चिपळूणचे संमेलन आणि पाच शक्यता

कोकणातील चिपळूण येथे ११ ते १३ जानेवारी २०१३ या काळात होणारे ८६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेल ह. मो. मराठे यांच्या एका पत्रकाने वादात सापडले आहे. ब्रिगेडने संमेलनाच्या मैदानात उडी घेतल्यामुळे हे संमेलन होईलच याची आता कोणालाही खात्री राहिलेली नाही. पण हे संमेलन व्हावे, असे सर्वसामान्य मराठी रसिकांस वाटते. संमेलन निर्विघ्न व्हायचे असेल, तर तीन प्रमुख अटी संभाजी ब्रिगडने घातल्या आहेत. त्या अशा :

१. ह. मो. मराठे यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी.
२. ह. मो. मराठे यांनी जाहीर माफी मागावी.
३. मराठे यांनी जारी केलेले आपले वादग्रस्त पत्रक मागे घ्यावे.

या अटी मान्य झाल्या नाही, तर मराठे यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही संमेलन उधळून लावू असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रवीणदादा गायकवाड यांनी दिला आहे. ह. मो. योग्य की संभाजी ब्रिगेड या वादात न पडता, या संमेलनाचे काय होणार या विषयीच्या पाच शक्यता पुढील प्रमाणे असू शकतील.

शक्यता एक
ह. मो. मराठे निवडणूक हरतील. त्यामुळे संभाजी ब्रिगेडला संमलेन उधळण्याची गरजच राहणार नाही. संमलेन निर्विघ्न पार पडेल.

शक्यता दोन
ह. मो. मराठे विजयी होतील. विजयी झाल्यानंतर ते जाहीर दिलगिरी व्यक्त करतील. आपण जारी केलेले पत्रक मागे घेतील. त्यामुळे संभाजी ब्रिगेडला संमेलन उधळण्याची गरज राहणार नाही. संमेलन निर्विघ्न पार पडेल.

शक्यता तीन
ह. मो. मराठे विजयी होतील. पण माफी मागण्यास नकार देतील. पत्रक मागे घेण्याचेही नाकारतील. त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थिती संमेलन घेणे धोकादायक आहे, असे गृहीत धरून साहित्य महामंडळ संमेलनच रद्द करील.

शक्यता चार
ह. मो. मराठे विजयी होतील. माफी मागण्यास , पत्रक मागे घेण्यास नकार देतील. परिस्थिती तणावपूर्ण होईल. तरीही संमेलन होईलच, अशी कणखर भूमिका महामंडळ घेईल. मात्र, संभाजी ब्रिगेड खरोखरच गोंधळ घालून संमेलन उधळून लावील.

शक्यता पाच
ह. मो. मराठे विजयी होतील. माफी मागण्याचे नाकारतील. महामंडळ संमेलन घेण्यावर ठाम राहील. सरकार महामंडळाला पाqठबा देईल. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकत्र्यांची आधीच धरपकड केली जाईल. पुरेसा पोलिस बंदोबस्त दिला जाईल. पोलिस बंदोबस्तात संमेलन निर्विघ्न पार पडेल.
.....................

या पेक्षा वेगळ्या शक्यता असू शकतात का? बघा डोके लावून.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

पहिल्याच शक्यतेचा विस्तार करता येतो. हमो हरतील. मग त्यांचा निषेध साहित्य संमेलनाने केला पाहिजे, अशी मागणी ब्रिगेडला करता येते. मग पुढच्या चारही शक्यतांचा उत्तरार्ध लागू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"संभाजी ब्रिगेड"चं मतपरिवर्तन होण्याची शक्यता अजिबातच नाही का? Smile माझ्या मते ती सहावी शक्यता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सविताताई,

भूमिका कोणत्याही परिस्थितीत न बदलणे व योग्य संधीची वाट पाहणे हा ब्रिगेडचा इतिहास आहे.
त्यामुळे याची शक्यता कमीच आहे. पण ही एक शक्यता नक्कीच आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या शक्यतेचा दूरान्वयानेही विचार करू नका, सविताताई. 'वाघ्या' नंतर फार दिवसांनी ब्रिगेडला एक खणखणीत विषय सापडला आहे....किंबहुना ह.मों.च्या उमेदवारीने 'मराठे' गटात नसेल इतका 'मराठा' गटात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. परवाच कोल्हापूरात प्रविणदादा थोर कार्यकर्त्यांसमोर जे बोलले [किंवा ज्या भाषेत बोलले] ते कोणत्याही वर्तमानपत्राने 'जसेच्यातसे' छापलेले नाही. त्या भाषेचा 'डौल' असा काही रणरणता आहे की आता परिस्थिती अशी झाली आहे की, ह.मो. नी उमेदवारी मागे घेतली तर ब्रिगेडच्या गोटातच अनुत्साहाचे वातावरण पसरेल.

बाकी श्री.सूर्यकांत पळसकर यांच्या शक्यतेतील पहिलीच घटना सत्य होण्याची चिन्हे असल्याने....आंदोलकांच्या संदर्भातील हालचाली म्हणजे "केरच नाही, तर केरसुणी कशासाठी ?...." अशीच काहीशी अवस्था राहील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आज मराठेंनी दिलगिरी व्यक्त केली आहे अशी ओझरती बातमी टीव्ही वर पाहिली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भाइ लोग, हो. मो. मराठे यान्नी माफी मागून टाकली आहे.
मटा मध्ये बातमि आहे.
..................
जेम्स लेनबाबत हमोंची दिलगिरी
Sep 11, 2012, 03.36PM IST
पुणेः ह . मो . मराठे यांनी मतदारांना पाठवलेल्या मतपत्रिकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बदनामीकारक मजकूर लिहिणाऱ्या जेम्स लेनच्या पुस्तकाचा उल्लेख केला होता . त्यावरून संभाजी ब्रिगेडने मराठेंची उमेदवारी रद्द करावी , अशी मागणी केली होती . त्यावर ' छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपल्याला नितांत आदर असून ते सर्वांचे दैवत आहेत . मी मतदारांना पाठविलेल्या पत्रामध्ये अनावधानाने लेनच्या पुस्तकाबद्दल उल्लेख झाला . तो उल्लेख मी मागे घेतो ,' अशा आशयाचे पत्र पाठवून मराठेंनी या प्रकरणी माघार घेतली .

बातमीची लिन्क

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सगळ्या भाई लोगान्ला गरीब माणसाचा शि.सा.दंडवत.

हो. मो. मराठे यांनी सगळ्या लोकान्ला उल्लू बनवला है. जेम्स लेनचा नाव घेऊन त्यांनी सगळ्या लोकान्चे लक्ष आपल्याकडे खिचून घेतले. आता माफी मागून टाकली. निवडून येण्याचा रास्ता मोकळा. संमेलन होण्याचा मार्ग मोकळा.

म्हणून आपून सांगते का, जयहिन्द बोलणे का, और चूप रैने का.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह मो मराठे यांच्या पत्रात नेमके काय होते हे कोणी सांगितले तर बरे होईल. वर तेजा यांच्या प्रतिसादातून जेम्स लेन यांच्या पुस्तकाचा काही उल्लेख असल्याचे समजले पण नेमके काय ते समजले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>ह मो मराठे यांच्या पत्रात नेमके काय होते हे कोणी सांगितले तर बरे होईल. वर तेजा यांच्या प्रतिसादातून जेम्स लेन यांच्या पुस्तकाचा काही उल्लेख असल्याचे समजले पण नेमके काय ते समजले नाही.<<

'लोकमत'मध्ये त्या पत्रकाचा अंश प्रकाशित झाला होता. तो इथे पाहता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

धन्यवाद. पत्रकातील वादग्रस्त भाग काय आहे ते लक्षात आले. संभाजी ब्रिगेड वगैरेंना या पत्रकाने त्रास होणे व त्यांनी आक्रस्ताळी भुमिका घेणे याबाबत आश्चर्य वाटले नाही. ठाकरे, ब्रिगेड वगैरेंसारख्या टोळ्यांची मराठी सांस्कृतिक जीवनात ढवळाढवळ हे आता नित्याचेच झाले आहे. परंतु श्री मराठे यांच्या पत्रकाचा सारांश अनेक कारणांमुळे आश्चर्यकारक आहे.

एका साहित्यिकाने कलेच्या क्षेत्रात अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर होत असलेल्या अतिक्रमणाविषयी चिंता व्यक्त करणे, संमेलनाच्या व्यासपीठावर हा मुद्दा हिरीरीने मांडणे हे समर्थनीय आहे. परंतु श्री मराठे यांनी लेन प्रकाराचा उल्लेख* मात्र अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार म्हणून केलेला दिसत नाही. ब्राह्मण समाजाबद्दल पसरवला जाणारा द्वेष हा त्यांचा प्राथमिक मुद्दा असावा असे सारांश वाचतांना जाणवले. उदा. सारांशातील खालील विधाने.

ब्राह्मण समाजाविषयी किंवा कोणत्याही धर्म-जातीविषयी या प्रकारे हिंसक वातावरण तयार करून त्यावर राजकीय स्वार्थाची पोळी भाजून घेणे ही अनिष्ट प्रवृत्ती आहे. गेल्या दीडशे वर्षांपासून महाराष्ट्रात ब्राह्मणद्वेषाचे वातावरण पद्धतशीरपणे तयार करण्यात येत असून, सध्या त्याचा कळस गाठण्यात येत आहे.

हिंसक वातावरण तयार करण्याच्या या प्रयत्नांविरुद्ध ब्राह्मण समाजाने संघटित होऊन आवाज उठवला पाहिजे, हा माझ्या भूमिकेचा एक भाग आहे. ब्राह्मणांना भारतीय समाजाचे एक नंबरचे शत्रू ठरविण्याचे प्रयत्न विविध लेखांतून व पुस्तकांतून करण्यात येत आहेत.

श्री मराठे यांनी ब्राह्मण समाजावर होत असलेल्या कथित अन्यायाची भुमिका समजण्यासारखी आहे. त्यांनी त्यांचा लढा सुरू ठेवावा. फक्त या प्रकारात साहित्य-संस्कृतीपेक्षा एका जातीच्या कल्याणाची त्यांना चिंता असावी असे दिसते. जे वावगे नाही पण संमेलनाच्या निमित्ताने ceteris paribus संभाजी ब्रिगेड व श्री मराठे हे एकाच कापडाचे आहेत असे वाटावे इतपत अप्रस्तुत आणि अनाठायी आहे.

*लेन यांच्या पुस्तकाविषयी न्यायालयाने दिलेल्या निवाड्यांचा संदर्भ देऊन लिहिणे आ आक्षेपार्ह मुद्दा नाही. किंबहून 'लेन प्रकरण' हे त्यामुळे उद्भवलेल्या हिंसाचारापेक्षा त्या पुस्तकाला झालेल्या सार्वत्रिक विरोधामुळे मला चिंतनीय वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>संमेलनाच्या निमित्ताने ceteris paribus संभाजी ब्रिगेड व श्री मराठे हे एकाच कापडाचे आहेत असे वाटावे इतपत अप्रस्तुत आणि अनाठायी आहे.<<

सहमत. नुसतं संमेलनच नाही, तर याआधीदेखील ह.मों.चं हे असलं लिखाण वाचून असंच वाटलं होतं. फक्त एक फरक करायचा झालाच तर - आधी हे असं लिहून प्रकरण चिघळल्यानंतरचा 'अनवधानानं' विधान केल्याचा कांगावा फारच विनोदी होता. किमान आपल्या भूमिकेशी ठाम राहण्याचं पुण्यही त्यातून हरवलं. त्यामुळे ते आनंद यादवांचाच कित्ता गिरवताहेत हे स्पष्ट झालं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आडनावातच मराठे असल्याने ब्रिगेडचे दादा-पादा विरोध करणार नाहीत असा माझा कयास होता.पण तो खोटा ठरला्. शरदपादा,अजितपादा आता काय भूमिका घेतात बघायचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी मागे ज्या ब्लॉग बद्दल लिहिले होते, त्या वर ह. मो. यान्चे निवेदन आहे. लिन्क येथे देत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0