आहे. अरविंद कोल्हटकरांना विचारले तर बर्याच लिंका मिळतील.
>>याचा अर्थ प्रस्तुत दंतकथेचा
हो. उदाहरणार्थ, कालिदासाच्या आधीची शकुंतलेची गोष्ट ही तशी स्त्रीवादी होती असं एक विश्लेषण रोमिला थापर यांनी केल्याचं* स्मरतंय - म्हणजे आधीच्या गोष्टीत 'ह्या मुलाचा स्वीकार कर' म्हणून शकुंतला दुष्यंतासमोर लाचार होत नाही; पण कालिदास अंगठी हरवून वगैरे तिला दुष्यंतासमोर लाचार करतो.
* - Śakuntalā:
Texts, Readings, Histories - http://books.google.co.in/books?id=ZjFhaDluzMUC&lpg=PP1&ots=HDn5dLxTmv
विरोधासाठी विरोध?
>>एखादी गोष्ट घडली होती हे असं सहज स्वीकारणं इतिहास ह्या ज्ञानशाखेला अमान्य आहे. पुराव्यांनिशी कोणतीही गोष्ट जशीच्यातशी किंवा स्वीकारणं हे वैज्ञानिक दृष्टिकोनाला मूलतः अमान्य आहे.
शबरीच्या गोष्टीवर असलेला आक्षेप ह्या लेखाच्या माध्यमातून घेण्याचे प्रयोजन कळत नाही, लेखकाने श्रद्धेपोटी माहिती दिली आहे, ती स्विकारावी हा आग्रह चूकिचा असला तरी वरिल बर्याच प्रतिसादात केवळ विरोधासाठी विरोध होताना दिसत आहे, हे इथे अवांतर वाटते.
इतिहास आणि वैज्ञानिक दृष्टीकोन ह्यावर वेगळी चर्चा व्हावी, पण अशा प्रकारचे धर्माशी निगडित लेखन परत संस्थाळावर येऊ नये ह्यासाठी वरिल काही प्रतिसादांत प्रयत्न केला जातो आहे काय अशी शंका येते.
शबरी हे ( सत्य / काल्पनिक