मराठी पुस्तकांचे अनुवाद

इतर भाषांतून मराठीत होणार्‍या अनुवादांची संख्या अतिप्रचंड असली, तरी मराठीतील पुस्तकांचा इतर भाषांत अनुवाद होण्याचे प्रमाण फार म्हणजे फारच कमी आहे. तेंडुलकर, नारळीकर, श्री. ना. पेंडसे अशा मोजक्याच लेखकांचे मराठी लेखन इंग्रजीत गेले आहे. याखेरीज विश्राम बेडेकरांचे 'रणांगण' हे एकच असे पुस्तक मला माहीत आहे, ज्याचा जर्मन भाषेत अनुवाद झालेला आहे. संतांपैकी तुकाराम, ज्ञानेश्वर अशा काहींचे साहित्य इतर भाषांत गेले आहे. मराठीतून इतर भारतीय भाषांत झालेल्या अनुवादांबद्दल मला काहीच माहिती नाही, परंतु त्यांचेही प्रमाण फारसे नाही अशी सार्वत्रिक ओरड ऐकलेली आहे.

अशी कोणती मराठी पुस्तके अथवा लेखन आहे, जे इंग्रजीत अनुवादले जाऊन जागतिक वाचकापर्यंत पोहोचावे असे तुम्हाला वाटते (येथे ''इंग्रजी' ही जागतिक वाचकाची भाषा आहे' असे एक गृहीतक तात्पुरते धरले आहे)? ते पुस्तक वैचारिक अथवा साहित्यिक असे कसेही असू शकते. साहित्यिक असल्यास गद्य वा पद्य अशा कोणत्याही स्वरुपाचे असू शकते. पुस्तक सुचवतानाच त्याच्या निवडीमागचे कारणही सांगा. उदा. फुलेंचे अखंड इंग्रजीत यावेत असे वाटते कारण फुलेंचे विचार महाराष्ट्राबाहेरील जगासमोर जायला हवेत. किंवा पुलंचे साहित्य अनुवादित झालेच पाहिजे कारण ते मराठी साहित्यातले एक खूप महत्त्वाचे साहित्यिक आहेत इ.

थोडक्यात, जागतिक पातळीवर मिरवावे असे मराठीतले लेखन कोणते हा प्रश्न आहे.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

अगदी मनातला प्रश्न विचारलात बघा. माझी यादी:

(जनरल संतसाहित्य पण माझे काही फेव्हरिट्स)
ज्ञानेश्वरी
तुकाराम गाथा
दासबोध

शिवाय

रामचंद्रपंत अमात्यांची आज्ञापत्रे-आर्ट ऑफ वॉर वैग्रेंच्या तोडीचा ग्रंथ आहे.
भाऊसाहेबांची बखर - मराठ्यांच्या वॉटर्लूचे अप्रतिम वर्णन, सुंदर भाषा.

नवीन लोकः

गोनीदां-अप्रतिम सुंदर भाषा आणि कसदार साहित्य- मराठीचा थॉमस हार्डीच जणू. कुणा एकाची भ्रमणगाथा आणि बुधा हे मास्तरपीसेस.
समग्र कुरुंदकर-मराठीचा सॉक्रेटीस
सेतुमाधवराव पगडी-त्यांचे आत्मचरित्र (जीवनसेतू)
विट्ठलराव घाटे - आत्मचरित्र (दिवस असे होते)
जीए,चिंत्र्यं
पुल
लंपन सीरीज बाय प्रकाश नारायण संत
माझा प्रवास-वरसईकर गोडसे गुर्जी.
गुरुदेव रानडे-पण त्यांचे बहुतेक लिखाण मराठीबरोबरच इंग्रजीतदेखील आहे.
महात्मा फुले
स्मृतिचित्रे
नवनीत-मराठीची गोल्डन ट्रेजरी.
लोकहितवादी.

काही इतिहासकारांचे योगदान, रादर मराठीतली इतिहासकारांची परंपरा व तिचे पूर्ण योगदान इंग्रजीतून सामोरे येणे अवश्यमेव आहे:

राजवाडे
वासुदेवशास्त्री खरे
त्र्यंबक शंकर शेजवलकर-विशेषतः स्फुट लेख.
मेहेंदळे-तरी यांनी समग्र शिवचरित्र इंग्रजीत लिहिले ते एक बरेच आहे.
ग ह खरे
रियासतकार

सध्या तरी इतकीच आठवताहेत. बाकी पुढे आठवल्यास देईनच. बायदवे गीतारहस्याचे अगदी मलयाळममध्ये देखील भाषांतर झाले होते असे हिंदू दैनिकात दिलेले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

या पैकी काही पुस्तकं इंग्रजीत उपलब्ध आहेत. उदा: भाऊसाहेबांच्या बखरीचे इअन रेसाइड यांनी सुरेख भाषांतर केले आहे. (ते कुठेही उपलब्ध नाही ही निराळी गोष्ट!) स्मृतिचित्रे दोनदा अनुवादित झाले आहे - आता अनुवादकांची नावं आठवत नाही.
एकूण १९व्या शतकानंतरच्या मंडळींसाठी "नवीन लोक" ही कॅटगरी आवडली!

राधिका, बंगाली मध्ये साहित्य अकादमी द्वारा झालेले अनुवाद आहेत - कोसला, उचल्या, इ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहितीबद्दल धन्यवाद. इअन रेसाइड यांनी आणखीही काही मराठी पुस्तकांचे भाषांतर केले आहे. 'गारंबीचा बापू' याचे त्यांनी केलेले भाषांतर मी मध्यंतरी साहित्य अकादमीमधून अवघ्या २५ रु.ना विकत घेतले होते.

स्मृतिचित्रेचा अनुवाद झाला असेल अशी शंका होतीच. मीरा कोसंबी यांनी पंडिता रमाबाईंच्या काही निवडक लेखनाचा अनुवाद केला आहे. माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी काशीबाई कानीटकरांच्या 'पालखीचा गोंडा' या कादंबरीचाही अनुवाद केला आहे, पण त्याचा उल्लेख विकिपिडियावर सापडला नाही.

कोसला, उचल्या यांबद्दल माहीत नव्हतं. साहित्य अकादमीने आणखी काय काय अनुवादून घेतलं आहे ते पहायला हवं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राधिका

या वर्षी पुस्तक मेळ्यात साहित्य अकादमी च्या स्टॉल मध्ये ७-८ मराठी पुस्तकं बंगाली अनुवादात पाहिली होती - साहित्य अकादमीच्या जालीय पत्त्यावर बंगाली पुस्तकांच्या यादीत (पीडीएफ) बरीच मराठी पुस्तकं आहेत. नमुनादाखलः
ज्ञानेक्ष्वर, "अमृतानुभव आर चांगदेव पासष्टी" - अनु. गिरिशचंद्र सेन, १९६५. त्यांनीच केलेला "ज्ञानेक्ष्वरी" चा अनुवाद १९९९ मध्ये पुनः छापला गेला.
हरि नारायण आपटे, "किंतु के खॉबोर राखे" (पण लक्षात कोण घेतो) - अनु. सरोजिनी कामतनुरकर, १९७१
नेमाडे, "नीड" (कोसला), अनु. वंदना आलासे हाजरा
विष्णु प्रभाकर, "काका कालेलकर," अनु, स्नेहलता चट्टोपाध्याय
प्रभाकर माचवे, "केशवसुत," अनु. क्षितीज राय
दा द कोसंबी "भगवान बुद्ध," अनु. चंद्रोदय भट्टाचार्य

साहित्य अकादमी च्या साइटीवर सर्व भाषांतील पुस्तकांची यादी आहे - प्रथमदर्शनी हेच सगळे 'मराठी ग्रेटेस्ट हिट्स' वेगवेगळ्या भाषांत अनुवादित झाले आहेत असे दिसते.

गेल्या वर्षी मृणाल पाण्डे यांनी गोडसे भटजींचे "माझा प्रवास" इंग्रजीत आणले - काही महिन्यात ऑक्स्फोर्ड वाले प्रिया अडरकर आणि शांता गोखले यांनी केलेला याच पुस्तकाचा अनुवाद छापणार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

> नेमाडे, "नीड" (कोसला), अनु. वंदना आलासे हाजरा

अवांतर पण curious. संस्कृतात 'नीड:' म्हणजे घरटं, अाणि लॅटिनमध्ये 'nidus (उच्चार: नीडुस्)' म्हणजे घरटं. या योगायोग अाहे की मूळचा इंडो-युरोपियन शब्द अाहे, माहित नाही. असो. बंगालीत 'नीड' याचा अर्थ 'कोश' अशासारखा होतो का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

नीड या शब्दाचा जो काही प्रोटोफॉर्म असेल तो असो, तो इंडो-युरोपियनच आहे असे वाचलेले आहे. बाकी बंगाली अर्थाबद्दल कॉलिंग रोचना Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बंगाली मध्ये नीड म्हणजे घरटं, किंवा घर (ठाकूरांची - आणि राय यांच्या चारुलता सिनेमाची - प्रसिद्ध कथा - नॉष्टो नीड)
खरंतर मी नीड चुकीचं लिहीत आहे - नीड मधला ड च्या खाली एक टिंब हवा (নষ্টনীড়), पण तो इथे कसा द्यावा हे कळत नाहीये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्र का टा आ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पीडीएफच्या दुव्यासाठी धन्यवाद. "माझा प्रवास"चे एक भाषांतर झाल्याचे ऐकले होते. आणखी एक भाषांतर येणार आहे ही बातमी नवीन आहे. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राधिका

आयला इअन रेसाइडने भाऊसाहेबांच्या बखरीचं भाषांतर केलं होतं??? आणि तुम्हाला ते कुठून कळालं????? सांगा प्लीज Smile हा रेसाइड लैच खतरनाक प्राणि दिसतोय. ललितच्या काही ७० च्या दशकातल्या दिवाळी अंकांत याचे उल्लेख आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मला ते अमेरिकेतील एका वाचनालयात अचानक एके दिवशी मिळालं! Smile The Decade of Panipat असे त्याचे शीर्षक आहे, पॉप्युलर ने छापले आहे, आणि बखरी बरोबर नाना फडणीस, अंताजी माणकेक्ष्वरांच्या काही पत्रांचाही अनुवाद आहे. बखरीचा अनुवाद मस्त आहे - त्या भाषेला तशाच लयीच्या इंग्रजीत आणायचा प्रयत्न खास आहे. कॉपी हवी असल्यास माझ्याकडची स्कॅन करून कुठे अपलोडता येते का पाहते. रेसाइड गेल्या वर्षीच वारले. आधुनिक मराठी कादंबरीच्या उगमाबद्दल त्यांचे काही रोचक लेखही आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निव्वळ हेच नाही, पण समग्र/बहुतांश रेसाइड कुठे मिळेल? यादी मिळाली तरी बेहत्तर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तूर्तास रेसाइड यांचे काही लेख इथे अपलोडले आहेत (, , , .) पेंडसेंच्या गारंबीचा बापूवर ही एक समीक्षात्मक लेख आहे, पण तो माझ्याकडे सध्या नाही. भाऊसाहेबांच्या बखरीच्या अनुवादाची स्कॅन करायचे पाहतेय...

मला त्यांची लिहायची शैली फार आवडते, एक मिस्किल, अस्सल ब्रिटिश विनोद असतो, पण त्यांचे निष्कर्ष बर्‍याच वेळेला पटत नाहीत - उदा. बखरीचा अनुवाद त्यांनी अगदी विचारपूर्वक केला, पण त्या साहित्यप्रकाराचे मूल्यमापन अगदीच वरवरचे आहे - आधुनिक काळाच्या 'उदया'च्या तुलनेने बखरी त्यांना कमकुवतच वाटतात. गतकालाच्या नॅरेटिवची, गद्याची, लालित्याची चिन्हं, "डिवेलपमेंट ऑफ प्रोस" या सत्राच्या बाहेर, निराळीच असू शकतील याचा ते विचार करत नाहीत, फारच सरसकटीकरण करतात. पण १९६८ मध्ये लिहीलेला लेख आहे, त्यामुळे तेव्हाच्या 'डिवेलपमेंटलिस्ट' वातावरणात दुसरे काही अपेक्षितही नसावे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बहुत बहुत धन्यवाद !!! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

या चर्चेच्या निमित्ताने इअ‍ॅन रेसाईड यांचा उल्लेख इथे होत आहे हे पाहून फार समाधान झाले.

मराठी आणि गुजराथी या दोन भाषांवर मनापासून प्रेम करणारे प्रा.रेसाईड हे इंग्लिश आणि मराठी भाषेला जोडणारा एक महत्वाचा दुवा होते. लंडनच्या स्कूल ऑफ ओरिएन्टल अ‍ॅण्ड आफ्रिकन स्टडिजमध्ये 'मराठी' विषय शिकविणारे प्रा.रेसाईड हे शेवटचे शिक्षक होते असे मानले जाते. 'गारंबीचा बापू' दरम्यान श्री.ना.पेंडसे आणि इअ‍ॅन रेसाईड यांच्या दरम्यान झालेल्या पत्रव्यवहाराचा रोचक इतिहास पेंडश्यांच्याच 'लेखक आणि माणूस...' आत्मकथनामध्ये वाचायला मिळतो. त्या काळात तर [साठचे दशक] ई-मेल नसताना बाय-एअर पत्रे पाठवून प्रा.रेसाईड काही खास कोकणी शब्दांचा अर्थ पेंडसे याना विचारून मगच इंग्लिश अनुवादाचे काम पुढे नेत हे वाचून त्या माणसाच्या सखोल अभ्यास करण्याची वृत्तीबाबत आदर दुणावतो. कोकण भागातील मराठी शिकण्यासाठी रेसाईड खास आले होते आणि पेंडश्यासमवेत सारा मुरूड परिसर त्यानी पिंजून काढला होता.

त्यांचे पुत्र जेम्स रेसाईड यानी प्रा.इअ‍ॅन रेसाईड यांच्या मृत्युनंतर 'गार्डियन' मध्ये लिहिलेला लेख खालील लिंकवर अभ्यासकांना वाचता येईल.

http://www.guardian.co.uk/theguardian/2011/apr/03/ian-raeside-obituary

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'गारंबीचा बापू' दरम्यान श्री.ना.पेंडसे आणि इअ‍ॅन रेसाईड यांच्या दरम्यान झालेल्या पत्रव्यवहाराचा रोचक इतिहास पेंडश्यांच्याच 'लेखक आणि माणूस...' आत्मकथनामध्ये वाचायला मिळतो.

ही माहिती माझ्यासाठी महत्त्वाची आहे. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राधिका

राधिका...

रेसाईड यांच्या अनुषंगाने चर्चा चालू आहेच तर त्यात थोडीशी भर घालतो.

विश्वास पाटील यानी 'आपला "पानिपत" कादंबरी लिहिण्याचा अनुभव' या विषयावर 'सकाळ' च्या पुरवणीत एक दीर्घ लेख लिहिला होता. अनेक रोचक घटनांचा उल्लेख करताना त्यानी असेही लिहिले आहे की, "पानिपत कादंबरी वाचून इंग्लंडहून रेसाईड नामक एका विद्वानाचे मला पत्र आले. ती कादंबरी त्याना इतकी प्रभावीत करून गेली की त्यानी असे लिहिले 'अशाच रोमहर्षक वर्णनांना पूरक असा इंग्लंडचाही इतिहास आहे आणि त्यांचेही तुमच्या पानिपत सारखे लेखन होणे गरजेचे आहे...." इ.इ.

श्री.विश्वास पाटील याना 'रेसाईड' म्हणजे नेमके 'वाईल्ड बापू ऑफ गारंबी' हेच अपेक्षित होते की अजून दुसरे कुणी तिथे मराठी जाणणारे 'रेसाईड' आहेत याचा उलगडा होत नाही. लेखात प्रथम नामाचा उल्लेख नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I recognize the lion by its paw.

-Jacob Bernoulli on Newton's anonymous solution in the form of branchistochrone to the calculus problem posed by him.

तोच न्याय Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

छान यादी दिली आहे.

गीतारहस्याला तर मी विसरलेच होते. आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद.

बाकी, दासबोधाचे भाषांतर अलीकडे आले आहे. दिलीप चित्र्यांचे 'सेज तुका' हे तुकारामांच्या गाथांचेच भाषांतर असावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राधिका

<अशी कोणती मराठी पुस्तके अथवा लेखन आहे, जे इंग्रजीत अनुवादले जाऊन जागतिक वाचकापर्यंत पोहोचावे असे तुम्हाला वाटते?>

मराठी भाषेचा आणि संस्कृतीचा अभिमान बाळगतांनाहि असे म्हणावेसे वाटते की वरील प्रश्न 'आधी कळस मग पाया' अशा प्रकारचा आहे.

एखाद्या भाषेतील साहित्य अनुवादित होऊन ते दुसर्‍या भाषेत जाण्याची प्रक्रिया कशी होते ते पाहू. उदाहरणार्थ रशियन भाषा घेऊ.

रशियनमधील टॉल्स्टॉय (तल्स्तोइ), दस्तयेव्स्की, चेखोव पासून ते अलीकडल्या पास्तरनाक, आख्मातोवापर्यंतच्या सर्व रशियन लेखकांची भाषान्तरे इंग्रजी मातृभाषा असलेल्या पण हे लेखक आपल्याहि भाषेत यावेत असे वाटणार्‍या रशियन भाषा जाणणार्‍या भाषान्तरकारांनी केले आहेत. कोठेहि रशियन व्यक्तीने इंग्रजीत भाषान्तर करून ते इंग्लंड-अमेरिकेत पोहोचवले आहे असे दिसत नाही. त्याची अनेक कारणे मला सुचतात. सर्वात पहिले म्हणजे इतके सफाईदार इंग्रजी फार थोडया रशियनांना येत असावे. दुसरे म्हणजे कोणा रशियनाने भाषान्तर केलेच तर ते इंग्लंड-अमेरिकेत प्रकाशक छापतील आणि वाचक वाचतील ह्यासाठी लागणारी संपर्क आणि व्यवस्थापनव्यवस्था कोणा रशियनापाशी उपलब्ध असेल असे वाटत नाही. हे मुद्दे संपूर्ण व्यावहारिक पातळीवरचे आहेत पण म्हणून दुर्लक्ष करावेत असे नाहीत.

(सोवियट दिवसात सरकारी पातळीवर अशी भाषान्तरे करून मोठा तोटा सोसून ते सरकार लोकवाङ्मय गृहासारख्या आपल्याच प्रभावळीतील प्रकाशन संस्थांमधून ती भाषान्तरे अन्य देशात प्रसारित करत असे पण ते धाग्यातील प्रश्नाला उत्तर आहे असे कोणी आता म्हणेल असे वाटत नाही. त्या पुस्तकांची आठवणहि आता कोणास येत नाही.)

थोडक्यात म्हणजे पुरेशा इंग्रज-अमेरिकनांना मराठी संस्कृतीचे प्रेम निर्माण झाल्यामुळे अथवा केवळ व्यापारी कारणामुळे मराठीतील अमुक पुस्तक आपल्या देशात भाषान्तरित करून आणल्यास त्याला पुरेसे वाचक मिळतील असे 'तिकडे' वाटायला लागल्याशिवाय भाषान्तराचे हे अवघड कार्य कोणी अंगावर घेईल असे वाटत नाही. धाडसाने कोणी इकडच्याच भाषान्तरकाराने हे शिवधनुष्य उचलायचा प्रयत्न केलाच तर तो अयशस्वी होण्याचीच शक्यता वाटते.

ह्या आधीव्या प्रतिसादात एक यादी दिलीच आहे. अन्य चोखंदळ वाचक काही अन्य याद्याहि पुरवतील. याद्या आणि जंत्र्या करणे अजिबात कठिण बाब नाही. ही सर्वच पुस्तके उत्तम आहेत आणि जागतिक पातळीवर वाचली जाण्याइतपत महत्त्वाची आहेत हेहि आपण वादापुरते मान्य करू. खरा प्रश्न पुस्तके निवडण्याचा नाही, जागतिक वाचकांना ती वाचावी असे वाटायला कसे लावावे हा आहे आणि केवळ भाषान्तरांच्या उपलब्धतेपलीकडे त्याचे उत्तर आहे. ते तुमच्यापाशी आहे का?

थोडे 'सिनिकल' उत्तर असेहि देता येईल की सध्याच्या चालू मराठी तरुण पिढीपर्यंत ही पुस्तके कशी पोहोचतील हा ज्वलन्त प्रश्न आधी सोडवा, जगाचा उद्धार नंतर करू!

(भारतीय पार्श्वभूमि असलेल्या वाङ्मयकृति निर्माण करणारे पण मुळातच इंग्रजीत लिहिणारे लेखक अर्थातच आहेत आणि त्यांपैकी काही यशस्वीहि आहेत पण असे लेखक ह्या चर्चेचा विषय नाहीत.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रशियनमधील टॉल्स्टॉय (तल्स्तोइ), दस्तयेव्स्की, चेखोव पासून ते अलीकडल्या पास्तरनाक, आख्मातोवापर्यंतच्या सर्व रशियन लेखकांची भाषान्तरे इंग्रजी मातृभाषा असलेल्या पण हे लेखक आपल्याहि भाषेत यावेत असे वाटणार्‍या रशियन भाषा जाणणार्‍या भाषान्तरकारांनी केले आहेत. कोठेहि रशियन व्यक्तीने इंग्रजीत भाषान्तर करून ते इंग्लंड-अमेरिकेत पोहोचवले आहे असे दिसत नाही.

असहमत. कृपया हा दुवा पहा.

थोडक्यात म्हणजे पुरेशा इंग्रज-अमेरिकनांना मराठी संस्कृतीचे प्रेम निर्माण झाल्यामुळे अथवा केवळ व्यापारी कारणामुळे मराठीतील अमुक पुस्तक आपल्या देशात भाषान्तरित करून आणल्यास त्याला पुरेसे वाचक मिळतील असे 'तिकडे' वाटायला लागल्याशिवाय भाषान्तराचे हे अवघड कार्य कोणी अंगावर घेईल असे वाटत नाही. धाडसाने कोणी इकडच्याच भाषान्तरकाराने हे शिवधनुष्य उचलायचा प्रयत्न केलाच तर तो अयशस्वी होण्याचीच शक्यता वाटते.

याबद्दलही असहमत.
मराठीच्या इंग्रजी भाषांतराचे अवघड कार्य आतापर्यंत अनेकांनी अंगावर घेतलेले आहे आणि ते यशस्वीपणे करून दाखवलेले आहे. पुढील यादी पहा.
दिलीप चित्रे, मीरा कोसंबी, सुजाता गोडबोले (नारळीकरांच्या एका वैज्ञानिक कादंबरिकेच्या अनुवादिका), प्रिया आडारकर (शांतता! कोर्ट चालू आहे) ही नावे आता लगेच आठवत आहेत. याखेरीज अनुवादकांची नावे आठवत नसली, तरी मराठी अनुवादकांनी केलेले मराठीचे काही इंग्रजी अनुवाद आठवत आहेत.

हे खरे, की यातले फार थोडे अनुवाद इंग्लंड-अमेरिकेतल्या प्रकाशकांनी प्रसिद्ध केलेले आहेत. अशा प्रकाशकांत केवळ 'ऑक्सफर्स युनिव्हर्सिटी प्रेस' आणि 'पेंग्विन' ही दोन नावे दिसत आहेत. परंतु, यांनी प्रकाशित केलेले मराठीचे इंग्रजी अनुवाद हे केवळ भारतापुरतेच प्रकाशित केले आहेत का हे मला जाणून घेता आलेले नाही. त्यामुळे ती पुस्तके खरोखरच जागतिक वाचकापर्यंत पोहोचली आहेत का हे मला माहीत नाही.

आपण या समस्येचे तुकडे पाडूया
१. इंग्रजी अनुवाद करण्याची भाषिक, मानसिक इ. इ. क्षमता असणे- वर दिलेल्या अनुवादकांच्या जंत्रीवरून अशी क्षमता असलेले काही भाषांतरकार तरी आहेत आणि तसे अधिक भाषांतरकार तयार करणे शक्य आहे असे दिसते.
२. अनुवादकांना असे अनुवाद करणे व्यावहारिकदृष्ट्या परवडणे- यासाठी किमानपक्षी भारतीय प्रकाशन संस्था तरी पुढे येण्याची शक्यता निर्माण झाली पाहिजे. पुन्हा वरील जंत्रीतील भाषांतरकारांची प्रकाशित भाषांतरे पाहता, हेही शक्य आहे असे दिसते.
३. हे अनुवाद जागतिक पातळीवर जाणे- यासाठी इंग्लंड-अमेरिकेतील प्रकाशक मिळाले पाहिजेत. असे प्रकाशक दोन प्रकारचे असू शकतात- अकॅडमिक आणि मेनस्ट्रीम. अनुवादिलेले मराठी पुस्तक हे मराठी समाजाचा आणि संस्कृतीचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने पुरेसे महत्त्वाचे असल्यास अकॅडमिक प्रकाशक मिळण्याची शक्यता वाढत असावी. मेनस्ट्रीम प्रकाशकांना तयार करणे हे त्यामानाने फारच अवघड असावे. त्यामुळे मराठीचे अनुवाद जागतिक वाचकापर्यंत पोहोचवण्यातली ही अडचण मी मान्य करते.

परंतु, मला वाटते की जागतिक वाचकापर्यंत पोहोचता येणे कठीण असल्याने इंग्रजी अनुवाद करायचेच नाहीत अशी भुमिका घेण्यापेक्षा इंग्रजी अनुवाद करून ते आधी भारतीय वाचकांपर्यंत पोहोचवून मग इंग्लंड-अमेरिकेतल्या प्रकाशकांचा पाठपुरावा करणे अधिक चांगले. मला या समस्येच्या मुळाशी जाऊन चांगले स्पष्टीकरण देता आलेले नाही, असे मला वाटते आहे. मी प्रयत्न चालू ठेवीन आणि तसे देता आल्यास लगेच येथे टाकेन. Smile

खरा प्रश्न पुस्तके निवडण्याचा नाही, जागतिक वाचकांना ती वाचावी असे वाटायला कसे लावावे हा आहे आणि केवळ भाषान्तरांच्या उपलब्धतेपलीकडे त्याचे उत्तर आहे. ते तुमच्यापाशी आहे का?

सहमत. म्हणूनच तर 'थोडक्यात, जागतिक पातळीवर मिरवावे असे मराठीतले लेखन कोणते हा प्रश्न आहे.' असे म्हटले आहे. आणि त्याचे उत्तर शोधायचा प्रयत्न चालवला आहे.

सध्याच्या चालू मराठी तरुण पिढीपर्यंत ही पुस्तके कशी पोहोचतील हा ज्वलन्त प्रश्न आधी सोडवा, जगाचा उद्धार नंतर करू!

असे 'सिनिकल' उत्तर जर कोणी दिले, तर त्या उत्तराशीही मी असहमत असेन. वरील ज्वलन्त प्रश्न सोडवणे आणि जगाचा उद्धार करणे या दोन्ही गोष्टी एकत्रच का नाही करता येणार?

असो, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राधिका

१००% सहमत आहे.

एकदा का सुरुवात झाली की मेन स्ट्रीम प्रकाशक पण तयार होतील .सुरुवात कुठून तरी व्हायला हवी.एकदा का प्रसिद्धी मिळाली की प्रोफेशनल अनुवादक पण तयार होतील आणि प्रकाशक पण सहज मिळतील.सुरुवातीला त्यात थोडे पैसे कोणाला तरी घालायला लागतील."मेहता प्रकाशन" सारखे लोक सुद्धा यात बरेच काही करू शकतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणजे काय बुवा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राधिका

बा.डी.स.=बाय डिफॉल्ट सहमत
पूर्णपणे सहमती

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाडीस !!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

रशियन मातृभाषा असलेले भाषान्तरकार आपले साहित्य इंग्रजीत नेतांना दिसत नाहीत, उलट रशियन वाङ्मय जाणणारे इंग्रजी-भाषिकच 'अमुक रशियन कृति इंग्रजीत आणू या' असे वाटून ते काम अंगावर घेतात असे मी म्हटले. त्यावर राधिकाताईंनी असहमति नोंदवून व्लादीमिर नाबोकोव ('लोलिता'चा लेखक) ह्याचे उदाहरण दाखविले आहे.

हे उदाहरण मी म्हणतो तोच मुद्दा अधिक बळकट करीत आहे. नाबोकोव हा रशियन उमराव कुटुंबातील होता (minor Russian nobility)आणि रशियन क्रान्तीनंतर लगेचच ते कुटुंब रशिया सोडून इंग्लंडमध्ये गेले. तेव्हा नाबोकोव वीस वर्षांचा होता. अशा कुटुंबात पद्धत होती त्याप्रमाणे रशियात असतांनाहि तो रशियन, इंग्लिश आणि फ्रेंच ह्या तीनहि भाषा उत्तम जाणत होता. (अशा कुटुंबांमध्ये सर्वसाधारण संभाषण रशियनऐवजी फ्रेंचमध्ये चालत असे हे 'War and Peace'च्या वाचकांना चांगले माहीत आहे.) त्याच्या वडिलांनी क्रान्तिविरोधी émigré चळवळीत नंतर बराच भाग घेतला होता.

त्याचे शिक्षण केंब्रिजमध्ये झाले. त्याने सुरुवातीचे लेखन रशियनमध्ये केले पण १९४१ नंतर शेवटापर्यंत तो इंग्लिशमध्येच लेखन करीत असे आणि इंग्लिश लेखक म्हणूनच तो जगापुढे प्रसिद्ध पावला. तरुण वयात तो अमेरिकेस पोहोचला आणि तेथेच त्याचे उर्वरित आयुष्य गेले. रशियन आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषा स्वतंत्र लेखन करण्याच्या पातळीवर तो जाणत असल्याने त्याने काही रशियन कृतींची इंग्लिश भाषान्तरे केली.

पण असे उदाहरण दुर्मिळच असणार. मला स्वतःला भाषान्तराचा अनुभव नाही पण असे वाटते की नाबोकोवसारखी खर्‍या अर्थाने दुभाषी लोक सोडले तर सर्वसाधारणपणे भाषान्तरकर्ता - जरी त्याला दोन्ही भाषा उत्तम येत असल्या तरीहि - ज्या भाषेला तो 'स्वतःची' भाषा असे मानतो त्या भाषेत तो दुसर्‍या भाषेतून भाषान्तर करतो. हे थोडेसे उजव्या-डाव्या हातासारखे आहे. डावखोरा नसलेला मनुष्य नैसर्गिक प्रवृत्तीने उजव्या हाताने लिहितो, यद्यपि डाव्या हाताने लिहिणे त्याला अशक्य नसते. नाबोकोव सारखे खरेखुरे 'सव्यसाची' हे अपवाद असतात. (राधिकाताईंचा भाषान्तराचा चांगला अनुभव आहे, ह्यावर त्या अधिकाराने लिहू शकतील.)

हे जर खरे असले तर इंग्लिश ही 'स्वतःची' भाषा असलेला कोणी भाषान्तरकार स्वयंस्फूर्तीने पुढे होऊन 'अमुक मराठी कृति इंग्लिशमध्ये यायला हवी' अशा विचाराने काही भाषान्तर करेल तर त्याला यशाची शक्यता अधिक आहे. मराठीचा एखादा अभिमानी 'आमचे अमुक साहित्य जागतिक दर्जाचे आहे, ते तुम्ही वाचावे म्हणून मी हा अनुवाद केला आहे' असा प्रस्ताव घेऊन जगाकडे गेला तर त्याच्याकडे कोणी विशेष ध्यान देईल असे वाटत नाही. हे अप्रिय वाटले तरी सत्य आहे असे मला वाटते.

थोडा चाळा म्हणून सध्याचे काही प्रथितयश मराठी लेखक जागतिक पातळीवर कितपत पोहोचले आहेत असा अंदाज घेण्याचा मी प्रयत्न केला. चॅप्टर्सच्या संस्थळावर शोध घेता पु.ल., पेंडसे, नेमाडे, विश्वास पाटील, जीए ह्यांचे एकहि पुस्तक मला सापडले नाही. दिलीप चित्रेंचे 'अनुभवामृत' मिळाले पण 'सेज तुका' नाही. न्यू यॉर्क पब्लिक लायब्ररीमध्ये पुढील पुस्तके मिळाली पण ती मराठीमधील आहेत, इंग्लिश भाषान्तरे नाहीत - (पेंडसे) घागर रिकामी, ऑक्टोपस. तुंबाडचे खोत, (नेमाडे) कोसला, बिढार, (जीए) पिंगळावेळ, रमलखुणा. नेमाडेंचे 'Tukaram' हे मुळातच इंग्लिश असलेले पुस्तक तेथे होते. रेसाइड ह्यांची भाषान्तरे 'Wild Bapu of Garambi', 'Jñaneshwar's Gita आणि 'Gadyaraja'ही मिळाली. त्यांच्या नावाने असलेली अन्य दोनतीन पुस्तके उदा. 'Decade of Panipat' ही त्यांची संशोधनात्मक पुस्तके आहेत म्हणून ती येथे मोजत नाही.

थोडक्यात म्हणजे ह्या चर्चेत 'भाषान्तर झालेली' असा ज्या पुस्तकांचा उल्लेख झाला आहे त्यातील एकहि 'जागतिक' झालेले नाही. थोडेफार यश केवळ रेसाइड ह्यांच्या भाषान्तरांनाच मिळाले आहे. मी आधीच म्हटल्याप्रमाणे ते 'तिकडचेच' आहेत आणि त्यांची मातृभाषा इंग्लिश असून प्रेमापोटी त्यांनी ही मराठीतून भाषान्तरे केली आहेत. असे अधिक रेसाइड जेव्हा मिळतील तेव्हा मराठी साहित्य जागतिक स्तरावर जाऊन पोहोचेल.

मधल्या काळात आपण अधिक निकटची आणि अधिक प्राप्य अशी दोन उद्दिष्टे आपल्यापुढे ठेवावीत असे वाटते - १)महाराष्ट्रातीलच नव्या पिढीला मराठी वाचनाला उद्युक्त करणे. २)अन्य प्रान्तात मराठी साहित्य त्यांच्या भाषेत सोपविणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुस्तक प्रकाशन हा आर्थिक उलाढालीच्या तालावर नाचणारा एक 'धंदा' असल्याने कोणताही प्रकाशक अमुक एक म्हैस किती दूध देईल याचाच विचार अगोदर करतो आणि तोच दृष्टिकोण "अनुवाद" या घटकांसाठी त्याने लावणे [फावल्या वेळेत....होय, मी मुद्दाम या शब्दप्रयोगाचे योजन केले आहे...कोणताही प्रकाशक 'अनुवाद' प्रकरणाकडे सेकंड चॉईस म्हणूनच पाहतो] साहजिकच असल्याने तुमच्या माझ्या मनी असलेले [मराठी] पुस्तक हमखास अनुवादासाठी घेतले जाईल याची शक्यता फार अल्प असते.

मात्र सरकारी साहित्य अकादमी ही संस्था असे अनुवादाचे काम प्रामाणिकपणे करीत असते...किंबहुना साहित्य अकादमीच्या स्थापनेमागील भूमिका ही केवळ त्या त्या भाषेतील सर्वोत्तम पुस्तकांना पारितोषिके देणे इतकेच नसून पुरस्कारप्राप्त कलाकृती मान्यताप्राप्त भारतीय भाषांतून अनुवादीत झाली पाहिजे याकडे कटाक्षाने लक्ष देते. दुर्दैवाने संस्थेच्या कार्याला 'सरकारी' मुद्रा बसली असल्याने तेथील कारभार आणि कारभारी हे सारे टिपिकल 'बाबू' धर्तीचेच असते. "छापले अमुक एक अनुवादीत पुस्तक....आणली त्याचे गठ्ठे प्रेसमधून आणि दिली ठेवून गोडावूनमध्ये...' अशा पातळीवरच तिथे 'कारकुनी' काम चालते असेच चित्र दिसत्ये. साहित्य अकादमीतर्फे ज्या ठिकाणी वर्कशॉप चाललेली असतात त्या ठिकाणीही अशी अनुवादित पुस्तकाच्या विक्रीचा एखादा स्टॉल नसतो.

महाराष्ट्रातील तीनचार जिल्ह्यातील मोठमोठ्या गणल्या गेलेल्या महाविद्यालयात मी ऑडिटनिमित्ताने गेलो असताना [ग्रामीण भागातील मुक्कामाच्यावेळी] रात्रीच्या वेळी काही वाचायला सोबतीला असावे म्हणून त्या त्या अकादमी अनुवादित पुस्तकाच्या पाहणीसाठी जर ग्रंथालयात गेलो तर तिथे जरून मूळ मराठीतील कथा-कादंबर्‍या प्रचंड संख्येने स्टॅकमध्ये माना टाकून पडलेल्या दिसतील...पण एकाही ग्रंथालयात 'साहित्य अकादमी अनुवाद पुस्तके' असा रॅक वा सेक्शन दिसलेला नाही...ही उदासीनता ग्रंथपालांमुळेही आढळली. मी सहज चहापानाच्यावेळी ज्या ज्या ग्रंथपालांच्या [क्वालिफाईड...एम.ए. एम.लिब.सायन्स...युजीसी स्केल प्राप्त नियुक्तीवर असलेले] अनौपचारिक मुलाखती घेतल्या त्यापैकी एकालाही 'साहित्य अकादमीची पारितोषिकप्राप्त अनुवादित पुस्तकांची' सविस्तर, भरघोस अशी माहिती दिसली नाही. फक्त गावातील 'पुस्तके विक्रेते' जे गट्ठे पाठवितात त्यातून संबंधित मराठी विभागप्रमुख + लायब्ररी समिती जी पुस्तके निवडतात, त्यांचे पेमेन्ट कॉलेज करते. बस्स ! अमुक एका विभागप्रमुखाने तमुक 'साहित्य अकादमी प्रकाशने' आग्रहपूर्वक मागितली आहेत असे घडत नाही...हे ग्रंथपाल मंडळीच सांगतात. आजही अशा महाविद्यालयातून [पुणे-मुंबई इथेही हीच स्थिती असेल] 'अनुवादित' पुस्तके म्हणजे 'मेहता पब्लिकेशन्स' सारख्या प्रकाशनसंस्थेमार्फत प्रसिद्ध होत असलेल्या 'जॉन ग्रीशम...स्टीफन किंग...लुडलम' धर्तीच्या वेगवान आणि खपावू कादंबर्‍या.

विविध विद्यापीठांतून 'अनुवादित साहित्य' या विषयावर साहित्य अकादमीतर्फे वेळोवेळी चर्चासत्रे आयोजित केली जातात. त्यातून असेही दिसून आले आहे की मराठीमधल्या कादंबर्‍यांपेक्षाही 'नाटक' हा साहित्यप्रकार बाहेरील राज्यातील वाचकांना खूप भावलेला आहे. त्या नाटकांच्या 'अनुवाद' उपलब्धतेविषयी अकादमीकडे वेळोवेळी विचारणाही होत असते. पण आपल्या [मराठीच्या] दुर्दैवाने अशा कलाकृतीसाठी अकादमीला मराठीतून इंग्रजीसाठी 'भाषांतरकार' मिळत नाहीत [हाही मुद्दा अकादमीच्यावतीने डॉ. गो.मा.पवार, डॉ.अविनाश सप्रे आदीनी प्रामुख्याने मांडला होता]. मराठीतील एखाद्या प्रस्थापिताला जर काही काम अकादमीच्या संबंधित सल्लागार समितीने सांगितले तर ते वेळेत कधीच पूर्ण न होणे, त्याच्याकडेच ते बाड वर्षानुवर्षे पडून राहाणे असे प्रकार घडलेले आहेत. त्यामानाने हिंदी, मल्याळी, बंगाली, कन्नड इतकेच काय पण गुजराथीदेखील फार मोठ्या प्रमाणावर अशी अनुवादाची कामे होत असल्याचा अकादमीचा दाखला आहे.

मराठी कादंबरीच्या इतिहासात माईल स्टोन ठरणारी किरण नगरकरांची 'सात सक्कं त्रेचाळीस' विविध पातळीवर गाजल्यावर ती इंग्रजीत अनुवादित करण्यामध्ये लंडनच्या हाईनमन पब्लिकेशन्सने पुढाकार घेतला होता. सुरुवातीला रेखा सबनीस यानी ते काम स्वीकारले होते, पण त्यांच्याकडून वेळेत न झाल्याने तसेच समर्थ अनुवादकही मिळत नाही असे दिसले. मग क्वीन्सलॅण्ड युनिव्हर्सिटी प्रेस यांच्यावतीने शुभा स्ली* यानी 'Seven Sixes are Forty-three' या नावाने पूर्ण केला. त्या तुलनेत ज्ञानपीठ पारितोषिकाने गौरवण्यात आलेली वि.स.खांडेकरांची "ययाति" ही कादंबरी वाय.पी.कुलकर्णी यानी "Classic Tale of Lust' या शीर्षकाने देखण्यारितीने अनुवादित केली आहे. अनुवादित 'ययाति' चे पुस्तक सादरीकरणही श्रीमंतीचे आहे. व्यंकटेश माडगूळकर यांची 'वावटळ' ही कादंबरी दिल्लीच्या हिंद पॉकेट बुक्सने "Winds of Fire" या नावाने इंग्रजीत प्रकाशित केली होती. हीच कादंबरी नंतर रशियन भाषेतही अनुवादित झाली होती.

राधिका यानी "अशी कोणती मराठी पुस्तके अथवा लेखन आहे, जे इंग्रजीत अनुवादले जाऊन जागतिक वाचकापर्यंत पोहोचावे असे तुम्हाला वाटते..." असाही एक प्रश्न लेखात विचारला आहे. या प्रकारच्या यादीत [कथा कादंबर्‍या टाळून] १. आचार्य अत्रे यांचे 'मी कसा झालो", २. दुर्गा भागवत यांचे "ऋतुचक्र", ३. विजया राजाध्यक्ष यांचे 'शोध मर्ढेकरांचा', ४. इंदिरा संत यांचा "गर्भरेशीम' हा काव्यसंग्रह आणि ५. माधव आचवल यांचे 'जास्वंद' यांचा समावेश झाल्याचे पाहणे व्यक्तिशः मला आवडेल.

{ * 'शुभा स्ली' हे नाव मी प्रथम माझे जालीय मित्र श्री.निवांत पोपट यांच्याकडून ऐकले. किरण नगरकर यांच्या समग्र साहित्यावर यास्मिन लुकमणी यांच्या संपादनाखाली The Shifting World of Kiran Nagarkar's Fiction हे पुस्तक प्रकाशित झाले असून त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करताना 'शुभा स्ली' यांचाही उल्लेख झाला. शुभा स्ली यांच्याबाबतीत त्या आग्रा युनिव्हर्सिटीच्या पदवीधर असून १९६४ पासून ऑस्ट्रेलियात वास्तव्यास होत्या. १९८० मध्ये तिथेच त्यांचे निधन झाले...इतपत माहिती जालावर मिळाली. 'स्ली' आडनावावरून काही अर्थबोध झाला नाही. कुणाला माहीत असल्यास ती माहिती जरूर इथे द्यावी.}

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अशोक काका,

अतिशय मार्मिक प्रतिसाद.

नेमक्या शब्दांत तुम्ही व्यथा मांडली आहे.

पुस्तक प्रकाशन हा आर्थिक उलाढालीच्या तालावर नाचणारा एक 'धंदा' असल्याने कोणताही प्रकाशक अमुक एक म्हैस किती दूध देईल याचाच विचार अगोदर करतो आणि तोच दृष्टिकोण "अनुवाद" या घटकांसाठी त्याने लावणे [फावल्या वेळेत....होय, मी मुद्दाम या शब्दप्रयोगाचे योजन केले आहे...कोणताही प्रकाशक 'अनुवाद' प्रकरणाकडे सेकंड चॉईस म्हणूनच पाहतो] साहजिकच असल्याने तुमच्या माझ्या मनी असलेले [मराठी] पुस्तक हमखास अनुवादासाठी घेतले जाईल याची शक्यता फार अल्प असते.

हे अगदी पटते.
अलिकडच्या काळात हे चित्र थोडे बदलून अनुवादीत पुस्तकांसाठी थोडी स्पर्धा सुरु झाली आहे असे दिसते.

मेहता पब्लिशिंग हाऊस ने अनुवादीत मराठी साहित्य या क्षेत्रात एक प्रकारची एक मक्तेदारी प्रस्थापित केली होती. त्याला तुल्यबळ अशी टक्कर श्रीराम बुक एजन्सी देत होती. (गॉडफादर, पॅपिलॉन, शेल्डनची पुस्तके, इ... ) राजहंस प्रकाशन, मॅजेस्टीक ही ही नावे काही प्रमाणात घेता येतील एवढेच.
अलिकडच्या काळात अनेक प्रकाशकांनी अनुवादीत पुस्तकांच्या क्षेत्रात उडी घेतल्याचे दिसते. पण मेहता वा श्रीराम वाल्यांसारखा दरारा मात्र कोणी निर्माण करु शकले नाही. साकेत प्रकाशनाची काही वाखाणण्यासारखी अनुवादीत पुस्तके आहेत.

१. आचार्य अत्रे यांचे 'मी कसा झालो", २. दुर्गा भागवत यांचे "ऋतुचक्र", ३. विजया राजाध्यक्ष यांचे 'शोध मर्ढेकरांचा', ४. इंदिरा संत यांचा "गर्भरेशीम' हा काव्यसंग्रह आणि ५. माधव आचवल यांचे 'जास्वंद' यांचा समावेश झाल्याचे पाहणे व्यक्तिशः मला आवडेल.

याही बाबतीत सहमत आहे अशोक काका.
या बरोबर पु.शि. रेगे यांची सावित्री व मातृका इंग्रजीत बघायला आवडेल.

अवांतरः तमीळ लेखक अखिलन यांची Chitra pavai ही कादंबरी कोणी वाचली आहे का? मराठीत 'चित्रप्रिया' या नावाने वाचली होती. केवळ अप्रतिम अशी कादंबरी आहे ही. Chitra pavai देखील इंग्रजीत अनुवादित झालेली आहे. या कादंबरीविषयी येथे वाचायला मिळेल.
हा इंग्रजी 'चित्रपावै'चा अ‍ॅमेझॉनचा दुवा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद सागर....

डॉ.कुमुद मेहता यानी रेग्यांच्या 'सावित्री' चा इंग्रजीमध्ये अनुवाद केला आहे....त्याच नावाने न आणता "सावित्री अ‍ॅन्ड अवलोकिता' या नावाने इंग्रजीत आणले आहे. म्हणजे रेग्यांच्या दोन कादंबर्‍या {ज्या छोटेखानीच आहेत} एकत्रित इंग्रजीमध्ये उपलब्ध आहेत. पण 'मातृका' अद्यापि अनुवादित झालेले नाही.

मेहताप्रमाणेच राजहंस आणि मॅजेस्टिक जरूर इंग्रजी टु मराठीकरणामध्ये आघाडीवर आहेत....पण धाग्याचा मुख्य हेतू 'मराठी टु इंग्रजी' असा असल्याने त्यामुळे प्रकाशकांचा मुद्दा प्रातिनिधिक स्वरूपात मी वर प्रतिसादात घेतला आहे....[धागा भरकटू नये म्हणून.].

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डॉ.कुमुद मेहता यानी रेग्यांच्या 'सावित्री' चा इंग्रजीमध्ये अनुवाद केला आहे....त्याच नावाने न आणता "सावित्री अ‍ॅन्ड अवलोकिता' या नावाने इंग्रजीत आणले आहे. म्हणजे रेग्यांच्या दोन कादंबर्‍या {ज्या छोटेखानीच आहेत} एकत्रित इंग्रजीमध्ये उपलब्ध आहेत.

याबद्दल मात्र माहिती नव्हते. धन्यवाद अशोक काका. सावित्री वाचले असल्याने हा इंग्रजी अनुवाद मिळवण्याचा प्रयत्न करतो. कारण अवलोकीता आता बाजारात उपलब्ध नाहिये. तेव्हा इंग्रजीतूनच अवलोकीतेची तहान भागवावी लागणार असे दिसते आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा प्रतिसाद अशोकरावांच्या प्रतिसादाचे खंडन नाही. त्याच्या (निदान भासीत) अन्वयार्थावरून आलेला प्रश्न मांडण्यासाठी अशोकरावांच्या प्रतिसादाखाली लिहितो आहे.
अनुवाद आणि प्रकाशकीय व्यवहार यासंदर्भात आपण एका बाजूला 'पाडस' आणि उमा कुलकर्णींसारख्यांनी केलेले अनुवाद आणि दुसरीकडे पिठाच्या गिरणीतून बाहेर पडणाऱ्या दळणांसारखे अनुवाद यात काही फरक करतो आहोत की नाही?
हा प्रश्न मनात निर्माण झाला आहे. म्हणून विचारला.
गिरणीत दळण टाकण्याचं काम मी केलं आहे, इतका माझा हितसंबंध या प्रश्नामागे आहे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्रा.मो.....

~ मी फार फार सहमत आहे तुमच्या विचाराशी. माझ्याकडून प्रतिसादात विचार मांडताना एक चूक झाली, ती म्हणजे अनुवादाविषयी लिहिताना तिथे ".....काही सन्माननीय अपवाद वगळता" अशी काहीशी 'मस्ट' म्हटली जाणारी शब्दयोजना करणे नितांत गरजेचे होते. पण असो, तुमच्या मार्मिक नजरेतून ती गोष्ट हुकली नाही याचाच मला आनंद आहे.

म्हणजे बघा....मौजेसारख्या मातब्बर प्रकाशन संस्थेने जवळपास ४५ वर्षापूर्वी ['पाडस' प्रथम प्रकाशन १९६७] सादर केलेले हे अतिशय सुंदर पुस्तक आपण आजही विसरू शकत नाही; याचाच अर्थ असाही होतो की जिला 'क्लासिक' म्हटले जाते ती कलाकृती काळाच्या ओघात पुसली जात नाही. पण 'मेहता दळपकांडप...' फॅक्टरीतून बाहेर पडणारे मटेरिअल हे केवळ 'पॉप्युलर जॉन्र' गटातील असल्याने ते वाचले काय वा न वाचले काय, फार मोठा फायदा वा नुकसान होऊ शकत नाही.

उमा कुलकर्णी यानी अनंतमूर्ती, भैरप्पा यांच्यासारख्या दिग्गजांना 'मराठी' समर्थपणे आणले यात दुमत नाही, पण राधिका यांचा धागा 'मराठी ते इंग्रजी' अशा प्रवासाचा असल्याने मी तो मुद्दा प्रतिसादात घेतला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

<'पाडस' आणि उमा कुलकर्णींसारख्यांनी केलेले अनुवाद आणि दुसरीकडे पिठाच्या गिरणीतून बाहेर पडणाऱ्या दळणांसारखे अनुवाद यात काही फरक करतो आहोत की नाही?>

समर्थ अनुवादकाच्या गरजेचा मुद्दा येथे पटतो.

“इयरलिंग” चे मराठीत दोन अनुवाद आहेत..राम पटवर्धन यांचे “पाडस” आणि भा.रा. भागवत यांचे “हरीणशावक”…समजा राम पटवर्धन ह्यांचे पाडस नसतेच तर ??..मग इयर्लिंग वाचकांपर्यंत जसे पोहोचायला पाहिजे तसे ते पोचले असते काय?आणि 'इयरलिंग' वाचकांसाठी किमान दखलपात्र तरी ठरू शकले असते काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इयरलिंग = पाडस
इयरलिंग = हरिणशावक
यात बरेच काही येते.
'पाडस' नसते तर 'इयरलिंग' 'पोचले' नसते, असे माझे वैयक्तिक मत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मूळ पुस्तक : कार्यरत.
लेखक : अनिल अवचट

इङ्ग्रजीत भाषान्तर: Beyond work: visionaries from another India
भाषान्तरकार: Aasha Deodhar; सम्पादन : Rukmini Sekhar
दिल्लीच्या 'विवेका फाउण्डेशन'ने प्रकाशित केले आहे. (http://isbndb.com/d/book/beyond_work_a01.html)

माझ्यासाठी, अनेक जणान्ना वाचायला द्यावे असे हे एक पुस्तक आहे.
भारतात अत्यन्त प्रतिकूल परिस्थितीत विविध सामाजिक/वैद्यकीय/पर्यावरणीय समस्यांवर मूलभूत विचार आणि काम करणार्‍या व्यक्तीञ्चा विस्तृत परिचय करून देणारे पुस्तक. (अवचटाञ्चे असल्याने सोपी भाषा.) इङ्ग्रजीत रूपान्तर झालेल्या पुस्तकात सर्व व्यक्ती समाविष्ट नाहीत.
इङ्ग्रजीत जाणे महत्त्वाचे कारण इतर समस्याम्बरोबरच पर्यावरणाच्या समस्या आणि उर्जेसम्बन्धी जगभरात ओतला जाणारा पैसा पाहता 'अरूण देशपांडे' सारख्या व्यक्तीञ्चे मूलगामी विचार जगभरात पोहोचावे असे प्रकर्षाने वाटते.
या पुस्तकातील काही व्यक्ती, उदा- हिंमतराव बावस्कर, अभय बंग हे त्याञ्च्या शोधनिबन्धान्द्वारे आधीच आन्तरराष्ट्रीय स्तरावर त्याञ्च्या क्षेत्रातील/वैद्यकीय वर्तुळात पोहोचले आहेत परन्तु त्याञ्चे विचार आणि कार्य हे सामान्य जनापर्यन्त पोहोचणे हे देखील महत्त्वाचे वाटते.
-------------------------
'माझा साक्षात्कारी ह्रदयरोग' हे अभय बंग याञ्चे पुस्तक अनेक भाषान्त जावे असे कळकळीने वाटते.
-------------------------
साधारण १९९८ साली, जी.एं. च्या काही निवडक कथाञ्चा इङ्ग्रजी अनुवाद करण्याचे काम एका पॉण्डिचरीतील तरुणाने हाती घेतले होते. पुण्यात, एका प्रकाशन संस्थेने (बहुधा राजहंस प्रकाशन) एका कथेचे जाहीर वाचन आयोजित केले होते. त्यावेळी जी. एं. च्या भगिनीदेखील (बहुतेक) नन्दा पैठणकर उपस्थित होत्या. त्या उपक्रमाचे पुढे काय झाले कळले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विश्वास पाटलांच्या 'महानायक' आणि 'पानिपत'चं इंग्लिश भाषांतर स्वतः लेखकाबरोबर नियमितपणे चर्चा करून केला गेल्याचं मला माहित आहे. (कागद आणि पेनं संपत आले की आणून देण्याचं काम कधीमधी माझ्या गळ्यात पडत असे.) पण प्रकाशनाबद्दल माहित नाही. याच अशोक गोडबोले यांनी मनाच्या श्लोकांचंही भाषांतर केलेलं आहे. ही पुस्तिका छापली गेल्याचं मी पाहिलेलं आहे. तपशील गोडबोल्यांनाच विचारावे लागतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

श्याम मनोहरांच्या सर्व पुस्तकांचा दुसर्‍या भाषांत अनुवाद व्हायला हवा असे नेहमीच वाटते. त्यांच्या पुस्तकांचा इंग्रजी अनुवाद उपलब्ध असल्यास कृपया नोंदवावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>थोडक्यात, जागतिक पातळीवर मिरवावे असे मराठीतले लेखन कोणते हा प्रश्न आहे.<<

हा खरा कळीचा प्रश्न आहे आणि प्रकाशक, अर्थकारण वगैरे उहापोहांमध्ये तो हरवून जातो आहे असं वाटतंय. थोडा 'सिनिकल' होण्याचा धोका पत्करून असं म्हणेन की मराठीत असं साहित्य फारसं नाही. परपुष्ट असण्याचा हा तोटा असावा. अनेक लेखक माझे आवडते असूनही त्यांचा अनुवाद जागतिक पातळीवर मिरवावासा वाटत नाही हे माझ्यासाठी कटू, पण सत्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

"....अनेक लेखक माझे आवडते असूनही त्यांचा अनुवाद जागतिक पातळीवर मिरवावासा वाटत नाही हे माझ्यासाठी कटू, पण सत्य आहे....."

~ काही मतांना आनंदाने सदस्य सहमती दर्शवितात....पण चिंजं यांच्या या मताला "सहमत आहे" असे म्हणताना मला वाईट वाटते...पण नाईलाज आहे, म्हटलेच पाहिजे.

मला वाटते 'समर्थ अनुवादक' मिळणे फार दुरापास्त आहे. कारण मराठीतील 'भाषेची नेमकी कळ' इंग्रजीत जशीच्या तशी अवतरणे फार फार कठीण आहे. डॉ. रेसाईड यानी पेंडशांच्यासमवेत मुरुड परिसर पाहताना अंगावर उपरणे घेतले होते. त्याचे वर्णन करताना डॉ.रेसाईड यानी माधव आचवलाना लिहिले होते, "काल येथील हवेत मुद्दाम अंगवस्त्र घेऊन फिरलो....". आचवलांनी मग 'वस्त्र' आणि 'अंगवस्त्र' यातील फरक त्याना कळविला.....डॉ.रेसाईड भेलकांडूनच गेले असतील मराठीतील शब्दांचे ट्विस्ट पाहून. त्यांच्यासारख्या 'मराठी' विषयाच्या अध्यापकाची ही अवस्था असेल तर मग जी.ए.कुलकर्णी, भालचंद्र नेमाडे, किरण नगरकर, अरुण कोलटकर, मर्ढेकर....आदी दिग्गजांनी जे लिहिले आहे त्याची 'नस' इंग्रजीमध्ये येणे [वा आणणे] महाकठिण काम असू शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा खरा कळीचा प्रश्न आहे आणि प्रकाशक, अर्थकारण वगैरे उहापोहांमध्ये तो हरवून जातो आहे असं वाटतंय.

सहमत.

अनेक लेखक माझे आवडते असूनही त्यांचा अनुवाद जागतिक पातळीवर मिरवावासा वाटत नाही हे माझ्यासाठी कटू, पण सत्य आहे.

जागतिक पातळीवर मिरवण्याजोगे लेखन म्हणजे नेमके कसे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राधिका

थोडक्यात, जागतिक पातळीवर मिरवावे असे मराठीतले लेखन कोणते हा प्रश्न आहे.

या प्रश्नाकडे मी थोड्या व्यापक दृष्टीकोनातून बघतो. लेखन म्हटलं की आपल्याला कथा, कादंबरी इत्यादीच डोळ्यासमोर येतं. पण लेखन त्यापलिकडे जातं. उदाहरण द्यायचं झालं तर विसाव्या शतकाच्या सुरूवातीला र. धों. कर्वे नावाचा गृहस्थ जे विचार मांडत होता ते विचार जागतिक पातळीवर क्रांतीकारक होते. मराठी लोकांच्या गरीबीमुळे म्हणा अज्ञानामुळे म्हणा, एकंदरीत मागासलेपणामुळे म्हणा ते विचार इथल्या भूमीतच रुजले नाहीत. मग त्यांचा वृक्ष होऊन बीजं परक्या भूमीत जाणं बाजूलाच राहिलं. त्या काळच्या सुजाण, लिबरल मराठी वर्गाला विचारलं असतं, की बाबारे, कुठचं लेखन इंग्रजीत नेऊ? तर माहीत असूनही खचितच त्याने कर्व्यांच्या लेखनाकडे बोट दाखवलं नसतं. आज आपण तशीच चूक तर करत नाही ना?

शेक्स्पिअरच्या कितीतरी नाटकांपेक्षा मला 'घाशीराम कोतवाल' अधिक आवडतं.

भाषांतर होण्याजोगं - यात ऐतिहासिक लेखनाचाही समावेश होतो, कारण ते प्रादेशिक दृष्ट्या युनिक असतं. उदाहरणार्थ १८५७ सालच्या बंडाभोवतीचं 'माझा प्रवास'.

तसंच, कलात्मक मूल्यांत टॉप १% मध्ये किंवा टॉप १०% मध्ये नसलेलं (हे कसं ठरवणार हेही बाजूलाच राहूद्यात) पुस्तक असलं तरी मराठी समाजाला भिडलेलं एक पुस्तक इंग्रजी समाजाला वाचायला देण्याची गरज असते. तशी काहीच पुस्तकं नाहीत असं म्हणणं धार्ष्ट्याचं ठरेल.

थोडक्यात मिरवण्यापलिकडे भाषांतराची इतरही कारणं असू शकतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कलात्मक मूल्यांत टॉप १% मध्ये किंवा टॉप १०% मध्ये नसलेलं (हे कसं ठरवणार हेही बाजूलाच राहूद्यात) पुस्तक असलं तरी मराठी समाजाला भिडलेलं एक पुस्तक इंग्रजी समाजाला वाचायला देण्याची गरज असते. तशी काहीच पुस्तकं नाहीत असं म्हणणं धार्ष्ट्याचं ठरेल.

क्वालिटी बेटर दॅन क्वांटिटी हे येथे उधृत करायचा मोह होतो आहे. Smile
घासकडवींशी सहमत आहे. मराठीतील लेखनाची व्याप्ती अपार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मराठी पुस्तकांचे इंग्रजीत अनुवाद व्हायला हवेत, हे खरेच आहे. पण आपण अनुवादापेक्षा वादात फार तरबेज आहोत. विशेषत: संशोधक वृत्तीचे लोक वाद निर्माण करणारे लेखन करतात, असे दिसून येते. राधिका यांनी या लेखात ज्ञानेश्वर आणि तुकारामांचा उल्लेख केला आहे, म्हणून सांगतो. या दोन्ही संतांच्या अभंगांचा वापर करून, एका लेखकाने गणपती ही वारकरी संतांनी त्याज्य ठरविलेली देवता आहे, असा शोधक लेख लिहिला आहे. आजच मी तो वाचला. आपणही वाचा.

गणपती : वारकरी संतांनी त्याज्य ठरविलेली एक देवता

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिलेला लेख वाचता संशोधक वृत्तीचे लोक म्हणण्याऐवजी स्यूडोसंशोधक वृत्तीचे लोक म्हणा Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>>थोडक्यात, जागतिक पातळीवर मिरवावे असे मराठीतले लेखन कोणते हा प्रश्न आहे.<<
<हा खरा कळीचा प्रश्न आहे >
चिं.जं.शी अतिशय सहमत..

चिं.जं.चा प्रश्न कदाचित “आपण मराठी साहित्य सकस,निकस ठरवण्यासाठी साहित्यात सामाजिक ,सांस्कृतिक मुल्ये शोधतो की निखळ साहित्यिक ,वाड:मयीन मुल्ये शोधतो? " असाही विचारता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>थोडक्यात, जागतिक पातळीवर मिरवावे असे मराठीतले लेखन कोणते हा प्रश्न आहे.<<
<हा खरा कळीचा प्रश्न आहे >
चिं.जं.शी अतिशय सहमत..

निपो,
तुमच्या आणि चि.जं. दोघांच्याही मतांचा पूर्ण आदर राखून व अतिशय विचारपूर्वक मी हे विधान करतो आहे.
"जागतिक पातळीवर मिरवावे असे मराठीतले लेखन कोणते? " याचे उत्तर पुढे केव्हातरी अवश्य मिळेल.

पण मुळात मराठी साहित्यात काही दमच नाही ही मानसिकता बदलली पाहिजे. एकदा मानसिकतेत बदल झाला की सौंदर्यस्थळे आपोआप दिसू लागतील.
वरील चिं.जं. च्या विधानातील शब्द बदलले तर शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांपेक्षा बर्मिंगहॅम पॅलेस जास्त सुंदर वाटतो.... या विचारसरणीत मनुष्यस्वभावाला दोष देता येईल. दुसर्‍याचे ते नेहमीच चांगले वाटते, या नियमानुसार साहित्यातही हा प्रकार आहे.

उदाहरण घ्यायचे झाले तर...
साने गुरुजींचे श्यामची आई घेऊयात.
त्यातील निर्मळ शाम जगातील कोणत्या तरी कलाकृतीत तरी सापडेल का? पण आपल्याला साने गुरुजींच्या 'श्यामची आई' पेक्षा अनुवादीत 'तोत्तोचान' अधिक चांगली वाटेल. असो... या अनुषंगाने उद्या अजून सविस्तर लिहायला वेळ मिळाला तर अवश्य लिहीन.

महादेवशास्त्री जोशींची मानिनी कोणत्या इंग्रजी साहित्यात सापडेल? ना.सी. फडकेंची कलंकशोभा , नाथमाधवांची स्वराज्य मालिका, सोनेरी टोळी अशा अनेक उदाहरणांनी हे स्पष्ट करता येईल. फार तर आपल्या मराठी वाचनाचा आवाका मर्यादीत असल्याने व विदेशी साहित्याचे वाचन जास्त असल्याने असे वाटणे गैर नसावे. पण वस्तुस्थिती ही नव्हे याकडेही लक्ष दिले पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा विषय निघाल्यामुळे प्रिया अाडारकरांनी केलेलं 'शांतता! कोर्ट..' चं 'Silence, The Court is in Session' हे भाषांतर अाज वाचलं. माझ्या मते ते तसं चांगलं जमलं अाहे, पण एक घोळ झाला अाहे.

मूळ नाटकात अभिरूप न्यायालयासमोर बेणारेवर 'भ्रूणहत्या' केल्याचा अारोप होतो. मी जेव्हा नाटक (मराठीतून) वाचलं होतं, तेव्हा याचा अर्थ 'गर्भपात' असाच समजलो होतो. (नाटक १९७० च्या अासपास जेव्हा लिहिलं गेलं तेव्हा गर्भपात भारतात बेकायदेशीर होता, अाता काही मर्यादेत तो कायदेशीर अाहे.) अाडारकरांनी मात्र याचं भाषांतर infanticide असं केलं अाहे, त्यामुळे भलताच अनर्थ होतो. गर्भपात कायदेशीर असावा की नाही किंवा तो नैतिक अाहे की नाही, यावर उहापोह होऊ शकेल, पण जन्मलेल्या मुलाला मारून टाकण्याचं समर्थन करणारे मात्र फारच थोडे सापडतील. त्यामुळे मराठीतल्या बेणारेबद्दल जितकी सहानुभूती वाटते, तितकी इंग्रजीतल्या बेणारेबद्दल वाटणं अवघड अाहे.

इंग्रजीत foeticide (अाणि अमेरिकनमध्ये feticide) असा शब्द अाहे, तसाच इंग्लिश कॉमन लॉ मध्ये child destruction असाही शब्दप्रयोग अाहे. अर्थात abortion हाही पर्याय अाहेच. नाटकाचं इंग्रजी भाषांतर करताना कुठला शब्द बरोबर वाटतो यावर 'ऐअ' च्या इतर वाचकांचं मत समजून घ्यायला अावडेल. (Think of it as a parlour-game.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

भ्रूणहत्या म्हणजे foeticide/feticide,पण infanticide नव्हे, हे मला वाटते, अगदी स्पष्ट आहे. 'भ्रूण' हा शब्द 'भृ-बिभर्ति' ह्या धातूपासून निर्माण झाला आहे. धारण केलेला तो भ्रूण, म्हणजेच गर्भ foetus. Infanticide म्हणजे killing of an infant. असे infant गर्भावस्थेच्या पलीकडे जाऊन जन्मलेले असते. सारांश, भ्रूणहत्या foeticide/feticide आणि बालहत्या infanticide ह्या एकच गोष्टी नाहीत.

Manslaughter आणि murder ह्या वरकरणी एकच वाटणार्‍या शब्दांमध्ये जसा सूक्ष्म फरक आहे तसाच येथेहि आहे.

(संपादितः भ्रूण आणि गर्भ ह्यांमध्येहि फरक आहे असे दिसते. धारणेनंतर पहिल्या आट ते दहा आठवडयातील तो भ्रूण. येथे अजूनपर्यंत मानवी आकार दिसू लागलेला नसतो. तो दिसू लागल्यानंतर त्याचा 'गर्भ' होतो. हा मराठी विकिपीडियातील लेख पहा.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>चिं.जं.चा प्रश्न कदाचित “आपण मराठी साहित्य सकस,निकस ठरवण्यासाठी साहित्यात सामाजिक ,सांस्कृतिक मुल्ये शोधतो की निखळ साहित्यिक ,वाड:मयीन मुल्ये शोधतो? " असाही विचारता येईल.<<

सहमत.

>>त्या काळच्या सुजाण, लिबरल मराठी वर्गाला विचारलं असतं, की बाबारे, कुठचं लेखन इंग्रजीत नेऊ? तर माहीत असूनही खचितच त्याने कर्व्यांच्या लेखनाकडे बोट दाखवलं नसतं. आज आपण तशीच चूक तर करत नाही ना?<<

असंच काहीसं होत आहे असं वरचे अनेक प्रतिसाद वाचून म्हणेन. ऑस्करला भारतीय सिनेमे पाठवताना जसे लोक 'ऑस्कर-मिळण्याची-क्षमता'* हा निकष सोडून वेगळ्याच निकषांवर सिनेमे निवडतात, तसंच इथे होताना दिसतं आहे. जुन्या साहित्याचा विचार केला तर काही संतसाहित्य आणि लोकवाङ्मय (ओव्या वगैरे), गाथा सप्तशती, लीळाचरित्र किंवा नंतरच्या काळात गोडसे भटजींचं 'माझा प्रवास', ताराबाई शिंद्यांचं 'स्त्री-पुरुष तुलना', लक्ष्मीबाई टिळकांचं 'स्मृतिचित्रे' अशी काही पुस्तकं भारताविषयी किमान कुतुहल/रस असलेल्या गंभीर परदेशी रसिकाला रुचतील असं वाटतं. समकालीन साहित्याचा विचार केला तर भाऊ पाध्ये, सतीश आळेकर, काही दलित साहित्य, विलास सारंग, अरुण कोलटकर, श्याम मनोहर किंवा मकरंद साठे यांसारखे मोजकेच लेखक समकालीन जागतिक साहित्याकडे गांभीर्यानं पाहणाऱ्या परदेशी रसिकाला आज रोचक वाटू शकतील. बाकीचं बरंचसं मराठी साहित्य हे मराठीच्या परिप्रेक्ष्यात दर्जेदार असलं तरी जागतिक परिप्रेक्ष्यात 'ऑल्सो-रॅन' धर्तीचंच आहे.

* - म्हणजे निखळ दर्जा नव्हे. ऑस्करचा इतिहासच याला पुरेशी साक्ष ठरेल.
प्रतिसाद संपादन करून माझ्या मूळच्या यादीत थोडी भर टाकली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

>>संशोधक वृत्तीचे लोक वाद निर्माण करणारे लेखन करतात, असे दिसून येते. राधिका यांनी या लेखात ज्ञानेश्वर आणि तुकारामांचा उल्लेख केला आहे, म्हणून सांगतो. या दोन्ही संतांच्या अभंगांचा वापर करून, एका लेखकाने गणपती ही वारकरी संतांनी त्याज्य ठरविलेली देवता आहे, असा शोधक लेख लिहिला आहे.इति तेजा<<
>>दिलेला लेख वाचता संशोधक वृत्तीचे लोक म्हणण्याऐवजी स्यूडोसंशोधक वृत्तीचे लोक म्हणा- इति बॅटमन <<

मित्रहो,
तेजा आणि बॅटमन यांनी उल्लेख केलेला ब्लॉग माझा आहे. गणपतीविषयी मी लिहिलेल्या लेखाबद्दल त्यांना मतप्रदर्शन करण्याचा अधिकार आहे. तरीही मी आपणस सांगू इच्छितो की, या लेखात तीव्र प्रतिक्रिया देण्याजोगे काही नाही. वारकरी संतांना गणपतीबद्दल काय वाटते, याचा आढावा गणेशोत्सवानिमित्त मी घेतला आहे. संतांनी गणपतीला निषिद्ध मानणारे अभंग मी जेव्हा प्रथम वाचले, तेव्हा मलाही धक्का बसला होता.

आपल्याकडे धार्मिक अंतर्विरोध खूप आहेत, ही गोष्ट आपण एकदा मान्य केली पाहिजे. आपले दैवत सार्वत्रिक आणि सार्वकालिक आहे, असा समज आपण करून घेतो. मग त्याच्या विरोधी जाणारे मत समोर आले की, आपल्याला धक्का बसतो.

आपण हा लेख येथे वाचू शकाल. वाचा आणि निर्णय पण द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओके. आपल्या धर्मातील अंतर्विरोध ही सर्वप्रसिद्ध गोष्ट आहे. तसेही गणपती हे वैदिक दैवत नाही - गणपती ह्या शब्दावरून शंकरपार्वतीचा मुलगा गजानन. तेव्हा सर्व कार्यारंभी गणेशपूजा करणे हे नंतरच रूढ झालेले आहे. मुळात आपल्या पंथाच्या प्रसारासाठी अन्य दैवतांना विरोध करणे हे खूप जुने आहे, त्याला फार महत्व देण्याचे कारण नाही, असा माझा मोर जेनेरिक डेन स्पेसिफिक सूर होता आणि आहे. तुमचा लेख वरवर वाचल्यामुळे तशी जरा रिअ‍ॅक्शनरी प्रतिक्रिया होती. आता पुन्हा नीट वाचल्यावर जाणवते की त्यात अभिनिवेश नाही, सबब आधीच्या विधानाबद्दल मी आपली माफी मागतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

भाषांतर करणारी व्यक्ती दोन्हीही भाषांमधे पारंगत असली तरच भाषांतर चांगले होते. पडघवलीचं भाषांतर कसं करणार?

बाकी चिंतातुर जंतु यांच्या "मराठीतील साहीत्य जागतिक स्तरावर मिरवण्यासारखं नाही" या सारख्या विधानाला जोरदार आक्षेप. गोनिदा, अत्रे, जी.ए. वगैरेंच्या कादंबर्‍या उत्तम अन ओरीजनल आहेत. फक्त भाषांतरकार प्रचंड हुशार असला तरच भाषेतला गोडवा, खवचटपणा, विखार इंग्रजीत आणता येईल.

असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिल्पा

तुमच्या मतांशी पूर्ण सहमत आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>बाकी चिंतातुर जंतु यांच्या "मराठीतील साहीत्य जागतिक स्तरावर मिरवण्यासारखं नाही" या सारख्या विधानाला जोरदार आक्षेप.<<
जोरदार आक्षेप असण्याला हरकत नाही; मूळ विधानाचा विपर्यास मात्र करू नये ही नम्र विनंती. माझ्या मते जे लिखाण इंग्रजीत जायला हवं अशी काही उदाहरणं माझ्या प्रतिसादात देऊन मग 'बाकीचं बरंचसं मराठी साहित्य हे मराठीच्या परिप्रेक्ष्यात दर्जेदार असलं तरी जागतिक परिप्रेक्ष्यात 'ऑल्सो-रॅन' धर्तीचंच आहे.' असं म्हटलं आहे. माझ्या दृष्टीनं याचा अर्थ 'मिरवण्यासारखं काही नाही' असा होत नाही, तर वेगळा होतो. जागतिक परिप्रेक्ष्यातले दर्जेदार साहित्याचे निकष पाहता मराठीतलं बरंचसं साहित्य त्यात फारसं ओरिजिनल ठरत नाही, हे कटू वाटलं तरी खरं आहे. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

<ग्वाल्हेरहून बाईजाबाई शिंदे यांनी यज्ञाकरिता पाठविलेल्या निमंत्रणावरून गोडसेगुरुजी पेणजवळच्या वरसई येथून ग्वाल्हेरकडे रवाना झाले आणि त्यांनीही १८५७ च्या उठावात सक्रीय भूमिका निभावली , असे प्रा . सुखमणी रॉय यांना संशोधनादरम्यान जाणवले . पुढे प्रत्यक्षात तो यज्ञ पूर्ण झालाच नाही . गोडसेभटजींना यज्ञासाठी निमंत्रण असले , तरी त्यांच्यावर हेरगिरीची किंवा अधिक मोठी जबाबदारी असावी, अशी रास्त शक्यता दिसते.>

भाषान्तर करण्याच्या आणि मराठी साहित्य आन्तरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविण्याच्या प्रयत्नात वस्तुस्थितीचे अतिशयोक्तीतून विडंबन होऊ नये.

बायजाबाईंनी 'निमन्त्रण' पाठवून यज्ञाला बोलविण्याइतके विष्णुभट अखिल भारतीय पातळीवरचे गाजलेले विद्वान होते काय? पुण्यातील रमण्यासारखाच ग्वाल्हेरमधील यज्ञात मोठा देकार होणार आहे अशी बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचल्याने ते आणि काका, आणि असेच अन्य भिक्षुक, प्रवासाला निघाले असे वाचल्याचे आठवते. अनिच्छेने बंडाच्या धामधुमीत सापडण्यापलीकडे अन्य कोठली 'सक्रिय' भूमिका विष्णुभटांनी बंडात 'निभावली' हे सुचत नाही.

त्यांच्यावर हेरगिरीची जबाबदारी कोणी बरे टाकली असावी आणि अशी जबाबदारी मिळण्यासारखी त्यांची पूर्वीची काय कर्तबगारी होती? वैद्यांच्या प्रस्तावनेत असे काही वाचल्याचे आठवत नाही.

'प्रवासवर्णन' वाचल्यावर आपल्यासमोर विष्णुभटजींचे जे चित्र उभे राहते ते एका साध्याभोळ्या, लहान खेडयातल्या गरीब ब्राह्मणाचे. त्यांनी आपला वृत्तान्त लिहावा म्हणून वैद्यच त्यांच्या मागे लागले होते. ह्या प्रतिमेशी भाषान्तरात पोहोचविली जाणारी प्रतिमा जुळत नाही असे ही बातमी वाचून - ती विश्वासार्ह आहे असे मानून - वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म.टा. तली बातमी वाचली.

निदान माझ्या तरी कानांना 'Travails of 1857' हा इंग्रजी शब्दप्रयोग विचित्र वाटला. 'The Travails of 1857' हा जास्त बरा वाटतो, पण थोडासाच. दोन्हीपैकी कशालाच 'माझा प्रवास' ची सर नाही.

बातमीत अाणखी एक असं हास्यास्पद विधान अाहे:

माझा प्रवास हे प्रथम मोडी लिपित लिहिण्यात आले होते व नंतर मराठीत उपलब्ध झाले.

म.टा. च्या बातमीदाराला मराठी अाणि देवनागरी यांतला फरक कळत नाही म्हणजे कठीण अाहे. (तळवलकर इतक्या लवकर रिटायर का झाले?) जगबुडी जवळ अालेली अाहे.

बाकी कोल्हटकरांच्या शंकांशी एकशेदहा टक्के सहमत. मी 'माझा प्रवास' अनेकदा वाचलेलं अाहे, अाणि पुस्तकाची एकूण प्रकृती पाहता विष्णुभट गोडसे काकांसह हेरगिरी करायला गेले होते हा अंदाज काहीच्या काही वाटतो. (तसा ठोस पुरावा असेल तर अर्थात मला मत बदलावं लागेल.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

थोडंसं अवांतर: गोडसे भटजींच्या पुस्तकाच्या दोन निरनिराळ्या आवृत्यांवर प्राची देशपांडे यांनी माझा प्रवास आणि भारतीय इतिहास लेखनाची कुळकथा ह्या नावानं एक अप्रतिम लेख लिहिलाय. तो समाज प्रबोधन पत्रिकेने संपादित केलेल्या इतिहास लेखन मीमांसा ह्या पुस्तक सापडेल. (लोकवांग्मय गृह, २०१०). त्यात १९६६ साली उपलब्ध झालेली गोडसे भटजींची मूळ संहिता आणि १९४८ साली चिंतामणराव वैद्यांनी संपादित केलेली आवृत्ती ह्यांची चिकित्सक तुलना केलीये. "अश्या संपादकीय आणि कथनात्मक व्यवहारांचे परिशीलन केल्यास "आधुनिक" मराठी इतिहासलेखन ज्या गुंतागुंतीच्या परिस्थितीतून उद्भवले त्याचा काही प्रमाणात उलगडा होऊ शकतो अशी माझी भूमिका आहे". मूळ लेख आवर्जून वाचावा असा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

தநுஷ்

तो लेख जालावर इथे वाचता येईल Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असाच मान वाकडी करून वाचावा लागेल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ल्यापटाप कुशीवर उभा धरला तरी चालेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हापिसात वाचायची पंचाईत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डिस्क्लेमर (शिंचा याला एक छानसा मराठी प्रतिशब्द सुचवा हो कुणीतरी. 'श्रेयाव्हेर' इथे लागू पडत नाही. 'वैधानिक इशारा' म्हटल्यावर अगदीच 'टार से भरे हुए फेफडें' नजरेसमोर तरळतात.): १. वर चिंजंनी लिहिल्याप्रमाणे, जागतिक वाचकाच्या दृष्टीनं मराठी साहित्यामधलं नक्की काय दखलपात्र ठरेल याचं भान असणं कळीचं आहे. ते काही माझ्यापाशी नाही. त्यामुळे माझ्या मताला तितपतच वजन असेल.
२. जुन्यापैकी आपण फारसं काही समग्र वाचलेलं नाही. त्याबद्दल मला मत नाही. Sad
३. स्थलकालातीत आशयसौंदर्य किंवा देशकालभाषापरिस्थितीशी निगडीत-अभिन्न आशय (हे दोन निकष परस्परविरोधी भासले तरीही दोघांपैकी कुठलाही एक असणं निर्णायक ठरू शकतं) आणि त्या त्या पुस्तकाचं परपुष्ट नसणं, एवढेच माझे निकष आहेत.
४. यांतल्या काहींचा आधीच अनुवाद झालेला आहे नि मला पत्ताच नाही असंही असू शकेल!
५. उत्तम भाषांतर करणं अतिशय अवघड आहे नि त्याकरता दोन्ही भाषांमध्ये निपुण असलेले भाषांतरकार हवेत, हे तर स्वयंस्पष्ट-सर्वमान्यच आहे.
६. ही आज-आत्ताची मतं आहेत. अजून काही आठवल्यास / मत बदलल्यास हा प्रतिसाद संपादित करण्यात येईल. Wink

सगळेच्या सगळे कुरुंदकर
दया पवार - बलुतं
लक्ष्मीबाई टिळक - स्मृतिचित्रे
दांडेकर - पडघवली, कुणा एकाची भ्रमणगाथा, माचीवरला बुधा
पेंडसे - तुंबाडचे खोत, लव्हाळी
पु.ल. - व्यक्ती आणि वल्ली, बटाट्याची चाळ, हसवणूक
प्रकाश नारायण संत - सगळाच्या सगळा लंपन
मर्ढेकरांची कविता
विंदा - मृद्गंध, स्वेदगंगा
खानोलकर - नक्षत्रांचे देणे
पुशि - मातृका
शेजवलकर - पानिपत
नंदा खरे - दगडावर दगड विटेवर वीट
पद्मजा फाटक - आवजो
सुनीताबाई - आहे मनोहर तरी
जीए - काजळमाया, निवडक पत्रांतली काही निवडक पत्रे, माणसे - अरभाट आणि चिल्लर
तेंडुलकर - घाशीराम कोतवाल
दुर्गाबाई - व्यासपर्व
भारत सासणे - चिरदाह, 'डफ' आणि 'उंट' या कथा (नक्की कुठल्या संग्रहात आहेत आठवेना. :()
मेघना पेठे - हंस अकेला

शिवाय -
१. या पुस्तकांच्या संकल्पना सरळसोट परकीय तरी आहेत किंवा या प्रकारचं लिखाण आधीच इतरत्र झालं तरी आहे, त्यामुळे मी ही पुस्तकं कष्टानं वगळते आहे: नंदा खरे - अंताजीची बखर, नेमाडे - कोसला, आचवल - किमया, गौरीच्या कादंबर्‍या, अवचट - माणसे
२. ही माझ्या मते मराठीत झालेली चांगली भाषांतरं: पाडस (राम पटवर्धन), चौघीजणी (शांता शेळके), काय वाट्टेल ते होईल (पु. ल. देशपांडे), राग दरबारी (भा.का.चं नाव विसरले. :प) ; तर 'भाषांतर कसं असू नये' याचा हा मराठीतला वस्तुपाठ: प्राइड अ‍ॅण्ड प्रेजुडिस (ताराबाई शाळिग्राम)
३. 'हिंदू'कारांनी नायकाच्या तोंडी घातलेलं भाषांतराबद्दलचं एक नमुनेदार मत इथे लिहिल्यावाचून राहवत नाही. (शब्द जसेच्या तसे नाहीत, भाव मनी धरावा!): "मूळ इंग्रजीतून पुस्तके वाचणे बिनकामाचे. भाषांतरात आशय हरवतो वगैरे ठीक. पण विद्यार्थ्याचे इंग्रजी इतके जेमतेम असते की दोन्ही एकूण सारखेच पडते!" ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

लिष्ट भारीच!!!

बाकी शेजवलकरांनी पानिपत हा ग्रंथ स्वतःच मराठी आणि इंग्रजी दोन्हींत लिहिला होता. इंग्रजी ग्रंथ आज हार्डकॉपी रूपात तरी मिळत नाही. नेटवर असल्यास न कळे. त्यांनीच लिहिल्याप्रमाणे

"इंग्रजी ग्रंथ हा संशोधकांसाठी व मुख्यतः यदुनाथ खोडण्यासाठी लिहिला होता, तर मराठी ग्रंथाची मांडणी मजसमोर माझे इतिहासप्रेमी मराठे बांधव बसलेले आहेत आणि मला समक्ष शंका विचारताहेत व मी त्यांना उत्तरे देत आहे, अशा प्रकारची आहे."

मराठी ग्रंथातील काही म्याटर इंग्रजी ग्रंथात नाही, असेही ते लिहितात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हम्म, रैट्ट. बूच मारलेत. आता स्वयंसंपादन शक्य नाही. मागाहून शुद्धिपत्रच लिहू च्यामारी! हाय काय नि नाय काय!
***

पुरवणी / शुद्धिपत्रः
अरुण साधूंची 'मुखवटा' आणि 'सिंहासन' / 'मुंबई दिनांक' घ्यायला लागतील. ('मुखवटा'चं भाषांतर कितपत शक्य कुणास ठाऊक, पण मिरवण्याजोगी कादंबरी आहे ती.)
महेश एलकुंचवारांचं 'मौनराग'.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मृद्गंध - इंदिरा संतांच आहे न? कि त्यांचंपण आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यादी रोचक आहे पण "पु.ल. - व्यक्ती आणि वल्ली, बटाट्याची चाळ, हसवणूक" याने थोडी बुचकळ्यात पडले. भाषिक, सांस्कृतिक, भौगिलिक अशा विसंगतीतून झालेला विनोद, अनुवाद झाल्यावर आपली चमक गमावतो का? हे माझे मत असे नाही पण शंका आहे. जाणकारांनी यावर थोडे विस्तृत लिहिले किंवा अशी उदहरणे दिली तर फार आवडेल.
यावरून आठवले, माझा एक मित्र आहे ज्याचे मराठी-इंग्लिश-जर्मन इत्यादी भाषांवर चांगलेच प्रभुत्व आहे आणि त्याची विनोदबुद्धीही फारच तल्लख आहे. हा मित्र कोठेही गेला की त्याच्या संभाषणचातुर्याने लोक त्याच्याभोवती गोळा होतात. तर हा मित्र, काही महिन्यांसाठी चीनला गेला आणि तिथे तो फारच उदास झाला कारण तिथल्या सहकार्यांना कामापुरते इंग्लिश येत असले तरी त्यातले विनोद कळायचेच नाहीत. त्यामुळे या मित्राची गत धनुष्याशिवाय कुरुक्षेत्रात उतरलेल्या अर्जुनासारखी झाली होती. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भाषांतर यशस्वी होईल की नाही हा पारच वेगळा मुद्दा. कुठली पुस्तके मिरवायला मला आवडतील, तर ही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

याचे इंग्रजी भाषांतर उपलब्ध आहेसे वाटते. (अ‍ॅमेझॉनवर पाहिल्यासारखे वाटते.) (चूभूद्याघ्या.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दया पवार आणि नरेंद्र जाधव यांचे प्रत्येकी एक पुस्तक इंग्लिश आणि जर्मन मध्ये गेले आहे. धर्माधिकारींच्या 'अस्वस्थ दशकाची डायरी'चा गौरी देशपांडेनी इंग्लिशमध्ये अनुवाद केला आहे. वि.स. खांडेकर यांच्या बहुतेक सर्व कादंबर्‍या गुजरातीत अत्यंत लोकप्रिय होत्या..
रा.चि.ढेरे यांचे साहित्य निदान संदर्भ उद्धृत करता यावेत यासाठी तरी इंग्लिशमध्ये जावे. महाराष्ट्राच्या (भारताच्याही) सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय इतिहासाविषयी स्थानिक भाषांतील साहित्याचे फारसे दुवे विकिपीडिआवर उपलब्ध नाहीत. य.दि.फडके, गोविंद तळवलकर यांचे संदर्भसमृद्ध साहित्य इंग्लिशमध्ये आले तर कदाचित विकीद्वारे इतर भाषकांपर्यंत पोचू शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हॉय, रा. चिं. ढेर्‍यांना कस्काय विसरले मी?! 'लज्जागौरी' आणि 'लोकदैवतांचे विश्व' भाषांतरित व्हायला हवीतच.
खेरीज - 'आहे मनोहर तरी'चं भाषांतर बहुतेक गौरी देशपांडेंनीच केले आहे. किशोर शांताबाई काळ्यांचे 'कोल्हाट्याचे पोर' बहुदा फ्रेंचमध्ये भाषांतरित आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

'लज्जागौरी' आणि 'लोकदैवतांचे विश्व' चांगली आहेतच. पण मला 'श्रीविट्ठल-एक महासमन्वय' महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरांचा खोलवर वेध घेणारे म्हणून अधिक आवडते. अवधूतसंप्रदायावर त्यांनी एक प्रबंध लिहिला होता, जो पुढे पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाला त्याचाही आवाका खूप मोठा आहे. संपूर्ण भारतातील शैव शाक्त,कौलमत, नाथपरंपरा, जैनांचे आदिनाथादि तीर्थंकर इत्यादींचे संदर्भ आणि त्यांवरील संशोधनाचे निष्कर्ष यामुळे हे छोटेखानी पुस्तक वाचनीय आणि संग्राह्य झाले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्रीविठ्ठल एक महासमन्वय नुकतच इंग्रजीत आलंय. राईज ऑफ अ फोक गॉड नावाने. anne feldhaus यांनी अनुवाद केलाय ऑक्सफर्ड युनिवर्सिटी प्रेसचं प्रकाशन; २०११

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

தநுஷ்

या प्रतिसादाच्या निमित्ताने मनात घोळणारा एक जुनाच प्रश्न पुन्हा एकदा विचारतो.

भाषांतर अन समीक्षण अशा दोन्ही रूपांनी मराठी साहित्य अन्य भारतीय भाषांत कितपत गेलेय याबद्दल काही पॉइंटर्स कुठे मिळू शकतील का? बर्‍याचदा विखुरलेल्या रूपात हे वाचलेय. आत्ता तुम्ही म्हणालात तसे वि.स.खांडेकर गुजरातीत लोकप्रिय होते तशी काही उदाहरणे वाचल्याचे आठवतेय, पण एखादे पुस्तक अथवा लेख फक्त त्याच थीमला वाहिलेला अजूनपर्यंत कुठे वाचण्यात आला नाही. तुमच्या पाहण्यात तसे एखादे पुस्तक/लेख/काहीही असल्यास कृपया कळविणे हे विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मुंबई, पुणे आणि माणगांव(रायगड जिल्हा) येथे 'आंतरभारती अनुवाद-सुविधा केंद्र' या नावाची निव्वळ अनुवाद या विषयाला वाहिलेली एक संस्था कार्यरत आहे. तिच्यातर्फे अनेक कार्यशाळा, सभा, मेळावे, चर्चासत्रे असे कार्यक्रम होत असतात. विविध भाषक लेखकांना निमंत्रित करून त्यांच्याकरवी त्यांच्या भाषेमध्ये चाललेल्या अनुवादकार्याविषयी निबंध वाचले जातात आणि संस्थेच्या 'माय-मावशी' या मुखपत्र-नियतकालिकात ते प्रसिद्ध केले जातात. या निबंधांव्यतिरिक्त अनुवादासंबंधीचे लेख, अनुवादित पुस्तकांची रसग्रहणे, बोलीभाषांतील प्रवाह अशी अनेकांगी माहितीत्यात असते. पुण्यात मला वाटते 'केल्याने भाषांतर'कडे हे अंक मिळू शकतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हेच लिहायला आले होते. हे त्यांचं संस्थळ. अजून काही माहिती हवी असल्यास परिचितांकडून सहज मिळू शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

क्या बात है!! राही आणि मेघना, बहुत धन्यवाद!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

रारंगढांग : प्रभाकर पेंढारकर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

रारंगढांग वाचल्यावर वाटले होते की ही कादंबरी(?) जर इंग्लंड मधे कोणी लिहली असती तर एक नेटका टिव्ही मुव्ही किंवा तीन भागाची सुबक मालिका बनली असती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या पुस्तकावर चित्रपट यावा अशी फार इच्छा आहे. पुस्तक वाचताना सगळे प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभे राहतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मी श्री. दा. पानवलकरांचं काही वाचलेलं नाही. त्यांचा कुणी चाहता इथे आहे का, त्यांच्या लिखाणाबद्दल बोलू पाहणारा? ते महत्त्वाचे लेखक होते असं म्हणतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

त्यांचा सूर्य नामक एकच कथासंग्रह वाचलाय, तो मस्त आहे. सर्वांना परिचयाची असलेली "सुंदर" कथा त्यात आहे. तो कथासंग्रह भारीच आहे, त्यातही सुंदर ही कथा भाषांतरासाठी अवश्यमेव आहे असे मला वाटते. एका प्राण्याला केंद्रस्थानी ठेवून लिहिलेली मराठीत अन्य कथा आहे का? मला माहिती नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

श्री. दा. पानवलकरांबद्द्ल विजय तेंडुलकरांनी लिहिलं आहे. तेंडुलकरांच्या एका ललित लेख संग्रहात (त्याचं नाव आठवत नाही, पण माणसांवर/व्यक्तिंवर लिहिलेले लेख आहेत त्यात) वाचला होता. (हा लेख अर्थात लेखकाबद्द्ल जास्त आणि लेखनाबद्दल कमी आहे- पण अर्थात अतिशय वाचनीय.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बहूदा "हे सर्व कोठून येते?"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी बरोबर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

उत्तम यादी मिळते आहे. या निमित्ताने भाषांतरीत सोडा, मराठीतच किती चांगले वाचायचे आहे हे अनेकवेळेप्रमाणे आताही जाणवले Smile

बाकी, भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास भाषांतरीत झाला आहे का? नसल्यास सर्वात अगत्याने त्याची गरज आहे Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बॅट्याच्या यादीत समग्र राजवाडे आहेत की. ते भाषांतर महत्त्वाचं आहे खरंच. नि मिरवावं असंही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

समग्र म्हंजे? अजून काय काय उपलब्ध आहे त्यांचं?
हा हन्त हन्त मी फक्त हे एकच वाचलेय Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

'विवाहसंस्थेचा इतिहास' हे बहुदा आठव्या खंडातलं एक प्रकरण आहे फक्त. ठाण्याला झालेल्या साहित्य संमेलनात राजवाडे साहित्य प्रकाशन समिती (का असेच कायसेसे) नाव असलेला एक नाशिकधुळ्याच्या संस्थेचा स्टॉल होता. त्यांच्याकडे सगळे खंड उपलब्ध होते. जरा हुडकाहुडकी केल्यास त्यांचा नंबर मिळेल. इथे कुणाला ठाऊक असल्यास, माहिती पुरवा प्लीज. मीही शोधून पाहते.
***
जालावर हा पत्ता मिळाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आत्ताच अंताजीची बखर आणि बखर अंतकाळची पुन्हा वाचून काढली. भाषांतरापेक्षाही, यावर एक उत्कृष्ट सीरियल तयार करता येईल अशी खात्री वाटली. अर्थातच इतिहासाला 'स्वामी' स्टाइल रोमॅटिकतेने जपणाऱ्या समाजाला हे असलं खरंखुरं वर्णन किती झेपेल याची शंकाच आहे. पण मिरवण्यासाठी हे दोन खंड सुंदर आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोकसत्तामधे या बातम्या मिळाल्या.

अब तक छप्पन्न!
अनुवादाबद्दल लेखक बोलतात तेव्हा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

दुसर्‍या दुव्यावर एका रोचक ब्लॉगचा पत्ता दिला आहे.

राधिका

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राधिका

जीएंच्या कथांचा उर्दूत अनुवाद झालेला आहे (जी ए कुलकर्नी की कहानियां - सलाम बिन रज्जाक ). शिवाय मराठी दलित साहित्याचे देखील उर्दूत अनुवाद झालेले आहेत ( सध्या डिटेल्स नाहीत - मिळाल्या की इथे टाकेन.

नीड या शब्दाच्या संबंधाने 'नीड का निर्माण फिर' (हरिवंशराय बच्चन यांचे आत्मचरित्र)हे पुस्तक आठवते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आयला, जीए चक्क उर्दूत??? जबरीच! हे सलाम बिन रज्जाक मराठीभाषक आहेत/होते की कसे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

होय - श्री रज्जाक यानी हे अनुवाद मूळ मराठीतूनच केले आहेत - हे अनुवादाचे अनुवाद नाहीत.

सलाम बिन रज्जाक आधुनिक उर्दू कथेतले महत्वाचे लेखक आहेत - त्याना स्वतंत्र कथा लेखन आणि अनुवाद या दोहोंसाठी अकादेमी पुरस्कार मिळालेला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहितीकरिता धन्यवाद. सहज कुतूहल म्हणून विचारतो, अनुवाद त्यांना कितपत जमला आहे? जीएंचा अनुवाद म्हंजे साधी गोष्ट नव्हे. (पुरस्कार मिळाला म्हंजे चांगला जमला असेलच, पण स्वतः पाहिले असल्यास तसे मत पाहिजे होते.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अनुवाद माझ्या मते उत्तम आहे...हा पॅसेज बघा ( कथेचं शीर्ष़क - मुक्ती) :

सामने गहरे सब्ज रंग का पहाड गोया किसी के इंतजार में खडा था. पहाड से उपर जाता रास्ता यूं दिखाई दे रहा था जैसे कोई सफेद सांप लहराता चला जा रहा हो. जख्मों से सुलगते हुए अपनें जिस्म को उसने एक चट्टान से टिकाया और दिल बरदाश्ता सा वहीं बैठ गया. इतना अरसा हो गया मगर वह अभी तक रेजा रेजा झडते अपनें मनहूस बदन को ढोने का आदी नहीं हुआ था. वह जहां बैठा था उसके पीछे थोडी उंचाई से कल कल करती पानी की धारा गिर रही थी और जहां पानी जमअ हो रहा था उस के मुकाबिल एक चबुतरानुमा जगह के पास एक बैरागी बैठा था....

बाकी पुरस्कारांवर माझा देखील विश्वास नाही Smile

हे पुस्तक राम पंडितानी प्रकाशित केले आहे. पुस्तक हवे असल्यास पुढील पत्त्यावर मिळेल:

अभिव्यक्ती प्रकाशन ( डॉ राम पंडीत)
४ अटलांटा प्लॉट नंबर २९
सेक्टर ४०
नेरूल पश्चीम
नवी मुंबई ४००७०६

टीप : पुस्तक उर्दूत आहे - देवनागरीत बहुधा अद्याप लिप्यंतरण झालेले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्या बात! मस्त भाषा वाटतीये. असे काही वाचले तर उर्दू नीट समजायला काही अडचण येऊ नये असे वाटते. पुस्तक पत्त्याबद्दल अनेक धन्यवाद!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>>>पुस्तक उर्दूत आहे - देवनागरीत बहुधा अद्याप लिप्यंतरण झालेले नाही. <<<<

तुम्ही उर्दू अनुवाद अरबी लिपी(?) मधे वाचून इथे देवनागरीमधे लिप्यंतर (transcribe) केले आहे काय ? जर का केले असेल तर .....

_________/\_________

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

तसा मी नशीबवान आहे, मला उर्दू लिहीता वाचता येतं Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मिरवता येण्याजोगं आहे की नाही मराठी साहित्य वगैरे अशी शंका पाहून आश्चर्य वाटलं. ताकदीने अनुवाद करतील असे इतर भाषांमध्ये पारंगत मराठी लोक आहेत का अशी थोडी शंका मला आहे-पण नक्कीच आहेत असा आशावादी विचार मी बाळगून आहे. असो.
अनुवाद नक्कीच व्हायला हवेत-वर दिलेल्या याद्यांमधली ही गाजलेली/उत्तम पुस्तके अनुवादित नसतील तर कठीण आहे. मराठी जाणणारे लोक ती इतर भाषिकांपर्यंत पोहोचवण्यात फारच मागे आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साप्ताहिक "लोकप्रभा" मध्ये ऐसी अक्षरे वरील या धाग्याची घेतली गेलेली दखल

दुवा : http://issuu.com/lokprabha/docs/13_june_2014_full_issue_for_website

पान क्रमांक ४७

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपली बरीच नाटके सीगल प्रकाशनातर्फे इंग्रजीत अनुवादित झालीयेत. गो पु देशपांडे, एलकुंचवार, मकरंद साठे, तेंडूलकर, सतीश आळेकर इत्यादी. अर्थातच हे लोक आपले सर्वोत्कृष्ठ नाटककार आहेत. ह्यातले बहुतेक अनुवाद शांता गोखलेंनी केलेत. (ह्यांनी इंग्रजीत मराठी नाटकाचा विस्तृत इतिहास सुद्धा लिहिलाय - प्लेराईट एट द सेंटर. असं पुस्तक खर तर मराठीतच नाहीये) मराठीत खास करून नाटक आणि दलित साहित्य ही दोन समृद्ध दालने आहेत हे भारतीय पातळीवर नीट नोंदलं गेलंय, त्यामुळे मराठीतून काही आणायचं तर नाटक किंवा दलित साहित्य आणू असा विचार दिसतो. खूप उत्तम कविता असूनही ती फारशी अनुवादित झालेली दिसत नाही. (चित्रे, कोलटकर स्वतःच अनुवाद करायचे किंवा सरळ इंग्रजीतच लिहायचे, ते एक बर झालं. डहाके, सारंग, काळसेकर किंवा नवीन लोकांपैकी मंगेश काळे, श्रीधर तिळवे, सलिल ह्यांनी उत्तम कविता लिहूनही त्यांना मराठीतच कुणी वाचत नाही, तर अनुवाद कोण करणार?) पूर्वीच्या ओरीएन्ट लोन्गमन प्रकाशनवाल्यांनी निवडक अनुवादित मराठी दलित साहित्याचे ३ खंड अर्जुन डान्गळे ह्यांच्या कडून संपादित करून घेऊन छापले होते. (सध्या बहुदा मिळत नाहीत). नेमाडेंची कोसला साहित्य अकादमी ने इंग्रजीत ककुन नावाने काढलीये. (ती वाचणे मात्र कष्टप्रद आहे.) मकरंद परांजपेंनी हेमंत जोगळेकरांच्या होड्या ह्या कविता संग्रहाचा इंग्रजी अनुवाद केलाय. दिलीप चित्रेंनी सुद्धा भरपूर अनुवाद केलेत - नामदेव ढसाळ, तुकाराम, हेमंत दिवटे. ह्यात अनुवाद कोण करतो आणि कुठल्या वाचकासाठी करतो ही गोष्ट महत्वाची दिसते. दुसरे म्हणजे, अमराठी संस्कृतीला मराठीतून काय आणावेसे वाटते हे एक आहेच. ऐतिहासिक महत्वाची पुस्तके, गेल्या ५० वर्षात भारतीय पातळीवर नावाजली गेलेली ललित पुस्तके हा साधारण सोर्स दिसतो. आजच्या अकॅडमिक जगाला मराठीतलं काय उपयोगी वाटत ते इंग्रजीत येत असही दिसते. मध्ये एकदा गोविंद नारायण माडगावकर ह्याचं मुंबईचे वर्णन नावाचे पुस्तक इंग्रजीत आलेलं पाहिलं. (मात्र अनुवादकाने मूळ लेखकाच्या नावातून माडगावकर काढूनच टाकलय; ते का ते समजले नाही.)

मराठी संस्कृतीला महत्वाचे वाटतात असे लोक कोण आहेत आणि त्यांना इतर भाषांमध्ये नेण्याचे कोणते प्रयत्न आपण केले ह्याचं एकदा परीक्षण करायला हवय. मराठ्यांची स्वतःला फालतू समजण्याची पाचा उत्तरी गोष्ट साठा उत्तरी जेंव्हा सुफळ संपूर्ण होईल तेंव्हा काय ते खर. शिवाय नेमाडे म्हणतात तसं, आपण उदाहरणार्थ हे बघा आमचा शेक्सपीअर, किंवा आमचा बेकेट वगैरे प्रकाराने आपले लेखक अनुवाद्ण्याने आपल्याला इंग्रजी किंवा अमराठी मापदंड वापरूनच तशी मांडणी करावी लागणार. त्यामुळे सरळ आमचा पण बेहद्द नाममात्र घोडा असं म्हणून अनुवाद करावेत…

माझ साधारण निरीक्षण असं कि गेल्या ५० वर्षातले आपल्याकडचे खरोखरचे ग्रेट लोक आपल्या संस्कृतीतले कदाचित सर्वाधिक कमी वाचले गेलेले लोक असतील. त्यांना भारतीय लेखनातला सो कॉल्ड सर्वोच्च सम्मान सुद्धा नाहीच - अरुण कोलटकर (साहित्य अकादमी मिळाली पण ज्ञानपीठ नाही), नामदेव ढसाळ (साहित्य अकादमीचा पहिला आणि एकमेव जीवन गौरव पुरस्कार, ज्ञानपीठ नाहीच), भालचंद्र नेमाडे (साहित्य अकादमी पण पुन्हा ज्ञानपीठ नाहीच), विजय तेंडूलकर (भारतीय पातळीवर भरपूर गाजून सुद्धा ज्ञानपीठ नाहीच), दिलीप चित्रे (ज्ञानपीठ नाहीच), महेश एलकुंचवार (पुन्हा तेच), रा चिं ढेरे (तेच)…

माझी यादी -

१. विश्वनाथ खैरे - मराठी भाषेचे मूळ; अडगुळ मडगूळ;
२. दुर्गा भागवत -
३. इरावती कर्वे -
४. श्री व्य केतकर -
५. लक्ष्मण शास्त्री जोशी - ह्याचं वैदिक संस्कृतीचा विकास इंग्रजीत आलंय, पण हिंदू धर्म समीक्षा आणि सर्व धर्म समीक्षा यायला हवय.
६. खानोलकर - एक शून्य बाजीराव (हिंदी अनुवाद झालाय)
७. शरद पाटील - दलित साहित्यांचे सौंदर्यशास्त्र
८. राजाराम शास्त्री भागवत - खास करून मराठ्यां संदर्भात चार उद्गार
९. राजवाडे - जितके जमतील तितके
१०. विठ्ठल रामजी शिंदे
११. वसंत आबाजी डहाके
१२. नेमाडे
१३. ढेरे

तूर्तास थांबतो. .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

தநுஷ்

शरद पाटिलांचे मार्क्स-फुले-अंबेडकरवाद नवायन प्रेस इंग्रजीत आणतंय हे ऐकून फारच आनंद झाला. अब्राह्मणीय सौंदर्यशास्त्र देखील यायलाच हवं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जबरी प्रतिसाद. बहुत धन्यवाद.

तदुपरि विश्वनाथ खैर्‍यांचे काम वादग्रस्त नाही काय? आय मीन मराठीचा संबंध कन्नड-तेलुगु आदि सोडून डैरेक्ट तमिऴबरोबर भिडवण्याचा प्रकार त्यांनी केला म्हणून वाचनात आले म्हणून विचारतो..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

खैर्यांचे काम किंचित ढोबळ पद्धतीने झालंय आणि विवादास्पद सुद्धा आहे. पण त्यांच्या अभ्यासाचा आवाका निश्तित मोठा आहे. राजवाड्याप्रमाणे खैरे सुद्धा ऐतिहासिक व्याकरण ह्या भाषिक ढिगार्याचा उपसा काढताहेत. शिवाय राजवाड्यांच ऐतिहासिक व्याकरणाच काम सुद्धा वादग्रस्त आहेच. निदान हे काम जरा व्यापक पातळीवर जाईल; त्यावर चर्चा होइल. म्हणून खैरे सुचवले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

தநுஷ்

हम्म ओक्के.

बाकी राजवाड्यांचे व्याकरण/भाषाविषयक विचार विस्कळीत रूपात थोडे थोडे वाचावयास मिळालेत त्यात ते जिथेतिथे संस्कृत कनेक्शन जोडायचा अट्टाहास करतातसे दिसून येते. त्याला व त्यांच्या अन्य कल्पनेच्या भरार्‍यांबद्दल नेटवर एकाने केलेली खास रोचक कमेंट-"राजवाडे हेच पु.ना.ओकांचे गुरू असावेत" Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं